Drupal/C3/Menu-and-Endpoints/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Menu and Endpoints वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण URL Patterns सेट करणे शिकणार आहोत. त्याचबरोबर मेनू मॅनेजमेंटदेखील शिकणार आहोत. |
00:15 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, उबंटू लिनक्स ऑपरेटींग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊझर.तुम्ही तुमच्या निवडीचे कोणतेही वेब ब्राऊझर वापरू शकता. |
00:29 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण आपल्या वेबसाईसाठी योग्य URL paths तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. |
00:36 | एन्डपॉईंट्स आणि एलियसेस-- एन्डपॉईंट्स हे URL paths आहेत जे एक विशिष्ट कंटेन्ट प्रदर्शित करतात. |
00:45 | डिफॉल्टपणे ड्रुपलमध्ये नोडचा एन्डपॉईंट आहे node/[node:id] |
00:53 | हे सर्वर वर पाठविल्यामुळे नोडचे कंन्टेट प्रदर्शित होईल. ID ची संख्या व्यक्तीला वाचण्यायोग्य नाही आहे. |
01:02 | म्हणजेच सांगितलेल्या node/278162 सोबत आपण सहजपणे विशिष्ट कंटेन्टची सांगड घालू शकत नाही. एक 'alias' तयार करण्याने व्यक्तीचे वाचण्यायोग्य (endpoint) उपलब्ध आहे. |
01:19 | समान कंटेन्टसाठी एलियस हे एक पर्यायी URL path आहे. त्याच कंटेन्टच्या प्रदर्शनासाठी आपण एकतर मूळ किंवा अनेक एलियसपैकी एक वापरू शकतो. |
01:34 | उदाहरणार्थ node/278162 आणि content/drupal-camp-mumbai-2015 |
01:47 | दोन्ही सारख्या कंन्टेट प्रदर्शित करतात. पण दुसरा लक्षात ठेवावयास सोपा आहे. |
01:54 | आता नवीन URL पॅटर्न्स तयार करूया जे आपल्याकडे असलेल्या सर्व कंटेन्सला लागू होईल. |
01:59 | URL पाथ्स सेट करण्यासाठी तीन मॉड्युल्स हवेत. |
02:04 | हे तीन मॉड्युल्स आहेत – पाथॉटो, टोकन आणि सीटूल्स. |
02:13 | कृपया पुढे चला आणि तुमच्या मशिनवर 'Pathauto' इन्टॉल करा. |
02:18 | पाथॉटो (Pathauto) प्रोजेक्ट पानावर परत या. इथे तुमच्या लक्षात येईल की पाथॉटोसाठी टोकन आणि सीटूल्सची आवश्यकता आहे. |
02:27 | टोकन आणि सीटूल्स इन्टॉल करा. एकदा तुम्ही हे मॉड्युल्स इन्टॉल केले की ते सुरू (ऑन) करा. |
02:37 | एकदा आपण हे केले की आपण पुढे जायला तयार आहोत. |
02:40 | इथे खाली डावीकडे 'Configuration' वर क्लिक करा. SEARCH AND METADATA सेक्शनमध्ये तुम्हाला 'URL' एलियसेस दिसेल. |
02:52 | बायडिफॉल्ट तिकडे 'URL' एलियसेस नाहीत. |
02:58 | Patterns टॅबवर क्लिक करा. Add Pathauto pattern बटणावर क्लिक करा. |
03:05 | Pattern type ड्रॉप डाऊन वर क्लिक करा. |
03:09 | इथे आपण फोरम, कंटेन्ट, टॅक्सोनोमी टर्म आणि युझरसाठी स्वतंत्र पॅटर्न्स (नमूने) तयार करू शकतो. |
03:17 | उदाहरणार्थ, मी कंटेन्ट निवडेन. पाथ पॅटर्न फिल्डमध्ये, आपल्याला टेम्पलेट पॅटर्न (नमूना) टाकायचा आहे. |
03:27 | टेम्पलेट वेरिएबल्सना टोकन्स म्हणतात. ते प्रत्येक एन्टीटीसाठी गतिकरित्या (शीघ्रतेने) निर्माण झाले आहेत. |
03:36 | टोकन मॉड्युल हे वेरिएबल्स पुरविते. जेव्हा तुम्ही कोणत्याही इनपूट फॉर्ममध्ये 'Browse available tokens' हे पाहाल, तेव्हा तुम्ही पूर्वनिर्धारित टोकन्स ठेवू शकता. |
03:49 | तुम्हाला जिथे टोकन ठेवायचे आहे तिथे Path pattern वर क्लिक करा. |
03:55 | "content/" टाईप करा. मग Browse available tokens लिंकवर क्लिक करा. |
04:02 | एक पॉपअप विंडो "Available tokens" दाखवत उघडते. |
04:07 | समजा आपल्याला content/[title of the page] असे पॅटर्न हवे आहे, पानाच्या शिर्षकासाठी टोकन हे नोड सेक्शनमध्ये आहे. |
04:18 | Nodes सेक्शनच्या उजव्या बाणाच्या (राईट एरो) बटणावर क्लिक करा. |
04:23 | token [node:title] निवडा जे पानाचे टाईटलने बदलले आहे. |
04:32 | form बॉक्समध्ये कर्सरच्या दिशेने हे [node:title] टाका. |
04:38 | जर हे झाले नाही तर, बॉक्सवर क्लिक करा आणि कर्सर हव्या त्या स्थितीत आहे का ह्याची खात्री करून घ्या. नंतर token सिलेक्ट करा. |
04:49 | Content type मध्ये आपण ह्या पॅटर्नसाठी कोणता इन्टीटी टाईप लागू झाला पाहिजे हे निवडू शकतो. |
04:56 | सर्व टाईप्स सिलेक्ट करा जेणेकरून सर्वांना हे पॅटर्न बायडिफॉल्टपणे लागू होईल. |
05:04 | हे सेटिंग विशिष्ट टाईप साठी अधिलिखित (ओवराईट) करता येऊ शकते. उदाहरणार्थ : आपण usergroup/[node:title] तयार करून आणि ते फक्त युजर ग्रुप लागू करू शकतो. |
05:18 | लेबल फिल्डमध्ये, टाईप करा "Content Title". नंतर Save बटणावर क्लिक करा. इथे आपण नुकतेच तयार केलेले नवीन पॅटर्न तपासू शकतो. |
05:31 | हे पॅटर्न नव्याने जोडलेल्या सर्व कंटेन्ट्सला URL एलियसेस तयार करण्यासाठी लागू होईल पण हे विद्यमान कंटेन्ट्ससाठी URL एलियसेस तयार करणार नाही. |
05:45 | ते विद्यमान कंटेन्ट्ससाठी लागू करण्यासाठी, बल्क जनरेट टॅबवर क्लिक करा. Content type सिलेक्ट करा आणि Update बटणावर क्लिक करा. |
05:58 | हे URL एलियसेस तयार करण्याची सुरवात करते. हे थोडा वेळ घेऊ शकते आणि हे असलेल्या कंन्टेट्सच्या संख्येवर अवलंबून आहे. |
06:08 | आता List टॅबवर क्लिक करा. आपण आपल्या कंन्टेटसाठी URL एलियसेस पाहू शकतो. |
06:15 | आपल्या साईटवरील प्रत्येक नोडकडे /node/nodeid चा सिस्टम पाथ आहे. |
06:24 | तिथे पहिल्या एलियस कॉलममध्ये नव्याने तयार झालेला URL एलियस आहे. |
06:30 | आपण पाहू शकतो की सर्व एलियसेस समान पॅटर्नचे अनुसरण करतो. नवीन कंन्टेट टाईप तयार करताना प्रत्येक वेळी तुम्हाला हे करायचे आहे. |
06:41 | पॅटर्न्स तयार करण्यासाठी खालील नियम वापरा. लोवर केस शब्दांचा वापर करणे, शब्दांमध्ये स्पेस(अंतर) न देणे. |
06:52 | शब्द अंडरस्कोरने वेगळे न करता हायफनने वेगळे करणे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी (SEO) URL मध्ये अर्थपूर्ण, व्यक्तीला वाचता येईल अशा शब्दांचा वापर करणे. |
07:07 | वेळेनुसार कंन्टेट्स वर्गीकृत करण्यासाठी date tokens वापरा. |
07:12 | सेटिंग टॅबमध्ये URL एलियस कंट्रोल करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपण सेपरेटर, लेन्थ इत्यादी पाहू शकतो. |
07:26 | आपण हेसुद्धा पाहू शकतो की बायडिफॉल्ट पॅटर्नमधून अनेक सामान्य शब्द काढले आहेत. हे एन्डपॉईंटला संक्षिप्त आणि अर्थपूर्ण ठेवते. |
07:38 | सारांशित करा. पाथॉटो आणि टोकन मॉड्युल्स आपल्याला URL पॅटर्न्स सेटअप करण्यासाठी, |
07:46 | त्याचबरोबर कधीही 'delete aliases' आणि 'bulk generate aliases' सेट करण्याची अनुमती देतो. |
07:52 | आतापासून, प्रत्येक नवीन नोड, आपण स्थापिलेले पॅटर्न्स वापरतील. |
07:59 | आता आपण मेनूज विषयी बोलू. |
08:03 | आपण आपल्या साईटवर एका अविशिष्ट क्रमाने अधिक 'Views' आणि बेसिक पेजेसवर आधारित menus जोडले आहेत. |
08:10 | आपण मेनू सिस्टमची सिस्टम कशी बदलू शकतो हे पाहू. |
08:15 | Structure वर जा, खाली स्क्रोल करा आणि Menus वर क्लिक करा. |
08:21 | आपल्याकडे इथे अनेक विविध मेन्यूज आहे जे ड्रुपलसोबत बायडिफॉल्ट आहेत. आपल्याकडे सहा मेनूज आहे. |
08:31 | आपली मुख्य नेव्हिगेशन मेनूमध्ये रुची आहे म्हणून Edit menu वर क्लिक करा. |
08:38 | इथे आपण आपले मेनू लिंक्स क्लिक, ड्रॅग आणि रिऑर्डर करू शकतो. |
08:44 | Home आणि Home वर ड्रॅग करा. |
08:49 | तुम्ही तुमच्या निवडीनुसार ह्याचा क्रम बदलू शकता. ह्यानंतर Save वर क्लिक करा. |
08:56 | आता आपल्याकडे इव्हेंट्स आणि अपकमिंग इव्हेंट्स आहेत. Events वर क्लिक करा आणि वर खेचून आणा आणि नंतर Upcoming Events ला उजवीकडे खेचून आणा. |
09:07 | हे सब मेनू तयार करेल. |
09:10 | हे खूपच सोपे आहे, Save क्लिक करा आणि आपल्या समोरच्या पानावर पहा. |
09:15 | लक्षात घ्या की आता आपल्याकडे चार मेन्यूज आहेत. |
09:19 | आपला इव्हेंट सब मेनू कुठे गेला? |
09:23 | कृपया लक्षात ठेवा की ड्रुपलमधील सर्व थिम्स सब मेनूज किंवा ड्रॉप डाऊन मेनूजला सपोर्ट करत नाहीत. बारटीक थिम हे त्यापैकी एक आहे. |
09:32 | आतासाठी स्ट्रक्चर मेनूजवर परत जा आणि मेन मेनू एडिट करा. Upcoming Event परत इथे वर ड्रॅग करा आणि Save वर क्लिक करा. |
09:44 | आपल्याला आपल्या साईटच्या विशिष्ट सेक्शनसाठी किंवा विशिष्ट नोडसाठी लिंक हवी आहे? |
09:51 | उदाहरणार्थ, जर माझ्या फोरम्ससाठी मला मेनू लिंक पाहिजे तर आधी मला साईटवर पुन्हा जायला आवडेल. |
09:58 | फोरम्स पेजवर जा आणि URL कॉपी करा जे फक्त आहे /forum. |
10:05 | नंतर परत या आणि आधी Edit menu आणि नंतर Add link वर क्लिक करा. |
10:12 | त्याला फोरम असे नाव द्या आणि कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. |
10:17 | तुम्ही जर विशिष्ट कंन्टेटचा भाग पाहत असाल तर फक्त 'F' किंवा 'G' सारखे अक्षरे टाईप करा. ह्या अक्षराने सुरू होणारे सर्व नोड्स दाखविले जाईल. |
10:28 | उदाहरणार्थ, जर आपण a अक्षर टाईप केले तर टाईटलमधील a असलेले सर्व नोड्स दिसू लागतील. |
10:38 | जे आपण पाहत आहोत त्यातून आपण फक्त एकच निवडू शकतो आणि ते आपल्याला सांगेत ते आहे नोड आय डी नंबर 1. |
10:46 | जर आपल्याला अंतर्गत पाथ हवा आहे, जसे node जोडण्याची क्षमता मग ते असेल /node/add. |
10:56 | जर आपल्याला होमपेजला लिंक करायचे असेल तर ते असेल front. परंतू आपल्याला इथे /forum हवय जे 'Forum' लिंक आहे. |
11:08 | Save क्लिक करा आणि आता आपल्याकडे Forum साठी एक लिंक आहे. |
11:14 | Save क्लिक करा. आता फक्त ह्या दुहेरी तपासणी करा की हे काम करते आणि खरोखर हे करत आहे. |
11:21 | म्हणून ते अधिक चांगले समजून घेण्यासाठी ह्यावर काम करा. ह्यामुळे आपल्या मेनू सिस्टममध्ये View किंवा Content Type साठी मेनू आईटम तयार करणे अधिक सोपे होईल. |
11:34 | आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. |
11:38 | सारांशित करा. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: URL Patterns ची स्थापना करणे, मेनू मॅनेजमेंट. |
11:59 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
12:09 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:26 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:39 | हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |