Inkscape/C2/Layers-and-Boolean-operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:36, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | Inkscape मधील “Layers and Boolean operations” वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत: * लेयर्स |
00:11 | फिल्टर्स आणि बुलियन ऑपरेशन्स. |
00:15 | या पाठासाठी वापरणार आहोत: |
00:18 | उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:21 | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:25 | इंकस्केप उघडण्यासाठी Dash home वर जाऊन "Inkscape" टाईप करा. |
00:30 | Inkscape च्या लोगोवर क्लिक करा. |
00:32 | आपण बनवलेली 'Assignment_2.svg' ही फाईल उघडा. |
00:38 | मी ती Documents फोल्डरमधे सेव्ह केलेली होती. |
00:41 | प्रथम लेयर्सबद्दल जाणून घेऊ. |
00:45 | Layer मेनूखालील Layers पर्यायावर क्लिक करा. |
00:50 | interface च्या उजवीकडे Layer palette उघडेल. |
00:55 | डिफॉल्ट रुपात तिथे लेयर आहे जिचे Layer 1 हे नाव आहे. |
01:01 | नव्या layer साठी Layer palette वरील अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. |
01:07 | Add layer नावाचा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:10 | layer या टेक्स्ट बॉक्समधे लेयरला नाव देता येते. |
01:15 | लेयरला eye हे नाव देऊ. |
01:18 | आता Position या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून लेयरची जागा ठरवू शकतो. |
01:25 | येथे तीन पर्याय आहेत. |
01:27 | Above current हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या वरती ठेवेल. |
01:32 | Below current हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या खाली ठेवेल. |
01:36 | As sublayer of current पर्याय हा चालू लेयरचा भाग असल्याचे दाखवेल. |
01:41 | Above current पर्याय निवडू. Add वर क्लिक करा. |
01:47 | eye नावाची नवी layer आता Layer palette मधे दिसत आहे. |
01:52 | अशाप्रकारे bow नावाची आणखी एक लेयर बनवा. |
02:00 | आता लेयर पॅलेटमधे तीन लेयर्स आहेत. |
02:04 | आता लेयर चे नाव कसे बदलायचे ते पाहू. |
02:08 | प्रथम Layer 1 वर डबल क्लिक करा. आणि त्याला circle नाव देऊन एंटर दाबा. |
02:16 | कॅनव्हासवर परत जा. येथे दोन डोळे आणि एक बो आहे. |
02:20 | हे आकार आपण बनवलेल्या दोन वेगळ्या लेयर्समधे ठेवू. |
02:25 | माऊसच्या सहाय्याने दोन्ही डोळे सिलेक्ट करा. |
02:28 | Ctrl + X दाबा. आता डोळे दिसेनासे झाले आहेत. |
02:34 | आता लेयर पॅलेटमधील eye लेयरवर क्लिक करा. |
02:38 | कॅनव्हासवर जाऊन Ctrl + Alt + V दाबा. |
02:44 | हेच बो (bow) ह्या आकारासाठी करा. |
02:52 | कॅनव्हास वरील सर्व ऑब्जेक्टस डिसिलेक्ट करण्यासाठी रिकाम्या जागेवर क्लिक करा. |
03:00 | eye आणि lock आयकॉन्स वापरून लेयर्स लपवता आणि लॉक करता येतात. |
03:04 | लेयर लपवल्यास त्याच्या खालोखालच्या लेयर्सवरील ऑब्जेक्टस स्पष्टपणे दिसतात. |
03:11 | लेयर लॉक केल्यास विशिष्ट लेयरमधे अपघाताने होणारे बदल टाळता येतात. |
03:18 | विशेषतः मोठे आणि गुंतागुंतीचे ग्राफिक काम करताना हे उपयोगी ठरते. |
03:25 | प्रत्येक लेयरच्या डावीकडे eye आणि lock नावाचे दोन आयकॉन आहेत. |
03:32 | हे कसे वापरायचे ते जाणून घेऊ. |
03:35 | लेयर्स लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी lock वर क्लिक करा. मी bow लेयर लॉक केला आहे. |
03:42 | layer लॉक केल्यास त्यात कोणताही बदल करू शकत नाही. |
03:47 | आता कॅनव्हासवरील bow सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ते करता येत नसल्याचे आपल्या लक्षात येईल. |
03:58 | आता bow लेयर अनलॉक करा. |
04:01 | आता bow ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज बदलता येतात. |
04:07 | कॅनव्हासवर लेयर दृश्य किंवा अदृश्य करण्यासाठी डावीकडील eye आयकॉनवर क्लिक करा. |
04:15 | bow लेयरसाठी eye आयकॉनवर क्लिक करू. |
04:18 | कॅनव्हासवर काय होते याकडे लक्ष द्या. |
04:23 | आता bow लेयरची दुसरी प्रत बनवू. |
04:26 | Layer मेनूखालील Duplicate Current Layer वर क्लिक करा. |
04:32 | bow copy नावाची नवी लेयर Layer Palette window मधे तयार झालेली दिसेल. |
04:41 | परंतु कॅनव्हासवर नवीन bow दिसणार नाही. कारण हे ऑब्जेक्ट आधीच्या लेयरवर ओव्हरलॅप झाले आहे. |
04:50 | वरच्या लेयरवरील bow सिलेक्ट करून तो बाजूला सरकवा म्हणजे दोन्ही बो दिसतील. |
04:56 | circle लेयर सिलेक्ट करा. |
04:58 | डोळे आणि बो यांच्याभोवती कॅनव्हासवर एक लंबगोल काढा. त्याला केशरी रंग द्या. |
05:05 | बॅकग्राऊंडमधे लंबगोल आणि इतर ऑब्जेक्टस त्याच्या वरच्या बाजूला दिसत आहेत. |
05:10 | Layers Palette मधील अधिक चिन्हापुढे चार आयकॉन्स आहेत जे निवडलेल्या लेयरची जागा ठरवतात. |
05:17 | पहिला आयकॉन सिलेक्ट केलेल्या लेयरला वर उचलून सगळ्यात वरचा लेयर बनवेल. |
05:23 | सध्या circle लेयर निवडलेली आहे. |
05:25 | हा पर्याय निवडल्यावर circle लेयर सगळ्यात वरची लेयर बनलेली दिसेल. |
05:33 | शेवटचा आयकॉन निवडलेली लेयर खाली नेऊन सगळ्यात खालची लेयर बनवेल. |
05:38 | हा आयकॉन क्लिक करा. आता circle लेयर सर्वात खालची लेयर बनली आहे. |
05:44 | दुसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर वर आणेल. |
05:48 | या आयकॉनवर क्लिक करा. circle लेयर ही eye लेयरच्या वर आलेली दिसेल. त्यामुळे आता डोळे दिसणार नाहीत. |
05:57 | तिसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर खाली नेईल. |
06:01 | या आयकॉनवर क्लिक करा. आता circle लेयर eye लेयरच्या खाली गेलेली दिसेल. |
06:07 | अशाप्रकारे ह्या चार आयकॉन्सचा उपयोग करता येऊ शकतो. |
06:13 | सगळ्यात शेवटचे वजाचे चिन्ह निवडलेली लेयर डिलीट करेल. bow copy लेयर निवडून यावर क्लिक करा. |
06:21 | bow copy आता दिसेनाशी झाली आहे. |
06:27 | Blend mode हा संपूर्ण लेयरवर Blend filter वापरायचा शॉटर्कट आहे. |
06:31 | म्हणजेच जर निवडलेल्या लेयर्सवरील ऑब्जेक्टस ओव्हरलॅप होत असल्यास, इंकस्केप या दोन ऑब्जेक्टसचे pixel-by-pixel मिश्रण करेल. |
06:41 | filters दिसण्यासाठी circle सर्वात वर ठेवा. |
06:46 | Blend mode च्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा. येथे पाच पर्याय आहेत. |
06:52 | Normal हा पहिला पर्याय लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट करत नाही. |
06:57 | हा पर्याय निवडा. लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट झालेला नाही. |
07:03 | पुढे Multiply वर क्लिक करा. |
07:06 | तुम्हाला दिसेल की सर्वात वरच्या लेयरमधील ऑब्जेक्टसमधून प्रकाश खालच्या लेयर्सवर झिरपून तेथील ऑब्जेक्टस दिसतील |
07:14 | त्याचबरोबर यामुळे रंगांचे मिश्रण होऊन ओव्हरलॅप क्षेत्रात गडद रंग तयार होतील. |
07:21 | Screen हा पुढचा पर्याय आहे. |
07:25 | वरच्या ऑब्जेक्टसकडे पहा. त्यांच्यामुळे खालची ऑब्जेक्टस फिकट दिसतील. |
07:30 | म्हणजेच त्यामुळे रंगांचे मिश्रण असे तयार होते की ओव्हरलॅप क्षेत्रात फिकट रंग तयार होतात. |
07:36 | Darken निवडा. वरच्या लेयर्स वरची ऑब्जेक्टस, खालच्या लेयर्सवरील ऑब्जेक्टसना गडद (dark) करतात. |
07:44 | आता शेवटचा पर्याय Lighten निवडा. येथे वरची ऑब्जेक्टस खालच्या ऑब्जेक्टसना फिकट करतात. |
07:53 | आपण केव्हाही Normal या Blend mode वर गेल्यास वापरलेली ब्लेंड फिल्टर्स दिसेनाशी होतील. |
08:00 | Filters मेनूखाली फिल्टर्सचे अनेक पर्याय आहेत. |
08:04 | विशिष्ट फिल्टर वापरण्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट निवडून नंतर योग्य फिल्टरवर क्लिक करा. |
08:12 | circle लेयर पुन्हा सगळ्यात मागे सरकवू. |
08:16 | डोळ्याचा आकार निवडा. Filters मेनूखालील Blur पर्यायातील Fancy blur वर क्लिक करा. |
08:26 | डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
08:29 | आता दुसरा डोळा निवडा. Filters मेनूखालील Bevel पर्यायातील Smart jelly वर क्लिक करा. |
08:39 | पुन्हा एकदा डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
08:44 | आता 'bow' सिलेक्ट करा. Filters मेनूखालील Scatter मधील Air spray निवडा. |
08:51 | बो एअर स्प्रे केल्याप्रमाणे दिसेल. |
08:55 | Blend mode च्या खालोखाल असलेला Opacity हा पर्याय निवडलेल्या लेयरची अपारदर्शकता कमी करतो. |
09:01 | circle लेयर निवडा. |
09:03 | Opacity लेव्हल बदलून लंबगोलात झालेला बदल पहा. |
09:10 | आता Boolean operations जाणून घेऊ. |
09:13 | Path मेनूखाली Boolean operations चे हे पर्याय उपलब्ध आहेत. |
09:21 | उपलब्ध असलेले हे आकार बाजूला ठेवू. |
09:26 | हिरव्या रंगाचा चौरस आणि लाल रंगाचे वर्तुळ काढा. चौरसाच्या वर थोडे कडेला हे वर्तुळ ठेवा. |
09:36 | दोन्ही सिलेक्ट करा. Path मेनू खालील Union वर क्लिक करा. आता दोन्ही आकार जोडले गेले आहेत. |
09:46 | Ctrl + Z दाबून undo करा. |
09:51 | पुन्हा दोन्ही सिलेक्ट करून Path मेनूवर जा. |
09:55 | Difference वर क्लिक करून काय होते ते बघा. |
09:59 | Ctrl + Z दाबून undo करा. |
10:03 | पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनू खालील Intersection वर क्लिक करून आकारात होणारे बदल पहा. |
10:11 | Ctrl + Z दाबून undo करा. |
10:16 | पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनूखालील Exclusion वर क्लिक करा. |
10:22 | आकारात झालेले बदल पहा. |
10:24 | Ctrl + Z दाबा. |
10:27 | पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस सिलेक्ट करून Path मेनू खालील Division वर क्लिक करा. |
10:34 | विभागलेल्या वर्तुळावर क्लिक करून तो भाग बाजूला सरकवा. |
10:39 | Ctrl + Z दाबून दोन वेळा undo करा. |
10:44 | पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनू खालील Cut Path क्लिक करा. |
10:50 | आकारात झालेला बदल पहा. |
10:53 | Cut Path पर्याय केवळ स्ट्रोक असलेल्या ऑब्जेक्टवरच वापरता येतो. प्रथम आकार अनसिलेक्ट करा. |
10:59 | आता कुठलाही एक स्ट्रोक निवडून तो बाजूला सरकवा म्हणजे cut path नीट दिसू शकेल. |
11:05 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
11:09 | लेयर्स , फिल्टर्स आणि बुलियन ऑपरेशन्स. |
11:14 | या चार असाईनमेंट करा. |
11:16 | गुलाबी रंगाचा आयत आणि हिरव्या रंगाचा त्रिकोण काढा. |
11:21 | आयताच्या वरच्या बाजूला त्रिकोण ठेवा. |
11:24 | दोन्ही सिलेक्ट करा. Union पर्याय वापरा. हे घराच्या आकारासारखे दिसले पाहिजे. |
11:30 | या लेयरला home नाव द्या. |
11:32 | दोन वर्तुळे काढा. |
11:34 | दोन्ही एकमेकांवर ठेवा. |
11:36 | दोन्ही सिलेक्ट करून Difference पर्याय वापरा. |
11:39 | हे चंद्रकोरीप्रमाणे दिसले पाहिजे. |
11:42 | एक लंबगोल काढा. |
11:44 | 10 कोन असलेली चांदणी काढा. |
11:46 | ती लंबगोलाच्या मध्यभागी ठेवा. |
11:49 | दोन्ही सिलेक्ट करून Exclusion पर्याय वापरा. |
11:52 | अनुक्रमे crescent आणि star नावाचे दोन लेयर्स बनवा. |
11:57 | चंद्रकोरीचा आकार कट करून crescent लेयरमधे पेस्ट करा. |
12:00 | असेच चांदणीच्या आकारासाठी करा. |
12:03 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल. |
12:07 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:16 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12:23 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:34 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:39 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:42 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |