PERL/C3/Exception-and-error-handling-in-PERL/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:06, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
| Time | Narration |
| 00:01 | Exception and error handling in PERL वरील पाठात आपले स्वागत. |
| 00:06 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -Catch errors आणि Handle exceptions |
| 00:12 | या पाठासाठी वापरणार आहोत,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर |
| 00:23 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
| 00:27 | तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
| 00:32 | नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
| 00:39 | जेव्हा एक एरर येते: Exception handling प्रोग्रामला सामान्य मार्गामधून दुसर्या मार्गात घेऊन जाते. |
| 00:47 | Error handling अप्लिकेशन निरस्त न करता, प्रोग्रॅम पुनर्प्राप्त करण्यासाठी मदत करते. |
| 00:53 | आपण अनेक प्रकारचे एरर्स ओळखू आणि पकडु शकतो. आपण पर्ल मध्ये काही सामान्यतः वापरलेल्या पद्धती पाहू. |
| 01:01 | warn फंक्शन पुढील कारवाई न करता फक्त एक वॉर्निंग मेसेज दाखवतो, |
| 01:07 | die फंक्शन लगेचच प्रोग्रामचे एक्सेक्यूशन बंद करते आणि एरर मेसेज दाखवते. |
| 01:13 | आपण एक सँपल प्रोग्रॅम वापरुन die फंक्शन समजून घेऊ, जे मे आधीच सेव्ह केले होते. |
| 01:20 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit die dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
| 01:29 | die.pl फाईल मध्ये हा कोड आहे. आता आपण कोड समजून घेऊ. |
| 01:35 | येथे आपण divide फंक्शन परिभाषित केले आहेत जे दोन इनपुट पॅरमीटर्स घेतात.उदा. dollar numerator आणि dollar denominator |
| 01:46 | At the rate underscore(@_) हे विशेष व्हेरिएबल आहे जे फंक्शनसाठी पॅरमीटर लिस्ट पास करण्यास वापरले जाते. |
| 01:53 | जर भाजक शून्य आहे, तर die फंक्शन स्क्रिप्ट सोडून देते. |
| 01:57 | वापरकर्त्याला वाचण्यासाठी एरर मेसेज प्रदर्शित करेल.किंवा आउटपुट प्रिंट करेल. |
| 02:05 | हे फंक्शन कॉल स्टेट्मेंट्स आहेत. |
| 02:08 | पहिल्या दोन वेळा, फंक्शन कार्यान्वित करून झाले कारण दुसरा पॅरमीटर शून्य नाही. |
| 02:15 | तिसऱ्या वेळी, भाजक शून्य आहे, म्हणून die function कार्यान्वित केले जाते. |
| 02:23 | शेवटचा divide function कार्यान्वित तेव्हा होणार जेव्हा die फंक्शन स्क्रिप्टला सोडून देतो. |
| 02:29 | प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. |
| 02:32 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
| 02:35 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl die dot pl आणि एंटर दाबा. |
| 02:43 | येथे दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.Can't divide by zero! - |
| 02:49 | प्रोग्रॅममधील die स्टेट्मेंट मध्ये हा एरर मेसेज दिला आहे. |
| 02:54 | पुढे, आपण एरर हॅंड्लिंग मध्ये eval फंक्शनचा वापर कसा करायचा ते पाहू. |
| 03:00 | रन-टाइम एरर्स किंवा एक्सेप्षन्स हाताळण्यासाठी eval फंक्शन वापरले जाते. |
| 03:06 | उदाहरणार्थ, built-in errors जसे out of memory, divide by zero किंवा user defined errors. |
| 03:14 | eval function साठी सामान्य सिंटॅक्स येथे दर्शविली आहे. |
| 03:19 | जर असे असेल तर, dollar exclamation($!) विशेष व्हेरिएबल एरर मेसेजला धरतो. |
| 03:25 | अन्यथा, dollar exclamation( $!) एक रिकामे स्ट्रिंग धरते. याचा अर्थ असा की चुकीचे मूल्यांकन होते. |
| 03:33 | सॅंपल प्रोग्रॅम वापरुन eval फंक्शन समजून घेऊ.टर्मिनल वर जा. |
| 03:40 | टाईप करा gedit eval dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
| 03:47 | स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे eval dot pl फाईलमध्ये हा कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते. |
| 03:54 | उदाहरण म्हणून, जर “test.dat” फाइल उघडण्यासाठी जर समस्या आहे, तर open FILE die स्टेट्मेंटची घोषणा करते. |
| 04:05 | पर्ल शेवटच्या eval ब्लॉक पासून ते व्हेरिएबल dollar exclamation( $!) पर्यन्त सिस्टम एरर मेसेज दाखवतो. |
| 04:13 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. |
| 04:17 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval dot pl आणि एंटर दाबा. |
| 04:25 | येथे दर्शवल्या प्रमाणे system error message दाखवले जाते. |
| 04:30 | आणखी एक उदाहरण बघू. या वेळी आपण $@ (dollar at the rate) वापरुन eval फंक्शन मधून जे परत आलेले एरर मेसेज आहे हे पाहणार आहोत. |
| 04:40 | आपण eval dot pl फाईल वर जाऊ. |
| 04:44 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
| 04:48 | आपण फंक्शन average साठी इनपुट पॅरमीटर्स म्हणून $total, $count पास करत आहोत. |
| 04:56 | जर गणना शून्य असेल तर आपल्याला एरर मिळण्याची शक्यता आहे. |
| 05:00 | येथे, हे die स्टेट्मेंट सह हाताळले आहे. |
| 05:04 | $@ ( dollar at the rate) वापरुन eval मधून परत आलेले एरर मेसेज प्रदर्शित आहे. |
| 05:11 | नाही तर, ते Average वॅल्यू प्रिंट करेल. |
| 05:15 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
| 05:22 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval.pl आणि एंटर दाबा. |
| 05:31 | आउटपुट येथे दाखवले आहे. |
| 05:35 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
| 05:41 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: Catch errors आणि Handle exceptions |
| 05:47 | खालील असाइनमेंट करा.तुमच्या लिनॅक्स मशीन वर, 5 एम्प्लोईच्या नावा सह एक emp.txt फाईल तयार करा. |
| 05:57 | emp.txt ची परवानगी फक्त READ Only मध्ये बदला. |
| 06:02 | टीप: change permission पर्यायसाठी स्पोकन ट्यूटोरियल मधील वेबसाइट वरील संबंधित स्पोकन ट्यूटोरियल्स पहा. |
| 06:10 | WRITE मोड मध्ये emp.txt फाईल उघडण्यास पर्ल प्रोग्रॅम लिहा आणि काही कर्मचार्यांचे नवे जोडा. |
| 06:19 | जर open/write ऑपरेशन अपयशी झाल्यास eval वापरुन संबंधित एरर मेसेज ला प्रिंट करा. |
| 06:26 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा. |
| 06:33 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
| 06:42 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
| 06:46 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
| 06:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
| 06:58 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |