Linux/C2/Basics-of-System-Administration/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 19:53, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | Linux च्या Basics of System Administration वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:09 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:13 | adduser su |
00:16 | usermod userdel |
00:18 | id du |
00:20 | df |
00:22 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.10चा वापर करणार आहोत. |
00:27 | पूर्वतयारीसाठी कृपया General Purpose Utilities in Linux हे ट्युटोरियल समजून घ्या. |
00:35 | जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
00:39 | दाखविलेल्या कमांडस् कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला Admin access असणे आवश्यक आहे. |
00:47 | प्रथम आपण नवीन user कसा बनवायचा ते पाहू. |
00:53 | 'adduser' ही कमांड नव्या user चे login, authentication सहित तयार करते. |
01:01 | आपण sudo ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही user account समाविष्ट करू शकतो. |
01:06 | sudo कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ. |
01:11 | sudo कमांडमुळे Administrative user ला super user म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात. |
01:19 | sudo ह्या कमांडमधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत. |
01:27 | आता आपण नवीन user कसा बनवायचा ते शिकू. |
01:32 | कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
01:45 | येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे. |
01:49 | येथे “sudo space adduser” ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
01:58 | आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. |
02:01 | येथे Admin हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा. |
02:07 | आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही. |
02:11 | त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे. |
02:16 | हे करून झाले की adduser:only one or two names allowed हा संदेश दर्शवेल. |
02:27 | आता आपण duck नामक नवे युजर अकाउंट तयार करू. |
02:34 | कमांड टाईप करा. |
02:36 | sudo space adduser space duck आणि एंटर करा. |
02:45 | आपण duck नामक नवा user तयार केला आहे. |
02:49 | नवीन user बनवण्याच्या प्रक्रियेत त्या userसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते. |
02:58 | कृपया लक्ष द्या. duck ह्या userसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल. |
03:05 | तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा. येथे मी duck हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे. |
03:17 | कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा. |
03:20 | सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली. |
03:26 | आता नवीन user साठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे. |
03:31 | इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते. |
03:35 | परंतु आत्तापुरते आपण Full name समोर duck एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटर चे बटण दाबून रिकामी ठेवा. |
03:46 | एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया. |
03:51 | ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते. |
03:55 | आता user अकाऊंट तयार झाले का हे तपासू. |
04:00 | त्यासाठी command prompt वर टाईप करा. |
04:04 | ls space slash home |
04:09 | आणि एंटर दाबा. |
04:11 | home फोल्डरमधील user ची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात. |
04:17 | आणि येथे आपला नवा duck नामक user तयार झाला आहे. |
04:23 | आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या. |
04:26 | आता पुढील कमाड आहे su |
04:30 | su चा अर्थswitch user |
04:34 | चालू user वरून दुस-या user वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो. |
04:39 | आता आपण टर्मिनल वर जाऊ. |
04:43 | टर्मिनलवर ही कमांड टाईप करूया. |
04:45 | su space hyphen space duck आणि एंटर दाबा. |
04:53 | आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. |
04:56 | आपण user duck साठी पासवर्ड टाईप करूया. जो duck हाच आहे. |
05:04 | कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या current user वरून दुस-या user वर गेला आहे. म्हणजे येथे आता आपण duck वर गेलो आहोत. |
05:14 | ह्या user मधून logout करण्यासाठी टाईप करा. |
05:17 | logout आणि एंटर दाबा. |
05:22 | आता आपण duck ह्या current user च्या टर्मिनलवरून logout झालो आहोत आणि आपण आधीच्या userअकाऊंट वर म्हणजेच येथे vinhai वर गेलो आहोत. |
05:31 | आता आपण usermod ही कमांड दाबूया. |
05:35 | usermod कमांडमुळे |
05:37 | super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की, |
05:46 | पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे. |
05:50 | user अकाऊंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे. |
05:55 | आपण ह्या कमांडस वापरून बघू या. |
05:57 | त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ . |
05:59 | duck user अकाऊंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू. |
06:05 | येथे command prompt वर टाईप करा. |
06:09 | sudo space usermod space hyphen e space 2012 hyphen 12 hyphen 27 space duck |
06:33 | आणि एंटर करा. |
06:37 | hyphen e ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण user अकाउंटची कमांड मध्ये दर्शवलेली Expiry date सेट केली आहे. |
06:46 | अशा प्रकारे आपण duck ह्या USER अकाऊंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे. |
06:52 | आता आपण uid आणि gid ह्या कमांडस बद्दल चर्चा करू. |
06:57 | 'id command' वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते. |
07:04 | id space hyphen u ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते. |
07:12 | ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी id space hyphen g ह्या कमांडचा उपयोग होतो. |
07:20 | आता आपण हे करून पाहू. |
07:22 | टर्मिनलवर टाईप करा. |
07:25 | id आणि एंटर दाबा. |
07:29 | आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले User IDs आणि Group IDs दिसत आहेत. |
07:37 | केवळ user id साठी hyphen u ह्या पर्यायाचा उपयोग होतो. |
07:43 | चला, कमांड टाईप करू या. id space hyphen u |
07:49 | आणि एंटर दाबा. |
07:50 | आता आपल्याला केवळ युजरच्या IDs दिसतील. |
07:55 | परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील तर? |
08:00 | हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा. |
08:02 | id space hyphen n space u आणि एंटर दाबा. |
08:13 | आता आपल्याला युजर IDs ऐवजी त्यांची नावे दिसतील. |
08:20 | आता आपण Group IDs च्या कमांडस् बद्दल जाणून घेऊ. |
08:24 | id space hyphen g टाईप करा. |
08:29 | येथे आपण Group IDs बघू शकतो. |
08:32 | जर आपल्याला चालू user चे सर्व ग्रुपIDs बघायचे असल्यास टाईप करा. |
08:38 | id space hyphen capital G आणि एंटर दाबा. |
08:46 | कृपया लक्ष द्या की आपण G हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे. |
08:50 | तुम्ही स्वतः आलेले आऊटपुट बघू शकता. |
08:53 | आता आपण user अकाऊंट कसे डिलीट करायचे ते पाहू. |
08:57 | त्यासाठी userdel ह्या कमांडचा उपयोग करा. |
09:00 | आपण userdel ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे user अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो. |
09:07 | आपण हे टर्मिनलवर करून बघू. |
09:09 | इथे sudo space userdel space hyphen r space duck असे टाईप करा. |
09:22 | आपण येथे hyphen r हा पर्याय वापरला आहे. |
09:25 | ह्यामुळे ह्या user बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे. |
09:30 | एंटर दाबा आणि निरीक्षण करा. |
09:34 | आता duck हा user डिलीट झाला आहे. |
09:38 | हे टाईप करून तपासून बघा. |
09:41 | ls space slash home आणि एंटर दाबा. |
09:47 | आपल्याला दिसेल की duck नामक user अकाऊंट डिलीट झाला आहे. |
09:53 | आता आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या. |
09:56 | Linux System Adminstration मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांडस आहेत. |
10:03 | df कमांड डिस्क वरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते. |
10:08 | आणि du कमांड फाईल ने वापरलेल्या जागेची माहिती देते. |
10:13 | कृपया Assignment म्हणून ह्या दोन्ही कमांडस् वापरून तुम्ही त्याचे आऊटपुट शोधा. |
10:19 | आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि df कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया. |
10:26 | कृपया df space hyphen h टाईप करून एंटर दाबा. |
10:33 | याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल. |
10:38 | ही mounted space वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते. |
10:46 | आता आपण du या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू. |
10:50 | आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत. |
10:57 | जर नसतील तर कृपया General purpose utilities in Linux हे ट्युटोरियल बघा. |
11:04 | ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत. |
11:11 | होम फोल्डरवर जाण्यसाठी टर्मिनलवर टाईप करा. |
11:15 | cd space slash home आणि एंटर दाबा. |
11:20 | मग du space hyphen s space astrix dot txt असे टाईप करून एंटर दाबा. |
11:33 | ही कमांड आपल्याला डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार ह्या बद्दलची माहिती दर्शवेल. |
11:43 | Assignment म्हणून command prompt वर टाईप करा. |
11:47 | du space hyphen ch space astrix dot txt आणि बघा काय होते ते. |
11:59 | आपण पुन्हा स्लाईडवर जाऊ या. |
12:01 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. |
12:03 | adduser ने नवा user बनतो. |
12:06 | su ने user बदलता येतो. |
12:09 | usermod ने अकाऊंट सेटींग्ज बदलता येतात. |
12:12 | Userdel ने user अकाऊंट डिलीट होतो. |
12:15 | id कमांडने user आणि group ids ची माहिती मिळते. |
12:20 | df कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते. |
12:24 | du कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते. |
12:27 | अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:33 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:37 | *ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:40 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:44 | *Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. |
12:53 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:03 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:08 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून |
13:12 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |