LibreOffice-Suite-Draw/C2/Basics-of-working-with-objects/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:26, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 LibreOffice Draw मधील मुलभूत ऑब्जेक्ट्स सह कार्य या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही,
00:11 ऑब्जेक्ट्स कट, कॉपी, पेस्ट,
00:14 हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे.
00:17 ऑब्जेक्ट्स मांडणी,
00:19 ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत,
00:21 समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित,
00:24 समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकू.
00:28 येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suit Verson 3.3.4. वापरत आहोत.
00:37 डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
00:42 या चित्रा मध्ये आणखीन तीन ढग कॉपी आणि पेस्ट करू.
00:47 प्रथम ढग निवडा. Context मेन्यु पाहण्यास right-click करून “Copy” वर क्लिक करा.
00:54 नंतर, पेज वर कर्सर ठेवा पुन्हा Context मेन्यु साठी right-click करून “Paste” वर क्लिक करा.
01:02 आपण फक्त एक ढग पाहू शकतो.
01:05 कॉपी आणि पेस्ट केलेले ढग कुठे आहेत?
01:08 कॉपी केलेला ढग वरील मूळ ढगावर पेस्ट झाला आहे.
01:13 ढग निवडून डावीकडे स्थानांतरीत करू.
01:17 अशाप्रकारे आणखीन एक ढग तयार करू.
01:21 ढग निवडा. Context मेन्यु पाहण्यास right-click करून “Copy” वर क्लिक करा.
01:26 पुन्हा Context मेन्यु साठी right-click करून “Paste” वर क्लिक करा.
01:30 कॉपी केलेला ढग निवडा आणि डावीकडे स्थानांतरीत करा.
01:37 ऑब्जेक्ट्स प्रती बनविण्यास शॉर्ट कट कीज वापरू शकता.
01:41 ऑब्जेक्ट्स कॉपी करण्यास CTRL+C
01:44 पेस्ट करण्यास CTRL+V
01:47 कट करण्यास CTRL+X
01:50 ढग निवडा आणि CTRL आणि C किज एकत्र दाबा.
01:55 ढग कॉपी झाला आहे.
01:57 पेस्ट साठी cntrl आणि v किज एकत्र दाबा.
02:02 ढग निवडून हव्या त्या जागेवर स्थानांतरीत करा.
02:08 हे ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
02:11 draw फ़ाइल ला दोन पेज जोडा.
02:14 पहिल्या पेज वर दोन ऑबजेक्ट काढा.
02:18 ऑब्जेक्ट ,पेज वन वरून पेज टू वर कॉपी करा.
02:22 कॉपी केलेला ऑब्जेक्ट्स कुठे आहे तपासा.
02:25 ऑब्जेक्ट कट आणि पेस्ट करा. या साठी शॉर्ट-कट कीज वापरू शकता.
02:31 कट करताना ऑब्जेक्ट ची प्रत बनली आहे का ते तपासा.
02:36 ढगाचा आकार कमी करू.
02:38 प्रथम, त्यास निवडा.
02:40 आता हैन्ड्ल्स दिसत आहे.
02:43 नंतर एका हैन्ड्ल वर बाणाचे टोक दिसेपर्यंत कर्सर ठेवा.
02:50 माउस चे डावे बटण पकडा आणि ढग लहान करण्यास बाण आतल्या बाजूने drag करा.
02:57 यास मोठे करण्यास बाण बाहेरच्या बाजूने drag करा.
03:00 हा बाण अधिक लांब करण्यास त्यास निवडा.
03:04 आता, एखाद्या हैन्ड्ल वर कर्सर आणा.
03:07 लहान पारदर्शक बाण चौकोन सोबत कर्सर च्या टोका खाली दिसत आहे.
03:14 कीबोर्ड वरील " Shift” कि दाबा. डावे माउस बटण पकडा आणि बाणास हैन्ड्ल वापरून खाली drag करा.
03:25 Shift कि दाबून ऑब्जेक्ट्स चा आकार बदलणे फार सोपे आहे. हो ना?
03:32 हैंडल्स वापरून ऑब्जेक्ट चा आकार बदलण्यास “Dynamic Resizing” म्हणतात.
03:38 याचा अर्थ आपण खरे माप नाही वापरत आहोत.
03:42 ऑब्जेक्ट्स चा अचूक आकार बदलणे आपण पुढच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
03:47 अशाप्रकारे या आयताची रुंदी वाढवू.
03:52 आयत निवडा . कीबोर्ड वरील Shift कि दाबा आणि वरच्या बाजूस drag करा.
03:59 खाली Draw विंडो वरील “Status” बार कडे पहा.
04:03 लक्ष द्या आयताचा आकार पुन्हा बदलल्यास त्याचा विस्थार सुद्धा बदलतो.
04:09 “Status” बार बदललेल्या ऑब्जेक्ट्स चे स्थान आणि विस्तार दर्शवितो.
04:16 येथे दाखविल्या प्रमाणे ढग आणि सूर्य क्रमाने लावू.
04:20 ढगांना ओळखण्यास, सुरवातीपासून डावीकडून उजवीकडे त्यांना 1, 2, 3, 4, असे क्रमांक देऊ.
04:29 क्रमांक देण्यास ढग निवडून त्यावर डबल क्लिक करा आणि 1 टाईप करा.
04:36 अशाप्रकारे इतर ढगांना हि क्रमांक द्या.
04:44 चौथा ढग निवडून सूर्यावर ठेवू.
04:49 याला सूर्याच्या मागे टाकण्यास context मेन्यु साठी ढगावर right-click करा.
04:55 “Arrange” वर क्लिक करून “Send Backward” निवडा.
04:58 चौथा ढग आता सूर्याच्या मागे आहे.
05:02 “Send Backward” एका लेयर ऑब्जेक्ट्स ला उपस्थित ऑबजेक्ट च्या मागे टाकते.
05:07 तीन नंबर ढग निवडून सूर्याच्या वर ठेवू.
05:12 context मेन्यु साठी Right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Send to Back” पर्याय निवडा.
05:18 तिसरा ढग सूर्याच्या आणि चौथ्या ढगाच्या मागे गेला आहे.
05:23 “Send to Back” ऑबजेक्ट ला शेवटच्या लेयर मध्ये पाठवितो.
05:28 स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढगांना अरेंज करणे सोपे आहे.
05:32 चार नंबर ढग निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Bring to Front” निवडा.
05:40 “Bring to Front” ऑब्जेक्ट्स, पहिल्या लेयर मध्ये घेतो.
05:44 तिसरा ढग निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Bring Forward” निवडा.
05:52 “Bring Forward” ऑब्जेक्ट्स ला पहिल्या लेयर पुढे घेतो.
05:57 आता, दुसऱ्या ढगाला निवडून पहिल्या ढगावर ठेवा.
06:01 स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढग रचले आहेत.
06:07 ढगावरील अंक डिलीट करू.
06:10 असे करण्यास, ढग निवडून डबल क्लिक करा. नंतर अंक निवडा आणि किबोर्ड वरील Delete कि दाबा.
06:23 या Assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
06:26 वर्तुळ, चौकोन, आणि चांदणी काढून खाली दाखविल्या प्रमाणे त्यास ठेवा.
06:32 प्रत्येक ऑब्जेक्ट निवडून arrange मेन्यु मधील सर्व पर्याय लागू करा.
06:38 प्रत्येक पर्याय साठी चित्राचे स्थान कसे बदलते ते पहा.
06:44 या स्लाईड वर दाखविल्या प्रमाणे ऑब्जेक्ट ठेवा आणि “bring to front" आणि “sent to back" पर्याय तपासा.
06:53 चला, जसे या स्लाईड मध्ये दर्शित असल्याप्रमाणे, Water Cycle diagram मध्ये झाड जोडू.
06:59 आपण ब्लॉक एरो आणि एक्सप्लोजन वापरून झाड काढू.
07:05 Insert नंतर Slideवर क्लिक करून या Draw file मध्ये नवीन पेज जोडू.
07:11 हे आपल्या फाइल मध्ये नवीन पेज जोडेल.
07:15 झाडाचे खोड काढण्यास Drawing टूलबार वरून “Block Arrows” निवडा.
07:21 उपलब्ध आकार पाहण्यास लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा आणि “Split Arrow” निवडा.
07:28 कर्सर पेज वर ठेवा आणि माउस चे डावे बटण पकडून खाली आणि बाजूला drag करा.
07:35 झाडाचे खोड दोन फांदी सह काढले आहे.
07:39 फांन्दयाना पाने जोडू.
07:42 Drawing टूलबार वरून Stars निवडा.
07:45 लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून “Explosion” निवडा.
07:51 आता, draw पेज वर जाऊ, कर्सर बाणाच्या च्या डाव्या फांदी वर ठेवा. आकार काढण्यास माउस चे डावे बटन पकडून डाव्या बाजूला drag करा.
08:01 आपण झाडाला पाने जोडली आहे.
08:04 आपण या आकाराला झाडाच्या उजव्या फांदी वर हि कॉपी करू शकतो.
08:09 आकार निवडा.
08:11 कॉपी साठी कीबोर्ड वरील CTRL+C key दाबा.
08:15 पेस्ट साठी CTRL+V key दाबा.
08:19 आता, आकाराला झाडाच्या फांदीच्या उजव्या बाजूला घ्या.
08:22 आपण झाड काढले आहे.
08:25 झाडाला निवडून खाली घेऊ.
08:28 फक्त झाडाचे खोड खाली येते, पाने नाही.
08:32 येथे "झाडाचे खोड" आणि दोन "पाने" भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे.
08:38 आता झाडाचे खोड जिथे होते तिथे हलवू.
08:41 "झाडाचे खोड" आणि दोन "पानांना" एक घटक मध्ये एकत्र कसे करतात ते शिकू.
08:47 गटातील कोणताही बदल त्या गटातील सर्व ऑब्जेक्टस ला लागू होईल.
08:53 प्रथम, पेज वर क्लिक करा, ज्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट निवडल्या जाणार नाही.
08:58 नंतर Drawing टूलबार वरून "Select" वर क्लिक करा.
09:02 कर्सर पेज वर आणून page वर क्लिक करा.
09:05 माउस चे डावे बटण दाबून drag केल्यास सर्व ऑब्जेक्ट निवडले जातील.
09:11 तुम्हाला बिन्दुकित आयत दिसेल.
09:14 खात्री करा झाडाचे सर्व ऑब्जेक्ट या आयतामध्ये निवडले आहेत.
09:20 एकांतरित, तुम्ही Shift बटण दाबून आणि नंतर प्रत्येक ऑब्जेक्ट वर क्लिक करून दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट निवडू शकता.
09:28 context मेन्यु साठी Right-click करून “Group” निवडा.
09:32 झाडातील कोणत्याही ऑब्जेक्ट वर क्लिक करा.
09:36 एक ऑब्जेक्ट चा भाग असल्यास हैंडल्स दिसतील.
09:40 हे ऑब्जेक्ट एका घटका प्रमाणे हाताळले आहे.
09:45 त्यांना अवर्गीकृत जसे भिन्न ऑब्जेक्ट करण्यास, झाड निवडा, Right-click करा आणि “Ungroup” निवडा.
09:52 ऑब्जेक्ट अवर्गीकृत होऊन, तीन भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे.
09:56 त्यांचे पुन्हा गट करू.
09:58 Shift कि दाबा आणि एका नंतर एक ऑब्जेक्ट निवडा.
10:03 Right click क्लिक करून 'group" निवडा.
10:06 झाडाला आपल्या मुख्य पेज वर कॉपी करू.
10:10 पेज एक वर कॉपी करण्यास CTRL+C, आणि पेस्ट करण्यास CTRL+V.
10:17 समजा गटातील एक ऑब्जेक्ट संपादित करायचा असल्यास आपण काय करू?
10:23 चला मी ऑब्जेकट्स अवर्गीकृत आणि पुन्हा वर्गीकृत करण्या शिवाय, असे करण्याचा सोपा मार्ग दाखविते
10:30 group निवडून context मेन्यु साठी Right-Click करा.
10:33 “Enter Group” निवडा.
10:35 लक्ष द्या गटाच्या बाहेरील सर्व ऑब्जेकट्स निर्योग्य झालेत.
10:39 फक्त गटातील ऑब्जेक्ट संपादित करू शकता.
10:43 उदाहरणार्थ, झाडाच्या उजव्या बाजूवरील पाने निवडून त्यांचा आकार कमी करू.
10:51 यास अन्डू करण्यास Ctrl + 'Z' दाबा आणि पुढे जा.
10:56 झाडाचा आकार कमी करायला हवा, म्हणजे Water Cycle drawing मध्ये ते योग्य बसेल.
11:02 आपल्याला गटाच्या 'Edit' मोड बाहेर यायला हवे.
11:05 गटाच्या बाहेर येण्यास पेज वर कर्सर ठेवा right-click करून “Exit group” निवडा.
11:13 आता आपण गटाच्या Edit मोड बाहेर आहोत.
11:16 झाड निवडा आणि कर्सर ला खाली उजव्या हैंडल वर आणा.
11:21 कर्सर बाणाचा आकार बदलण्यास वळेल.
11:24 बाणास आतल्या बाजूस drag करा.
11:26 आपण झाडाचा आकार कमी केला आहे.
11:29 या चित्रात आणखीन तीन झाड जोडू.
11:32 झाड निवडा, कॉपी साठी CTRL+C आणि पेस्ट साठी तीन वेळा CTRL+V.
11:39 हे झाडाच्या तीन प्रती बनवेल.
11:41 आपण त्यास हव्या त्या स्थानी घेवू.
11:45 सर्व झाडा साठी हि पायरी पुन्हा करा.
11:51 लक्षात घ्या प्रत्येक झाड तीन ऑब्जेक्ट ने बनले आहे.
11:55 प्रत्येक झाड स्वतः एक गट आहे.
11:58 आपण ऑब्जेक्ट चे गट बनविले आहे.
12:01 चित्रात पाण्याचा भाग जोडू.
12:04 पाण्याला परिणाम देण्यास, आयत च्या पुढे त्रिकोण जोडू आणि नंतर वक्र जोडू.
12:12 त्रिकोण काढण्यास “Drawing” टूलबार वरून “Basic shapes” निवडा.
12:18 लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून “Right Triangle” निवडा.
12:24 त्यास काढून आयत च्या पुढे ठेवू.
12:28 पाण्याच्या हालचाली दाखविण्यास वक्र रंगाने भरलेला काढू.
12:34 “Drawing” टूलबार वरून “Curve” निवडा. “Freeform Line, Filled” निवडा.
12:42 त्रिकोणाच्या वरच्या टोकावर कर्सर ठेवा. माउस चे डावे बटण दाबून खाली drag करा.
12:49 वक्र ला थोडेसे जुळवून घेवू, म्हणजे पाणी वाहते दिसेल.
12:56 त्रिकोण आणि वक्र एकत्र पाणी बनवितात, त्यांचा एक ऑब्जेक्ट चा गट बनवू.
13:03 “Drawing” टूलबार वरून Select वर क्लिक करा.
13:07 कर्सर ला पेज वर आणा, माउस चे डावे बटण दाबून त्रिकोण आणि वक्र समावेश करा.
13:16 Right-click आणि Group निवडा.
13:18 आपणWater Cycle ची मूळ रूपरेषा काढली आहे.
13:23 तुमच्या साठी Assignment आहे.
13:26 हे चित्र स्वतःहून काढा.
13:30 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:33 या मध्ये तुम्ही, ऑब्जेक्ट सह मुलभूत कार्य करणे शिकलात. तसेच तुम्ही,
13:39 ऑब्जेक्ट्स कट, कॉपी, पेस्ट,
13:42 हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे.
13:46 ऑब्जेक्ट्स क्रमबद्ध,
13:48 ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत,
13:50 समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित,
13:53 समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकलात.
13:57 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
14:01 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14:04 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
14:08 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम.
14:11 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:14 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
14:18 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:24 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे.
14:28 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
14:36 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
14:47 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble