LaTeX/C2/Beamer/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:16, 19 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:03 | ले टेक आणि बीमर वापरून सादरीकरण करण्याच्या प्रशिक्षणात आपले स्वागत. |
00:08 | मी आधी तुम्हाला पडद्यावर दिसणारी योजना समजावून देते. इथे मूळ फाईल आहे, |
00:15 | इथे मी पीडीएफ ले टेक ही आज्ञा वापरून संकलन करीन आणि तयार होणारे उत्पादन या कोपऱ्यात दिसेल. |
00:22 | आपण आधी इतर गोष्टी पाहून मग पुन्हा इथे परत येऊ. हे आधी करू. |
00:28 | इथली पहिली पारदर्शिका या मूळापासून येते - |
00:32 | बिगिन फ्रेम, एन्ड फ्रेम, टायटल पेज. मुख्य पान हे शीर्षक, लेखक व दिनांक देऊन निश्चित केले जाते. |
00:54 | मी वापरत असलेला दस्तऐवज प्रकार बीमर हा आहे. आपण इथे दस्तऐवजाची सुरुवात केली. |
01:01 | आता ही पहिली पारदर्शिका झाली, दुसरी पाहू. |
01:07 | ही रुपरेखा आहे ती कशी तयार होते ? बिगिन फ्रेम, एन्ड फ्रेम ने एक पारदर्शिका बनते. |
01:14 | फ्रेम शीर्षक ही रुपरेखा असते. ती येथे येते. मग मी नेहमी प्रमाणे आयटेमाइझ आज्ञा वापरते. |
01:24 | तिसऱ्या पारदर्शिकेकडे वळूयात. ही पारदर्शिका ले टेक वरील अजून एका प्रशिक्षणाबद्दल आहे. |
01:31 | ले टेक वरील अशी बरीच प्रशिक्षणे उपलब्ध आहेत. |
01:34 | तुम्हाला ले टेक वापरणे अवघड जात असल्यास तुम्ही ती प्रशिक्षणे जरूर पहावीत हे मी सुचवते. |
01:40 | ही प्रशिक्षणे विंडोज मध्ये लेटेक कसे बसवावे, चालवावे व वापरावे ते सांगतात. |
01:46 | आणि फॉसी.इन वापरून ती कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. |
01:52 | इथे हे संपले, हे या पारदर्शिकेचे मूळ आहे. |
01:57 | आपण दस्तऐवजाच्या शेवटी पोचलो हे तुम्ही पाहू शकता. |
02:12 | बीमर वापरून हा दस्तऐवज अधिक आकर्षक करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधा मी आता तुम्हाला दाखवते. |
02:19 | आपण आधी सुरुवातीला जाऊ. या फाईल मध्ये सर्वात वरती जाऊ. |
02:30 | आता मी जे काही बदल, ज्या काही सुधारणा या मध्ये करणार आहे त्या सर्व इथे. |
02:36 | मी एका वेळी एक सुधारणा करुन ती समजावणार आहे. |
02:39 | मी बीमर थीम स्प्लिट ही आज्ञा वापरली की काय होते ते पाहू. |
02:45 | हे मी कट करते, पुन्हा इथे परत येते. आता मी सेव्ह करून संकलित करते. |
02:57 | पीडीएफ ले टेक बीमर. आता इथे क्लिक करते, |
03:04 | तुम्ही इथे तयार झालेले एक निशाण आणि इतरत्र तयार झालेली निशाणे पाहू शकता. इथेही, ठीक आहे. |
03:15 | आता आपण इथे येऊ आणि हे पॅकेज वापरू. आता बीमर थीम शॅडो वापरू. मी हे कट करते, |
03:27 | येथे जाते, पेस्ट करते. हे सर्व दस्तऐवजाच्या आज्ञेपूर्वी पेस्ट केले आहे. मी हे संकलित करते. |
03:40 | ठीक, आता आपण पाहू की मी हे क्लिक केल्यावर काय होते. हे मोठे झाले. |
03:47 | तुम्ही पाहू शकता की येथील रंग बदलला आहे. |
03:51 | म्हणजे हे बीमर थीम शॅडो या आज्ञेमुळे झाले. अशी बरीच पॅकेजेस आहेत, |
03:58 | मी त्यापैकी काहींची इतर वैशिष्ट्ये समजावून देणार आहे. |
04:02 | इथे लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील वाचनासाठी काही संदर्भ देणार आहोत – |
04:13 | रेफरन्सेस फॉर फर्दर रीडिंग. |
04:16 | या भाषणाची रुपरेखा पुढीलप्रमाणे आहे. आपण काही काळ शीर्षक पान, लेखकाचे नाव, रंग, चिन्ह या करिता देऊ. |
04:26 | तुमच्या भाषणासाठी किमान चलचित्र, दोन कॉलम , आकृत्या आणि तालिका, समीकरणे, शब्दशः इत्यादी. |
04:35 | ठीक तर मग आपण पुन्हा सुरुवातीला जाऊ. |
04:41 | पुढील वैशिष्ट्य आहे लोगो. आता इथून लोगो कट आणि पेस्ट करू. |
04:48 | हा सुद्धा बिगिन डॉक्युमेंट या आज्ञेपूर्वीच असावा लागतो. |
04:54 | आता हा लोगो कसा दिसतो ते पाहू. आय आय टी बी लोगो. |
05:00 | पीडीएफ ही फाईल उघडून पाहू. मी इथे हेच नाव देत आहे. |
05:04 | मी हे उघडले की तुम्हाला कळेल की मी ज्या विषयी बोलत आहे ती चित्र फाईल हीच आहे. |
05:11 | या आज्ञेमुळे एक सेंटीमीटर आकाराचा लोगो या कोपऱ्यात दिसेल. |
05:17 | बघुया तर तो कसा दिसतो. इथे क्लिक करु. |
05:31 | आयआयटी मुंबईचा लोगो इथे आला हे तुम्ही पाहू शकता. हा इथून पुढे प्रत्येक पानावर येईल. |
05:40 | आता आपण ही अाज्ञा देऊ. सादरीकरणांसाठी कधी कधी सर्व अक्षरे मोठी करणे उपयुक्त असते. |
05:53 | म्हणून मी याचा अंतर्भाव करतो, कट, पेस्ट. प्रत्यक्षात मी हे बिगिन डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी देणे आवश्यक होते. |
06:08 | मी हे सेव्ह करते. संकलित करते. |
06:18 | आता मी हे क्लिक करताना नीट पहा - सर्व अक्षरे मोठी होतील. |
06:26 | ती मोठी झाली हे तुम्ही पाहू शकता. |
06:31 | आता यानंतर मी येथील लिखाण सुधारणार आहे. उदाहरणार्थ हे येथे बऱ्याच गोष्टी भरण्याचा प्रयत्न करते. |
06:39 | शीर्षक इथे येते, लेखकाची माहिती इथे येते पण बरीच माहिती इथे येते आहे. |
06:45 | कधी कधी मला इथे छोटे शीर्षक हवे असते. उदाहरणार्थ ही जागा पुरेशी नसते तेव्हा. |
06:51 | मग मी काय करावे हा प्रश्न हे वापरून सुटतो. उदाहरणार्थ हे सलग शीर्षक आहे ते मी तोडतो. |
07:01 | हे टायटल या आज्ञेनंतर यायला पाहिजे, टायटल या आज्ञेनंतर आणि प्रत्यक्ष शीर्षकापूर्वी. |
07:11 | मी हे इथे पेस्ट करते. |
07:17 | तुम्ही पाहू शकता की मी जे पेस्ट केले ते चौकटी कंसात आले आहे. आपण हे सेव्ह करू. रन करू. |
07:41 | मी तसेच करते, हे क्लिक करते, मी हे क्लिक केल्यावर या भागाचे काय होते ते पहा. |
07:51 | शीर्षक बदलले हे तुम्ही पाहू शकता. मी फक्त खालचा भाग दिला आहे कारण मी तोच चौकटी कंसात ठेवला आहे - |
08:01 | प्रेझेंटेशन यूजिंग ले टेक अँड बीमर. मग मी लिहिले आहे एच- स्पेस अर्धा सेंटीमीटर आहे. |
08:08 | आता मी इथे पृष्ठ क्रमांक दिले. हे पहा १ तिरकी रेघ ३. मग २ तिरकी रेघ ३ तीन तिरकी रेघ ३ याप्रमाणे. |
08:18 | यासाठी वापरा इन्सर्ट फ्रेम नंबर डिव्हायडेड बाय इन्सर्ट टोटल फ्रेम नंबर |
08:27 | आता मी हीच गोष्ट लेखकाच्या माहितीसाठी करते. इथे येऊ. |
08:36 | हे कट करू. आणि ऑथर नंतर हे येते. |
08:44 | सेव्ह करू. संकलित करू. हे क्लिक करू. तुम्ही बघू शकता की कण्णन मौद्गल्य दिसू लागले. |
08:58 | हेच मी चौकटी कंसात दिले होते. आता हे प्रत्येक पानावर येईल. |
09:05 | आता आपण पुढल्या पाठाकडे वळू. हा समीकरणे अंतर्भूत करण्यासाठी आहे. |
09:13 | ही सर्व गोष्ट एका चौकटीच्या स्वरूपात आहे-एक संपूर्ण चौकट. आता मी काय करते, हे सर्व कट करते. |
09:27 | इथे परत येते, या दस्तऐवजाच्या शेवटी जाते. सेव्ह करते. अशा प्रकारे मी एक नवीन पारदर्शिका तयार केली. |
09:39 | आता ती कशी दिसते ते पाहू. इथे ही चौकट सुरू होते. हे संकलित करू, आता इथे चार पाने दिसली पाहिजेत. |
09:57 | अजून इथे तीनच दिसत आहेत मी पुन्हा एकदा क्लिक करते आता इथे चार झाली. |
10:08 | ही समीकरण असलेली पारदर्शिका आहे. मी समीकरण कसे लिहावे हे समजावणार नाही आहे. |
10:14 | समीकरणे कशी लिहावी हे सांगणाऱ्या अन्य एका प्रशिक्षणात हे मी समजावून दिलेले आहे. |
10:19 | मी फक्त इतकेच केले की त्या ले टेक दस्तऐवजात गेले कट केले आणि ते इथे पेस्ट केले. |
10:25 | आणि अर्थातच त्या समीकरणातले सर्व आकडे मी काढून टाकले आहेत. |
10:31 | तसेच रंग ठळक करणे तुमच्यासाठी कधी कधी उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, मला हा रंग निळा हवा आहे, मी त्यासाठी हे करीन. |
10:43 | आज्ञा आहे- कलर, ब्ल्यू - मग मी हे बंद करीन. सेव्ह करीन. संकलित करीन. आणि इथे क्लिक करीन. |
11:14 | पहा हे निळे झाले आहे. |
11:17 | म्हणजे तुम्ही समीकरणातले आकडे सांगण्या ऐवजी निळ्या रंगातील समीकरण पहा असे म्हणू शकता किंवा मास बॅलन्स समीकरण पहा म्हणू शकता किंवा अन्य काही. |
11:28 | तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता की जे लोकांच्या सहज लक्षात राहील. |
11:32 | आता आपण यामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करूयात. ते पायरी पायरीने कल्पना समजावून देण्यास उपयुक्त ठरेल. |
11:41 | मी हे कट करून इथे पेस्ट केले. आता हे कसे दिसते ते पाहू. |
12:05 | प्रथम हे संकलित करू आणि काय होते ते पाहू. |
12:14 | हे पत्रलेखनाच्या प्रशिक्षणामधील आहे. ही माहिती पण तेथे आहे. |
12:20 | मी फक्त एकच बदल केला आणि तो म्हणजे, बिगिन एन्युमरेट आणि एन्ड एन्युमरेट यांच्या मध्ये |
12:27 | मी हे आयटेम प्लस मायनस अलर्ट टाकले. |
12:31 | हे काय करते ते आपण पाहू. मी येथे पॉज ही आज्ञा दिली हे तुम्ही पाहू शकता ते इथे थांबते. |
12:39 | आता बिगिन एन्युमरेटची सुरूवात होते. मी आता पुढे जाते. पेज डाउन, पुढील पान, पुढील पान, पुढील पान. |
12:52 | मी खाली जात असताना तुम्ही पाहिले असेल की अद्ययावत माहिती लाल रंगात आहे तर इतर सर्व माहिती सामान्य असलेल्या काळ्या रंगात आहे. |
13:02 | मी या दस्तऐवजाच्या शेवटी पोचले आहे. हा थोडक्या वेळात माहिती प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या सादरीकरणामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे. |
13:15 | यानंतर मला लक्षवेधी रंग निळा करायचा आहे. उदाहरणार्थ, येथे लक्षवेधी रंग लाल आहे त्याला लक्षवेधी रंग म्हणतात. |
13:26 | मला हा रंग निळा करायचा आहे. म्हणजे तो मी निवडलेल्या या रंगाशी जुळणारा होईल. |
13:39 | मी इथे येते व हे कट करते. हे या दस्तऐवजाच्या सुरुवातीला, बिगिनींग डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी जाऊदे. |
13:58 | मी हे संकलित करते, हे क्लिक करताना तुम्ही पाहू शकता की लक्षवेधी रंग निळा झाला आहे. |
14:08 | हे सेट बीमर कलर-अलर्टेड टेक्स्ट या आज्ञेमुळे शक्य होते. पृष्ठ भूमी चा रंग निळा करा, एफ जी इक्वल्स ब्ल्यू. |
14:19 | मी आता तुम्हाला संपूर्ण दस्तऐवजाचा रंग बदलणे किती सोपे आहे ते दाखवते. |
14:24 | मी इथे येते, या तिरक्या रेघेनंतर दस्तऐवज प्रकारात बीमर या शब्दापूर्वी मी ब्राऊन लिहिते. सेव्ह करते. |
14:46 | संकलित करते. तुम्ही पाहू शकता की ते तपकिरी झाले. खूप काम करण्याची गरज नाही. |
14:55 | मी आता काय करते, याचा मूळ रंग पुन्हा देते. सामान्य रंग निळा असल्यामुळे मी पुन्हा ते टंकित करणार नाही. |
15:16 | पुन्हा निळा रंग आला. |
15:21 | आता इथे येऊ मी हे खोडते. मी आता आकृत्यांचा अंतर्भाव करते. कट करू. इथे येऊ. याच्या शेवटी जाऊ. |
15:38 | सर्वात शेवटी. हे संकलित करू, आता पुढच्या पानावर जाऊ. इथे अाकृतीचे उदाहरण येथे दिलेले आहे. |
15:51 | आकृती अंतर्भूत करण्यासाठी काय करावे लागेल. काही महत्वपूर्ण सूचना आहेत. |
15:56 | त्या आपण नंतर पाहू. हे कट करू. पेस्ट करू. संकलित करू. हे तयार झाले. |
16:20 | अाकृती अंतर्भूत करण्यासाठी काही युक्त्या. आपण जिथे आकृती तयार केली त्या मूळ जागी जाऊ. |
16:33 | आपण आकृती अशी तयार केली. मग सूचना काय आहेत? |
16:38 | सादरीकरणामध्ये तरंगती संरचना वापरू नका, उदाहरणार्थ ले टेक दस्तऐवजामध्ये आवश्यक आकृती करता बिगिन फिगर, एन्ड फिगर या आज्ञा वापरू नका |
16:49 | तुम्हाला आकृती अंतर्भूत करण्याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास |
16:53 | तुम्ही तालिका आणि आक्ृत्यांसंबंधीचे प्रशिक्षण पहाणे उपयुक्त ठरेल. सध्या हे वापरू नका. |
17:01 | थेट इन्क्लूड ग्राफिक्स वापरा. उदाहरणार्थ इन्क्लूड ग्राफिक्स ही आज्ञा वापरली |
17:08 | आणि मी म्हटले की संपूर्ण अक्षरांची रुंदी वापरा आणि आय आय टी बी ही फाईल वापरा. |
17:15 | बीमर मध्ये सर्व आवश्यक पॅकेजेस येतात, तुम्हाला कोणते ही पॅकेज अंतर्भूत करण्याची गरज नाही, फक्त पॅकेज वापरा, |
17:22 | ते आधीपासून आहेच. आणि आता हे सर्व आपण मध्यभागी आणू. ही चौकट संपली. |
17:35 | शीर्षक, आकृती क्रमांक टाकू नका. पुन्हा लक्षात घ्या की लोक त्यातील अंक लक्षात ठेवणार नाहीत. |
17:47 | तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या एखाद्या आकृतीचा संदर्भ द्यायचा असल्यास ती परत दाखवा. |
17:53 | अजून एक पारदर्शिका तयार करण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट पडणार नाहीत. |
17:58 | आधी दाखवलेल्या पारदर्शिकेची कॉपी बनवा आणि एक पारदर्शिका बनवा. आता आपण या दस्तऐवजाच्या शेवटी आलो. |
18:08 | आता आपण दोन स्तंभ कसे अंतर्भूत करावे ते पाहू. इथे येऊ. दस्तऐवजाच्या शेवटी जाऊया. |
18:27 | सेव्ह करू. मी हे सोपे करण्यासाठी सध्या हे काढून टाकणार आहे. मी आता अशी आज्ञा देणार आहे की थोडी माहिती दाखवा. |
18:41 | आता हे संकलित करू आणि काय होते ते पाहू. हे पहा मला दोन स्तंभ मिळाले. |
18:56 | हे सेव्ह केलेले नाही म्हणून या चांदण्या दिसत आहेत. मी आता सर्वप्रथम हे सेव्ह करते. |
19:02 | तुम्ही संकलन करण्यापूर्वी सेव्ह न केल्यास ही समस्या निर्माण होते. तुमची तयार होणारी पीडीएफ फाईल आणि मूळ फाईल या असंबद्ध होतात. |
19:12 | आता हे संकलित करू. इथे येऊ. आता तुमची मूळ फाईल याच्याशी जुळते. |
19:27 | हे मी मध्यभागी घेते. चौकट शीर्षक, दोन स्तंभ, मी वापरत असलेली आज्ञा आहे |
19:54 | मिनि पेज, मी हे मध्यभागी घेत आहे आणि मी अक्षरांची रुंदी ४५ टक्के ठेवत आहे. |
20:14 | बिगिन एन्युमरेट. हे दोन आणि मग एन्ड एन्युमरेट. पूर्वीप्रमाणे मी लक्षवेधी बनवतो. हे दोन्ही पहा. |
20:25 | हा या दस्तऐवजाचा शेवट आहे. मी आता इथे येऊन हे सर्व काही इथे शेवटी जोडते. |
20:32 | इथे पूर्वीचे मिनी पेज संपले आहे. आता मी अजून एक मिनी पेज बनवून तेथे आय आय टी बी टाकते, |
20:45 | आपण यापूर्वी पाहिलेले चित्र. इथेही मी ४५ टक्के आकारमान वापरत आहे. हे आपण संकलित करू. |
20:55 | त्याआधी हे सेव्ह करूया. आता मी हे क्लिक करते. हे पहा आले. |
21:11 | पण त्यात एक छोटी समस्या आहे की मी जेव्हा हे पान पहाते तेव्हा मला मुद्दा आणि आकृती हे दोन्ही दिसते. |
21:18 | आकृती नंतर येते तरीही तो ती दाखवतो कारण मी ले टेक ला आकृती नंतर दाखव हे सांगितलेले नाही. |
21:25 | हे आपोआप आहे. तुम्ही हे सांगणे गरजेचे आहे की माहिती आधी दाखव आणि आकृती नंतर दाखव. पण आपण हे कुठेच सांगितले नाही. |
21:33 | आपल्याला अशा चुका टाळण्यासाठी सावध रहाणे आवश्यक आहे. हे सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे पॉज ही आज्ञा देणे. |
21:56 | हे मी संकलित करते. रक्षित करते. आता हे ठीक झाले. |
22:06 | हा प्रश्न सुटला. पहिले दुसरे आणि मग अजून एक हे एकदा झाले आणि तुम्ही पहाल की हा प्रश्न सुटला. |
22:23 | चला तर आता इथे येऊ. पुढील बाब आहे तालिका. हे रक्षित करू. हे संकलित करू. |
22:43 | तुम्ही पाहू शकता की तालिका दिसू लागली. मी तुम्हाला तालिका कशी तयार करावी हे सांगणार नाही कारण |
22:52 | ते तालिकांवरील प्रशिक्षणात दिलेले आहे. मी फक्त ते कट करून इथे पेस्ट केले. |
23:07 | चौकटीच्या सुरुवातीला जाऊ. ही आपण पूर्वी वापरलेली तालिका आहे. मी फक्त ती कट आणि पेस्ट केली. |
23:14 | तुम्ही पाहू शकता की बिगिन टॅब्युलर आणि एन्ड टॅब्युलर मध्यभागी िदसत आहेत. |
23:19 | यासाठी काय सूचना आहेत? त्या सूचना आकृती साठी असलेल्या सूचनांप्रमाणेच आहेत. आता त्या पण पाहू. |
23:28 | सूचना अशा आहेत. मी हे संकलित करते. हे पहा, पुढे चला. पुन्हा एकदा आपण तरंगती संरचना वापरणार नाही. |
23:56 | तालिकांवरील प्रशिक्षणामधे आपण तालिका संरचनेमधे आपण तालिका ठेवतो. |
24:01 | तालिका संरचना ही तरंगती असते ती इथे अंतर्भूत करू नका. हे थेट तिथे ठेवा. |
24:08 | उदाहरणार्थ आपण हे थेट मध्य संरचनेत ठेवू. शीर्षक, तालिका क्रमांक इत्यादी देऊ नका |
24:18 | त्याची गरज भासल्यास कॉपी करा. चलचित्र कसे होतो ते मी इथे सांगते. या पारदर्शिकेमधे हे भिन्न रंगानी लक्ष वेधत नाही. |
24:34 | आपण पूर्वी लक्ष वेधण्यासाठी निळा रंग वापरला आहे. हे का होते? कारण आपण इथे वेगळी संरचना वापरली आहे. |
24:45 | बिगिन आयटेमाइझ व, एन्ड आयटेमाइझ च्या दरम्यान आपण आयटेम प्लस मायनस वापरले. |
24:52 | पूर्वी आपण लक्ष वेधणे हा शब्द वापरला होता. तो आठवा. आपण तो आता वापरत नाही. |
25:01 | त्यामुळे, हे काळ्या रंगात येते. चलचित्र अंतर्भूत करण्याचा हा सोपा मार्ग आहे. |
25:07 | तुम्ही हे निवडू शकता. म्हणून मी हे इथे लिहिले आहे. आधिच्या पारदर्शिकेमधील विविध चलचित्र दाखवा. |
25:18 | आता याचे हस्तपत्रिकेत रूपांतर करणे आवश्यक आहे. |
25:24 | तुम्ही हे छापण्याचा प्रयत्न केला तर इथे असलेले सारे फक्त १० पाने असताना २४ पानांमधे छापले जाईल. |
25:35 | इथे फक्त १० चौकटी आहेत पण पाने मात्र २४ आहेत. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे हँडआउट ही कळ वापरणे. मी हे केले. |
26:00 | आता संकलन करते आता फक्त १० पाने राहिली. पुन्हा एकदा हे संकलित करू. आता चलचित्र राहिले नाही. |
26:16 | पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान, आणि पुढे. |
26:23 | मला हा रंग बदलायचा असला तर मग पुन्हा तपकिरी ही आज्ञा द्या. तुम्ही पाहू शकता की तो बदलला गेला. |
26:36 | प्रत्येक कार्यक्षेत्र सीमे नंतर स्वल्पविराम देणे आवश्यक आहे. मी हे परत निळे करते, संकलित करते. |
26:52 | कधी कधी आपल्याला शब्दशः पर्यावरण वापरावे लागते. मी उदाहरणा दाखल हे घेते. |
27:01 | इते जाऊ, शेवटी जाऊ. रक्षित करू. इथे शब्दशः ला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता की शब्दशः नि र्माण झाले. |
27:25 | इथे मी सायलॅब मधील काही अाज्ञा वापरून हे प्रदर्शित केले. मी इथे रंग निळा केला आमि इतरही काही केले. |
27:36 | तुम्हाला एकच करायचे आहे ते म्हणजे बिगिन फ्रेम चौकटी कंसात लिहा - फ्रजाइल. |
27:49 | तुम्ही हे केले नाहीत तर समस्या निर्माण होईल. तरा आता हे पहा. आपण परत येऊ आणि हे तपासू. |
27:59 | मी हे खोडते. रक्षित करते. संकलित करते. हे सांगेल की काहीतरी चुकले आहे. |
28:14 | आता परत हे लिहू - फ्रजाइल. रक्षित करू. इथून बाहेर पडू. पुन्हा संकलित करू. हे आाता व्यवस्थित आले. |
28:28 | बीमर प्रकारात बरीच माहिती आहे. इतर गोष्टींबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळेल. |
28:33 | म्हणून मी इथे काही माहिती दिली आहे, आपण सर्वात खाली जाऊ. अावश्यक असलेली अधिक माहिती कुठून मिळवावी हे या पारदर्शिकेत दिलेले आहे. |
28:43 | आपण हे संकलित करू आणि नीटपणे पाहू. |
28:55 | बीमर करता अधिकारिक स्त्रोत म्हणजे बीमर यूजर गाईड डॉट पीडीएफ. मी हे या ठिकाणी ठेवले आहे परंतु हे |
29:04 | बीमर प्रकल्पाच्या संकेतस्थळावर बीमर प्रकार विकासकांनी ठेवलेले आहे. |
29:10 | मी हे उतरवून धेतलेले आहे पण हे आधी सांगितलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे मार्गदर्शक एकूण २२४ पानांचे आहे. |
29:26 | ते फारच मोठे आहे. मला इथे दाखवायचे आहे की तुम्ही इथली माहिती थेट वापरू शकता. |
29:33 | आपण इथे येऊ. पहिल्याच पानात लेखकाने सोप्या पारदर्शिका कशा बनवाव्या हे सांगितले आहे व त्यांचे मूळ सुद्धा दिलेले आहे. |
29:53 | आपण हे कट करू, कॉपी करू, मी हे लहान करते. मी या दस्तऐवजाच्या शेवटी जाते. |
30:08 | पेस्ट करते. रक्षित करते, संकलित करते. आता आपण पुढल्या पानावर जाऊ. |
30:21 | तुम्ही पाहू शकता की तिथे असलेले सारे इथे आले. इथे लेखकाने प्रमेय पर्यावरण वापरलेले आहे. |
30:30 | बिगिन थिअरम, एन्ड थिअरम येथे येते. लेखकाने चौकट उपशीर्षक वापरले आहे ते इथे लहान अक्षरात दिसते. |
30:41 | मग बिगिन प्रूफ आणि एन्ड प्रूफ या आज्ञा येथे येतात. |
30:45 | लेखक लिहितो प्रूफ त्यामुळे एक नवीन चौकट उघडते, त्याला प्रूफ डॉट हे नाव दिले. |
30:52 | अशा रितीने हे पर्यावरण ठरवले जाते. लेखक लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या गोष्टी वापरतो. |
30:59 | आपल्याला हे पहायचे असल्यास परत जा, हॅन्डआऊट काढून टाका म्हणजे चलचित्र दिसू शकेल. |
31:10 | संकलित करा. आिता पान ३४ वर जाऊमागे जाऊन आता चलचित्र पाहू. हे पहा दिसू लागले. लेखकाने असे केले आहे की |
31:34 | या दोन बाबींना एक क्रमांक दिला आणि इतरांना दोन व तीन दिला. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला हव्या असलेल्या बाबी पारदर्शिकेमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या क्रमाने दिसू शकतात. |
31:53 | अधिक तपशिलात जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. मी तुम्हाला सुचवते की अधिक माहितीसाठी |
31:59 | इथे दिलेले संदर्भ साहित्य तुम्ही जरूर वाचा. हे मार्गदर्शक अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. |
32:10 | बीमर दस्तऐवज प्रकारात अनेक उपप्रकार आहेत आणि तुम्ही त्यातील काही वापरून पाहू शकता. |
32:20 | मी हे पुन्हा हॅन्डआऊट मधे बदलते. सादरीकरण मार्गाची एक अडचण आहे, आपण आता हॅन्डआऊट मार्गाने जाऊ, |
32:33 | सादरीकरण मार्गात तुम्ही चलचित्र दाखवत असल्यास दस्तऐवज संकलित होण्यास फार वेळ लागतो. |
32:39 | म्हणून शक्य तितका अधिक काळ तुम्ही हॅन्डआऊट मार्गाचा वापर करावा, |
32:43 | आणि तुम्हाला जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हाच सादरीकरण मार्गाचा वापर करावा. |
32:48 | अर्थात अखेरीस जेव्हा तुम्ही सादरीकरण कराल तेव्हा तुम्हाला सादरीकरण मार्गाचा वापर करावा लागेल. |
32:55 | आणि तुम्हाला जेव्हा मुद्रण करायचे असेल तेव्हा तुम्ही हॅन्डआउट मार्गाचा वापर करा. |
33:00 | आता शेवटाला जाऊ. आपण या प्रशिक्षणाच्या अखेरीस पोचलो आहे. |
33:08 | आता आपण ऋणनिर्देश करु, किंबहुना मी हे सर्व कॉपी करते, इथे येते. ठीक आहे. |
33:41 | या प्रशिक्षणासाठीचे अनुदान राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमातून आयसीटी द्वारा आलेले आहे. |
33:47 | हे या कार्यक्रमाचे संकेतस्थळ आहे. |
33:50 | या प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते. |
33:53 | आपल्या प्रतिक्रिया कृपया कण्णन डॉट आयआयटीबी डॉट एसी डॉट इन येथे जरूर कळवा. |
34:00 | मी चैत्राली जोगळेकर आपली रजा घेते. पुन्हा एकदा धन्यवाद. |