PHP-and-MySQL/C2/XAMPP-in-Linux/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:12, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 XAMPP Installation on Linux वरील स्पोकन ट्युटोरियमध्ये आपले स्वागत.
00:05 XAMPP हे विनामूल्य आणि मुक्त web server package आहे.

XAMPP

Apache HTTP Server, MySQL database, PHP मध्ये लिहिलेल्या scripts चे Interpreters आणि Perl programming languages
यापासून बनले आहे.


00:19 पूर्वी या सॉफ्टवेअरला LAMPP असे म्हणत. परंतु गैरसमज टाळण्यासाठी हे नाव बदलून XAMPP for Linux असे करण्यात आले.
00:27 XAMPP हे install करण्यास सोपे असून ते Windows, Linux, Mac OSX आणि Solaris साठी उपलब्ध आहे.
00:35 आपणUbuntu Linuxचे version 10.04 वापरणार आहोत.
00:39 यासाठी admin access असावा.
00:41 पहिल्या step मध्ये XAMPP for Linux डाऊनलोड करू.
00:44 आपण या लिंकवरून डाऊनलोड करू.
00:48 http://www.apachefriends.org/en/xampp.html
00:58 या लिंकवर जाऊ . XAMPP for Windows, for Mac OSX and Solaris डाऊनलोड करण्यासाठी देखील लिंक्स उपलब्ध आहेत.
01:09 आपण XAMPP for Linux ही लिंक निवडू .
01:13 येथे क्लिक करू. खाली Scroll करा आणि Step1 डाऊनलोडवर क्लिक करा.
01:19 XAMPP Linux 1.7.7 वर क्लिक करून डाऊनलोड करण्यासाठी सर्व steps follow करा.
01:26 मी ही फाईल डेस्कटॉपवर आधीच डाऊनलोड केलेली आहे.
01:30 आता टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt and T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:37 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडलेली दिसेल.
01:40 डिरेक्टरी बदलून डेस्कटॉपवर जाण्यासाठी cd space Desktop ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
01:48 डेस्कटॉपवरील उपलब्ध घटक बघण्यासाठी ls ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
01:55 XAMPP installation फाईल डेस्कटॉपवर उपलब्ध आहे.
01:58 sudo space tar space xvfz space xampp-linux-1.7.7.tar.gz space -C space /opt ही कमांड टाईप करा.
02:13 sudo password टाईप करून एंटर दाबा.
02:16 माफ करा. चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे मला Sorry, try again ही एरर दिसत आहे.
02:23 योग्य sudo password टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे आपण डाऊनलोड केलेली archive यशस्वीपणे extractकेली आहे. .
02:33 cd space /opt टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे आता आपण opt या डिरेक्टरीमध्ये आहोत.
02:43 opt या डिरेक्टरीमधील घटक बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
02:50 आता /opt/lampp या डिरेक्टरीखाली XAMPP इन्स्टॉल झाली आहे.
02:57 cd space lampp ही कमांड टाईप करा.
03:02 lampp या डिरेक्टरीमधील घटक बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
03:09 पुढील step म्हणजे XAMPP सुरू करणे.
03:13 sudo space /opt/lampp/lampp space start टाईप करून एंटर दाबा.
03:27 sudo password टाईप करून एंटर दाबा.
03:32 XAMPP for Linux यशस्वीरित्या सुरू झाले आहे.
03:36 आता आपले XAMPP installation तपासून पाहू.
03:40 त्यासाठी Firefox browser वर जाऊ या.
03:43 address bar मध्ये http://localhost ही URL टाईप करा.
03:55 आपल्या web browser मध्ये http://localhost/xampp splash.php ही URL दिसेल.
04:07 हे Apache server सुरू असल्याचे दाखवेल. आता आपण html होम पेज बनवू या.
04:15 ते web browserवर दाखवले जाईल.
04:18 पुन्हा टर्मिनलवर जा. डिरेक्टरी बदलून /opt/lampp/htdocsवर जाण्यासाठी cd space /opt/lampp/htdocs टाईप करून एंटर दाबा
04:36 हा आपल्या web directory चा पाथ आहे.
04:39 myhomepage ही डिरेक्टरी बनवण्यासाठी sudo space mkdir space myhomepageटाईप करून एंटर दाबा.
04:51 htdocs या डिरेक्टरीतील घटक बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
04:58 myhomepage या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी cd space myhomepageटाईप करून एंटर दाबा.
05:08 आता आपणhtml मध्ये homepage बनवू.
05:12 gedit text editor च्या सहाय्याने index.html बनवण्यासाठी sudo space gedit space index.html टाईप करून एंटर दाबा.
05:32 HTML शिकण्यासाठी आपल्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ट्युटोरियल्स बघा.
05:37 वेळ वाचवण्यासाठी मी येथे HTML code केवळ copy-paste करत आहे.
05:43 title tag मध्ये लिहिलेल्या टेक्स्ट ब्राऊजरच्या टायटल बारमध्ये दाखवले जाईल.
05:49 body tag मध्ये लिहिलेले टेक्स्ट ब्राऊजरमध्ये दाखवले जाईल.
05:54 फाईल सेव्ह करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा. आता gedit window बंद करा.
05:59 Firefox browser वर जा.
06:02 http://localhost/myhomepage हीURL टाईप करून एंटर दाबा.
06:13 आपण web browser मध्ये welcome message बघू शकतो.
06:20 अशा प्रकारे आपणXAMPP इन्स्टॉल केले, तसेच ते सुरू करून तपासून पाहिले.
06:26 स्लाईडवर परत जा. आता Spoken Tutorial Project बद्दल जाणून घेऊ.
06:31 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे http://spoken- tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
06:42 ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:46 तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
06:51 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:57 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:01 अधिक माहितीसाठी कृपया contact sptutemail@gmail.com या संकेतस्थळाला जा.
07:06 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
07:11 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:17 *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.
07:27 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:30 आपल्या सहभागासाठी धन्यवाद.
07:32 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha