Netbeans/C2/Introduction-to-Netbeans/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:43, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार,इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत. |
00:06 | ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत. |
00:13 | नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट www.netbeans.org वर उपलब्ध आहे. |
00:23 | हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते. |
00:27 | विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते. |
00:31 | GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते. |
00:39 | हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे. |
00:47 | या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत. |
00:52 | नेटबीन्स सुरू करण्यासाठी, |
00:55 | उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि |
01:00 | नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत. |
01:05 | या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत. |
01:11 | आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ. |
01:16 | सँपल जावा प्रोजेक्ट बनवू. |
01:19 | प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू. |
01:22 | www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते. |
01:27 | ही मुख्य अधिकृत साईट आहे. |
01:31 | साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. |
01:36 | उघडलेल्या पुढील पानावरील, |
01:39 | शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे. |
01:53 | तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते. |
02:05 | येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा. |
02:15 | उघडलेल्या पुढील पानावरील, |
02:19 | ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा. |
02:24 | उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल. |
02:29 | म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल. |
02:33 | टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा . |
02:38 | प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा. |
02:46 | sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
02:54 | काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल. |
03:04 | स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल. |
03:06 | सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा. |
03:13 | इन्स्टॉलरमधून बाहेर पडू. |
03:17 | नेटबीन्स विंडो उघडू. |
03:21 | उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी, |
03:25 | मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा. |
03:34 | प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल. |
03:41 | IDE विंडोमधे दिसतील, |
03:43 | मेनूबारवरील मेनू, |
03:46 | टूलबार्स आणि |
03:48 | वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो, |
03:52 | रनटाईम विंडो आणि,आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो. |
03:57 | नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की, |
04:03 | प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे . |
04:10 | मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो. |
04:18 | वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच. |
04:23 | जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी. |
04:35 | सँपल जावा प्रोजेक्ट बनवू. |
04:40 | त्यासाठी File (फाईल) मेनूतील New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा. |
04:47 | New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील |
04:51 | java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा. |
04:58 | name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे |
05:02 | प्रोजेक्टला KeyboardReader असे नाव द्या. |
05:08 | Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून |
05:12 | Finish (फिनिश) क्लिक करा. |
05:15 | प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल. |
05:20 | एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल. |
05:27 | यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात. |
05:36 | उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे. |
05:43 | Main क्लासमधे जावा कोड टाईप करू. |
05:49 | हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल. |
05:58 | हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू . |
06:11 | आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे. |
06:14 | नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत. |
06:20 | पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा. |
06:29 | किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा. |
06:34 | प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता. |
06:40 | प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा. |
06:45 | जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो. |
06:57 | आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे. |
07:01 | कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा. |
07:06 | हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे. |
07:11 | आता असाईनमेंट करा. |
07:15 | KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून, |
07:19 | तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल. |
07:27 | फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा. |
07:31 | आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा. |
07:36 | आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे. |
07:40 | ती असाईनमेंट कार्यान्वित करा. |
07:47 | प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल. |
07:52 | सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल. |
08:07 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:14 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
08:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:31 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:43 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
09:05 | सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा. |