BOSS-Linux/C3/Basics-of-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:53, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 "awk" कमांड वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात "awk" कमांडबद्दल,
00:09 काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ.
00:12 ह्या पाठासाठी, लिनक्स OS, GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.
00:21 पाठाच्या सरावासाठी GNU Bash च्या '4' किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:29 आता "awk" बद्दल जाणून घेऊ.
00:32 "awk" कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.
00:36 हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger आणि Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे.
00:42 हे अनेक प्रकारची कार्य करते.
00:46 हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते .
00:49 त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते.
00:56 आता काही उदाहरणे पाहू.
00:58 प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाईल वापरू.
01:03 आता awkdemo.txt फाईलमधील घटक पाहू.
01:07 आता 'टर्मिनल' विंडो उघडा
01:10 आता "awk" कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:15 टाईप करा: awk space सिंगल कोटमधे front slash ‘/Pass front slash / महिरपी कंस सुरू {print} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space awkdemo.txt
01:32 एंटर दाबा.
01:34 येथे Pass हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे.
01:38 awkdemo फाईलमधे Pass असलेल्या ओळी प्रिंट करेल.
01:43 येथे प्रिंट ही कृती आहे.
01:46 तसेच "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो.
01:50 समजा Mira असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत.
01:55 त्यासाठी टाईप करा: awk space सिंगल कोट्स मध्ये front slash capital M चौकटी कंस सुरू [ei] चौकटी कंस पूर्ण asterisks sign*ra asterisks sign front slash space महिरपी कंस सुरू, print महिरपी कंस पूर्ण, कोटस नंतर space awkdemo.txt
02:20 एंटर दाबा.
02:22 "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.
02:27 अशाप्रकारे 'i, e' आणि 'a' अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील .
02:34 उदाहरणार्थ Mira जसे ('M' 'I' 'R' 'A')
02:38 Meera जसे ('M' 'E' 'E' 'R' 'A')
02:41 Meeraa जसे (M E E R A A)
02:45 awk एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते.
02:51 म्हणजेच "PIPE" द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.
02:56 प्रॉम्प्ट क्लियर करू.
02:59 टाईप करा: "awk" space सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
03:18 एंटर दाबा. आता civil आणि electrical ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील.
03:24 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
03:28 पॅरॅमीटर्स awk कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत.
03:36 $1(Dollar 1) हे पहिले फिल्ड सूचित करते.
03:40 तसेच संबधित फिल्डससाठी $2, $3 इत्यादी आहेत.
03:47 $0 संपूर्ण ओळ दाखवते.
03:50 टर्मिनलवर जाऊ.
03:52 awkdemo.txt या फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.
03:59 येथे "PIPE" हे डिलिमीटर आहे.
04:03 डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते.
04:06 एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो .
04:11 कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी - capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो.
04:18 आता हे पाहू. टाईप करा awk space minus capital F space डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर space सिंगल कोटमधे front slash civil PIPE electrical front slash महिरपी कंस सुरू {print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".
04:44 एंटर दाबा.
04:46 येथे "$0" वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.
04:52 names आणि stream of students हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे.
04:58 समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत.
05:01 वरील कमांडमधे "$0" च्या जागी "$2 , $3" टाईप करा.
05:09 एंटर दाबा.
05:11 केवळ दोन फिल्डस दाखवली जातील.
05:14 उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे.
05:20 'C' मधील printf स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.
05:26 आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो.
05:33 आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
05:37 ” डबल कोट्स नंतर space सिंगल कोट्स मध्ये front slash /Pass/front slash महिरपी कंस सुरू {printf डबल कोट्स मध्ये “%4d %-25s %-15s space backslash \n” डबल कोट्स नंतर, NR,$2,$3 } महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर space awkdemo.txt
06:25 एंटर दाबा.
06:28 आपण फरक बघू शकतो.
06:30 येथे "NR" म्हणजे रेकॉर्डचा नंबर.
06:33 रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे "%d" लिहिले आहे.
06:37 "Name" आणि "Stream" ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण "%s" वापरले आहे.
06:43 येथे "25s" हे Name फिल्डसाठी "25 spaces" राखून ठेवेल.
06:48 '15s' हे Stream फिल्डसाठी "15 spaces" राखून ठेवेल.
06:54 "minus" हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे.
06:58 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:01 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
07:04 थोडक्यात, या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,
07:10 "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.
07:15 केवळ दुस-या आणि तिस-या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे.
07:18 फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे. असाईनमेंट म्हणून,
07:22 "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.
07:27 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:30 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:42 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:45 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:51 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:55 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:02 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:07 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana