LibreOffice-Suite-Base/C2/Tables-and-Relationships/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:11, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Table and Relationships

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:00 LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 यातआपण Base च्या Tables आणि Relationships बद्दल जाणून घेणार आहोत.
00:10 येथे आपण शिकणार आहोत टेबलमध्ये data भरणे.
00:16 Relationshipsची व्याख्या आणि त्यांची निर्मिती.
00:19 LibreOffice Base च्या आधीच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण बेसचा परिचय, databaseचे basics तसेच database आणि टेबल्स बनवणे याबद्दल शिकलो.
00:31 त्या ट्युटोरियल दरम्यान आपण Library नामक database आणि Books नावाचे table ही बनवले होते.
00:42 या ट्युटोरियलमध्ये आपण Library database परत उघडू आणि टेबलमध्ये data कसा भरायचा ते शिकू.
00:51 त्यासाठी आपण LibreOffice Base हा प्रोग्रॅम सुरू करू या.
00:57 त्यासाठी स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या Start button वर क्लिक करा.
01:03 All programs वर क्लिक करा. नंतर LibreOffice Suite मधील LibreOffice Base वर क्लिक करा.
01:12 आपण मागील ट्युटोरियलमध्ये Library database तयार केल्यामुळे आता आपल्याला तो केवळ उघडायचा आहे.
01:21 ते करण्यासाठी open an existing database file या पर्यायावर क्लिक करा.
01:28 Recently Used या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला Library database दिसेल.
01:35 आता Finish या बटणावर क्लिक करा.
01:38 जर तुम्हाला तो दिसत नसेल तर Library database सेव्ह केलेली Windows directory उघडूया. त्यासाठी मध्यभागी असलेल्या Open बटणावर क्लिक करा.
01:50 फाईल मिळाल्यावर त्यावर क्लिक करा. आणि Open बटणावर क्लिक करा.
01:57 आता जर LibreOffice Base हा प्रोग्रॅम आधीपासूनच सुरू असेल तर आपण Library database येथून उघडू शकतो.
02:07 त्यासाठी वरील File menu वर क्लिक करा आणि मग Openवर क्लिक करा.
02:14 आपण Library database ही फाईल जेथे सेव्ह केली आहे ती Windows directory उघडू या.
02:21 Library.odb या फाईलवर क्लिक करा. आणि मग Openवर क्लिक करा.
02:31 आता आपण Library databaseमध्ये आहोत.
02:35 डावीकडील पॅनेलमधील databaseच्या सूचीतील टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा.
02:42 उजवीकडील पॅनेलमधील टेबल्सच्या सूचीत Books हे टेबल असल्याचे दिसेल.
02:48 आता Books या टेबलवर राईट क्लिक करा.
02:53 येथे तुम्हाला निवडण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
02:58 आता या टेबलमध्ये Data भरण्यासाठी Openवर क्लिक करा.
03:04 किंवा आपण टेबल उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक देखील करू शकतो.
03:10 नवी विंडो उघडेल. 'Books – Library – LibreOffice Base: Table Data View'.
03:20 आता आपण प्रत्येक सेलमध्ये टाईप करून Books या टेबलमध्ये Data भरायला सुरूवात करू.
03:31 लक्षात घ्या की Bookid या कॉलमला AutoField आहे.
03:37 याचा अर्थ आपण समाविष्ट करत असलेल्या Data च्या प्रत्येक ओळीला बेस आपोआप चढत्या क्रमाने क्रमांक देईल.
03:48 स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे आता आपण एकेक row च्या सेल्स मध्ये Data भरू या.
04:22 अशा प्रकारे आपल्या Books या टेबलमध्ये sample data च्या 5ओळी आहेत.
04:29 वरील फाईल मेनूमधील close वर क्लिक करून आपण ही विंडो बंद करू या.
04:39 येथे तुमच्यासाठी एक assignment आहे.
04:42 प्रत्येक मेंबरची माहिती उदाहरणार्थ मेंबरचे नाव आणि फोन नंबर असलेले Members नामक टेबल बनवा.
04:53 त्यामध्ये ही पुढील तीन fields समाविष्ट करा.
04:57 Member Id with Field type Integer आणि ही प्रायमरी की बनवा.
05:06 Name with Fieldtype Text
05:10 Phone with Fieldtype Text
05:15 हे झाले की Members टेबल अशा प्रकारे दिसेल.
05:22 आता ही विंडो बंद करा.
05:26 आता आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे Members टेबलमध्ये चार sample members ची माहिती समाविष्ट करू या.
05:35 जसे आपण Books टेबलसाठी केले होते.
05:46 हे झाले की आपण विंडो बंद करू.
05:50 आता मुख्य विंडोवर परत जाऊन टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा.
05:57 आता आपण Books Issued हे तिसरे टेबल बनवू या.
06:04 Books Issued या टेबलमधील fields पुढीलप्रमाणे असतील.
06:09 Issue Id, Field type Integer.
06:16 Book Id,Field type,Integer
06:20 Member Id ,Field type,Integer
06:24 Issue Date,Field type,Date
06:28 Return Date,Field type,Date
06:31 Actual Return Date,Field type,Date
06:35 Checked In,Field type Yes/No Boolean
06:42 अशा प्रकारे आपण Books Issued हे टेबल बनवले आहे.
06:47 आणि आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा sample data आपण टेबलमध्ये भरू या.
06:56 जरी आत्ता याचा काही संदर्भ लागत नसला तरी काय होते हे लवकरच आपल्याला कळेल.
07:17 आता आपल्या Library database मध्ये sample data सहित तीन टेबल्स आहेत.
07:25 आता आपण database मध्ये relationships निर्माण करण्याबद्दल जाणून घेऊ.
07:31 आपण तीन वेगवेगळ्या प्रकारची माहिती संचित करण्यासाठी तीन टेबल्स बनवली आहेत.
07:38 Books, Members आणि Members ना Issue केलेली Books
07:44 तसेच आपण या तीन टेबल्स मध्ये प्रत्येक पुस्तक, प्रत्येक मेंबर आणि वाचायला दिलेले प्रत्येक पुस्तक वेगवेगळे ओळखण्यासाठी तसे columns बनवले आहेत.
07:57 त्या Primary Keys आहेत.
08:00 Primary Keys एक फायदा म्हणजे ती अनेक टेबल्स मध्ये संबंध प्रस्थापित करण्यास मदत करते.
08:10 परंतु आपल्याला या relationshipsची गरज का भासते?
08:13 Books Issued या टेबलकडे लक्ष द्या. येथे आपण Book Id आणि Member Id ही फिल्ड बघू शकतो.
08:23 Books Issued या टेबलमध्ये त्यांची कोणतीही value असू शकते.
08:28 परंतु या टेबलमधील values आणि अनुक्रमे Books and Members या टेबल्समधील values यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
08:38 म्हणजे जर Books टेबलमध्ये Macbeth या पुस्तकाचा Book Id 3 असेल,
08:45 तर Books Issued या टेबलमधील Book Id मध्ये 3 या क्रमांकाच्या सहाय्याने आपण त्याच पुस्तकाशी संदर्भ जोडू शकतो.
08:56 मग आपल्याला ही दोन टेबल्स स्पष्टपणे एकमेकांना जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठेतरी संबंध जोडणे आवश्यक असते.
09:05 उदाहरणार्थ Macbeth हे पुस्तक Ravi Kumar यांना २जून २०११ रोजी दिले गेले आहे.
09:16 किंवा एखादे पुस्तक केवळ लायब्ररीच्या मेंबरला दिले गेले आहे. इतर कोणालाही दिलेले नाही याची खात्री तुम्ही कशी कराल?
09:25 relationships च्या सहाय्याने आपण या सर्व गोष्टी साध्य करू शकतो. ज्यामुळे data एकमेकांना जोडण्यास मदत होते.
09:34 फिल्डसमधील परस्परसंबध प्रस्थापित करून आपल्याला Books आणि Members tables मधील values वापरणे बंधनकारक करता येते.
09:46 हे कसे ते पाहू.
09:48 LibreOffice Baseच्या मुख्य विंडोतील टूल्सवर क्लिक करा. नंतर Relationships वर क्लिक करा.
09:58 येथे एक pop up window उघडेल.
10:03 येथे सगळ्यात वरचे टेबल सिलेक्ट करा आणि add या बटणावर क्लिक करा. तसेच आता हे सर्व इतर दोन टेबलसाठी पुन्हा करा.
10:15 ही pop up window बंद करा.
10:18 आता आपल्याला Books, Books Issued आणि Members तिन्ही टेबल्स एका ओळीत दिसतील.
10:26 क्लिक, ड्रॅग व ड्रॉप यांचा उपयोग करून टेबल्समध्ये योग्य ते अंतर ठेवा.
10:35 आता Books टेबलमधील Book Id वर क्लिक करा आणि ते ड्रॅग करून Books Issued या टेबलमधील Book Id वर ड्रॉप करा.
10:48 ह्या दोन field ची नावे जोडणारी एक रेषा दिसेल. अशा पध्दतीने आपण तिथे एक Relationship प्रस्थापित केली आहे.
10:57 आता आपण MemberId साठी पुन्हा तसेच करू या.
11:02 मेंबर्स टेबलमधील MemberId वर क्लिक करून ते ड्रॅग करा आणि Books Issued टेबलवर ड्रॉप करा.
11:11 आपण आत्ताच प्रस्थापित केलेल्या दोन्ही relationships तुम्ही बघू शकता.
11:16 अशा पध्दतीने आपण relationships प्रस्थापित करू शकतो.
11:20 आणि त्यामुळे relational database मधील विविध टेबल्समधील संचित केलेला अर्थपूर्ण data एकमेकांशी जोडला जातो.
11:30 अशा प्रकारे आपण Tables and Relationships वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:36 टेबलमध्ये data समाविष्ट करणे आणि relationships प्रस्थापित करणे या बद्दल आपण शिकलो.
11:45 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:57 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे.
12:03 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
12:08 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pravin1389