LibreOffice-Suite-Base/C4/Database-Design-Purpose-OrganizeTables/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:12, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 ह्यात database design वरील topics आपण बघू.
00:09 database चा उद्देश समजून घेणे.
00:12 आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे.
00:15 माहितीचे tables मध्ये विभाजन करणे.
00:19 Database Design म्हणजे काय?
00:21 Database design म्हणजे databaseचे तपशीलवार data model तयार करणे.
00:28 चांगल्या design द्वारे database,
00:32 अद्ययावत, योग्य आणि परिपूर्ण माहिती देतो.
00:37 म्हणजे विविध स्तरावर माहिती पूर्ण असल्याची खात्री देतो.
00:43 data processing आणि reporting च्या गरजा पूर्ण करतो.
00:48 आणि बदल सहजपणे सामावून घेतो.
00:51 database design मध्ये पुढील steps आहेत.
00:57 database चा उद्देश समजून घेणे.
01:00 आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे.
01:04 माहितीचे tables मध्ये विभाजन करणे.
01:07 माहितीचा भाग columns मध्ये रूपांतरित करणे.
01:11 primary keys नमूद करणे.
01:14 tables मधील संबंध प्रस्थापित करणे.
01:17 design मध्ये सुधारणा करणे.
01:20 normalization rules लागू करणे.
01:23 शेवटी database तपासणे, कार्यान्वित आणि maintain करणे.
01:28 आता पहिली step पाहू.
01:32 database चा उद्देश समजून घेणे.
01:35 आपण simple Library Application बघू.
01:38 सामान्यतः library मध्ये पुस्तके असतात.
01:41 ही पुस्तके नोंदणीकृत सदस्यांना दिली जातात.
01:45 पुस्तके आणि सदस्यांची यादी maintainकरण्यासाठी Library application लागते.
01:51 पुस्तक कोणत्या सदस्याला दिले गेले ह्याची नोंद ठेवावी लागते.
01:56 प्रथम पायरी, आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे.
02:01 database मध्ये संचित करायची सर्व प्रकारची माहिती आपण जमा करणार आहोत.
02:09 Library applicationचा उद्देश आपल्याला माहित आहे. यातील items ओळखू.
02:17 एक म्हणजे पुस्तके.
02:19 पुस्तकाला शीर्षक, लेखक, प्रकाशक आणि किंमत आहे.
02:24 आणि आपण लेखकाची माहिती, जन्मतारीख आणि देश संचित करू शकतो.
02:33 तसेच प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर संचित करू शकतो.
02:38 Library members ची नावे, फोन नंबर्स आणि पत्ते संचित करू शकतो.
02:45 सदस्याला पुस्तक issueकरताना,
02:49 issue date, return date, actual return date आणि checked in status लागेल.
02:56 ह्या प्रत्येक item ला attributes म्हणतात.
03:01 हे प्रत्येक attribute, table मधील column म्हणून दर्शवले जाते.
03:08 आता काही प्रश्न तयार करू.
03:12 प्रकाशकाने Libraryकडे पाठवलेल्या नव्या पुस्तकांची माहिती कशी समाविष्ट करायची?
03:20 सदस्यांची यादी कशी maintain करायची?
03:25 एखादा सदस्य सोडून गेला किंवा त्याचा किंवा तिचा पत्ता बदलला तर काय?
03:32 त्याने पुस्तक परत केल्यावर ही माहिती कशी update करायची?
03:38 आपल्याला कशाप्रकारचा report हवा आहे?
03:42 वाचक कोणती पुस्तके अधिक वाचतात?
03:46 सदस्यांनी तारीख उलटून गेल्यावरही परत न केलेल्या पुस्तकांची यादी कशी तयार करायची?
03:55 आपल्याकडील माहितीचे tablesमध्ये कसे विभाजन करायचे ते पाहू.
04:02 आपल्या माहितीचे किंवा attributesचे विषयानुरूप विभाजन करणार आहोत.
04:11 प्रत्येक विषयाचे एक table बनेल.
04:14 screen वर दाखविल्याप्रमाणे tablesची प्राथमिक यादी दिसेल.
04:21 येथे books आणि members हे मुख्य विषय किंवा एंट्रीज आहेत.
04:26 books आणि members ही दोन tables बनवून सुरूवात करता येईल.
04:33 आता Books table चा तपशील पाहू.
04:37 पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 10 attributes किंवा columns आहेत.
04:43 Title, Author, Publisher, PublisherAddress, PublisherCity, PublisherPhone, PublishYear, Price, AuthorBirthDate आणि AuthorCountry.
04:58 ह्या table मध्ये data कसा दाखवला आहे ते पाहू.
05:03 प्रत्येक row किंवा record मध्ये पुस्तक, लेखक, प्रकाशक ह्यासंबंधीची माहिती संचित केली आहे.
05:13 ह्या design मध्ये दोन उणीवा आहेत.
05:17 एकाच लेखकाची किंवा प्रकाशकाची अनेक पुस्तके असू शकतात.
05:23 लेखक आणि प्रकाशकाचा तपशील अनेक वेळा दाखवला गेल्याचे आपल्या लक्षात येईल.
05:31 जे computer ची जागा वाया घालवते.
05:34 design मधली दुसरी समस्या म्हणजे
05:38 database मध्ये anomaliesचा शिरकाव होण्याची भीती.
05:44 anomaly म्हणजे काय?
05:47 सोप्या शब्दात database मधली error किंवा विसंगती.
05:53 तीन प्रकारच्या anomalies आहेत.
05:57 पहिली म्हणजे insertion anomaly,
06:01 जी नवे record समाविष्ट करताना निर्माण होऊ शकते.
06:06 एक attribute database मध्ये असल्याशिवाय दुसरे विशिष्ट attribute समाविष्ट करता न येणे.
06:14 उदाहरणार्थ Penguin नावाचा नवा प्रकाशक आहे.
06:21 आपल्या library मध्ये Penguin ह्या प्रकाशकाचे एखादे पुस्तक असल्याशिवाय आपले design त्याची माहिती समाविष्ट करू देणार नाही.
06:34 दुसरे म्हणजे deletion anomaly.
06:39 जी रेकॉर्ड डिलिट करताना तयार होते.
06:43 row किंवा record डिलिट करताना database मधील ठरवल्यापेक्षा जास्त माहिती डिलिट होणे.
06:51 उदाहरणार्थ डेटाबेसमध्ये Orient Publishers चे ‘Paradise Lost’ हे शीर्षक असलेले केवळ एक पुस्तक आहे.
07:01 जर हे रेकॉर्ड डिलिट केले तर Orient Publishers ची सर्व माहिती डिलिट होईल.
07:10 तसेच John Milton ह्या लेखकाची माहिती डिलिट होईल.
07:16 आता शेवटची Update Anomaly .
07:21 ही रेकॉर्ड update करताना तयार होते.
07:26 उदाहरणार्थ समजा Cambridge Publishers चा पत्ता बदलला आहे.
07:32 ह्या प्रकाशकासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी Address column update होणे आवश्यक आहे.
07:40 येथे दोन ठिकाणी.
07:43 जर Cambridge ची हजार पुस्तके असतील तर हजार रेकॉर्डसमध्ये address बदलणे आवश्यक आहे.
07:54 समजा एका ठिकाणी address बदलला पण दुस-या ठिकाणी तो बदलायला आपण विसरलो.
08:02 तर आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार नाही. आणि डेटा ची आखंडता गमवावी लागेल.
08:11 ही समस्या कशी सोडवायची?
08:14 डेटाबेस असा redesign करावा की प्रत्येक माहिती एकदाच रेकॉर्ड होईल.
08:20 एकच माहिती अनेक ठिकाणी वारंवार आलेली असेल तर ती वेगळ्या table मध्ये ठेवली पाहिजे.
08:29 कसे ते पाहू.
08:31 आपणBooks table, Books, Authors आणि Publications मध्ये विभागत आहोत.
08:38 प्रत्येक table च्या columns मध्ये केवळ त्याच विषयाची माहिती संचित केली आहे.
08:47 प्रत्येक प्रकाशकाची माहिती एकदाच Publisher table मध्ये संचित करू.
08:55 वेगळ्या Authors table मध्ये एका author ची माहिती केवळ एकदाच संचित करू.
09:04 पुढील पाठात ही tables Books tableला कशी जोडायची ते पाहू.
09:12 आपणDatabase Design च्या पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:19 आपण शिकलो ते थोडक्यात,
09:25 database चा उद्देश समजून घेणे.
09:28 आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे.
09:32 माहितीचे tables मध्ये विभाजन करणे.
09:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:48 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
09:54 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana