C-and-C++/C2/If-And-Else-If-statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:34, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:02 C and C++ मधील Conditional statements च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 ह्यात शिकणार आहोत,
00:11 एक statement कार्यान्वित करणे.
00:14 अनेक statements कार्यान्वित करणे.
00:16 हे उदाहरणांद्वारे पाहू.
00:19 आपण काही सामान्य errors आणि त्याचे उपाय ही बघू .
00:25 ह्यासाठी आपण Ubuntu Operating system version 11.10;

00:31 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत.
00:38 conditional statements च्या परिचयाने सुरू करू.
00:43 हे statement, कार्यान्वित होताना प्रोग्रॅमचा flow नियंत्रित करते.
00:49 हे कोणता code कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते.
00:55 आपण conditions, true किंवा false आहेत हे तपासू शकतो.
01:00 त्यानुसार एक किंवा अनेक statements कार्यान्वित करू शकतो.
01:07 if statement चा flow समजून घेऊ.
01:13 condition जर true असेल तर statement1 कार्यान्वित होईल.
01:20 condition जर false असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
01:29 आता else if statement चा flow पाहू.
01:32 condition1 जर true असेल statement1 कार्यान्वित होईल.
01:41 condition1 जर false असेल तर condition2 तपासली जाईल.
01:49 condition2 जर trueअसेल तर statement3 कार्यान्वित होईल.
01:54 condition2 जर false, असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
02:02 चला आता प्रोग्रॅमकडे वळू.
02:06 मी एडिटरवर code आधीच लिहिला आहे.
02:09 आपण तो उघडू.
02:13 लक्ष द्या ifstmt.c हे आपल्या फाईलचे नाव आहे.
02:18 ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही conditions तपासणार आहोत.
02:26 हा code समजून घेऊ.
02:30 ही Header file आहे.
02:34 हे main function आहे.
02:38 येथे 'a', 'b' आणि 'sum' ही तीन integer variables घोषित केली आहेत.
02:46 येथे user ला input देण्यास सांगू.
02:49 'a' आणि 'b' च्या व्हॅल्यूज user' एंटर करेल.
02:52 त्या व्हॅल्यूज variable a आणि b मध्ये संचित होतील.
02:58 scanf() फंक्शन हे console वरील डेटा वाचेल.
03:02 हे मिळालेला result दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते.
03:06 scanf() मधील format specifier डेटाचा टाईप सांगते.
03:10 येथे '%d' आहे ज्याचा अर्थ आपण डेटा टाईप integer शी संबंधित आहोत.
03:18 येथे 'a' आणि 'b' च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत .
03:22 मिळणारे उत्तर sum मध्ये संचित करू.
03:25 नंतर रिज़ल्ट प्रिंट करू.
03:29 हे if statement आहे.
03:30 sum वीस पेक्षा जास्त आहे का हे तपासू.
03:36 condition true असेल तर Sum is greater than 20 असे प्रिंट करू.
03:42 ह्या ओळींना comment करू.
03:48 हे return statement आहे.
03:51 सेव्ह करा.
03:53 प्रथम if statement कार्यान्वित कसे होते ते पाहू.
03:58 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
04:09 संकलित करण्यासाठी टाईप करा, gcc space ifstmt dot c space -o space if आणि एंटर दाबा.
04:20 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if आणि एंटर दाबा.
04:26 आपल्याला असे दिसेल,
04:27 Enter the value of a and b.
04:31 आपण '10' आणि '12' ह्या व्हॅल्यूज देऊ.
04:38 आउटपुट Sum of a and b is 22. Sum is greater than 20. हे दर्शविते.
04:45 प्रोग्रॅमवर जाऊ.
04:48 आपण दुसरी condition तपासू.
04:52 ही comment काढू.
04:56 येथे comment करू.
05:00 सेव्ह करा.
05:03 हे else-if statement आहे.
05:05 Sum ही दहा पेक्षा जास्त आहे का हे तपासू.
05:11 condition true असेल तर प्रिंट करू Sum is greater than 10 and less than 20 .
05:18 टर्मिनलवर जाऊ.
05:20 अगोदर प्रमाणे संकलित करू.
05:23 अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू.
05:26 आपल्याला असे दिसेल,
05:28 Enter the value of a and b.
05:30 10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ.
05:35 आपल्याला असे दिसेल Sum of a and b is 12.
05:38 Sum is greater than 10 and less than 20.
05:42 prompt clear करा.
05:44 प्रोग्रॅमवर परत जाऊ.
05:48 ही आणि ही comment काढा आणि सेव्ह करा.
05:56 जर वरील दोन्ही conditions false असतील तर प्रिंट करू Sum is less than 10.
06:04 हे else statement आहे.
06:07 कार्यान्वित करून पहा. टर्मिनल वर पुन्हा जा.
06:11 अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू.
06:18 हे असे दिसेल. Enter the value of a and b.
06:22 '3' आणि '5' अशा व्हॅल्यूज देऊ.
06:27 हे आऊटपुट दिसेल, sum of a and b is 8.
06:31 Sum is less than 10.
06:34 काही सामान्य errors पाहू. जी आपल्यास मिळू शकते.
06:38 प्रोग्रॅमवर परत जाऊ. ते सेव्ह करा.
06:41 समजा if statement च्या शेवटी semicolon टाईप केले.
06:47 चला पाहु काय होते सेव्ह करा.
06:50 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06:53 अगोदर प्रमाणे संकलित करू.
06:56 else without a previous if अशी error दिसेल.
07:02 प्रोग्रॅमवर जाऊ. ही Syntax error आहे.
07:07 If statement हे कधीही semicolon ने संपवले जात नाही.
07:10 else if statement चे कार्य आधीच्या if शिवाय होऊ शकत नाही.
07:16 ही error दुरूस्त करण्यासाठी semicolon डिलिट करा.
07:22 सेव्ह करा.
07:25 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
07:29 अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू.
07:35 'a' आणि 'b' ला व्हॅल्यूज देऊ.
07:37 '3' आणि '6' या व्हॅल्यू देऊ.
07:43 हे आऊटपुट दिसेल,
07:45 Sum of a and b is 9. Sum is less than 10.
07:52 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
07:57 प्रोग्रॅमवर जाऊ.
07:59 येथे काही बदल करू.
08:03 कीबोर्ड वरील Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
08:11 फाईलला .cpp extension देऊन सेव्ह करा.
08:20 header file बदलून iostream करा.
08:26 येथे using statement समाविष्ट करा.
08:30 search for and replace text option वर क्लिक करा.
08:35 printf statement च्या जागी cout statement लिहू.
08:40 Replace all आणि नंतर Close वर क्लिक करा.
08:46 येथे closing brackets डिलिट करा.
08:49 scanf statement च्या जागी cin statement लिहू
08:54 टाईप करा cin आणि दोन closing angle brackets.
09:00 C++ मध्ये ओळ वाचण्यासाठी cin >> function चा वापर होतो.
09:05 format specifiers डिलिट करू.
09:09 comma आणि ampersand & डिलिट करू.
09:12 comma डिलिट करून टाईप करा दोन closing angle brackets.
09:17 पुन्हा & आणि closing brackets डिलिट करून सेव्ह करा.
09:25 येथे closing brackets आणि comma डिलिट करा.
09:31 backslash n आणि format specifier डिलिट करू.
09:37 टाईप करा दोन opening angle brackets.
09:42 पुन्हा टाईप करा दोन opening angle brackets आणि डबल कोट्स मध्ये backslash n “\n”.
09:49 येथेही आपण closing bracket डिलिट करू.
09:53 आता पुन्हा ही आणि ही closing bracket डिलीट करू.
09:59 सेव्ह करा.
10:02 कार्यान्वित करू.
10:04 टर्मिनलवर जाऊन prompt clear करू.
10:10 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space ifstmt.cpp space -o space if1 एंटर दाबा.
10:20 येथे if1 आहे कारण ifstmt.c च्या output parameter if वर आपल्याला overwrite करायचे नाही.
10:31 आता एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if1
10:39 'a' आणि 'b' ला व्हॅल्यूज देऊ. आपण '20' आणि '10' या व्हॅल्यूज देऊ.
10:48 Sum of a and b is 30. हे आऊटपुट दिसेल.
10:52 Sum is greater than 20.
10:56 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:59 स्लाईडस वर जाऊ.
11:02 थोडक्यात,
11:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण , if statement उदाहरणार्थ if(condition)
11:11 आणि else if statement उदाहरणार्थ else if(condition) शिकलो.
11:17 Assignment, 'a' हा 'b' पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11:24 Hint: if statement वापरा.
11:28 'a', 'b' किंवा 'c' पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11:34 Hint: else-if statement वापरा.
11:38 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:41 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:44 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11:50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana