Linux/C3/The-grep-command/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 20:10, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00:01 grep कमांडवरील पाठात आपले स्वागत.
00:05 ह्या पाठात grep कमांडबद्दल जाणून घेऊ.
00:09 आपण काही उदाहरणांच्याद्वारे हे करू.
00:11 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:15 उबंटु लिनक्स version12.04 ऑपरेटिंग सिस्टीम.
00:20 आणि *GNU BASH वर्जन 4.2.24
00:24 ह्या पाठासाठी GNU bashचे वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन गरजेचे आहे.
00:32 तसेच Linux टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:36 संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 प्रथमregular expressions बद्दल जाणून घेऊ.
00:45 *ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे.
00:50 *ओळींत, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे.
00:56 उदाहरणार्थ टेलिफोन डिरेक्टरीत फोन नंबर शोधणे,
01:02 किंवा पॅरेग्राफ किंवा ओळीमधे एखादा कीवर्ड शोधण्यासाठी grep कमांड वापरणार आहोत.
01:11 grep एक किंवा अनेक ओळींमधे, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एक किंवा अनेक पॅटर्न्स शोधते.
01:17 फाईलनेमचा उल्लेख नसल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते.
01:23 फाईलनेम न सापडल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते.
01:30 grep कमांड कशी वापरायची हे बघण्यासाठी grepdemo.txt ही डेमो फाईल वापरू.
01:37 ह्या फाईलमधील घटक पाहू.
01:40 ह्या फाईलमधे 13 नोंदी आहेत.
01:44 प्रत्येक नोंदीसाठी roll number, name, stream, marks, आणि stipend am ount ही सहा फिल्डस आहेत.
01:52 प्रत्येक फिल्ड हे बार ह्या delimiterने वेगळे केले आहे.
01:56 grep कसे कार्य करते ते पाहू.
02:00 समजा कॉम्प्युटर्स स्ट्रीममधे कोणते विद्यार्थी आहेत हे बघण्यासाठी grep कमांड वापरू.
02:07 त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल.
02:10 त्यासाठी CTRL + ALT आणि T दाबा.
02:16 टर्मिनलवर टाईप करा:
02:18 grep space डबल कोटसमधे computersडबल कोटस नंतर space grepdemo .txt
02:27 एंटर दाबा.
02:28 हे computers ही स्ट्रीम असलेल्या नोंदीची सूची दाखवेल.
02:33 आता ह्या रिझल्टची मूळ फाईल सोबत तुलना करा.
02:37 आता टेक्स्ट एडिटरवर जा.
02:40 Zubin साठीची नोंद सूचीत दिसत नाही.
02:45 असे का झाले? कारण grep ने “computers” ह्या पॅटर्नसाठी शोध घेतला. ज्यात c स्मॉल आहे.
02:52 तर Zubin, साठी “Computers” ह्या स्ट्रीममधे C कॅपिटल आहे.
02:57 पॅटर्न मॅचिंग हे case सेन्सेटिव्ह आहे.
03:00 हे case सेन्सेटिव्ह ठेवायचे नसल्यास grepसोबत minus i वापरणे आवश्यक आहे.
03:06 टर्मिनलवर जाऊन टाईप करा:

grep space (minus) i space (डबल कोटसमधे) “computers” डबल कोटस नंतर space grepdemo.txt

03:20 एंटर दाबा.
03:21 आता हे चारही नोंदी सूचीत दाखवेल.
03:25 grep फाईलमधील केवळ आपण दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळी दाखवते.
03:32 आपण हे उलट देखील करू शकतो.
03:34 grep द्वारे दिलेल्या पॅटर्नशी न जुळणा-या ओळीही दाखवता येतात.
03:40 त्यासाठी minus v हा पर्याय आहे.
03:43 उदाहरणार्थ, पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीची सूची.
03:48 तुम्ही हा रिझल्ट दुस-या फाईलमधे देखील संचित करू शकता.
03:52 त्यासाठी टाईप करा:

grep space minus iv space डबल कोटसमधे pass डबल कोटस नंतर space grepdemo.txt space greater than sign space notpass.txt

04:11 एंटर दाबा.
04:12 फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space notpass.txt
04:20 एंटर दाबा.
04:21 आऊटपुट दाखवले जाईल.
04:24 प्रॉम्प्ट वर टाईप करा:
04:26 grep space minus i space' डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt
04:37 आणि एंटर दाबा. हे वेगळे आहे.
04:41 ह्यामधे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परंतु ह्याचा रिझल्ट अपूर्ण आहे.
04:46 सर्व नोंदींची सूची असलेल्या फाईलमधे ओळींचा क्रमांक बघायचा असल्यास minus n हा पर्याय आहे.
04:54 प्रॉम्प्ट क्लियर करा.
04:58 आता टाईप करा "grep space -in space डबल कोटसमधे "fail" डबल कोटस नंतर space grepdemo.txt
05:09 एंटर दाबा.
05:11 ओळीचा क्रमांक दाखवला जाईल.
05:15 आत्तापर्यंत आपण एकच शब्द असलेला पॅटर्न पाहिला.
05:18 आपल्याकडे अनेक शब्द असलेला पॅटर्न देखील असू शकतो.
05:21 परंतु संपूर्ण पॅटर्न quotesमधे असणे आवश्यक आहे.
05:24 त्यासाठी टाईप करा: grep space minus i spaceडबल कोटसमधे ankit space saraf डबल कोटस नंतर space grepdemo.txt
05:38 एंटर दाबा.
05:40 Ankit Sarafचे रेकॉर्ड दाखवले आहे.
05:44 आपण अनेक फाईल्समधील पॅटर्न्स शोधू शकतो.
05:48 त्यासाठी टाईप करा:

grep space minus i space डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतरspace grepdemo.txt space notpass.txt

06:03 एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल.
06:07 अनेक फाईल्स असताना grep नोंद सापडलेल्या फाईलचे नावही सोबत लिहील. grepdemo.txt आणि notpass.txt
06:18 ही रेकॉर्डसnotpass.txt फाईलमधील आणि ही रेकॉर्डस grepdemo.txt फाईलमधील आहेत.
06:26 समजा केवळ जुळणा-या पॅटर्नची एकूण आकडेवारी किंवा काऊंट हवा आहे.
06:31 त्यासाठी आपल्याकडे minus c हा पर्याय आहे.
06:35 त्यासाठी टाईप करा: grep space minus c spaceडबल कोटसमधे कॅपिटल F वापरून Fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt
06:48 एंटर दाबा.
06:50 हे दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळींची एकूण संख्या दाखवेल.
06:55 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:59 थोडक्यात.
07:01 आपण पाठात शिकलो,
07:03 फाईलमधील घटक बघणे

उदा. cat filename

07:07 विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे उदा. grep “computers” grepdemo.txt
07:14 casesविचारात न घेणे उदा. grep -i “computers” grepdemo.txt
07:21 पॅटर्न न जुळणा-या नोंदी मिळवणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt
07:30 नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे उदा. grep -in “fail” grepdemo.txt
07:38 रिझल्ट दुस-या फाईलमधे संचित करणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt > notpass.txt
07:50 आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे उदा. grep -c “Fail” grepdemo.txt
07:57 असाईनमेंट,-E, + आणि? ह्या काही कमांडस वापरून बघा.
08:04 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:10 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:16 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:19 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:23 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:45 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana