ExpEYES/C2/Electro-Magnetism/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:23, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Electro-magnetic induction वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत: इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शन, कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे. |
00:26 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10 |
00:35 | या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:47 | इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रात्यक्षिकापासून सुरू करू. |
00:52 | या प्रयोगामधे, 3000 वेढ्यांच्या कॉईलच्या तारा ग्राऊंड(GND) आणि A1 ला जोडलेल्या आहेत. |
01:00 | मॅग्नेटिक इफेक्ट दाखवण्यासाठी 5mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे मॅग्नेट वापरले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
01:11 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:15 | प्लॉट विंडोवर आडवी रेष दिसेल. कागदाची गुंडाळी करून ती कॉईलच्या आत घाला. |
01:23 | कागदाच्या गुंडाळीत मॅग्नेट टाका आणि ते वर - खाली करा. |
01:29 | इंड्युस्ड विद्युतदाब मिळेपर्यंत आणि दाखवला जाईपर्यंत असे करत रहा. |
01:35 | प्लॉट विंडोवरील Experiments बटणावर क्लिक करा. |
01:39 | सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. EM Induction वर क्लिक करा. |
01:46 | इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि स्किमॅटिक या दोन नव्या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. |
01:56 | इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विंडोवरील Start Scanning वर क्लिक करा. आडवी रेष वेवमधे बदललेली दिसेल. |
02:05 | periodic scanning चा विद्युतदाब मॅग्नेटच्या हालचालीशी जुळल्यास असे दिसते. |
02:12 | हे दर्शवते की हलणा-या मॅग्नेटमुळे कॉईलमधे विद्युतदाब इंड्युस झाला आहे. |
02:18 | दोन कॉईल्सच्या म्युच्युअल इंडक्शनचे प्रात्यक्षिक पाहू. |
02:23 | या प्रयोगामधे, A2 हे SINE ला जोडलेले आहे. SINE हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. |
02:31 | आणि A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
02:37 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
02:40 | A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे. |
02:47 | A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे. |
02:55 | अप्लाईड वेवफॉर्म आणि इंड्युस्ड वेवफॉर्म बघण्यासाठी msec/div स्लायडर हलवा. |
03:02 | मॅग्नेटिक फिल्डमधील बदल हा इंड्युस्ड विद्युतदाबाला कारणीभूत असतो. कदाचित सेकंडरी कॉईलवर कुठलाही इंड्युस्ड विद्युतदाब दिसणार नाही. |
03:12 | कॉईल्स एकाच अक्षावर ठेवून जवळ आणा. ferromagnetic वस्तू अक्षाशी ठेवा. |
03:20 | सेकंडरी कॉईलवर विद्युतदाब इन्ड्युस करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर आत घातला आहे. |
03:26 | CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. |
03:34 | A1 आणि A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दिसेल.
A1 आणि A2 मधील विद्युतदाबाचा फरक हा सेकंडरी कॉईलवरील इंड्युस्ड विद्युतदाबामुळे आहे. |
03:47 | आता DC मोटर आणि कॉईल्स वापरून फिरत्या मॅग्नेटने इंड्युस झालेला विद्युतदाब बघू. |
03:56 | या प्रयोगामधे, A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.
SQR2 हे ग्राऊंड(GND) ला DC मोटरद्वारे जोडले आहे. |
04:06 | 10mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे परमनंट मॅग्नेट DC मोटरवर बसवले आहे.
A2 हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे. |
04:18 | ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
04:20 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
04:23 | Setting Square waves खाली वारंवारतेची व्हॅल्यू 100Hz वर सेट करा. SQR2 चेकबॉक्सवर क्लिक करा. |
04:34 | A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे. |
04:41 | A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे. |
04:47 | वेव फॉर्म मिळवण्यासाठी msec/div स्लायडर हलवा. वेव फॉर्म ऍडजस्ट करण्यासाठी volt/div स्लायडर हलवा. |
04:57 | CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. |
05:05 | उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यू दिसतील. दोन्ही alternating वेव फॉर्मसाठी या व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत. |
05:16 | कारण की मॅग्नेट फिरताना, कॉईलच्या भोवतालचे मॅग्नेटिक फिल्ड ध्रुवांच्यामधे सतत बदलत असते. |
05:24 | फिरत्या मॅग्नेटचा परिणाम म्हणून कॉईलमधे alternating इंड्युस्ड emf तयार होते. |
05:31 | आता driven pendulum म्हणजे संचालित लंबकाचा प्रयोग पाहू. |
05:34 | इंड्युस्ड मॅग्नेटिक फिल्डद्वारे लंबक हलता ठेवल्यास त्यास driven pendulum म्हणतात. |
05:41 | या प्रयोगामधे, SQR1 हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. |
05:47 | बटण मॅग्नेटसमधे धरलेली कागदाची पट्टी लंबक म्हणून कॉईलच्या समोर हलती ठेवली आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
05:58 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
06:01 | SQR1 चेकबॉक्सवर क्लिक करा. |
06:05 | Experiments बटणावर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. Driven Pendulum वर क्लिक करा. |
06:15 | दोन विंडोज उघडतील- Schematic of Driven Pendulum आणि EYES Junior: Driven Pendulum. |
06:23 | EYES Junior: Driven Pendulum विंडोवरील स्लायडर ड्रॅग करा. असे ड्रॅग करताना लंबक हलण्यास सुरूवात होईल. |
06:33 | "2.6 Hz" ते "2.9Hz" मधे लंबक सर्वाधिक एँप्लीट्युडने हलेल.
कारण त्याची resonant वारंवारता ही त्याच्या नैसर्गिक वारंवारते एवढीच आहे. |
06:47 | थोडक्यात, |
06:49 | या पाठात आपण शिकलो : इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन
कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे, ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे. |
07:09 | असाईनमेंट म्हणून हे करून पहा:
इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्याची कृती, एक कॉईल व एक मॅग्नेट मधील म्युच्युअल इंडक्शन पहा , प्रयोगांसाठी विद्युत मंडलांच्या आकृत्या दाखवा. |
07:22 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
07:30 | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:44 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |