LibreOffice-Suite-Draw/C2/Fill-objects-with-color/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:08, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये तुम्ही,
00:09 ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps
00:15 Page Background सेट करणे,
00:17 नवीन रंग बनविणे शिकाल.
00:20 WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू.
00:24 तुम्ही ऑब्जेक्ट,Colors,Gradients
00:29 Line patterns किंवा hatching आणि
00:32 Pictures ने भरू शकता. येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:42 WaterCycle चित्र रंगवू.
00:46 सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू.
00:54 सूर्या पुढील ढग निवडा.
00:56 context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा.
01:01 “Area” डायलॉग बॉक्स दिसेल.
01:05 “Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा.
01:13 स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा.
01:16 OK वर क्लिक करा.
01:19 याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ.
01:24 area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा.
01:30 प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो.
01:33 असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा.
01:38 इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत.
01:46 अगोदर त्यांचा गट करू.
01:48 shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा.
01:54 context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा.
01:58 ढगांचा गट झाला आहे.
02:00 पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
02:07 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा.
02:23 OK वर क्लिक करा.
02:25 अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3” रंग देऊ.
02:37 अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ.
02:48 याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ.
02:58 नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ.
03:05 त्यांना समान formatting ची गरज आहे, अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू.
03:12 त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1.
03:27 निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे.
03:35 या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल.
03:41 ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा.
03:48 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
03:52 “Line” tab वर क्लिक करा.
03:55 “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा.
04:03 OK वर क्लिक करा.
04:05 water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे.
04:09 आता, झाडाला रंग देऊ.
04:14 डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू.
04:16 context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा.
04:23 झाड संपादीत करू.
04:26 उजव्या बाजूची पाने निवडा.
04:30 context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
04:36 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये,
04:38 “Area” tab वर क्लिक करा.
04:40 “Fill “, खाली Color निवडा.
04:44 खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा.
04:47 OK वर क्लिक करा.
04:49 डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू.
04:57 नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
05:05 Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
05:08 लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील.
05:15 चला “Color” निवडू.
05:18 स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा.
05:21 OK वर क्लिक करा.
05:23 झाडाला रंग दिला आहे.
05:26 group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा.
05:31 याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो.
05:36 आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा.
05:44 हा मार्ग फार सोपा आहे ना?
05:49 सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू.
05:55 निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा.
06:03 पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा.
06:10 “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा.
06:15 Properties मध्ये, Use Shadow box तपासा.
06:20 इतर फिल्ड सक्रिय होतील.
06:24 “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा.
06:29 सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल.
06:33 color फिल्ड मध्ये Gray निवडा.
06:36 OK वर क्लिक करा.
06:39 प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे.
06:44 चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ.
06:48 करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा.
06:55 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये, “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली, “Gradient” वर क्लिक करा.
07:02 Gradient 1 निवडा.
07:04 OK वर क्लिक करा.
07:06 करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत.
07:11 ढगांच्या गटांचा आकार निवडू. context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
07:19 Area tab पर्याय दिसेल.
07:23 Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील.
07:27 Colors, Gradient, Hatching आणि Bitmap.
07:32 लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे.
07:39 हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात.
07:43 Colors tab वर क्लिक करू.
07:46 Properties खाली, Color drop-down वरून Red 3 निवडा.
07:53 RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा.
08:01 R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळ्या मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे.
08:08 आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू.
08:16 येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत.
08:22 RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा.
08:28 पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो.
08:31 color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे.
08:37 यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू.
08:41 “New red” नाव प्रविष्ट करू.
08:44 Add बटनावर क्लिक करा.
08:46 यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे.
08:49 OK वर क्लिक करा.
08:51 आपण नवीन रंग बनविला आहे.
08:54 या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू.
08:59 ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे.
09:03 “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता.
09:10 Gradients छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात.
09:14 उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात.
09:18 Hatching, चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे.
09:24 आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू.
09:28 Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा.
09:33 अगोदर पाहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा.
09:39 Import बटनावर क्लिक करा.
09:42 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09:45 ब्राउज करून Bitmap निवडा.
09:48 Open बटनावर क्लिक करा.
09:50 Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल.
09:55 “New Bitmap” नाव एन्टर करू.
09:58 OK वर क्लिक करा.
10:00 Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे.
10:04 बाहेर येण्यास OK वर क्लिक करा.
10:07 ढगांचे निरीक्षण करा.
10:10 यास CTRLआणि Z दाबून undo करू.
10:14 “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू.
10:19 पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ.
10:22 असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा.
10:26 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
10:31 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा.
10:36 bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा.
10:41 OK वर क्लिक करा.
10:43 पाणी अधिक खरे दिसत आहे.
10:46 टयूटोरियल थांबवून Assignment करा.
10:50 ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा.
10:57 Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा.
11:02 आकाशाला रंग देणे सोपे आहे.
11:06 आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू करायचा आहे.
11:10 कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही.
11:15 context मेन्यु साठी right-click करा.
11:21 “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल.
11:25 “Background” tab वर क्लिक करा आणि “Fill” खाली “Color” निवडा.
11:30 स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू.
11:34 OK वर क्लिक करा.
11:36 Draw विचारेल background setting should be for all pages.
11:41 NO वर क्लिक करा.
11:44 आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे.
11:48 तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता.
11:52 आता, डोंगर निवडू.
11:55 context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा.
11:59 “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा.
12:04 “Fill” च्या खाली “None” निवडा.
12:06 OK वर क्लिक करा.
12:08 ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल.
12:15 undo करण्यास CTRL+Z keys दाबा.
12:20 तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता.
12:25 प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा.
12:34 एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील.
12:41 तुमच्या साठी Assignment आहे.
12:43 तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा.
12:45 पेज ला background द्या.
12:47 काही नवीन रंग बनवा.
12:50 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
12:54 या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे,
13:01 ऑब्जेक्ट भरणे,
13:03 backgroundतयार करणे,
13:05 नवीन स्टाइल तयार करणे शिकलो.
13:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:10 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
13:13 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
13:18 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
13:20 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:23 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13:27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:33 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
13:38 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13:45 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
13:56 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble