Java/C2/Method-overloading/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:00, 3 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Java तील method overloading वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 method overloading म्हणजे काय?
00:10 method overload करणे.
00:13 येथे वापरत आहोत, Ubuntu version 11.10 OS ,

Java Development kit 1.6 आणि Eclipse 3.7.0

00:24 आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे,
00:26 methods बनवणे,
00:29 java तील eclipse द्वारे constructor overload करणे.
00:32 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 method overloading म्हणजे काय?
00:42 class मधे दोन किंवा अधिक मेथडस एकाच नावाने डिफाईन करणे.
00:46 त्यांच्या parameters ची संख्या किंवा प्रकार भिन्न असली पाहिजे.
00:50 ह्या मेथडसना overloaded methods म्हणतात.
00:54 ह्या प्रक्रियेला method overloading म्हणतात.
00:57 method overload कशी करायची ते पाहू.
01:00 eclipse मधे Addition हा क्लास आहे.
01:06 class मधे दोन integer व्हेरिएबल्स घोषित करू.
01:10 त्यासाठी टाईप करा int a is equalto 10 आणि int b is equalto 5.
01:19 ह्या दोन integers ची बेरीज करण्यासाठी मेथड बनवू.
01:23 त्यासाठी टाईप करा void add parentheses.
01:30 curly brackets मधे टाईप करा System dot out dot println.
01:40 कंसात a+b.
01:44 ही मेथड दोन integer व्हेरिएबल्सची बेरीज करून देणार आहे.
01:50 आता दोन parameter घेणारी दुसरी मेथड बनवू.
01:55 त्यासाठी टाईप करा void addTwoNumbers.
02:04 parenthesesमधे int num1 comma int num2.
02:14 curly brackets मधे System dot out dot println कंसात num1 plus num2.
02:35 ही मेथड test argument म्हणून passकेलेल्या दोन व्हॅल्यूजची बेरीज करून देईल.
02:44 क्लासचे object बनवून मेथड call करू.
02:49 त्यासाठी main मेथड मधे टाईप करा Addition म्हणजेच class चे नाव obj is equalto new Addition parentheses semicolon.
03:13 नंतर parentheses मधे Obj.add
03:18 आणि Obj.addTwonumbers' parentheses मधे
03:31 दोन arguments पास करू.
03:33 समजा आपण floating point values पास केल्या.
03:37 टाईप करा 2.5 comma आणि integer 3.
03:45 आपल्याला अशी error मिळेल the method addTwoNumbers int comma int of the class addition is not applicable for the argument double comma int.
03:57 म्हणून मेथडमधे int च्या जागी double करू.
04:06 int च्या जागी double करून फाईल सेव्ह करा.
04:12 आता error राहिलेली नाही.
04:17 Java आपोआप int व्हॅल्यू पूर्णतः double मधे बदलते.
04:24 त्यामुळे आपण integer arguments देखील पास करू शकतो.
04:28 सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:32 आऊटपुटमधे दोन integers व्हेरिएबल्सची बेरीज,
04:37 आणि आपण पास केलेल्या दोन numeric arguments ची बेरीज बघू शकतो.
04:43 दोन्ही मेथडस एकच कृती करतात.
04:50 फक्त पहिल्या मेथडमधे parameter नाही तर दुस-यात आहेत.
05:00 अशावेळी java आपल्याला method overloading प्रदान करते.
05:05 आपण दोन्ही मेथडसला एकच नाव देऊ.
05:09 addTwoNumbers च्या जागी add करा. तसेच येथेही बदल करा.
05:29 तशीच कृती असलेली अजून एक मेथड define करू.
05:33 टाईप करा void add.
05:38 आणि parentheses मधे int n1 comma int n2 comma int n3.
05:51 येथे तीन parameters दिले आहेत.
05:54 curly brackets मधे System dot out dot println.
06:03 कंसात n1 plus n2 plus n3.
06:11 ही मेथड तीन संख्यांची बेरीज करून देईल.
06:17 ही मेथड कॉल करू.
06:19 त्यासाठी टाईप करा obj dot add कंसात1 comma 5 comma 4
06:35 सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:39 तीन संख्यांची बेरीज म्हणजे 10 हे आऊटपुट मिळेल.
06:47 Java कंपायलर parameters नुसार योग्य ती मेथड overload करतो.
06:52 तो पास केलेल्या parameter ची संख्या आणि प्रकार बघतो.
06:57 प्रोग्रॅमरना, मेथडचे नाव, पास केलेल्या argument चा प्रकार
07:01 व संख्या ह्यांची काळजी करण्याची गरज नाही.
07:05 strings एकमेकांना जोडणारी अजून एक मेथड पाहू.
07:11 म्हणजेच आणखी एक overload मेथड बनवणार आहोत.
07:15 त्यासाठी टाईप करा void add String s1 comma String s2.
07:29 curly brackets मधे System dot out dot println.
07:41 कंसात s1 plus s2.
07:45 आणि ही मेथड कॉल करण्यासाठी,
07:50 टाईप करा obj dot add.
07:55 कंसात double quotes मधे Hello comma पुन्हा double quotes मधे space World.
08:07 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:12 आऊटपुट मधे Hello space World असे दिसेल.
08:16 अशाप्रकारे दोन string arguments ची add ही मेथड strings जोडेल.
08:21 समजा आपण return type सहित add मेथड घोषित केली.
08:27 त्यासाठी टाईप करा int add parentheses no parameter आणि curly brackets.
08:40 आपल्याला duplicate method add in type addition ही एरर मिळेल.
08:48 कारण आपण parameters नसलेली add मेथड आधीच घोषित केली आहे.
08:54 लक्षात ठेवा मेथड overload करण्यासाठी parameters वेगवेगळे असणे आवश्यक आहे.
08:59 वेगवेगळे return types असल्यावर मेथड overload होत नाही.
09:03 म्हणून ही मेथड काढून फाईल सेव्ह करा.
09:09 याप्रकारे java मधे method overloading केले जाते.
09:16 आपण शिकलो,
09:18 method overloading विषयी
09:20 method overload करणे,
09:22 आणि method overloading चे फायदे.
09:25 असाईनमेंट. संख्यांची वजाबाकी करणारी subtract मेथड बनवा.
09:31 आणि overload करा.
09:33 प्रकल्पाची अधिक माहिती,
09:36 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.spoken-tutorial.org/what is a spoken-tutorial
09:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:50 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:52 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:56 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:05 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.spoken-tutorial.org/NMEICT-Intro
10:21 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana