Jmol-Application/C3/Script-Console-and-Script-Commands/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:26, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Jmol अप्लिकेशनमधील Script console and script commands वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 ह्यात आपण शिकणार आहोत,
00:11 script commands बद्दल.
00:13 script console विंडो कसे वापरावे.
00:16 script commands वापरून मॉडेलचे डिस्प्ले बदलणे.
00:21 पॅनलवर टेक्स्टच्या लाइन्स दर्शवणे.
00:24 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:26 Jmol अप्लिकेशनमधील रेणूतील मॉडेल्सला कसे तयार आणि एडिट करणे माहीत असले पाहिजे.
00:32 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:37 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे
00:39 'उबंटू' OS वर्जन 12.04
00:44 Jmol वर्जन 12.2.2
00:47 Java वर्जन 7
00:51 खालील गोष्टी वापरून Jmol पॅनेलवरील डिसप्ले संपादित केला जाऊ शकतो.
00:55 मेनूबारमधील पर्याय
00:57 पॉप-अप मेनूमधील पर्याय किंवा
01:00 स्क्रिप्ट 'कंसोल' वर स्क्रिप्टींग कमांड्सद्वारे.
01:04 आपण आधीच्या ट्यूटोरियल्समध्ये, मेनू बार आणि पॉप-अप मेनू वापरून डिसप्ले रुपांतरीत करण्यास शिकलो होतो.
01:13 या ट्युटोरियलमध्ये आपण स्क्रिप्ट कमांड्सचा वापर करण्यास शिकू.
01:18 कमांड्स च्या सेट ला स्क्रिप्ट कमांड म्हटले जाते.
01:22 स्क्रिप्ट कमांड्स पॅनेलवर मॉडेलचा डिस्प्ले नियंत्रित करतात.
01:27 RasMol प्रोग्रामवर आधारित भाषा Jmol कमांड वापरते.
01:32 अशा प्रकारचे कमांड्स लिहिणे याला स्क्रिप्टिंग म्हणतात.
01:36 Jmol च्या स्क्रिप्टिंग लॅंग्वेजचे डॉक्युमेंटेशन आणि कमांड्सची सूची ह्या साईटवर उपलब्ध आहे.
01:44 आता स्क्रिप्ट कमांड्स कसे वापरावे:
01:47 स्क्रिप्ट कन्सोल विंडोवर स्क्रिप्ट कमांड्स टाईप केले जातात.
01:53 स्क्रिप्ट'कंसोल Jmol ची कमांड लाईन इंटरफेस आहे.
01:58 हे मेनूबार वर 'फाईल' आणि 'कंसोल' पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
02:03 स्क्रिनवर प्रोपेनच्या मॉडेलसह Jmol अप्लिकेशन विंडो आहे.
02:08 आता डिस्प्ले बदलण्यासाठी स्क्रिप्ट कंसोल चा वापर करण्यास शिकू.
02:12 स्क्रिप्ट कंसोल' विंडो उघडण्यासाठी , मेनू बारमधील File मेनूवर क्लिक करा.
02:19 ड्रॉप-डाऊनमध्ये खाली स्क्रोल करून Console वर क्लिक करा.
02:24 स्क्रीनवर Jmol स्क्रिप्ट 'कंसोल' विंडो उघडते.
02:29 स्क्रिप्ट कंसोल विंडोमध्ये कमांड्स टाईप करण्यास एक टेक्स्ट एरिया आहे.
02:34 विंडोच्या तळाशी, स्क्रिप्ट एडिटर विंडो उघडण्यासाठी एक बटण आहे.
02:40 ह्या विंडोवर वेरियबल्स, क्लियर, हिस्टरी आणि स्टेट, नामक इतर बटणेदेखील आहेत.
02:49 उपलब्ध असलेल्या 'स्क्रिप्ट कमांड्स' ची सूची दर्शवणारे पान उघडण्यासाठी Help बटणावर क्लिक करा.
02:57 ही विंडो बंद करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा.
03:01 आता काही साधे स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्याचा प्रयत्न करू.
03:05 हे कमांड्स कसे लिहावेत.
03:08 'स्क्रिप्ट कंसोल' विंडोवर $ (डॉलर) प्रॉम्प्ट नंतर कमांड टाईप करा.
03:13 'स्क्रिप्ट कमांड्स' ची सुरवात 'कमांड वर्ड' ने होते.
03:17 स्पेसेसने वेगळे केलेले पॅरामीटर्सच्या सेट सह चालू राहते.
03:22 आणि 'एंड ऑफ लाईनकॅरक्टर' किंवा 'सेमीकोलनने समाप्त होते.
03:27 जोवर तुमचे कमांड टाईप करून पूर्ण होत नाही तोपर्यंत कमांड लाल दिसेल.
03:33 कमांड सक्रिय करण्यास, कीबोर्डवरील Enter की दाबा.
03:37 'कंसोल' मॅग्निफाय करण्यासाठी मी 'Kmag स्क्रिन मैग्निफायर' वापरत आहे.
03:44 उदाहरणार्थ, प्रोपेनमधील सर्व कार्बन्सचे रंग नारंगीमध्ये बदलण्यासाठी कर्सर 'स्क्रिप्ट कंसोल' विंडोवर नेऊन ठेवा.
03:53 डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा select carbon semicolon color atoms orange
04:05 कीबोर्डवरील Enter की दाबा.
04:08 पॅनलवरील प्रोपेन मॉडेलमध्ये आता सर्व कार्बन्स नारंगी रंगात आहेत.
04:14 आता सर्व बॉण्ड्सचे रंग निळ्या रंगात बदलू.
04:18 डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा.
04:20 select all bonds semicolon color bonds blue
04:26 एंटर दाबा.
04:29 लक्ष द्या, आता प्रोपेन मॉडेलमधील सर्व बॉन्ड्स निळ्या रंगात आहेत.
04:35 पुढे, आपण बॉन्ड्सचे आकार बदलू.
04:39 डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा wireframe 0.05.
04:45 angstromsमध्ये बॉण्ड्सचे रेडियस स्पेसिफाई करण्यासाठी डेसिमल नंबर वापरला जातो. एंटर दाबा
04:53 प्रोपेने मॉडेलमधील बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या.
04:58 त्याचप्रमाणे, बॉन्ड्सचा आकार वाढवण्यासाठी, प्रॉमप्टवर, टाईप करा wireframe 0.1.
05:07 पुन्हा एकदा, बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या.
05:12 अणूंचा आकार बदलण्यासाठी, आपण डेसिमल नंबरानंतर असलेल्या 'spacefill कमांडचा वापर करू.
05:20 डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा spacefill 0.2
05:26 डेसिमल नंबर अणूचा रेडियस angstroms मध्ये दर्शवत आहे.
05:30 एंटर दाबा
05:33 लक्ष द्या, प्रोपेन रेणूमध्ये अणूंचा आकार कमी होतो.
05:39 त्याचप्रमाणे, अणूंचा आकार वाढविण्यासाठी टाईप करा:
05:43 spacefill 0.5
05:46 एंटर दाबा
05:48 तुम्ही अणूंच्या आकारात बदल पाहू शकता.
05:51 वैकल्पिकपणे, आपण कमांड cpk नंतर पर्सेंटेज किंवा डेसिमल नंबरदेखील वापरू शकता.
05:59 हे पर्सेंटेज अणूची vanderwaals रेडियस प्रस्तुत करते.
06:04 उदाहरणार्थ, टाईप करा cpk 20% आणि एंटर दाबा.
06:11 अणूंच्या आकारातील बदलाकडे लक्ष द्या.
06:15 Jmol पॅनेलवर टेक्स्टच्या लाइन्स प्रदर्शित करण्यासाठी, कमांड्स लिहीणे शक्य आहे.
06:22 टेक्स्टसाठी कमांड लाईन 'set echo ने सुरू होते.
06:27 स्क्रीनवर हे टेक्स्टच्या स्थितीनंतर येते.
06:31 उदाहरणार्थ, पॅनेलच्यावर मध्यभागी रेणूचे नाव प्रोपेन म्हणून प्रदर्शित होईल.
06:39 त्यामुळे, टाईप करा set echo top center semicolon echo Propane आणि एंटर दाबा.
06:48 आपण पाहू शकता की पॅनेलच्यावर मध्यभागी प्रोपेनचे टेक्स्ट प्रदर्शित झाले आहे.
06:54 पॅनलवर आपण टेक्स्टच्या इतर लाईन्सदेखील प्रदर्शित करू शकतो.
06:58 उदाहरणार्थ, मला पॅनलखाली डाव्या कोपर्‍यात काही टेक्स्ट हवेत.
07:04 डॉलर प्रॉमप्टवर,
07:06 टाईप करा set echo bottom left semicolon echo This is a model of Propane.
07:15 एंटर दाबा
07:17 आपण पॅनलच्या खाली डाव्या कोपऱ्यात टेक्स्ट लाईन पाहू शकतो.
07:22 प्रदर्शित केलेल्या टेक्स्टचे रंग, आकार आणि फॉन्ट बदलणेदेखील शक्य आहे.
07:29 उदाहरणार्थ, मला टेक्स्ट Arial Italic फॉन्टमध्ये हवा आहे.
07:34 डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा font echo 20 Arial italic
07:42 एंटर दाबा, हे टेक्स्ट Arial Italic फॉन्टमध्ये बदलेल.
07:48 टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी, आपण 'color echo' नंतर रंगाचे नाव वापरू.
07:55 त्यामुळे, टाईप करा color echo yellow आणि एंटर दाबा.
08:01 फॉन्टच्या रंगातील बदल लक्षात घ्या.
08:05 अशाचप्रकारे, तुम्ही अनेक कमांड्स शोधू शकता आणि बदलांचे निरीक्षण करू शकता.
08:11 थोडक्यात.
08:13 ह्या पाठात आपण शिकलो आहोत,
08:15 स्क्रिप्ट कमांड्स आणि
08:17 'स्क्रिप्ट कंसोल', आपण हेदेखील शिकलो आहोत,
08:19 'स्क्रिप्ट कमांड्स' वापरून मॉडेलची डिसप्ले प्रॉपर्टीस बदलणे आणि
08:24 पॅनलवर डिसप्लेच्या लाईन्स दाखवणे.
08:28 असाईनमेंट
08:30 3-methyl-pentane चे मॉडेल तयार करणे.
08:33 खालीलप्रमाणे करण्यासाठी, स्क्रिप्ट कमांड्स वापरणे.
08:36 सर्व हायड्रोजन्सचे रंग निळ्या रंगात बदलणे.
08:40 सर्व बॉन्ड्सचे रंग 'लाल' मध्ये बदलणे.
08:43 आणि स्पिनसाठी रेणू सेट करा.
08:46 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:49 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:52 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:57 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:59 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:02 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:30 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana