DWSIM-3.4/C2/Sensitivity-Analysis-and-Adjust/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:28, 14 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण sensitivity analysis आणि adjust कसे करणे हे जाणून घेऊ.
00:10 कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्टचे प्रमुख आहेत.
00:12 या ट्यूटोरियल मध्ये, आपण separation साठी अचूक Reflux Ratio निश्चित करूया.
00:19 प्रथम आपण हे Sensitivity Analysis द्वारे करू.
00:24 आपण हे Adjust ऑपरेशन द्वारे पुन्हा करू.
00:28 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी DWSIM 3.4 वापरत आहे.
00:34 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला:

DWSIM मध्ये simulation file कसे उघडणे. rigorous distillation simulation कसे करणे. flowsheet मध्ये कॉंपोनेंट्स कसे जोडणे हे माहीत असले पाहिजे.

00:48 आपली वेबसाइट- spoken tutorial dot org पूर्वीपेक्षित ट्यूटोरियल्सचे तपशिल देते.
00:55 तुम्ही ह्या साइट मधून हे ट्यूटोरियल्स आणि सर्व संबंधित फाइल्स देखील एक्सेस करू शकता.
01:02 ही स्लाइड, एका पुर्वीपेक्षित ट्यूटोरियल्स मध्ये प्रॉब्लेम कसे सोडवले हे दाखवते.
01:08 Rigorous distillation वापरुन हे सोडवले जाते.
01:12 जी शुधता अपेक्षित होती त्या पेक्षा कमी आहे.
01:17 आपण शुद्धता कशी सुधारू?
01:19 आपल्याला reflux ratio वाढवण्याची गरज आहे.
01:23 आता DWSIM मध्ये संबंधित फाइल उघडू.
01:28 फाइलचे नाव शीर्षकात आहे.
01:30 मी आधीच DWSIM उघडले आहे.
01:34 मी आधीच rigorous dot dwxml फाइल उघडले आहे.
01:40 ही फाइल spoken-tutorial.org वेबसाइट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
01:48 Distillate वर क्‍लिक करू.
01:50 Properties विभागात, Molar Composition आइटम 2 पाहुया.
02:00 Mixture च्या बाजूच्या एरो वर क्‍लिक करू.
02:04 Benzene mole fraction 0.945 आहे.
02:09 आपण हे 0.95 ने वाढवू इच्छितो.
02:13 आता हे reflux ratio वाढवून पाहु.
02:18 हे तेच का जे आपण थोड्या वेळ पूर्वी, स्लाइड मध्ये पाहिले होते.
02:22 Menu बार मध्ये File बटनाच्या उजव्या बाजूला Optimization पर्याय शोधा.
02:28 त्यावर क्‍लिक करा. Sensitivity Analysis पर्याय वर क्‍लिक करा. एक विंडो दिसेल.
02:37 आपण sensitivity analysis च्या मेनु बार मध्ये 5 मेनुज पाहु शकतो.
02:43 Sensitivity Studies शोधा.
02:47 जर ते आधीच निवडलेले नसेल, तर त्यावर क्‍लिक करा.
02:51 Case Manager शीर्षकाच्या अंतर्गत 4 पर्याय सह एक बॉक्स पाहु शकतो.
02:58 New पर्याय वर क्‍लिक करा.
03:01 हे एक नवीन Sensitivity Analysis केस तयार करण्यात मदत करेल.
03:07 आपण SACase0 नाव पाहतो.
03:12 जो प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे त्याला पुन्हा आठवा:
03:14 चांगली शुधता मिळण्यासाठी reflux ratio वाढवायची गरज आहे.
03:19 reflux ratio हे इनडिपेंडेंट वेरियबल आहे.
03:24 आता Independent Variables बटनाद्वारे हे लागू करू.
03:29 Object बटनाच्या पलीकडच्या रिकाम्या जागेवर क्‍लिक करा.
03:34 आपल्या डिस्टिलेशन कॉलम, DC-000 वर क्‍लिक करा.
03:40 उजव्या बाजूला, एक Property नावाचा पर्याय आहे.
03:45 मी हे आतमध्ये आणते.
03:47 मी डाउन-एरो वर क्‍लिक करते.
03:50 खाली स्क्रोल करून Condenser_Specification_Value ला ओळखू.
03:55 ते ह्या मेनूच्या तळाशी येते.
03:57 ते reflux ratio ची भूमिका करते.
03:59 क्‍लिक करून ते निवडा.
04:03 तुम्ही ते इथे निवडलेले पाहु शकता.
04:07 reflux ratio 2 पेक्षा जास्त असले पाहिजे, ते आठवणीत ठेवा.
04:12 त्यामुळे, आपण Lower limit 2 म्हणून एंटर करू.
04:16 Upper limit 2.5 ने बदला.
04:20 Number of Points ना 6 ने बदला.
04:24 पुढे Dependent Variable वर क्‍लिक करू.
04:27 डाव्या बाजूला, Variables नावाचा कॉलम दिसेल.
04:33 त्याच्या खाली, वेरियबल्स जोडण्यासाठी हिरव्या रंगात एक प्लस बटन दिसेल. त्यावर क्‍लिक करा.
04:41 एक नवीन रो दिसेल. Object खालील डाउन-एरो वर क्‍लिक करा.
04:46 तुम्हाला ते दोनदा क्‍लिक करावे लागेल.
04:48 Distillate नामक पर्याय वर क्‍लिक करा.
04:52 मी Property खालील डाउन-एरो वर क्‍लिक करते.
04:56 ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यास हे देखील तुम्हाला दोनदा क्‍लिक करावे लागेल.
05:01 Molar Fraction (Mixture) – Benzene शोधा.
05:05 त्यासाठी खाली स्क्रोल करावे लागेल.
05:08 तसेच तिथे इतर पर्याय आहेत जे त्यासारखे अतिशय समान आहे.
05:12 खात्री करा की तुम्ही हेच निवडले आहे. त्यावर क्‍लिक करा.
05:17 ते निवडले जाते आणि टॅब वर दिसते. नंतर Results वर क्‍लिक करा.
05:24 आपण Start Sensitivity Analysis नावाचा पर्याय पाहु शकतो. मी त्यावर क्‍लिक करते.
05:31 आपण एक एक करुन reflux ratios साठी कॉलम सिमुलेट होतांना पाहतो.
05:36 सिम्युलेशन च्या शेवटी, आपल्याला Done मेसेज मिळतो.
05:40 सहा reflux ratios साठी परिणाम 2 ते 2.5 पर्यन्त पाहु शकता.
05:49 तसेच आपण संबंधित benzene कॉमपोज़िशन्स पाहु.
05:54 आपण Independent Variables वर परत जाऊ शकतो.
05:58 'number of points' 11 ने बदलून Results वर परत जाऊ.
06:05 पुन्हा एकदा Start Sensitivity Analysis वर क्‍लिक करा.
06:10 तुम्ही पाहु शकता की अकरा रन्स पूर्ण करून झाले.
06:14 वरती स्क्रोल करू.
06:17 0.95 ची इच्छित शुधता 2.05 आणि 2.1 च्या दरम्यान साध्य करता येईल.
06:26 तुम्ही हे Independent Variables मध्ये lower आणि upper limits निवडून पुनरावर्त करा.
06:34 पण, मी असे करणार नाही.
06:36 ह्या रीतीने पुढे चालू ठेवून, 0.95 शुधतेसाठी आवश्यक अचूक reflux ratio ठरवू शकतो.
06:45 तुमच्यसाठी असाइनमेंट आहे. शुधतेसाठी आवश्यक reflux ratio शोधू शकता का?
06:52 मी आत्ताच स्पष्ट केलेल्या पध्दतीचा वापर करा.
06:56 मी तुम्हाला उत्तर देईन हे अंदाजे 2.067 आहे.
07:01 आपण हे परिणाम आलेखीय स्वरूपात देखील पाहू शकतो.
07:07 Chart पर्याय वर क्‍लिक करा.
07:10 Draw पर्याय वर क्‍लिक करून इथे आलेख पाहु शकता.
07:15 Distillate composition विरुद्ध condenser specification value, जे की, reflux ratio आहे.
07:24 मी हे पोप-अप बंद करते.
07:26 मी हे सिम्युलेशन "sensitivity" म्हणून सेव्ह करते.
07:36 आता पुढील असाइनमेंट वर जाऊ.
07:39 मागील असाइनमेंट मध्ये, एक दुसरा डिपेंडेंट वेरियबल समाविष्ट करा: bottoms मध्ये Benzene mole फ्रक्शन आहे.
07:46 डिस्टिलेट आणि bottoms कॉमपोज़िशन्स बघा.
07:51 Chart वापरुन दोन प्रोफाइल्स कसे प्लॉट करणे हे बघा.
07:55 आता आणखी एक असाइनमेंट करू.
07:59 असाइनमेंट १ मध्ये पाहिलेले 2.067 चे रिफ्लक्स रेशियो काम करेल की नाही ते तपासा.
08:06 ह्यासाठी, पुन्हा एकदा rigorous.dwxml सह सुरूवात करू.
08:11 रिफ्लक्स रेशियो 2.067 ने बदला.
08:15 सिमुलेट करा.
08:17 कोणती डिस्टिलेट कॉंपोज़िशन तुम्हाला मिळेल?
08:20 आपण चाचणी आणि चूक करून इच्छित रिफ्लक्स रेशियोची गणना केली आहे.
08:27 DWSIM कडे गणना करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे.
08:32 त्याला Adjust म्हटले जाते.
08:35 आता उजविकडील object palette मधून Adjust शोधू.
08:42 त्याला ड्रॅग करून फ्लोशीट वर आणा आणि distillate खाली कॉलमच्या बाहेर ड्रॉप करा.
08:49 मी त्याला क्‍लिक करून निवडते.
08:52 Properties टॅब मध्ये, आपण Controlled variable नावाचा पर्याय पाहतो.
08:58 हे distillate composition म्हणजे डिपेंडेंट वेरियबलशी संबंधित असते.
09:05 जर ते आधी उघडलेले नसेल, Controlled Variable च्या डाव्या बाजूच्या एरो वर क्‍लिक करा आणि, ते उघडेल.
09:13 Click to Select वर क्‍लिक करा.
09:17 उजवया बाजूला दिसणार्‍या बटनावर क्‍लिक करा.
09:19 एक पॉप-अप दिसते.त्यात तीन कॉलम्स आहेत.
09:23 Type खालील, Material Stream वर क्‍लिक करा, जर ते आधीच निवडलेले नसेल.
09:29 Object कॉलम मध्ये, जे की, मध्यम कॉलम मध्ये, Distillate निवडा.
09:35 हे सर्वात उजवीकडील कॉलम वर भरपूर वेरियबल्स निर्माण करते.
09:39 Molar Fraction (Mixture) – Benzene शोधा.
09:44 ते Solid Phase एंट्रीस नंतर येतात. त्यावर क्‍लिक करा.
09:51 पुन्हा एकदा, काळजी घ्या, त्यासारखे अनेक पर्याय आहेत.
09:55 OK वर क्‍लिक करा.
09:58 हे Properties मेनू मध्ये प्रतिबिंबित होते याची खात्री करा.
10:04 Manipulated Variable सह वरील प्रक्रिया पुन्हा करा.
10:09 उजविकडील बटनावर क्‍लिक करा.
10:12 पोप अप मेनू मध्ये, खाली स्क्रोल करून Distillation column शोधून त्यावर क्‍लिक करा.
10:18 नंतर DC-000 वर क्‍लिक करून Condenser_Specification_Value शोधा.
10:26 त्यावर क्‍लिक करून OK वर क्‍लिक करा.
10:31 आता Parameters प्रॉपर्टी साठी नेहमीची प्रक्रिया अनुसरण करा.
10:36 हे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
10:40 आपण Adjust Property Value नावाचा एक पर्याय पाहु शकतो.
10:43 सामान्यतः ह्याची वॅल्यू 1 आहे.
10:48 1 काढून 0.95 प्रविष्ट करा.
10:52 मी एक किंचित मोठी संख्या 0.95001 प्रविष्ट करणार आहे.
11:00 मी एक किंचित मोठी संख्या प्रविष्ट का केली ह्या बद्दल तुम्ही विचार करा.
11:06 ह्या खालील काही ओळी नंतर, Simultaneous Adjust नावाचा एक पर्याय पहा.
11:11 नेहमीची पद्धत वापरुन, त्याची वॅल्यू True ने बदला.
11:18 जर त्याची गणना आपोआप झाली नसेल तर, Play आणि Recalculate All दाबा
11:26 माझ्या बाबतीत, त्याची गणना आपोआप झाली. त्यामुळे, मी हे क्‍लिक करणार नाही.
11:32 अगदी थोड्या वेळात, गणना पूर्ण होते.
11:35 आपला उद्देश डिस्टिलेट शुधतेसाठी 0.95 साध्य झाला का ते तपासूया.
11:42 Distillate निवडा.
11:44 Molar Composition च्या अंतर्गत Mixture तपासा.
11:49 आपण पाहु शकतो की benzene चा composition 0.95 आहे.
11:53 आता ह्यासाठी कोणता reflux ratio आवश्यक आहे ते तपासू.
11:59 ह्यासाठी, Distillation column वर क्‍लिक करा.
12:02 Condenser Specification अंतर्गत वॅल्यू तपासा.
12:08 आपण वॅल्यू 2.067 पाहतो.
12:13 हे तेच आहे जे आपण Sensitivity Analysis मध्ये प्राप्त केले होते.
12:18 मी हे सिम्युलेशन "adjust" म्हणून सेव्ह करते.
12:27 तुमच्यासाठी पुढील असाईनमेंट आहे.
12:29 समजा मला डिस्टिलेट मध्ये बेंझिन मोल फ्रक्शन 0.96 पाहिजे.
12:36 कोणता रिफ्लक्स रेशियो आवश्यक आहे ?
12:39 जसे की आपण प्रॉब्लम्स मध्ये सोडवले होते, तुम्ही फक्त रिफ्लक्स रेशियो बदलू शकता.
12:44 प्रथम हे Sensitivity Analysis द्वारे सोडवा.
12:47 तुमची गणना Adjust सह तपासा.
12:51 आता आणखी एक असाइनमेंट करू.
12:52 ह्या कॉलम मध्ये मिळणारी उच्चतम डिस्टिलेट शुधता शोधा.
12:58 यापूर्वी केलेल्या असाइनमेंट्स मध्ये, तुम्ही फक्त रिफ्लक्स रेशियो बदलू शकता.
13:03 0.99 च्या मोल फ्रक्शन पर्यन्त मी हळू हळू जाऊ शकते.
13:10 थोडक्यात.
13:12 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
13:14 Sensitivity Analysis कसे करणे.
13:16 सल्यूशन रेंजला कसे कमी करणे.
13:18 Adjust वापरुन समान परिणामांना कसे साध्य करणे.
13:22 प्लँट ला जास्त प्रेरित करण्यासाठी Adjust कसे वापरणे.
13:27 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
13:31 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:35 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर आपण वीडियो डाउनलोड करूनही पाहु शकता.
13:39 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
13:47 तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का?
13:51 जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा.
13:54 तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा.
13:56 FOSSEEटीम मधून कोणीतरी त्याच उत्तर देईल.
13:59 कृपया ह्या साइट ला भेट द्या.
14:02 FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते.
14:08 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
14:12 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
14:16 FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते.
14:21 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
14:25 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
14:28 स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:36 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana