Inkscape/C3/Design-a-CD-label/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:35, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Inkscape वापरून CD label ची रचना करण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत-
00:09 CD label टेंप्लेट बनवणे.
00:11 CD label ची रचना करणे.
00:13 फाईल PNG फॉरमॅटमधे सेव्ह करणे.
00:16 या पाठासाठी वापरणार आहोत-
00:18 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:21 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:25 इंकस्केप उघडू.
00:27 File खालील Document properties वर क्लिक करा.
00:32 Width आणि Height पॅरॅमिटर्स बदलून ते 425 पिक्सेल करा.
00:37 डायलॉग बॉक्स बंद करा.
00:40 Rectangle टूलच्या सहाय्याने चौरस काढून त्याला लाल रंग द्या.
00:45 selector tool वर क्लिक करा.
00:47 Tool controls bar वर Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून ते 425 करा.
00:54 नंतर Ellipse tool च्या सहाय्याने वर्तुळ काढा.
00:58 पुन्हा selector tool वर क्लिक करा.
01:01 Tool controls bar वरील Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून ते 425 करा.
01:07 वर्तुळ आणि चौरस दोन्ही सिलेक्ट करा.
01:11 Object मेनूवर जा.
01:13 Align and Distribute वर क्लिक करा.
01:16 Relative to साठी Page पर्याय निवडा.
01:19 दोन्ही ऑब्जेक्टस मध्यात अलाईन करा.
01:22 Path मेनू वर जाऊन Difference पर्याय निवडा.
01:26 आणखी एक वर्तुळ काढा.
01:28 पुन्हा selector tool वर क्लिक करा.
01:31 height आणि width पॅरॅमिटर्स बदलून 85 करा.
01:35 Align and Distribute च्या सहाय्याने हे पानाच्या मध्यभागी अलाईन करा.
01:41 दोन्ही आकार सिलेक्ट करा.
01:44 ही template असल्यामुळे त्याचा रंग बदलून तो पांढरा करू.
01:49 त्यामुळे आता हे कदाचित दिसणार नाही.
01:51 Layer मेनू खालील Layers वर क्लिक करा.
01:55 सध्याच्या लेयरचे नाव बदलून ते CD template असे करा.
02:00 अनावधानाने लेयरमधील घटक हलवले जाऊ नयेत म्हणून लेयर Lock करू.
02:05 आता आणखी एक लेयर बनवून त्याला CD design असे नाव द्या.
02:10 ती CD template लेयरच्या खाली ठेवा.
02:13 आपली CD template तयार झाली आहे.
02:16 हिचा उपयोग आपण भविष्यात विविध सिडीज बनवण्यासाठी करू शकतो.
02:20 फाईल SVG फॉरमॅटमधे सेव्ह करा.
02:23 फाईल मेनूखालील Save As वर क्लिक करा.
02:26 Desktop वर सेव्ह करू.
02:29 फाईलनेम मधे CD template टाईप करून Save वर क्लिक करा.
02:35 आता CD design लेयरवर काम करू.
02:39 बॅकग्राऊंडची रचना करू.
02:41 Rectangle tool च्या सहाय्याने एक चौरस काढा.
02:46 रंग पांढरा असल्यामुळे तो दिसणार नाही.
02:49 त्याचा रंग फिकट निळा करू.
02:52 selector tool वर क्लिक करा.
02:56 Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून 425 करा.
03:01 ते मध्यात अलाईन करा.
03:03 आपण सीमारेषांमधे background color बघू शकतो.
03:08 आता graphic illustration ची रचना करू.
03:11 हळूहळू बदलता हिरवा रंग घेऊ.
03:14 Bezier टूल घेऊन वक्राकार रेषा काढू.
03:19 नंतर Spoken tutorial लोगो इंपोर्ट करू.
03:23 लोगो Code files च्या लिंकमधे प्रदान केला आहे.
03:27 फाईल मेनूखालील Import वर क्लिक करा.
03:32 लोगोचा आकार बदलून तो चित्राच्या वरच्या बाजूला ठेवा.
03:37 लोगोच्या उजव्या बाजूला Spoken Tutorial असे टाईप करा.
03:41 फाँटचा आकार बदलून 20 करा.
03:44 पुढच्या ओळीवर “Partner with us...help bridge the digital divide” हे टाईप करा.
03:51 फाँटचा आकार बदलून 8 करा.
03:54 CD label च्या खालच्या भागात संपर्काचा तपशील टाईप करू.
03:59 मी लिबर ऑफिस रायटरमधे आधीच सेव्ह करून ठेवलेला तपशील कॉपी करणार आहे.
04:05 तो येथे खालच्या भागात पेस्ट करा.
04:08 "Contact us" हे टेक्स्ट बोल्ड करून ते मध्यात अलाईन करा.
04:13 टेक्स्टचा रंग बदलून तो निळा करा.
04:16 CD label च्या उजवीकडे काही इमेज समाविष्ट करू.
04:21 मी image collage तयार करून Documents फोल्डरमधे सेव्ह केलेला आहे.
04:26 तीच इमेज तुमच्या Code Files लिंकवर देखील दिलेली आहे.
04:30 इमेज सेव्ह केलेला फोल्डर तपासून पहा.
04:34 आता File खालील Import वर क्लिक करून Image1 सिलेक्ट करा.
04:40 येथे इमेज इंपोर्ट होईल. तिचा आकार बदला.
04:48 ती CD label च्या उजव्या बाजूला ठेवू.
04:51 ही फाईल 'SVG' फॉरमॅटमधे सेव्ह करण्यासाठी File खालील Save As वर क्लिक करा.
04:57 ST CD label हे फाईलनेम टाईप करून सेव्हवर क्लिक करा.
05:03 आपले CD label तयार आहे.
05:06 आता फाईल 'PNG' फॉरमॅटमधे export कशी करायची ते पाहू.
05:10 File खालील Export Bitmap वर क्लिक करा.
05:14 नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:16 Export area खालील Page टॅबवर क्लिक करा.
05:21 Bitmap size खालील dpi ची व्हॅल्यू बदलून ती 300 करा.
05:26 Browse बटणावर क्लिक करा.
05:29 फाईल सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप हे लोकेशन निवडू.
05:33 फाईलला ST-CD-label असे नाव देऊन Save वर क्लिक करा.
05:42 शेवटी Export बटणावर क्लिक करा.
05:46 आता डेस्कटॉपवर जाऊन आपली फाईल तपासू.
05:50 आपले CD label असे दिसेल.
05:53 थोडक्यात,
05:55 या पाठात शिकलो: * CD label टेंप्लेट बनवणे.
06:00 CD label ची रचना करणे.
06:02 फाईल 'PNG' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.
06:05 असाईनमेंट-
06:07 Inkscape साठी CD label बनवा.
06:10 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
06:13 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:19 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:27 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा
06:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:39 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya