PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-1/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:32, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | नमस्कार. हे आपले ट्युटोरियल थोडेसे स्पष्टीकरणाच्या स्वरूपात आहे. |
00:07 | PHP मध्ये प्रोग्रॅमिंग करताना होणा-या common errors आपण जाणून घेणार आहोत. |
00:13 | त्यापैकी ब-याचशा self explanatory आहेत. |
00:17 | मी असे म्हणेन की 50% errors ह्या आपण काहीतरी चुकीचे टाईप केल्यामुळे किंवा काहीतरी टाईप करण्यास विसरल्यामुळे होतात. |
00:32 | जसे की semicolon टाईप न करणे, जादा bracket समाविष्ट करणे किंवा अशाच काही चुका प्रत्येक जण करतो. |
00:41 | आता येथे मी काही पेजेस तयार केली आहेत. ह्यात काही errors आहेत ज्या सामान्यतः आपल्याला आढळतात. |
00:47 | ही संपूर्ण यादी नाही. परंतु आपण काही बेसिक errorsबघूया. |
00:51 | एकेक करून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी context editorतयार ठेवला आहे. |
01:00 | प्रथम मी तुम्हाला हे html पेज दाखवणार आहे. |
01:06 | येथे echo कमांड मध्ये html code समाविष्ट केला आहे. |
01:10 | हे पेज कार्यान्वित केले तर आपल्याला ही Parse error मिळेल. |
01:17 | आणि येथे हा मेसेज दिसेल. |
01:21 | येथे लक्ष द्या- expecting either a comma or a semicolon |
01:27 | तसेच line number दिला जाईल. जेव्हा Parse error मिळते तेव्हा नेहमी ओळीचा क्रमांक दिला जातो. |
01:34 | येथे ओळ क्रमांक 5 दिसत आहे. |
01:36 | जर आपण खाली 5व्या ओळीवर आलो तर येथे line 5 column 19 (Ln5, Col19); अशी सर्व माहिती दिसेल. |
01:45 | ही 5 वी ओळ आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काहीही चुकीचे दिसत नाही. |
01:50 | php मध्ये echoकमांडचा अशा पध्दतीने अर्थ लावला जातो. सुरूवात, नंतर double quotes आणि शेवट. म्हणजे येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल. |
02:06 | प्रत्यक्षात आपण येथे html code चा समावेश केला असल्यामुळे येथे मध्येच आपण double quotesवापरले आहेत. याचा अर्थ echo कमांड अशी वाचली जाईल. येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल. |
02:17 | याबद्दल आपण एको फंक्शन वरील ट्युटोरियलमध्ये जाणून घेतले होते. |
02:21 | या ओळीवर एरर मिळाली कारण की पहिल्यांदा double quotes अशा ठिकाणी दिला गेला आहे जिथे तो असायला नको. |
02:31 | तांत्रिक दृष्ट्या ही एरर phpला सापडलेली नाही म्हणून ती येथे दिसायला नको. |
02:36 | ही एरर आपल्याला असे सांगते की येथे semicolon असणे आवश्यक आहे. साधारणतः याचा वापर आपण एकोच्या शेवटी करतो. म्हणजेच हा semicolon येथे असणे अपेक्षित आहे. |
02:49 | परंतु येथे semicolon चा वापर अगदीच निरर्थक आहे. |
02:52 | त्याऐवजी आपण single quote चा वापर करणे आवश्यक आहे. |
02:58 | आता जर हे आपण सेव्ह करून कार्यान्वित केले तर आपल्याला 6 व्या ओळीवरची एरर दर्शवली जाईल. |
03:08 | आपल्याला कळेल की 6 व्या ओळीवर किंवा त्याच्या जवळपास बदल आवश्यक आहे. आपण अशाही काही एरर बघणार आहोत ज्या नक्की कुठल्या ओळीवर आहेत ते दर्शवत नाही. |
03:19 | आणि आता हे बघा आपला html code यशस्वीरित्या चालला आहे. याचा काही खास उपयोग नाही. परंतु आपण ते आता समजून घेतले आहे. |
03:28 | आता पुढे semicolonया अजून एका कॉमन एररबद्दल जाणून घेऊ. |
03:33 | आपण येथे semicolon ही फाईल उघडू. या येथे आपल्याला expecting a semicolon अशी parse error मिळाली आहे. |
03:39 | आता आपल्याला semicolonची गरज कशासाठी आहे? हा code तर आपल्याला ठीक दिसतो आहे. आपल्याकडे ही दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांची व्हॅल्यू Alex ही आहे. |
03:47 | आपण या दोन व्हेरिएबल्सची तुलना करत आहोत. म्हणजे येथे double equals असणे आवश्यक आहे. |
03:52 | म्हणजे जर ही कंडिशन true असेल तर हा मेसेज एको होईल. |
03:55 | आता आपण येथे 9 व्या ओळीवर जाऊ या. |
03:58 | हा अत्यंत साधा code आहे. तो जर कठीण असता तरी आपण line 9वर गेलो असतो. |
04:07 | आता येथे बघितल्यावर 9 व्या ओळीवर काहीच चूक दिसत नाही. |
04:10 | परंतु काहीतरी चूक नक्की आहे. phpमध्ये pages एकेका ओळीने वाचली जातात. |
04:19 | आपण बघत असलेल्या या code मध्ये आणि आधीच्या code मध्ये काहीच फरक नाही. |
04:23 | हे compileहोऊन कार्यान्वित होईल. परंतु हे इथे खाली आहे तसेच ते वर सुध्दा आहे. त्यामुळे यानंतर semicolon अपेक्षित आहे. |
04:34 | आपण हे केल्यास हा codeबरोबर होईल. आपण semicolon इथे घातला आहे जरी प्रत्यक्षात डोळ्यांना तो इथे बरा दिसतो. |
04:42 | आपण येथे हे खाली आणू आणि हा code पुन्हा कार्यान्वित करू. |
04:53 | बघा आपले पेज यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे. |
04:57 | अर्थातच हे आपण येथे नेले तरी देखील हा पूर्वीसारखाच valid code आहे. |
05:02 | या ओळीमध्ये एरर आहे असे phpमध्ये खात्रीने सांगता येत नाही. |
05:07 | सामान्यतः असे म्हणता येईल की पूर्वीच्या ओळींमध्ये एरर असल्यामुळे current line कार्यान्वित करता येत नाही. |
05:13 | ह्या ओळीत semicolon दिला गेलेला नसल्याने ही लाईन काम करत नाही. त्यामुळे आपल्याला दिसते की ही एरर line 9मध्ये दाखवली गेली आहे. |
05:29 | अशा प्रकारे आपण दोन बेसिक errors बद्दल जाणून घेतले. |
05:33 | जर तुम्हाला अशा प्रकारची एरर मिळाली तर ज्या ओळीवर एरर आहे केवळ तीच ओळ न तपासता |
05:40 | त्याच्या आधीची ओळही तपासून बघा. आणि त्या तिथे दुरूस्ती करता येते का ते बघा. |
05:47 | गरज असल्यास प्रत्येक अक्षरही तपासून बघा. |
05:50 | तुमच्यासारखे अनेक जण जे अशा प्रकारच्या चुका करतात, त्यांना मला मदत करायला नक्की आवडेल. |
05:56 | संकोच न करता तुम्ही मला शंका विचारू शकता. परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमचे काम दोन तीन वेळा तपासून पहा. |
06:04 | पुढील भागात आपण इतर errors ही जाणून घेऊ या. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.सहभागाबद्दल धन्यवाद. |