LibreOffice-Writer-on-BOSS-Linux/C4/Headers-Footers-and-Notes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:46, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: Headers-Footers-notes
Author: Manali Ranade
Keywords: Writer
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफिस रायटरमधील Headers, Footers and Endnotes वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:09 | डॉक्युमेंटमध्ये headers समाविष्ट करणे. |
00:12 | डॉक्युमेंटमध्ये footers समाविष्ट करणे. |
00:15 | पहिल्या पानावरील headers काढून टाकणे. |
00:19 | डॉक्युमेंटसमध्ये footnote आणि endnote समाविष्ट करणे. |
00:24 | आपण GNU Linux ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 वापरणार आहोत. |
00:33 | लिबर ऑफिस रायटर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये page numbers समाविष्ट करण्याची परवानगी देतो. |
00:38 | आपण आपली resume.odt ही फाईल उघडू. |
00:42 | आपल्याला footer मध्ये page numbers जिथे समाविष्ट करायचे आहेत त्या Document मधे जा. |
00:49 | आता डॉक्युमेंटमधील पानावर क्लिक करा. |
00:51 | आता मेनूबारवरील Insertवर क्लिक करू. नंतर Footerवर क्लिक करू. |
00:58 | पुढे Default वर क्लिक करू. |
01:01 | पानाच्या खालच्या भागात Footerसमाविष्ट झालेला आपल्याला दिसेल. |
01:06 | Footer मध्ये page number दाखवण्यासाठी प्रथम Insert वर क्लिक करू. |
01:12 | नंतरFields या पर्यायावर क्लिक करा. |
01:15 | येथे आपल्याला Footerचे विविध पर्याय बघायला मिळतील. |
01:19 | डॉक्युमेंटमध्ये Page Number समाविष्ट करण्यासाठी Page Number वर क्लिक करा. |
01:24 | लगेचच आपल्याला Footer मध्ये 1 हा आकडा दिसेल. |
01:29 | वेगवेगळ्या styles मध्ये page number देण्यासाठी page number वर डबल क्लिक करा. |
01:35 | आपल्याला स्क्रीनवर Edit Fields: Document नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:41 | Formatपर्यायाखाली आपल्याला अनेक पर्याय दिसतील. जसे की A B C in uppercase, a b c in lowercase, Arabic 1 2 3आणि इतर अनेक. |
01:53 | आपल्या आवडीनुसार आपणpage numbering style येथे निवडू शकतो. |
01:58 | येथे Roman i,ii,iii हा पर्याय निवडून नंतर OKवर क्लिक करू. |
02:05 | पानावरील numbering format आपल्याला बदललेला दिसेल. |
02:09 | अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटमध्ये header समाविष्ट करू शकतो. |
02:13 | प्रथम पानावर क्लिक करा. येथे आपल्याला header समाविष्ट करायचे आहे. |
02:17 | आता Insertमेनूवर क्लिक करून नंतरHeaderपर्यायावर क्लिक करा. |
02:23 | Default पर्यायावर क्लिक करा. |
02:26 | पानाच्या वरच्या भागात Headerसमाविष्ट झालेले दिसेल. |
02:30 | Headerमध्ये तारीख समाविष्ट करण्यासाठी Insertवर क्लिक करून मग Fieldsपर्यायावर क्लिक करा. |
02:37 | side मेनूमधीलDateपर्यायावर क्लिक करा. |
02:42 | Headerमध्ये तारीख दिसेल. |
02:45 | तारखेवर डबल क्लिक केल्यावर तारीख दाखवण्याचे शक्य असलेले सर्व फॉरमॅट दिसतील. |
02:51 | येथे आपण 31 Dec, 1999 निवडून OK वर क्लिक करा. |
02:58 | आता मेनूबारवरील Fileमेनूवर क्लिक करा आणि नंतर Page previewपर्यायावर क्लिक करा. |
03:05 | डॉक्युमेंट 50% पर्यंत zoom करू. |
03:09 | आता पानाच्या वरच्या भागात तारीख आणि खाली page number दिसेल. |
03:15 | डॉक्युमेंटच्या सर्व pages वर असेच झालेले दिसेल. |
03:19 | original document वर परत जाण्यासाठी Close Preview चे बटण दाबा. |
03:25 | आपणheader किंवा footer फ्रेमच्या संबंधित टेक्स्टमधील अंतर कमी जास्त करू शकतो. |
03:30 | header किंवा footerला आपण बॉर्डरही देऊ शकतो. |
03:34 | मेनूबारमधील Formatपर्यायावर क्लिक करा आणि नंतरPageवर क्लिक करा. |
03:40 | डायलॉग बॉक्समधील Footer टॅब सिलेक्ट करा. |
03:43 | तुम्हाला हवे ते spacing optionsसेट करा. Left margin 1.00cm ठेवा. |
03:52 | footer मध्ये border किंवा shadow समाविष्ट करण्यासाठी प्रथम Moreह्या पर्यायावर क्लिक करा. नंतर footerमध्ये हवा तो पर्याय सेट करा. |
04:03 | उदाहरणार्थ Footerमध्ये shadow style समाविष्ट करण्यासाठी, Cast Shadow to Top Rightयावर क्लिक करा. |
04:10 | येथे shadow style पर्यायाखाली Position टॅबमध्ये विविध उपलब्ध आयकॉन दिसत आहेत. |
04:18 | आपण border आणि shadow साठी रंगही निवडू शकतो. |
04:23 | उपलब्ध पर्यायाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डायलॉग बॉक्स बघा. |
04:28 | आता OK बटणावर क्लिक करा. |
04:30 | पुन्हा OK बटणावर क्लिक करा. footer मध्ये समाविष्ट केलेले effect आपल्याला दिसतील. |
04:36 | पुढे जाण्यापूर्वी आपल्या डॉक्युमेंटमध्ये अजून एक पान समाविष्ट करा. |
04:41 | त्यासाठी Insert आणि नंतर Manual Break वर क्लिक करूनPage break या पर्याय निवडा. |
04:47 | नंतरOK वर क्लिक करा. |
04:50 | page number 2 आलेला दिसेल. |
04:54 | जर आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावर footer नको असल्यास पहिल्या पानावर कर्सर नेऊन ठेवा. |
05:01 | मग मेनूबारवरील Formatवर क्लिक करा आणि Styles and Formattingवर क्लिक करा. |
05:08 | आता डायलॉग बॉक्समध्ये वरती Page Styles या चौथ्या आयकॉनवर क्लिक करा. |
05:16 | नंतरFirst Page या पर्यायावर राईट क्लिक करा. |
05:20 | Newया पर्यायावर क्लिक करून मग Organiserटॅबवर क्लिक करा. |
05:25 | Nameफिल्डमध्ये समाविष्ट करायच्या new style चे नाव आपण टाईप करू शकतो. |
05:30 | येथे आपणnew first page असे नाव टाईप करू. |
05:35 | Next Style साठी Defaultअसे सेट करू या. |
05:38 | आता डायलॉग बॉक्स मधील Footer टॅबवर क्लिक करा. |
05:42 | default रूपात जर Footer onहा checkbox, unchecked नसल्यास तो uncheck करा. |
05:48 | शेवटी OK वर क्लिक करा. |
05:51 | आपणStyles and Formatting डायलॉग बॉक्सवर परत आलो आहोत. |
05:55 | Page Styles या पर्यायाखाली new first pageही Styleआलेली दिसेल. |
06:01 | आता new first pageवर डबल क्लिक करा. |
06:04 | आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या page व्यतिरिक्त इतर सर्वpages वरfooter दिसेल. |
06:11 | अशाच प्रकारे आपण उपलब्ध असलेल्या व default styles मध्ये बदल करू शकतो. आणि डॉक्युमेंटच्या प्रत्येक पानावर त्या वापरू शकतो. |
06:19 | हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
06:22 | आता लिबर ऑफिस रायटरमध्ये footnotes आणि endnotes बद्दल जाणून घेऊ. |
06:27 | पानाच्या खालच्या भागात त्या पानाशी संबंधित असलेल्या Footnotes दिसतील. |
06:31 | Endnotes चे संकलन डॉक्युमेंटच्या शेवटी केले जाते. |
06:35 | टीपेसाठीची खूण कर्सरच्या सध्याच्या ठिकाणी लिहिली जाईल. |
06:40 | automatic numbering किंवा custom symbol यामधून आपण ती निवडू शकतो. |
06:45 | ह्या पर्यायावर जाण्यासाठी प्रथम मेनूबारमधील Insert वर क्लिक करा. |
06:51 | नंतर Footnote/Endnote वर क्लिक करा. |
06:55 | स्क्रीनवर डायलॉगबॉक्स उघडलेला दिसेल. यामध्ये Numberingआणि Type नामक हेडिंग्ज दिसतील. |
07:02 | यामध्ये Automatic, Character, Footnote आणि Endnote नावाचे चेक बॉक्स आहेत. |
07:08 | Numberingआपल्याला footnotes आणि endnotes साठी अनुक्रमांकांचा पर्याय निवडण्याची परवानगी देते. |
07:15 | Automaticहा पर्याय तुम्ही समाविष्ट केलेल्या footnotes किंवा endnotes ला अनुक्रमांक automatically प्रदान करतो. |
07:24 | हा डायलॉग बॉक्स बंद करा. |
07:26 | automatic numberingही सेटिंग्ज बदलण्यासाठी मेनूबारवरील Toolsपर्यायावर क्लिक करा. |
07:33 | आणि नंतरFootnotes/Endnotes वर क्लिक करा. |
07:37 | AutoNumbering and Styles साठी automatic settings चा पर्याय आहे. |
07:42 | आपल्या आवश्यकतेप्रमाणे या पर्यायांतून निवड करा आणि OK वर क्लिक करा. |
07:49 | Insert आणि नंतर Footnote/Endnote या पर्यायावर क्लिक करा. |
07:54 | करंट footnote साठी अक्षर किंवा चिन्ह खूण म्हणून निश्चित करण्यासाठी Character हा पर्याय निवडावा. |
08:00 | हे अक्षर किंवा अंक यापैकी काहीही असू शकते. |
08:03 | special characterसमाविष्ट करण्यासाठी, character fieldच्या खालील बटणावर क्लिक करा. |
08:09 | आता तुम्हाला जी special characters समाविष्ट करायची असतील त्यावर क्लिक करा. नंतरOKवर क्लिक करा. |
08:17 | आपली निवड स्पष्ट करण्यासाठी Type या शीर्षकाखाली Footnoteकिंवा Endnoteयापैकी एका पर्यायावर क्लिक करा. |
08:24 | आपण Numbering खालील Automaticआणि Type खालीलFootnoteनिवडू या. |
08:29 | OKवर क्लिक करा. |
08:32 | आपल्या footnote फिल्ड default numerical value सहित page च्या खालच्या भागात आलेले दिसेल. |
08:39 | footnote field मध्ये This is the end of first pageहे टेक्स्ट टाईप करा. |
08:45 | आणि नंतर कीबोर्डवरील एंटरचे बटण दाबा. |
08:48 | पानाच्या खालच्या भागात आपल्याला footnote त्यातील टेक्स्टसहित दिसेल. |
08:55 | अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटच्या शेवटी endnote समाविष्ट करू शकतो. |
09:00 | आपण Writer वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:04 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
09:06 | डॉक्युमेंटमध्ये headers समाविष्ट करणे. |
09:09 | डॉक्युमेंटमध्ये footers समाविष्ट करणे. |
09:12 | पहिल्या पानावरील headers काढून टाकणे. |
09:15 | डॉक्युमेंटसमध्ये footnote आणि endnote समाविष्ट करणे. |
09:19 | आता ASSIGNMENT करू. |
09:22 | practice.odt ही फाईल उघडा. |
09:25 | डॉक्युमेंटमध्ये header आणि footer समाविष्ट करा. |
09:28 | header मध्ये authorहे नाव समाविष्ट करा. |
09:31 | footer मध्ये Page Countसमाविष्ट करा. |
09:35 | पानाचा शेवट जिथे होतो तिथे endnote समाविष्ट करा. |
09:39 | डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावरील header काढून टाका. |
09:43 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे |
09:46 | *ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:49 | *तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
09:54 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
09:56 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:00 | *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:04 | *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा. |
10:10 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
10:15 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
10:22 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
10:25 | *spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
10:33 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |