Blender/C2/Types-of-Windows-Outliner/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:30, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:03 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:07 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये आउटलाइनर विंडो बद्दल आहे. |
00:16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:28 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, |
00:33 | आउटलाइनर विंडो म्हणजे काय? |
00:36 | आउटलाइनर विंडो मधील Eye, arrow आणि camera आइकॉन्स म्हणजे काय? |
00:43 | आणि आउटलाइनर विंडो मधील display मेन्यू म्हणजे काय? हे शिकू. |
00:49 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. |
00:54 | जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा. |
01:03 | आउटलाइनर हे ब्लेंडर मधील डेटा च्या फ्लोचार्ट ची सूची आहे. |
01:09 | डिफॉल्ट द्वारे हे ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे. |
01:15 | चला आउटलाइनर विंडो चा आकार बदलू. |
01:20 | खालच्या भागाच्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास खालच्या बाजूस ड्रॅग करा. |
01:26 | डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास डाव्या बाजूस ड्रॅग करा. |
01:36 | आउट लाइनर विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो. |
01:41 | ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे ट्यूटोरियल |
01:47 | ब्लेंडर मध्ये विंडो टाइप्स कसा बदलायचा पहा. |
01:59 | View वर लेफ्ट-क्लिक करा. |
02:03 | येथे अनेक पर्याय आहेत जसे की, |
02:06 | Show restriction columns, |
02:09 | show active, |
02:11 | show or hide one level, |
02:14 | show hierarchy, |
02:17 | Duplicate area into New window and Toggle full screen. |
02:25 | Show Restriction columns निष्क्रिय करा. |
02:30 | हे आउट लाइनर विंडो च्या उजव्या कोपऱ्यात उपस्थित असलेले पर्याय पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुत तिय पर्यायास निष्क्रिय करते. |
02:42 | पुन्हा view वर लेफ्ट-क्लिक करा. |
02:46 | पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुततिय पर्याय दाखविण्यासाठी Show restriction columns सक्रियित करा. |
02:56 | आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब च्या डाव्या बाजूला असलेल्या plus sign वर लेफ्ट-क्लिक करा. |
03:03 | cascade सूची दिसेल. |
03:05 | हे तुम्हाला निवडलेल्या ओब्जेकटच्या प्रॉपर्टीस ची सूची दर्शवेल. |
03:11 | आपण या बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू. |
03:16 | Eye तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये दृश्य किंवा अदृश्य बनविते. |
03:24 | उदाहरणार्थ, क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा. |
03:29 | 3D व्यू मध्ये क्यूब आता दिसणार नाही. |
03:35 | पुन्हा क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा. |
03:41 | आता आपण 3Dव्यू मध्ये क्यूब पाहु शकतो. |
03:48 | Arrow तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये निवडण्याजोगे किंवा न निवडण्याजोगे बनविते. |
03:56 | उदाहरणार्थ, क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा. |
04:02 | 3Dव्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा. क्यूब निवडली जात नाही. |
04:10 | पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा. |
04:17 | 3D व्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा. |
04:21 | क्यूब आता निवडली जाऊ शकते. |
04:28 | Camera तुमच्या ओब्जेक्टला, प्रस्तुतीय किंवा अप्रस्तुतीय बनवितो. |
04:34 | क्यूब साठी camera वर लेफ्ट क्लिक करा. |
04:38 | सीन ला रेंडर करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील f12 दाबा. |
04:46 | रेंडर मध्ये क्यूब आता दिसणार नाही. |
04:51 | 3D व्यू वर पुन्हा जाण्यासाठी कीबोर्ड वरील esc दाबा. |
04:56 | पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी Camera वर लेफ्ट क्लिक करा. |
05:03 | सीन रेंडर करण्यासाठी f12 दाबा. |
05:09 | क्यूब आता रेंडर मध्ये दिसत आहे. |
05:15 | 3D व्यू वर जाण्यासाठी esc दाबा. |
05:21 | आउट लाइनर विंडो मध्ये Search bar वर लेफ्ट क्लिक करा. |
05:28 | जर तुमच्या scene मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतील तर, हे सर्च टूल तुम्हाला scene मध्ये, समान गटाचे ऑब्जेक्ट किंवा विशेष ऑब्जेक्ट ना फिल्टर करण्यास मदत करते. |
05:40 | आउट लाइनर विंडो च्या डाव्या कोपऱ्यावर असलेले Scene, तुमच्या ब्लेंडर सीन मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स ना आणि त्याच्या संबंधित असलेल्या घटकांना सूचीबद्ध करते. |
05:51 | All scenes वर लेफ्ट क्लिक करा. |
05:55 | ही ड्रॉप डाउन ची सूची म्हणजे display menu आहे. |
05:59 | या मध्ये आउट लाइनर पॅनल साठी display पर्याय समाविष्ट आहे. |
06:04 | current scene वर लेफ्ट क्लिक करा. |
06:08 | आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध असलेले सर्व ऑब्जेक्ट तुम्ही current scene मध्ये पाहु शकता. |
06:18 | displayमेन्यू उघडण्यासाठी current scene वर लेफ्ट क्लिक करा. |
06:26 | visible layers वर लेफ्ट क्लिक करा. |
06:30 | आक्टिव लेयर किंवा लेयर्स मध्ये उपस्थित असलेले सर्व ऑब्जेक्ट्स आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध आहेत. |
06:38 | आपण लेयर्स बदद्ल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकुया. |
06:44 | displayमेन्यू उघडण्यासाठी visible layers वर लेफ्ट क्लिक करा. |
06:52 | selected वर लेफ्ट क्लिक करा. |
06:55 | आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे. |
07:04 | displayमेन्यू उघडण्यासाठी selected वर लेफ्ट क्लिक करा. |
07:09 | Active वर लेफ्ट क्लिक करा. |
07:12 | आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, नुकताच 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे. |
07:22 | displayमेन्यू उघडण्यासाठी Active वर लेफ्ट क्लिक करा. |
07:28 | Same types वर लेफ्ट क्लिक करा. |
07:31 | जसे की नावावरून सूचीत होते की, same type पर्याय आउटलाइनर विंडो मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स सूचीबद्ध करते, जे समान विभागात येतात. |
07:41 | उदाहरणार्थ, 3D व्यू मध्ये क्यूब डिफॉल्ट द्वारे निवडलेली आहे. |
07:47 | आउट लाइनर scene मध्ये सर्व मेश ऑब्जेक्ट सूचीबद्ध करतो. |
07:51 | या बाबतीत, scene मध्ये फक्त क्यूब हे मेश ऑब्जेक्ट आहे. |
07:58 | आपण मेश ऑब्जेक्ट बद्दल, ब्लेंडर मधील आनिमेशन वरील प्रगत ट्यूटोरियल मध्ये अधिक विस्तृत पणे शिकुया. |
08:08 | displayमेन्यू उघडण्यासाठी Same types वर लेफ्ट क्लिक करा. |
08:14 | ‘groups’ सीन मध्ये सर्व समूहित ऑब्जेक्ट्स ना सूचीबद्ध करते. |
08:20 | येथे काही इतर पर्याय ही आहेत ते आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
08:27 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:32 | मोठ्या सीन सह कार्य करत असताना, एकाधिक ऑब्जेक्ट्स असल्यास, सीन मध्ये प्रत्येक ओब्जेक्टची माहिती ठेवण्यासाठी आउट लाइनर विंडो अतिशय उपयुक्त असे साधन आहे. |
08:45 | आता नवीन फाइल तयार करा, आउट लाइनर मध्ये निवडलेल्याना सूचीबद्ध करा आणि क्यूब ला अनरेंडरेबल बनवा. |
08:58 | हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
09:07 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:12 | oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/ NMEICT-Intro. |
09:28 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
09:30 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:34 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
09:38 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:45 | आमच्यासह जुड ण्यासाठी. धन्यवाद. |