Inkscape/C3/Create-a-3-fold-brochure/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:53, 3 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | “Create a 3-fold brochure” या इंकस्केप वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | आपण शिकणार आहोत – |
00:08 | guidelines वापरणे, सेट करणे |
00:10 | 3-fold brochure साठी सेटींग्ज. |
00:12 | ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना. |
00:15 | तसेच लेयर्सच्या वापराचे महत्व जाणून घेऊ. |
00:18 | या पाठासाठी वापरणार आहोत, |
00:21 | उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:24 | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:28 | हा 3 fold brochure चा नमुना आहे. ते उघडल्यावर 3 फोल्डस दिसतील. |
00:34 | येथे एकूण सहा भाग आहेत. |
00:37 | बाहेरच्या बाजूला 1, 5 आणि 6 हे भाग आहेत. |
00:42 | ब्रोशरच्या आतल्या बाजूला 2, 3 आणि 4 हे भाग आहेत. |
00:46 | असा ब्रोशर कसा बनवायचा हे जाणून घेऊ. |
00:51 | इंकस्केप उघडा. |
00:53 | File मेनूखालील Document Properties वर जा. |
00:56 | प्रथम काही प्राथमिक सेटिंग्ज करू. |
00:59 | हे पर्याय निवडा- Default units साठी mm |
01:03 | Page Size साठी A4 |
01:05 | Orientation साठी Landscape |
01:07 | Custom Size Units साठी mm. |
01:11 | कॅनव्हास 3 फोल्डसमधे विभागावा लागेल. |
01:14 | येथे कॅनव्हासची width 297 आहे. |
01:18 | म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची width 99 असली पाहिजे. |
01:27 | Document Properties चा डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:30 | कॅनव्हासच्या डावीकडील guideline वर क्लिक करून ड्रॅग करा. |
01:35 | या guideline वर डबल क्लिक करा. |
01:37 | डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:41 | 'X' ची व्हॅल्यू 99 करून OK क्लिक करा. |
01:45 | कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा guideline वर क्लिक करून ड्रॅग करा. |
01:50 | डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
01:53 | येथे 'X' ची व्हॅल्यू 198 करा. |
01:56 | आपल्या कॅनव्हासचे तीन समान भाग झाले आहेत. |
02:01 | ह्या गाईडलाईन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात. |
02:06 | ही फाईल दोनदा सेव्ह करा. |
02:08 | पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी |
02:11 | आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी. |
02:13 | File मेनूखालील Save as क्लिक करा. |
02:16 | मी ही फाईल डेस्कटॉपवर Brochure-OUT.svg नावाने सेव्ह करते. |
02:22 | पुन्हा File मेनूखालील Save as क्लिक करा. |
02:26 | यावेळी फाईलला Brochure-IN.svg नाव देऊन Save वर क्लिक करा. |
02:33 | आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा दोन फाईल्स आहेत. |
02:39 | Brochure-IN.svg पासून सुरूवात करू. |
02:43 | हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल. |
02:50 | पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल. |
02:54 | प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू. |
03:00 | Bezier tool वापरून कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलस्ट्रेशन काढा. त्याला निळा रंग द्या. |
03:09 | stroke काढून टाका. |
03:14 | नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या. |
03:19 | 150X150 पिक्सेल्सचे वर्तुळ काढा. |
03:26 | त्याला हिरवा रंग द्या. |
03:28 | वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी पाच वर्तुळे बनवा. |
03:36 | दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा. |
03:40 | या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू. |
03:44 | त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून Documents फोल्डरमधे सेव्ह करून ठेवल्या आहेत. |
03:50 | तुमच्यासाठी या इमेजेस Code files लिंकवर उपलब्ध आहेत. |
03:56 | पाठ थांबवून या लिंकवर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डरमधे सेव्ह करा. |
04:02 | पाठ पुन्हा सुरू करा. |
04:04 | File खालील Import वर क्लिक करा. Image1 निवडा. |
04:09 | ती पहिल्या वर्तुळावर ठेवा. |
04:12 | हेच सर्व इतर पाच इमेजेससाठी करा. |
04:17 | Align and Distribute पर्याय वापरून हे अलाईन करा. |
04:20 | तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे. |
04:25 | पुढे नवा लेयर बनवा. |
04:28 | Bezier tool सिलेक्ट करून एक बाण काढा. |
04:34 | त्याला राखाडी रंग द्या. |
04:38 | stroke काढून टाका. |
04:41 | Filters मेनूखालील Shadows and Glows मधील Drop Shadow वर क्लिक करा. |
04:47 | इफेक्ट बघण्यासाठी Preview चा चेक बॉक्स निवडा. |
04:50 | Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
04:55 | दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा. |
05:01 | या बाणाच्या आणखी दोन प्रती बनवा. |
05:05 | आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या वर्तुळावर ठेवा. |
05:10 | आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत. |
05:13 | आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू. |
05:15 | नव्या लेयरमधे पहिल्या बाणावर “Introduction” असे टाईप करा. |
05:20 | दुस-या बाणावर “Features” असे टाईप करा. |
05:24 | तिस-या बाणावर “Usage” असे टाईप करा. |
05:28 | आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे. |
05:33 | लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू. |
05:40 | ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमधे आहे. |
05:43 | ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा. |
05:47 | दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा. |
05:50 | Text and Font पर्यायातून फाँटचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाईन करा. |
05:55 | ellipse टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा. |
05:59 | आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा. |
06:02 | हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा. |
06:05 | आता ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे. |
06:08 | SVG फाईल CTRL + S दाबून सेव्ह करा. |
06:12 | आता फायनल ब्रोशरमधे तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता. |
06:18 | आता हीच फाईल PDF मधे सेव्ह करू. |
06:21 | File खालील Save As क्लिक करा. |
06:24 | फाईलचे एक्सटेन्शन बदलून PDF करा. |
06:29 | Save क्लिक करा. |
06:31 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:34 | प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे. |
06:37 | वेबसाठी हे 72 ठेवू शकता. |
06:40 | आपण 300 ठेवू. |
06:42 | OK क्लिक करा. |
06:44 | आता बाणांची अपारदर्शकता बदलू. |
06:47 | Arrow लेयरवर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा. |
06:52 | तसेच ink-blots हा नवा लेयर समाविष्ट करा. |
06:58 | फाईल SVG आणि PDF फॉरमॅटमधे सेव्ह करा. |
07:04 | फरक समजून घेण्यासाठी दोन 'pdf' फाईल्सची तुलना करा. |
07:08 | आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू. |
07:12 | File वर जाऊन Open वर क्लिक करा. |
07:14 | Brochure-OUT.svg निवडा. |
07:18 | आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू. |
07:22 | लक्षात ठेवा वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे. |
07:28 | दाखवल्याप्रमाणे Bezier tool वापरून डाव्या वरच्या कोप-यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा. |
07:33 | त्याला निळा रंग द्या आणि stroke काढून टाका. |
07:36 | तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करा. |
07:40 | त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोप-यात वरती ठेवा. |
07:46 | “Spoken Tutorial” असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाईन करा. |
07:51 | फाँटचा आकार 25 करा. |
07:54 | टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या. |
07:58 | 'Inkscape' चा लोगो इंपोर्ट करा. |
08:00 | तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा. |
08:03 | लोगोखाली “Inkscape” टाईप करून त्याच्या फाँटचा आकार 45 ठेवा. |
08:09 | मी स्पोकन ट्युटरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले. |
08:15 | तुम्हीही असेच करा. |
08:17 | मी सर्व घटक |
08:19 | Text and font |
08:21 | आणि Align and Distribute वापरून अलाईन केले आहेत. |
08:24 | आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे. |
08:28 | File मेनूखालील, Save As वर क्लिक करा. |
08:31 | फॉरमॅट बदलून SVG करा आणि Save क्लिक करा. |
08:37 | हीच क्रिया पुन्हा करा. |
08:39 | एक्सटेन्शन बदलून PDF करा. |
08:41 | Save क्लिक करा. |
08:43 | आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे. |
08:46 | विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात. |
08:54 | हेच ब्रोशर मी आणखी दोन रंगसंगतीत तयार केले आहे. |
09:00 | थोडक्यात, |
09:02 | पाठात शिकलो: |
09:04 | guidelines वापरणे, सेट करणे |
09:07 | ‘‘‘3-fold brochure’’’ साठी सेटींग्ज |
09:09 | ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना. |
09:11 | तसेच, लेयर्सचे महत्व जाणून घेऊन, |
09:14 | एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले. |
09:18 | ही असाईनमेंट करा. |
09:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी 3-fold brochure बनवा. |
09:24 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल. |
09:29 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:35 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:42 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:45 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:50 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:54 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:57 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |