Linux/C2/Basics-of-System-Administration/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:03, 25 March 2013 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Basics of System Administration

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Visual Clue
Narration
00:02 Linux च्या Basics of System Administration वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:09 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:13 adduser
00:14 su
00:16 usermod
0.17 userdel
00:18 id
00:19 du
00:20 df
00:22 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.10चा वापर करणार आहोत.
00:27 पूर्वतयारीसाठी कृपया General Purpose Utilities in Linux हे ट्युटोरियल समजून घ्या.
00:35 जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00:39 दाखविलेल्या कमांडस् कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला Admin access असणे आवश्यक आहे.
00:47 प्रथम आपण नवीन user कसा बनवायचा ते पाहू.
00:53 'adduser' ही कमांड नव्या user चे login, authentication सहित तयार करते.
01:01 आपण sudo ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही user account समाविष्ट करू शकतो.
01:06 sudo कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ.
01:11 sudo कमांडमुळे Administrative user ला super user म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात.
01:19 sudo ह्या कमांडमधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत.
01:27 आता आपण नवीन user कसा बनवायचा ते शिकू.
01:32 कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
01:45 येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे.
01:49 येथे “sudo space adduser” ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
01:58 आपल्याला पासवर्ड विचारला जाईल.
02:01 येथे Admin हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा.
02:07 आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही.
02:11 त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे.
02:16 हे करून झाले की adduser:only one or two names allowed हा संदेश दर्शवेल.
02:27 आता आपण duck नामक नवे युजर अकाउंट तयार करू.
02: 34 कमांड टाईप करा.
02:36 sudo space adduser space duck आणि एंटर करा.
02:45 आपण duck नामक नवा user तयार केला आहे.
02:49 नवीन user बनवण्याच्या प्रक्रियेत त्या userसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते.
02:58 कृपया लक्ष द्या. duck ह्या userसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल.
03:05 तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा. येथे मी duck हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे.
03:17 कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा.
03:20 सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली.
03:26 आता नवीन user साठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे.
03:31 इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते.
03:35 परंतु आत्तापुरते आपण Full name समोर duck एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटर चे बटण दाबून रिकामी ठेवा.
03:46 एंटर दाबा.
03:47 आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया.
03:51 ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते.
03:55 आता user अकाऊंट तयार झाले का हे तपासू.
04:00 त्यासाठी command prompt वर टाईप करा.
04:04 ls space slash home
04:09 आणि एंटर दाबा.
04:11 home फोल्डरमधील user ची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात.
04:17 आणि येथे आपला नवा duck नामक user तयार झाला आहे.
04:23 आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या.
04:26 आता पुढील कमाड आहे su
04:30 su चा अर्थswitch user
04:34 चालू user वरून दुस-या user वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो.
04:39 आता आपण टर्मिनल वर जाऊ.
04:43 टर्मिनलवर ही कमांड टाईप करूया.
04:45 su space hyphen space duck आणि एंटर दाबा.
04:53 आपल्याला पासवर्ड विचारला जाईल.
04:56 आपण user duck साठी पासवर्ड टाईप करूया. जो duck हाच आहे.
05:04 कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या current user वरून दुस-या user वर गेला आहे. म्हणजे येथे आता आपण duck वर गेलो आहोत.
05:14 ह्या user मधून logout करण्यासाठी टाईप करा.
05:17 logout आणि एंटर दाबा.
05:22 आता आपण duck ह्या current user च्या टर्मिनलवरून logout झालो आहोत आणि आपण आधीच्या userअकाऊंट वर म्हणजेच येथे vinhai वर गेलो आहोत.
05:31 आता आपण usermod ही कमांड दाबूया.
05:35 usermod कमांडमुळे
05:37 super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की,
05:46 पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे.
05:50 user अकाऊंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे.
05:55 आपण ह्या कमांडस वापरून बघू या.
05:57 त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ .
05:59 duck user अकाऊंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू.
06:05 येथे command prompt वर टाईप करा.
06:09 sudo space usermod space hyphen e space 2012 hyphen 12 hyphen 27 space duck
06:33 आणि एंटर करा.
06:37 hyphen e ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण user अकाउंटची कमांड मध्ये दर्शवलेली Expiry date सेट केली आहे.
06:46 अशा प्रकारे आपण duck ह्या USER अकाऊंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे.
06:52 आता आपण uid आणि gid ह्या कमांडस बद्दल चर्चा करू.
06:57 'id command' वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते.
07:04 id space hyphen u ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते.
07:12 ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी id space hyphen g ह्या कमांडचा उपयोग होतो.
07:20 आता आपण हे करून पाहू.
07:22 टर्मिनलवर टाईप करा.
07:25 id आणि एंटर दाबा.
07:29 आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले User IDs आणि Group IDs दिसत आहेत.
07:37 केवळ user id साठी hyphen u ह्या पर्यायाचा उपयोग होतो.
07:43 चला, कमांड टाईप करू या. id space hyphen u
07:49 आणि एंटर दाबा.
07:50 आता आपल्याला केवळ युजरच्या IDs दिसतील.
07:55 परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील तर?
08:00 हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा.
08:02 id space hyphen n space u आणि एंटर दाबा.
08:13 आता आपल्याला युजर IDs ऐवजी त्यांची नावे दिसतील.
08:20 आता आपण Group IDs च्या कमांडस् बद्दल जाणून घेऊ.
08:24 id space hyphen g टाईप करा.
08:29 येथे आपण Group IDs बघू शकतो.
08:32 जर आपल्याला चालू user चे सर्व ग्रुपIDs बघायचे असल्यास टाईप करा.
08:38 id space hyphen capital G आणि एंटर दाबा.
08:46 कृपया लक्ष द्या की आपण G हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे.
08:50 तुम्ही स्वतः आलेले आऊटपुट बघू शकता.
08:53 आता आपण user अकाऊंट कसे डिलीट करायचे ते पाहू.
08:57 त्यासाठी userdel ह्या कमांडचा उपयोग करा.
09:00 आपण userdel ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे user अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो.
09:07 आपण हे टर्मिनलवर करून बघू.
09:09 इथे sudo space userdel space hyphen r space duck असे टाईप करा.
09:22 आपण येथे hyphen r हा पर्याय वापरला आहे.
09:25 ह्यामुळे ह्या user बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे.
09:30 एंटर दाबा आणि निरीक्षण करा.
09:34 आता duck हा user डिलीट झाला आहे.
09:38 हे टाईप करून तपासून बघा.
09:41 ls space slash home आणि एंटर दाबा.
09:47 आपल्याला दिसेल की duck नामक user अकाऊंट डिलीट झाला आहे.
09:53 आता आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या.
09:56 Linux System Adminstration मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांडस आहेत.
10:03 df कमांड डिस्क वरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते.
10:08 आणि du कमांड फाईल ने वापरलेल्या जागेची माहिती देते.
10:13 कृपया Assignment म्हणून ह्या दोन्ही कमांडस् वापरून तुम्ही त्याचे आऊटपुट शोधा.
10:19 आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि df कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया.
10:26 कृपया df space hyphen h टाईप करून एंटर दाबा.
10:33 याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल.
10:38 ही mounted space वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते.
10:46 आता आपण du या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू.
10:50 आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत.
10:57 जर नसतील तर कृपया General purpose utilities in Linux हे ट्युटोरियल बघा.
11:04 ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत.
11:11 होम फोल्डरवर जाण्यसाठी टर्मिनलवर टाईप करा.
11:15 cd space slash home आणि एंटर दाबा.
11:20 मग du space hyphen s space astrix dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
11:33 ही कमांड आपल्याला डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार ह्या बद्दलची माहिती दर्शवेल.
11:43 Assignment म्हणून command prompt वर टाईप करा.
11:47 du space hyphen ch space astrix dot txt आणि बघा काय होते ते.
11:59 आपण पुन्हा स्लाईडवर जाऊ या.
12:01 आपण काय शिकलो ते थोडक्यात.
12:03 adduser ने नवा user बनतो.
12:06 su ने user बदलता येतो.
12:09 usermod ने अकाऊंट सेटींग्ज बदलता येतात.
12:12 Userdel ने user अकाऊंट डिलीट होतो.
12:15 id कमांडने user आणि group ids ची माहिती मिळते.
12:20 df कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते.
12:24 du कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते.
12:27 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:33 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:37 *ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:40 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:44 *Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या.
12:53 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:03 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:08 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून
13:12 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha