Drupal/C2/Managing-Content/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Managing Content वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे |
00:11 | कंटेंट मॅनेज करणे आणि रिविजन्स |
00:15 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:25 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:29 | आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू. |
00:33 | आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू. |
00:37 | आपण आपला पहिला Event समाविष्ट करू. Content क्लिक करा. |
00:42 | Add content क्लिक करा आणि Events निवडा. |
00:46 | काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण 'Event' चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे. |
00:52 | मी 'Event Name' फिल्ड मधे 'DrupalCamp Cincinnati' टाईप करत आहे. |
00:58 | 'Event Description' फिल्ड मधे 'This is the first DrupalCamp in the southern Ohio region' टाईप करू. |
01:07 | लक्षात घ्या येथे 'Create New revision' चेक-बॉक्स ऑन आहे. |
01:12 | येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही. |
01:17 | आतासाठी 'Event Logo' रिकामा ठेवा. |
01:21 | परंतु आपल्याला एक Event Website हवी आहे. |
01:24 | म्हणून आपण 'URL http://drupalcampcincinnati.org' टाईप करू. |
01:34 | 'Link text' मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच 'URL' असेल. म्हणून आत्ता आपण असे करू. |
01:44 | 'Event Date' वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते. |
01:49 | January 11th 2016 निवडा. |
01:54 | आता कोणताही 'EVENT SPONSORS' समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच 'User Groups' सेट केलेला नाही. |
02:01 | ड्रुपलमधे एक 'Inline Entity Reference' नावाचे वैशिष्टय आहे. |
02:07 | हे आपल्याला 'user groups' समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ. |
02:13 | आपल्याजवळ काही EVENT TOPICS आहेत. टाईप करा ‘I’ आणि ‘Introduction to Drupal’ निवडा. |
02:21 | Add another item वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू. |
02:27 | लक्षात घ्या की ज्यात 'm' आहे असे सर्व टॉपिक दिसतील. |
02:32 | त्यातील Module Development निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीचा अन्य टॉपिक निवडू शकता. |
02:38 | नंतर Save and publish क्लिक करा. |
02:41 | हा आपला DrupalCamp Cincinnati नोड आहे. |
02:45 | Title, Body, Event Website जी स्वत:च लिंक असते परंतु ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. |
02:53 | हवे असल्यास आपण ही Event Date फॉरमॅट मधे बदलू. |
02:58 | ही taxonomy आहे. |
03:00 | ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट 'Introduction to Drupal' ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल. |
03:12 | आपण आपला पहिला event node यशस्वीरित्या बनवला आहे. |
03:17 | आता Shortcuts आणि Add content वर क्लिक करा आणि यावेळी आपला User Group समाविष्ट करा. |
03:27 | आपण याला "Cincinnati User Group" संबोधू. |
03:31 | User Group Description फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”. |
03:42 | “We meet on the 3rd Thursday of every month”. |
03:47 | येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो. |
03.51 | या User Group साठी URL आहे: https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati. |
04:03 | आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल. |
04:10 | आपल्या परिसरातील User Group शोधण्यासाठी, groups dot drupal dot org वर जा. |
04:16 | नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा. |
04:21 | जगात अनेक User Groups आहेत. |
04:25 | Group Contact मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि Contact Email मधे टाईप करा: "drupalgroup@email.com". |
04:38 | लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड email address असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल. |
04:46 | येथील अनेक पर्यायांतून Group Level निवडा. |
04:50 | EVENTS SPONSORED मधे Event निवडावे लागेल. |
04:55 | आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल. |
05:02 | Save and Publish क्लिक करा. |
05:05 | आपण आपला पहिला User Group यशस्वीरित्या बनवला आहे. |
05:09 | आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ. |
05:13 | Content वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल. |
05:19 | 'Content type' कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो. |
05:25 | आपण हे Publish status, Content type आणि Title द्वारे फिल्टर करू शकतो. |
05:32 | आपण येथे ‘W’ टाईप करून Filter, वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील. |
05:41 | Reset वर क्लिक करा. |
05:43 | आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो. |
05:49 | एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की Delete, make Sticky, Promote, Publish इत्यादी. |
06:04 | आपण Unpublish content निवडू. Apply वर क्लिक करू. |
06:09 | लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स 'Unpublished' मधे अपडेट झाले आहेत. |
06:16 | कंटेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे. |
06:20 | सर्व नोड्स परत एकदा निवडून Publish आणि नंतर Apply वर क्लिक करा. |
06:28 | यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे. |
06:35 | आपण येथून कुठलेही नोड Edit किंवा Delete करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो. |
06:44 | ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे Content लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल. |
06:54 | वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या 'Comments' आपण मॅनेज करू शकतो. |
07:00 | आणि कोणत्याही file फिल्ड मधे अपलोड केल्या गेलेल्या फाईलला सुध्दा मॅनेज करता येते. |
07:05 | इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल. |
07:10 | इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी 'Places' लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे. |
07:20 | आपण Administration टूलबारमधे Content लिंक द्वारे Content, Comments आणि Files मॅनेज करू शकतो. |
07:29 | आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू. |
07:33 | मी ही कॉमेंट लिहित आहे- “Great Node! Fantastic content.” |
07:39 | Save वर क्लिक करा. |
07:42 | superuser म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही. |
07:50 | आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, 'Content' आणि नंतर 'Comments' वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील. |
07:59 | उदाहरणार्थ - comments प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा. |
08:05 | ड्रुपलमधे 'Content, 'Comments' आणि 'Files' ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते. |
08:12 | आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि 'Revisions' कसे कार्य करते ते पाहू. |
08:20 | Home page वर येण्यासाठी Home लिंक वर क्लिक करा. |
08:24 | DrupalCamp Cincinnati मधे 'Quick edit' वर क्लिक करा. |
08:29 | नोडच्या body मधे थोडे अधिक 'content' लिहू “There is another great camp in Columbus every October.” |
08:39 | Save वर क्लिक करा. |
08:41 | आणि आता DrupalCamp Cincinnati वर क्लिक करा. आपल्याला Revisions नावाचा नवीन टॅब दिसेल. |
08:49 | Revisions वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की admin ने या नोडला 2:37 वाजता अपडेट केले आहे आणि हे Current revision आहे. |
09:00 | आधीचे वर्जनही उपलब्ध आहे. |
09:03 | यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे. |
09:09 | परत जाण्यासाठी Revisions वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला Revert किंवा Delete करू शकतो. |
09:18 | येथे अन्य Modules आहेत जी ही क्रिया सोपी बनवतात. |
09:22 | परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण version control आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा 'revert' करू शकतो. |
09:36 | ड्रुपलमधील स्वतःचे version control खूपच उपयोगी आहे. |
09:41 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, |
09:47 | आपण या पाठात जाणून घेतलेः 'contents' बनवणे, 'contents' मॅनेज करणे आणि 'Revisions' तयार करणे. |
10:06 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
10:16 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
10:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:45 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |