Biogas-Plant/C3/Construction-of-the-Mixing-tank/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:18, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | नमस्कार.मिश्रण टँक बांधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. |
00:12 | ही क्रिया दुसऱ्या दिवशी केली जाते. |
00:18 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकू - मिश्रण टँकचे महत्व आणि मिश्रण टँक कसे बांधायचे |
00:31 | आधी आपण मिश्रण टँक चे महत्व आणि मिश्रण टँकचा आकार याबद्दल समजून घेऊ. |
00:44 | मिश्रण टँक मध्ये जैववस्तू पाण्यात मिसळून त्यातून डायजेस्टर टँक मध्ये जाते. |
00:55 | मिश्रण टँक सहसा दंडगोलाकार आकाराचा असतो. |
01:02 | २ फूट उंची आणि २२ इंच व्यास असणाऱ्या मिश्रण टँक ची क्षमता, पाण्यात मिसळलेल्या २५ किलो खता इतके असते. |
01:21 | अन्यथा ,कोरडे खत या टँक मध्ये टाकू नये. |
01:29 | नेहमी खता बरोबर पाणी समान प्रमाणात मिसळले पाहिजे. |
01:38 | उदाहरणार्थ, २५ किलो खत २५ लिटर पाण्यात मिसळले पाहिजे. |
01:50 | डायजेस्टर टँक मध्ये जैववस्तू मोकळे पानाणे वाहून जाईल याची खात्री केली पाहिजे. |
01:59 | आता आपण मिश्रण टँकचे बांधकाम पाहूया. |
02:04 | बांधकामासाठी खालील वस्तूंच्या अवशाक्ता आहे- |
02:12 | 16 माप जड असणारे जाळी घ्या. |
02:18 | काही वृत्तपत्रे |
02:21 | रेती |
02:23 | सिमेंट |
02:25 | आणि लिक्विड वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य. |
02:30 | टप्या - टप्याने मिश्रण टँकच्या बांधकामाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे- |
02:41 | जमिनीवर ६९ इंच बाय २४ इंचाची जाळी पसरवा. |
02:52 | पुढे, जाळीच्या एका टोकापासून ३४ इंच अंतरावर, एक लोखंडी पक्कडने ४ इंच व्यासाचा एक छिद्र करा. |
03:08 | एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तारेच्या वायरेने बांधा. |
03:17 | आपल्याला, २२ इंच व्यासाचा आणि २४ इंच उंचीचा एक दंडगोलाकार करणे आवश्यक आहे. |
03:31 | लक्षात ठेवा मिश्रण टँकच्या खाली होल असणे आवश्यक आहे. |
03:40 | आता, वृत्तपत्रे किंवा कोणताही इतर कागद ह्या जाळीच्या आत मध्ये लावा. |
03:50 | कागदामुळे जाळीच्या आत मधले भरलेली रेती दाबून राहण्यास मद्दत होईल. |
03:59 | जाळीच्या आत रेती काटेकोरपणे भरणे. ह्या मुळे बाहेरच्या जाळीला प्लास्टर करताना हे पक्के होईल. |
04:14 | आता, आपण मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीला प्लास्टर करूया. |
04:23 | सिमेंट मिश्रण पुढीलप्रमाणे तयार करूया- |
04:30 | रेती - ७५ किलो |
04:34 | सिमेंट - २५ किलो |
04:40 | ५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, १० लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळा. |
04:51 | आणि पुरेसं पाणी मिश्रणा मध्ये मिसळा. लक्षात ठेवा ह्या मिश्रणा मध्ये खडी मिसळली जाणार नाही. |
05:05 | दाखवल्या प्रमाणे मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीचे प्लास्टर करणे सुरु करा. |
05:14 | शेवटी एक लाकडाची थापी वापरून प्लास्टर सपाट करून घ्या. |
05:23 | मिश्रण टँक रात्र भर सुखण्यासाठी ठेवला पाहिजे. |
05:29 | दुसऱ्या दिवशी मिश्रण टँकच्या आतली सगळी रेती काढून टाका. |
05:38 | हे सर्व काळजी पूर्वक करा ज्याने मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीचे प्लास्टर तुटणार नाही. |
05:51 | एकदा रेती काढली की, मिश्रण टँकच्या आतल्या भिंतीला प्लास्टर करा. |
06:02 | ह्यासाठी ताजे सिमेंटचे मिश्रण तयार करा, जसे मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीसाठी बनवले होते. |
06:14 | अर्ध मिश्रण आतल्या भिंतीवर पसरवा. |
06:21 | कृपया लक्ष ठेवा प्लास्टर करताना खाली येथे होल आहे. |
06:31 | पुढे आपल्याला येथे प्लास्टर तोडावे लागेल. |
06:37 | आतल्या भिंतीचे प्लास्टर ६ ते ७ तसासाठी सुखून द्या. |
06:48 | छिद्र स्थानावरचे प्लॅस्टर ६ ते ७ तासा नंतर हलकेच ठोकून काढून टाका. |
07:00 | आता प्रत्यक्ष मिश्रण टँक सायंत्राच्या जागेवर न्याण्यासाठी तयार आहे. |
07:12 | लक्षात ठेवा - हे सर्व त्याच दिवसात झाले पाहिजे; म्हणजेच बांधकामाच्या दुसऱ्या दिवशी. त्यामुळे, गवंडीला त्यानुसार योजना करावी लागेल . |
07:25 | आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
07:30 | बायोगॅस संयंत्रासाठी मिश्रण टँकचे एकत्रित करणे पुढील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले जाईल. |
07:40 | थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो- |
07:47 | मिश्रण टँकचे महत्व |
07:50 | आणि मिश्रण टँक कसे बांधायचे |
07:56 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
08:10 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
08:24 | मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |