Linux/C3/More-on-grep-command/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:41, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 more on grep वरील पाठात आपले स्वागत.
00:05 ह्यामधे शिकणार आहोत,
00:07 grepच्या आणखी कमांडस,
00:10 आणि उदाहरणे.
00:13 या पाठासाठी वापरणार आहोत,
00:16 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
00:20 GNU BASH वर्जन 4.2.24.
00:24 ह्या पाठाच्या सरावासाठी GNU bash च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:31 तसेच तुम्हाला,
00:33 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान,
00:36 grepसंबंधीचे ज्ञान असावे.
00:39 संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:45 आपण एकापेक्षा अधिक पॅटर्न्स देखील जुळवून बघू शकतो .
00:49 त्यासाठी hyphen e पर्याय वापरावा लागेल.
00:53 मी grepdemo.txt हीच फाईल वापरणार आहे.
00:58 समजा civil किंवा electronicsमधे कोण आहे ह्यासंबंधीची माहिती हवी आहे.
01:05 टर्मिनलवर टाईप कराः
01:07 grep space hyphen e space डबल कोटसमधे electronics कोटस नंतर space hyphen e space डबल कोटसमधे civil कोटस नंतर space grepdemo.txt
01:24 एंटर दाबा. ,अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
01:28 समजा choudhury नावाच्या व्यक्ती शोधायच्या आहेत.
01:33 वेगवेगळ्या व्यक्ती नावांचे स्पेलिंग वेगवेगळ्या पध्दतीने करतात.
01:38 यावर उपाय काय?
01:42 अशा वेळी hyphen e पर्याय hyphen i बरोबर वापरू शकतो.
01:48 टाईप करा: grep space hyphen ie space डबल कोटसमधे chaudhury कोटस नंतर space hyphen ie space डबल कोटसमधे chowdhari कोटस नंतर space grepdemo.txt
02:12 एंटर दाबा.
02:14 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
02:16 परंतु नावे इतर अनेक पध्दतीने लिहीता येतात.
02:23 आपण hyphen e पर्याय किती वेळा वापरू शकतो?
02:26 आपल्याला ह्यापेक्षा अधिक चांगली पध्दत हवी आहे आणि ती आहे रेग्युलर एक्सप्रेशन्स.
02:33 रेग्युलर एक्सप्रेशन टेक्स्ट स्ट्रिंग्ज जुळवून बघण्याच्या सुटसुटीत आणि लवचिक पध्दती प्रदान करते
02:41 विशिष्ट अक्षरे, शब्द किंवा अक्षरांचे पॅटर्न्स.
02:47 अक्षरांचे रेग्युलर एक्सप्रेशन्स अनेक आहेत.
02:52 आपण एकेक करून बघू.
02:55 कॅरॅक्टर क्लास.
02:57 हे चौकटी कंसामधे अक्षरांचा संच प्रदान करण्याची परवानगी देते .
03:03 या अक्षरांच्या संचामधील एकेक अक्षराशी जुळवून बघितले जाते.
03:08 उदाहरणार्थ [abc] चा अर्थ हे रेग्युलर एक्सप्रेशन a किंवा b किंवा c अक्षराशी जुळवून बघितले जाईल.
03:18 chaudhury नाव जुळवण्यासाठी प्रॉम्प्टवर टाईप कराः
03:23 grep space hyphen i space डबल कोटसमधे ch चौकटी कंस सुरू ao चौकटी कंस पूर्ण चौकटी कंस सुरू uw चौकटी कंस पूर्ण dh चौकटी कंस सुरू ua चौकटी कंस पूर्ण r चौकटी कंस सुरू yi चौकटी कंस पूर्ण डबल कोटस नंतर space grepdemo.txt
03:54 एंटर दाबा.
03:56 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
03:59 तरी अजून दोनदा e असलेले choudhuree नाव जुळले नाही.
04:03 मोठी रेंज नमूद करायची असल्यास आपल्याला लिहावे लागेल:
04:08 रेंजमधील पहिले अक्षर dash शेवटचे अक्षर
04:13 समजा एखादा अंक जुळवून बघायचा असेल तर [0-9] लिहावे लागेल.
04:20 या अक्षरांच्या संचातील एकेक जुळवून बघितले जाते.
04:24 Asterisk: asterisk त्याच्या आधीच्या अक्षराची शू्न्य किंवा अधिक वेळा उपस्थिती सुचवतो.
04:33 उदाहरणार्थ ab asterisk हे a,ab,abb,abbb इत्यादी बरोबर जुळवून बघेल.
04:44 Mira नावाच्या विद्यार्थीनींच्या नावाशी जुळवून बघण्यासाठी
04:48 प्रॉम्प्टवर टाईप करा:
04:51 grep space hyphen i space डबल कोटसमधे m चौकटी कंस सुरू ei चौकटी कंस पूर्ण asterisk r a a asterisk कोटस नंतर space grepdemo.txt
05:12 एंटर दाबा.
05:14 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
05:16 dot रेग्युलर एक्सप्रेशन कुठलेही एक अक्षर जुळवून पाहतो.
05:21 समजा एखादा Mने सुरू होणारा 4 अक्षरी शब्द शोधायचा आहे.
05:29 त्यासाठी टाईप करा,
05:31 grep space डबल कोटसमधे M... space कोटस नंतर space grepdemo.txt
05:44 एंटर दाबा.
05:46 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
05:48 येथे कोटसमधीलspace महत्त्वाची आहे कारण त्यामुळे 5 किंवा अधिक अक्षरांचा शब्द जुळवून पाहिला जाणार आहे.
05:56 आपला पॅटर्न शोधण्यासाठी ओळीमधील विशिष्ट भाग देखील नमूद करू शकतो.
06:01 तो ओळीच्या सुरूवातीला असू शकतो.
06:04 त्यासाठी caret हे चिन्ह आहे.
06:07 समजा अशा एंट्रीज हव्या आहेत ज्यांचा roll नंबर A ने सुरू होतो.
06:14 फाईलमधे rollहे पहिले फिल्ड आहे.
06:19 प्रॉम्प्टवर टाईप करा: grep spaceडबल कोटसमधे caret sign A कोटस नंतर grepdemo.txt
06:29 एंटर दाबा.
06:32 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
06:35 आपण फाईलच्या शेवटी पॅटर्न जुळवून बघू शकतो. त्यासाठी dollar चे चिन्ह आहे.
06:41 7000 ते 8999 मधील स्टायपेंडस शोधण्यासाठी आपल्याला लिहावे लागेल:
06:50 grep space डबल कोटसमधे चौकटी कंस सुरू 78 चौकटी कंस पूर्ण ...dollar sign कोटस नंतर space grepdemo.txt
07:06 एंटर दाबा.
07:08 अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
07:11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:13 थोडक्यात,
07:16 या पाठात शिकलो,
07:18 एकापेक्षा अधिक पॅटर्न जुळवून बघणे.
07:20 वेगवेगळी स्पेलिंग्ज असलेला शब्द तपासणे.
07:24 कॅरॅक्टर क्लास.asterisk चा वापर.
07:28 कुठलेही एक कॅरॅक्टर जुळवण्यासाठी dot वापरणे.
07:32 फाईलच्या सुरवातीला असलेला पॅटर्न जुळवणे.
07:35 फाईलचा शेवटी असलेला पॅटर्न जुळवणे.
07:40 असाईनमेंट म्हणून, Y ने सुरू होणा-या आणि 5 अक्षरे असलेल्या एंट्रीजची सूची दाखवा.
07:48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:05 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:08 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:15 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana