Skill-Development--Fitter/C2/Filing-a-workpiece/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:35, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | नमस्कार आणि Filing a Workpiece वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत, |
00:10 | 'फायलिंग' म्हणजे काय? |
00:12 | 'फायलिंग' साठी वापरण्यात येणारे वापरली जाणारी विविध टुल्स. |
00:15 | 'फायलिंग' चे वेगवेगळे प्रकार. |
00:17 | वर्कपीस कशाप्रकारे फाईल करणे. |
00:22 | आणि 'फायलिंग' करताना सामन्य चुका. |
00:24 | ह्या ट्युटोरियलसाठी, आपल्याला हवी |
00:27 | एक 'फाईल'. फाईल करण्यासाठी एक 'वर्कपिस'. |
00:31 | वर्कपीस धरण्यासाठी 'बेंच वाईस' |
00:34 | मापण्यासाठी 'वर्नीयर ('वर्नियर) क्यॅलीपर' |
00:37 | 'वर्कपीस' चा चौरस तपासण्यासाठी 'ट्राय स्क्वेर'. |
00:42 | 'वर्कपीस' कापण्यासाठी 'हॅकसॉ' (करवत) |
00:45 | 'वर्कपीस' वर खूणा (चिन्ह) करण्यासाठी पंच |
00:48 | आणि एक 'बॉल पाईन हॅमर'(हातोडा). |
00:51 | प्रथम 'फायलिंग' म्हणजे ते पाहूया? |
00:54 | 'फाईल' वापरून एक 'जॉब' किंवा वर्कपीसमधील अतिरिक्त सामग्री काढून टाकण्यासाठी 'फायलिंग' पद्धत आहे. |
01:02 | विविध गरजांसाठी?? विविध 'फाईल्स' चे प्रकार आहेत. |
01:07 | रेक्टॅंग्युलर क्रॉस- सेक्शन (आयताकृती क्रॉस विभाग) साठी 'फ्लॅट फाईल' |
01:11 | गुळगुळीत पृष्ठभाग मिळवण्यासाठी 'स्मूथ फाईल'. |
01:15 | वर्कपीसच्या कोनविशिष्ट भागाला फाईल करण्यासाठी 'सेफ एड्ज फाईल'. |
01:21 | चौरस कोन आणि चौरस बिळे विकसित करण्यासाठी 'स्क्वेर फाईल'. |
01:27 | अर्ध गोलाकार पृष्ठभागांना फाईल करण्यासाठी 'हाफ रन फाईल'. |
01:32 | बिळे आणि गोल ग्रोव्ह्स विकसित करण्यासाठी 'राऊंड फाईल'. |
01:38 | आता 'फायलिंग' ची प्रक्रिया जाणून घेऊ. |
01:41 | मला हवा आहे 5 बाय 3 इंचाचा वर्कपीस. |
01:46 | माझ्याकडील जॉब किंवा वर्कपीस 5 बाय 4 इंचाचा आहे. |
01:52 | आता प्रथम 1 इंचाचा अतिरिक्त भाग कापून टाकू. |
01:58 | त्यासाठी, 'वर्कपीस' वर 'मार्किंग मीडियम' चा वापर करा. |
02:03 | आपण चॉक (खडू) किंवा इंक (शाई) मार्किंग मीडियम म्हणून वापरू शकता. |
02:08 | एकदा का मीडियमचा वापर केला तर दाखविल्याप्रमाणे 'जेनी कॅलिपर' वापरून वर्कपीसवर निशाणी लावा. |
02:15 | माझ्या गरजेप्रमाणे मी १ (1) इंचापेक्षा थोडे कमी चिन्हांकित करते. |
02:21 | पुढे, चिन्हांकित केलेल्या ओळीवर पंच करण्यास, पंच आणि बॉल पाईन हॅमरचा वापर करा. |
02:28 | यानंतर, वर्कपीस वाइसच्या जॉसमध्ये समांतर ठेवा. |
02:34 | आता ह्या जागी वर्कपीस धरण्यासाठी घट्ट कसणे. |
02:38 | जेणेकरून आपण सहज वर्कपीस कट करू शकतो. |
02:42 | पुढे, 'हॅक सॉ' वापरून वर्कपीसचा अतिरिक्त भाग काढून टाका. |
02:48 | अतिरिक्त भाग काढून टाकल्यानंतर, पुन्हा एकदा वर्कपीस मोजा. |
02:54 | होय, मापन आता योग्य आहे . माझ्याकडे 5 बाय 3 इंचाचा वर्कपीस आहे. |
03:00 | आता फायलिंग सुरू करू. |
03:02 | प्रथम आपल्याला योग्य फाईल निवडायची आहे. |
03:06 | मला गुळगुळीत काठ हवी आहे, त्यासाठी मी Smooth file निवडेन. |
03:11 | फाईलीचा हँडल सुरक्षितपणे घट्ट बसलेला आहे का ह्याची खात्री करा. |
03:16 | योग्य हँडल नसल्यास, 'फाईल' वापरू नका. |
03:19 | नाहीतर, आपल्या हातांना जखम होईल. |
03:22 | फायलिंग सुरू करण्यापूर्वी 'फाईल' स्वच्छ आहे का खात्री करून घ्या. |
03:27 | जर गंजलेला फाईल वापरला तर, 'वर्कपीस' चे नुकसान होईल तसेच आपले हात देखील जखमी होईल. |
03:34 | त्यामुळे, मी योग्य 'फाईल' निवडली आहे. |
03:38 | पुढील पायरी अशी की पुन्हा एकदा 'वर्कपीस' 'बेंच वाइस' मध्ये सुरक्षितपणे ठेवायचे आहे. |
03:45 | आपली स्थिती '90 डिग्री' वर आहे 'बेंच वाइस' च्या समकोण वर |
03:51 | आपला डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवा. |
03:57 | फायलिंगसाठी ही उत्कृष्ट स्थिती आहे. |
04:00 | आता आपल्या उजव्या हातात फाईलचा हॅंडल घट्ट पकडा. |
04:05 | दर्शविल्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताने, 'फाईल' टोक पकडा. |
04:10 | फाईलचा हॅंडल दृडतापूर्वक उजव्या अंगठ्याने दाबले आहे ह्याची खात्री करून घ्या. |
04:15 | आता 'फायलिंग' सुरू करण्यास तयार आहोत. |
04:18 | फायलिंगच्या तीन पद्धती आहेत, त्या म्हणजे, |
04:21 | 'स्ट्रेट फॉरवर्ड फायलिंग' |
04:23 | 'ड्रॉ फायलिंग' |
04:25 | डायग्नल किंवा क्रॉस फायलिंग. |
04:28 | त्या एका नंतर एक पाहूया. |
04:30 | एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबीच्या बाजूने फाईल वर्कपीसच्या पृष्ठभागावर हलवणे याला 'स्ट्रेट फॉरवर्ड फाइलिंग' म्हणतात. |
04:38 | ह्या पद्धतीत फाईल हळूहळू वर आणि खाली हलवून फायलिंग केले जाते. |
04:44 | आपण पाहू शकतो की आपला वर्कपिस 'फाईल' झालेला आहे आणि अतिरिक्त भाग काढून टाकलेला आहे. |
04:51 | ड्रॉ फायलिंग पद्धतीत, फाईल एकसारखा दाब देऊन शरीराकडे खेचली जाते. |
04:58 | 'डायग्नल फायलिंग' पद्धतीत, फाईल वर्कपीसच्या पृष्टभगावर तिरपी हलवली जाते. |
05:06 | फाईलीची हालचाल, वर्कपीसवर एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यापर्यंत तिरपी होते. |
05:13 | एकदा फायलिंग पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला वर्कपीसच्या 'फ्लॅटनेस' आणि 'स्क्वायरनेस' ची तपासणी केली पाहिजे. |
05:21 | हे 'ट्राय-स्क्वायर' आणि 'वर्नियर कॅलिपर' च्या मदतीने करता येते. |
05:26 | फ्लॅटनेस बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी दाखविल्याप्रमाणे ट्रायस्वेअर वर्कपीसवर ठेवा. |
05:33 | असे 'वर्कपीस' तीन वेगवेगळ्या जागेवर ठेऊन करा. |
05:38 | हे एक प्रकाश स्रोताविरुद्ध तपासा. |
05:41 | हा फ्लॅटनेसचा स्पष्ट संकेत आहे. |
05:44 | जर पृष्ठभाग असमान आहे तर, आपल्याला 'वर्कपीस' आणि ट्राय-स्क्वेयरच्या दरम्यान प्रकाशाची किरणे दिसतील. |
05:52 | अशा वेळी, आपल्याला पुन्हा 'फाईल' करण्याची गरज आहे. |
05:57 | पुढे आपण 'ट्राय-स्क्वेयर' वापरून, 'वर्कपीस' चा 'स्क्वायरनेस' तपासू. |
06:03 | दाखविल्याप्रमाणे, 'ट्राय-स्क्वेयर' 'वर्कपीस' च्या एका कोपर्यात नेऊन ठेवा. |
06:07 | आता ट्राय-स्क्वेयच्या कडा वर्कपीसच्या दोन्ही संलग्न बाजूस चिटकवा, असे |
06:14 | 'वर्कपीस' च्या संलग्न बाजू परस्परांना 90 डिग्री आहेत की नाही हे तपासा. |
06:20 | नाही, तर पुन्हा 'फाईल' करा. |
06:23 | आपल्याला अजून एक मोजमाप करायची आहे ती आहे 'वर्कपीस' ची जाडी तपासणे. |
06:29 | यासाठी आपण 'वर्नियर कॅलिपर' वापरणार आहोत. |
06:33 | दाखविल्याप्रमाणे, 'वर्कपीस' 'वर्नियर कॅलिपर' च्या जॉसच्यामध्ये नेऊन ठेवा. |
06:38 | 'वर्कपीस' ची जाडी मोजा. |
06:41 | ह्या 'वर्कपीस' वर किमान तीन विविध ठिकाणी जाडी मोजा. |
06:47 | एक सारखे मापन दाखवते की 'वर्कपीस' ची जाडी समान आहे. |
06:53 | 'फायलिंग' करताना काय करू नये हे जाणून घेऊ. |
06:57 | वर्कपीसला एका कोनात फायलिंग करू नये. |
07:00 | केंद्र सोडून वर्कपीसच्या दोन्ही कडांना फाईल करू नका. |
07:05 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:08 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
07:12 | एक 'वर्कपीस' मापणे |
07:14 | 'वर्कपीस' चा अतिरिक्त भाग काढून टाकणे. |
07:17 | 'वर्कपीस' फाईल करणे. |
07:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. तो डाऊनलोड करून पहा. |
07:27 | स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि online (ऑनलाईन) परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
07:35 | अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. |
07:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
07:45 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:51 | हे ट्युटोरियल केवळ राष्ट्रीय प्रशिक्षण संबंधी मीडिया संस्था, चेन्नईसाठी तयार केले गेले आहे. |
07:59 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून. |
08:03 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08:07 | सहभागासाठी धन्यवाद. |