Biogas-Plant/C3/Construction-of-the-Dome/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:12, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | नमस्कार डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:10 | खालील ट्यूटोरियल्स- खड्डा खोदणे आणि बायोगॅस संयंत्राचे पाया बांधणे, Spoken-tutorial.org वेबसाइटवर उपलब्ध आहे. |
00:22 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टप्या टप्याने घूमटाच्या बांधकामाची प्रक्रीया शिकू. |
00:29 | घूमट म्हणजे काय? |
00:32 | घूमटाची रचना कमान सारखी आहे जी डायजेस्टर टंकवर स्थिर असते, जेथे बायोगॅस गोळा केला जातो. |
00:42 | घूमटाचे बांधकाम करणे हे अतिशय आवडीचे व म्हात्वाची प्रक्रिया आहे. |
00:47 | बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू खालील प्रमाणे आहेत.स्टील रोड्स, तारेची जाळी आणि स्टील वाइयर |
01:00 | ह्या वैशिष्ट्यांची माहिती बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या ट्यूटोरियलमध्ये उल्लेखित आहे. |
01:09 | चला सुरु करू |
01:11 | प्रथम, ७ फूट आणि ६ इंच व्यासाचा एक वर्तुळ, चुना पावडरने आखा. |
01:23 | आता वर्तुळाच्या परिघावर १२ चिन्हे चिन्हांकीत करा आणि दाखवल्याप्रमाणे त्यांना १ ते १२ अंक द्या. |
01:37 | हे १२ चिन्हे एकमेकांशी दोन फूट अंतरापासून लांब असले पाहिजे. |
01:47 | नंतर, १२ अंक चिन्हांकित केलेल्या सर्व बाजूंना १० -इंचाचे स्टील रॉड हातोडीने आत ठोका. |
01:57 | १० इंचाचे स्टील रॉड हातोडीने २ इंचापर्यंत जमिनीत ठोका. |
02:06 | लक्षात ठेवा की ते नंतर काढावे लागतील. |
02:11 | पुढे १२ फूट लांबी स्टील रॉडचा वापर करा. |
02:18 | त्याच बरोबर १२ फूट लांबीचा स्टील रॉड घेऊन, आधीच्या १० इंच स्टील रॉडने ठोकून घेतलेल्या वर्तुळाच्या भौती बाहेरून एक वर्तुळ काढून घ्या. |
02:33 | आता मी तुम्हाला पोकळ रॉड वापरून वर्तुळ कसा बनवायचा हे सांगेन. |
02:40 | पोकळ टोक असलेले लोखंडी रॉड वापरा. |
02:45 | या लोखंडी रॉडने, एक वर्तुळाकार आकार तयार करण्यासाठी १२ फूट स्टील रॉडला वाकवा. |
02:53 | मग दाखवल्याप्रमाणे, हा वर्तुळाकार आकाराचा स्टील रॉड, लहान १० इंच स्टील रॉडच्या भौती ठेवा. |
03:03 | वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आपल्यला दोन १२ फुटचे रॉड लागतील. |
03:11 | येथे दर्शवल्याप्रमाणे, आता स्टील वाइयर वापरून वर्तुळ आकाराचे स्टील रॉड १० इंचाचे स्टील रॉडला बांधा. |
03:25 | काळजी घ्याकी गाठ फार घट्ट बांधली आहे आणि स्टील रॉडचे वर्तुळ अतिशय स्थिर आहे. |
03:32 | हा घूमटाचा पाया आहे. |
03:37 | घूमटाचा पाया इतका मजबूत असणे आवश्यक आहे की तो प्लास्टर घूमटाचे भार सहन करू शकेल. |
03:47 | येथे दर्शवल्याप्रमाणे, आता वर्तुळाच्या मध्यभागी एक ४ फूट आणि २ इंच लांबी बांबूची काठी हातोडीने ठोका. |
04:00 | हातोडीने बांबूची काठी २ इंचापर्यंत जमिनीत ठोका. |
04:07 | काळजी घ्याकी हे स्वत: हून उभे राहू शकते आणि नंतर सहज पणे काढले जाऊ शकते. |
04:17 | ह्या बांबूच्या काठीने घुमटाच्या प्रतिमेला तात्पुरते समर्थन केले पाहिजे. |
04:27 | आता घुमटाची प्रतिमा बांधण्यासाठी सुरु करूया. |
04:33 | पुन्हा एकदा, कमान सारखा आकार तयार करण्यासाठी पोकळ लोखंडी रॉड वापरा आणि एक १२ फूट लांबी स्टील रॉड वाकवा. |
04:43 | हि कमान घूमटाला अर्धवर्तुळाकृतीत आकार देईल. |
04:51 | त्यामुळे, खात्री करा की जेव्हा एका बाजूने वकवल्यावर कमान संतुलनामध्ये आहे. |
05:01 | त्याचप्रमाणे, कमान तयार करण्यसाठी अजून दोन १२ फुटचे रॉड वाकवा. |
05:09 | आता मी आकृती वापरुन परिघावर कमान कश्याप्रकारे ठेवायचे हे स्पष्ट करते. |
05:19 | कमानीचा एक बाजूचा शेवटचा टोक रोड नंबर १, आणि दुसर्या बाजूचा शेवटचा टोक रोड नंबर ७ वर सुरक्षितपणे ठेवा. |
05:34 | हे कमानीची परिपूर्ण सममिती खात्री करेल आणि हे केंद्रात बांबूच्या काठीच्या आधारावर स्थिर राहील. |
05:46 | कमानाला १० इंच स्टील रोड आणि वर्तुळाकार रिंग बरोबर एकत्र बांधण्यासाठी स्टील वाइयर वापरा. |
06:00 | येथे दाखवल्याप्रमाणे, बांधण्यासाठी स्टील वाइयरला गाठी सारखे बांधा. |
06:09 | तसेच कमानीच्या शेवटच्या विरुद्ध दिशेला देखील करा. |
06:17 | पुढे आपण आणखी दोन कमानी बांधूया. |
06:24 | दुसरा कमान रॉड नंबर ३ आणि रॉड नंबर ९ वर सुरक्षितपणे ठेवा. |
06:35 | आणि तिसरा कमान रॉड नंबर ५ आणि रॉड नंबर ११ ला ठेवा. |
06:44 | १२ फूट स्टील रॉड कमानीचा पाया ६० अंशाच्या वेगवेगळ्या कोनावर असावा. |
06:57 | आता आपल्याकडे घूमटाच्या प्रतिमेसाठी तीन कमानी आहेत. |
07:03 | पुढे, काळजीपूर्वक हे स्टील रॉड असे सरकवा ज्याने शीर्षस्थानी थोडे अंतर राहील. |
07:18 | दर्शवल्याप्रमाणे स्टीलच्या तारा वापरून स्टील रॉड बांधा. |
07:26 | तीन कमानी छेदनबिंदू त्रिकोणासारखे दिसेल. |
07:34 | त्रिकोणाची बाजू अंदाजे २.५ इंचाची असावी. |
07:40 | चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, गाठ बांधल्यानंतर प्रतिमेची वरची बाजु अशी दिसली पाहिजे . |
07:51 | येथे पाहू, गवंडीने दखवल्याप्रमाणे - बांबू रॉड वापरून उघड्या त्रिकोणाचा भाग दाखवतो. |
08:04 | ह्या जागेत येथे १ इंच व्यासाचा ग्यास पाईप फिट होईल. |
08:15 | कमान एकदा लाऊन झाले की, उरलेल्या १२ फूट स्टील रॉडने वर्तुळाकार रिंग उभारुया. |
08:25 | या चित्राच्या मदतीने, प्रथम आपण शिकुया की रिंग कश्या प्रकारे बनवायच्या. |
08:34 | आता पर्यंत अशी प्रतिमा आपण बांधली आहे- |
08:40 | वर्तुळाकार पाया आणि अर्ध-वर्तुळाकार कमान. |
08:48 | दाखवल्याप्रमाणे, आपल्याला ८ वर्तुळाकार रिंग अशा प्रकारे कमानी वर स्थीर करण्याची गरज आहे. |
09:00 | ह्या रिंग एकसमान अशा ठेवा की, प्रतेकामध्ये ८ इंचाचे अंतर विभागलेले राहिल. |
09:13 | वर्तुळाकार रिंग बनवण्यासाठी, वरून सुरू करा आणि हळूवार खाली या. |
09:22 | वर्तुळाकार रिंग करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा- |
09:29 | प्रतिमेवर स्टील रॉडची लांबी वर्तुळाकार रिंगच्या स्थानावर अवलंबून असते. |
09:39 | जसे आपण वरून खली जाऊ तशी लांब स्टील रॉडची आवशकता लागेल. |
09:50 | रिंग स्थिर करण्यासाठी, आवश्यक लांबी मिळण्यासाठी प्रथम आपल्याला स्टील रॉड कापावे लागतील. |
10:01 | चला मग करूया. |
10:04 | पहिल्या रिंग साठी, जी वरून सर्वात छोटी रिंग आहे त्याला अंदाजे ४ फुट आणि ७ इंच स्टील रॉड लागेल व गाठ बांधण्यासाठी २ फुट जास्त लागेल. |
10:25 | ह्या वर्तुळाकार रिंगचा व्यास १० इंचाचा असावा. |
10:33 | दुसऱ्या रिंग साठी अंदाजाने ७ फुट १ इंच स्टील रॉड लागेल. |
10:45 | रिंगचा व्यास १ फुट ७ इंचाचा असावा. |
10:55 | तिसऱ्या रिंग साठी ९ फुट ८ इंच स्टील रॉड लागेल. |
11:07 | रिंगचा व्यास २ फुट ५ इंच असावा. |
11:16 | चवथ्या रिंग साठी १२ फुट आणि ३ इंच स्टील रॉड लागेल. |
11:26 | रिंगचा व्यास ३ फुट ३ इंच असावा. |
11:36 | पाचव्या रिंग साठी १४ फुट आणि १० इंच लांबी स्टील रॉड लागेल. |
11:46 | रिंगचा व्यास ४ फुट १ इंच असावा. |
11:58 | साहाव्या रिंग साठी १७ फुट ४ इंच लांबी स्टील रॉड लागेल. |
12:08 | रिंगचा व्यास ४ फुट १० इंचाचा असावा. |
12:17 | लक्षात ठेवा- आधी सांगितलेल्या पहिल्या वर्तुळाकार रिंगप्रमाणे, सर्व ८ रिंग साठी स्टील वाइयर बरोबर रॉड्सला बांधण्यासाठी २ फुट जास्त वाइयर घेतली होती. |
12:38 | आणि सर्व्या ८ रिंगचा व्यास ६ इंच न धरता मोजले आहे. |
12:49 | आता येते ७ वी आणि ८ वी रिंग. |
12:55 | दोन्ही, वर्तुळाकार रिंग आणि घुमटाचा प्रवेश करण्यासाठी देखील वापरले जाते. |
13:07 | या दोन रिंगचे मोजमाप खालील प्रमाणे आहेत- |
13:12 | सातव्या रिंग साठी २० फुट आणि १० इंच लांबी स्टील रॉड लागेल. |
13:23 | आणि आठव्या रिंग साठी २३ फुट ५ इंच लांबी स्टील रॉड लागेल. |
13:37 | लक्षात ठेवाकी ह्यात वाकवलेल्या रॉडची मोजमाप धरले आहे. |
13:45 | जसे तीन परिपूर्ण रिंग घुमटाच्या प्रतिमेवर ठेवले जाते, एक महत्वाची गोष्ट करावी लागते जी- |
13:59 | ४ फुट लांबीचे ६ बांबू कांड्या वाकवलेल्या स्तिथित घूमटेच्या प्रतिमेवर ठेवा. |
14:12 | लक्षात ठेवाकी बांबू कांड्या पायाच्या केंद्रा पासून एकसमान असली पाहिजे. |
14:22 | आणि वर्तुळाकार रिंग किंवा कमानीच्या विरोधात घट्टपणे आधारित असेल पाहिजे. |
14:31 | या काठ्या घुमटाच्या प्रतिमेला आधार देतील. |
14:40 | लक्षात ठेवा, आधी सांगितल्या प्रमाणे मोजमाप केले असले तर- आपल्याला प्रतेक वर्तुळाकार रिंग मध्ये ८ इंच एकसमान अंतरावर मिळेल. |
14:56 | हे खात्री करण्यासाठी २ होल असणारी १ फुट स्टील पट्टी घ्या. |
15:06 | ह्या दोन होलचे अंतर ८ इंचाचा असावे. |
15:13 | आणि इथे दाखवल्याप्रमाणे, २ वर्तुळाकार रिंगच्या मध्ये घट्ट असले पाहिजे. |
15:21 | तसेच तुम्ही काही बारीक फरक दुर्लक्ष करू शकता. |
15:29 | सव्हया वर्तुळाकार रिंग ठेवल्यानंतर एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे, प्रतिमेवर रॉड उभे स्थिर केले पाहिजे. |
15:43 | मी समजावते हे कसे शक्य आहे. |
15:48 | दोन अर्ध्या कमानीच्या मध्ये - ५ फुट ५ इंचेचा स्टील रॉड दोन मुख्य कमानाना दोन भागात स्थिर करा. |
16:04 | या चित्रात दाखवल्या प्रमाणे, रॉडला रिंगच्या पाया पासून पहिल्या रिंग पर्यंत स्टीलच्या ताराणे बांधा. |
16:17 | तसेच अर्ध्या-कामानाला अजून दोन स्टील रॉड ४ फुट ७ इंचाचे भागा आणि ५ फुट ५ इंच स्टील रॉड स्थिर करा. |
16:37 | दाखवल्याप्रमाणे, या दोन रॉडला रिंगच्या पाया पासून दुसऱ्या रिंग पर्यंत स्टीलच्या तारेणे बांधा. |
16:49 | लक्ष्यात घ्या- ५ व्या आणि ६ व्या १० इंचाचा हातोडीने ठोकलेल्या स्टील रॉडने पुढील गोष्टी करा: |
17:01 | ४ फुट ७ इंच लांबीचा स्टील रॉड वाकवून ६ व्या रिंगला बांधा. |
17:12 | चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे, हे सर्व आपण घुमटामध्ये प्रवेश करण्यासाठी केले आहे. |
17:23 | काळजी घ्या की दोन्ही गोष्ठीमध्ये- वर्तुळाकार रिंगला स्टील वाइयरने सोप्या पद्धतीने बांधण्यासाठी वरती ३ इंच जास्त जागा सोडली आहे. |
17:39 | आता आपण शेवटच्या २ वर्तुळाकार रिंग म्हणजेच ७ व्या आणि ८ व्या रिंग स्थिर करूया. |
17:50 | तसेच काळजी घ्या- ६ व्या आणि ८ व्या रिंगच्या मध्ये फट आहे किंवा घुमटाच्या आत जाण्यासाठी जागा आहे . |
18:02 | ही जागा इतकी मोठी हवी आहे की त्यातून गवंडी आत जाऊ शकतो. |
18:10 | या फटचे अंतर अंदाजे- २ फुट रुंदी आणि २ फुट उंची असावी. |
18:18 | वरील सांगितल्या प्रमाणे, जागा तयार करण्यासाठी ७ वी आणि ८ वी रिंग वापरा. |
18:28 | चित्रात दाखवल्याप्रमाणे, ७ वा रॉड वाकवा ज्याने आत जाण्याची वरची बाजू बनेल, आणि ८ वा रॉड वाकवा ज्याने खालची बाजू बनेल. |
18:43 | चित्रात दाखवल्याप्रमाणे, खालच्या बाजूचे अंतर किंवा आत जाण्याची जागा बनेल. |
18:54 | आता, ७ वी आणि ८ वी रिंगला वाकवून स्टील वाइयर बरोबर घट्ट बांधा. |
19:05 | पुढे घुमटाची प्रतिमा तारेच्या जाळीने झाका. |
19:13 | तारेची जाळीचा आवश्यक आकार कापण्यासाठी कात्रीचा वापर करा. |
19:21 | वरपासून खालपर्यंत तारेची जाळी घट्ट झाकण्यासाठी सुरू करा. |
19:31 | प्रतिमेला जाळी बांधण्यासाठी, जाळी घट्ट ताणून स्टील तारेने बांधून घ्या. |
19:39 | हे धातूचा हुक वापरुन केले जाऊ शकता. |
19:46 | तारेच्या जाळीचे थर घट्ट बांधण्यासाठी- दोन थरांच्या छिद्रामध्ये हुक समाविष्ट करा. |
19:56 | तारेच्या जाळीला ताणून हुकला फिरवून घ्या आणि एकाच वेळी त्यात गुंतवून घ्या. |
20:06 | तारेची जाळी नीट घट्ट ताणली नाही तर, नंतर घुमटाचा प्लास्टर करताना त्याच्यावर तडा येऊ शकतो. |
20:20 | लक्षात ठेवा, प्रतिमेच्या मागच्या बाजूला अतिरिक्त ४ -५ इंच जाळी सोडने. |
20:31 | ह्या कारणासाठी डायजेस्टर टंक वरील घुमट स्थिर करणे ह्याच्यात स्पष्ट केले जाईल. |
20:39 | पूर्ण प्रतिमा झाकण्यासाठी ३ बंडल तरांची जाळी वापरा. |
20:47 | अंदाजे घूमटावर ३ थर बांधली जाईल. |
20:55 | तारांच्या जाळीचे अनेक थर लवल्यामुळे घूमटाला प्लास्टर करताना सिमेंट घट्टपणे ठेवण्यास मदत होईल. |
21:06 | घुमटाच्या प्रवेशावर तारेची जाळी झाकून झाल्यावर कात्रीने कापून घ्या. |
21:15 | आपण येथे पाहू शकता गवंडी घुमटाच्या त्याच अंतराद्वारे किंवा प्रवेशद्वारा आत जात आहे. |
21:24 | तारेची जाळी एकदा स्थिर झाल्यावर, आधारासाठी आत ठेवलेल्या बांबूची काठ्या काढून टाका. |
21:32 | कृपया लक्षात ठेवा काठ्या काढतांना घुमटाच्या प्रतिमेला अडथळा येनार नाहीना. |
21:41 | हे काळजी पूर्वक आणि सावकाश करा. |
21:45 | तारेचे घुमट आता तयार झाले आणि डायजेस्टर टॅंक वर ठेवू शकता. |
21:53 | सर्कावण्या आधी १० इंचाची लोखंडी स्टील रॉडला पायाच्या रिंग पासून काढा. |
22:01 | याची खात्री कराकी, तारेची जाळी घट्ट बांधली आहे. |
22:07 | हे बायोगॅस सयंत्राच्या घुमट बांधण्याच्या ट्यूटोरियलच्या अंतिम टपप्यात पोचलो आहोत. |
22:14 | बायोगॅस सयंत्रावर घुमट स्थित करण्याचे हे पुढील ट्यूटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे. |
22:22 | थोडक्यात, ह्या ट्यूटोरियलमध्ये, आपण टप्या टप्याने घुमटाच्या बांधकामाची प्रक्रीया शिकलो. |
22:30 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केला आहे |
22:40 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
22:49 | मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद |