Drupal/C2/Managing-Content/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:20, 20 September 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Managing Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे
00:11 * कंटेंट मॅनेज करणे आणि रिविजन्स
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8 आणि
  • Firefox वेब ब्राउजर
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
00:33 आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू.
00:37 आपण आपला पहिला Event समाविष्ट करू. Content क्लिक करा.
00:42 Add content क्लिक करा आणि Events निवडा.
00:46 काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण Event चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे.
00:52 मी Event Name फिल्ड मधे DrupalCamp Cincinnati टाईप करत आहे.
00:58 Event Description फिल्ड मधे This is the first DrupalCamp in the southern Ohio region टाईप करू.
01:07 लक्षात घ्या येथे Create New revision चेक-बॉक्स ऑन आहे.
01:12 येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही.
01:17 आतासाठी Event Logo रिकामा ठेवा.
01:21 परंतु आपल्याला एक Event Website हवी आहे.
01:24 म्हणून आपण URL http://drupalcampcincinnati.org टाईप करू.
01:34 Link text मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच URL असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
01:44 Event Date वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
01:49 January 11th 2016 निवडा.
01:54 आता कोणताही EVENT SPONSORS समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच User Groups सेट केलेला नाही.
02:01 ड्रुपलमधे एक Inline Entity Reference नावाचे वैशिष्टय आहे.
02:07 हे आपल्याला user groups समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ.
02:13 आपल्याजवळ काही EVENT TOPICS आहेत. टाईप करा ‘I’ आणि ‘Introduction to Drupal’ निवडा.
02:21 Add another item वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू.
02:27 लक्षात घ्या की ज्यात m आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
02:32 त्यातील Module Development निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीचा अन्य टॉपिक निवडू शकता.
02:38 नंतर Save and publish क्लिक करा.
02:41 हा आपला DrupalCamp Cincinnati नोड आहे.
02:45 Title, Body, Event Website जी स्वत:च लिंक असते परंतु ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.
02:53 हवे असल्यास आपण ही Event Date फॉरमॅट मधे बदलू.
02:58 ही taxonomy आहे.
03:00 ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट Introduction to Drupal ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल.
03:12 आपण आपला पहिला event node यशस्वीरित्या बनवला आहे.
03:17 आता Shortcuts आणि Add content वर क्लिक करा आणि यावेळी आपला User Group समाविष्ट करा.
03:27 आपण याला "Cincinnati User Group" संबोधू.
03:31 User Group Description फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”.


03:42 “We meet on the 3rd Thursday of every month”.
03:47 येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो.
03.51 या User Group साठी URL आहे: https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati.
04:03 आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल.
04:10 आपल्या परिसरातील User Group शोधण्यासाठी, groups dot drupal dot org वर जा.
04:16 नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा.
04:21 जगात अनेक User Groups आहेत.
04:25 Group Contact मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि Contact Email मधे टाईप करा: "drupalgroup@email.com".
04:38 लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड email address असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल.
04:46 येथील अनेक पर्यायांतून Group Level निवडा.
04:50 EVENTS SPONSORED मधे Event निवडावे लागेल.
04:55 आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल.
05:02 Save and Publish क्लिक करा.
05:05 आपण आपला पहिला User Group यशस्वीरित्या बनवला आहे.
05:09 आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ.
05:13 Content वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल.
05:19 Content type कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो.
05:25 आपण हे Publish status, Content type आणि Title द्वारे फिल्टर करू शकतो.
05:32 आपण येथे ‘W’ टाईप करून Filter, वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
05:41 Reset वर क्लिक करा.
05:43 आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो.
05:49 एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की Delete, make Sticky, Promote ,Publish इत्यादी.
06:04 आपण Unpublish content निवडू. Apply वर क्लिक करू.
06:09 लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स Unpublished मधे अपडेट झाले आहेत.
06:16 कंटेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे.
06:20 सर्व नोड्स परत एकदा निवडून Publish' आणि नंतर Apply वर क्लिक करा.
06:28 यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे.
06:35 आपण येथून कुठलेही नोड Edit किंवा Delete करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो.
06:44 ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे Content लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल.
06:54 वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या Comments आपण मॅनेज करू शकतो.
07:00 आणि कोणत्याही file फिल्ड मधे अपलोड केल्या गेलेल्या फाईलला सुध्दा मॅनेज करता येते.
07:05 इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल.
07:10 इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी Places लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे.
07:20 आपण Administration टूलबारमधे Content लिंक द्वारे Content, Comments आणि Files मॅनेज करू शकतो.
07:29 आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू.
07:33 मी ही कॉमेंट लिहित आहे- “Great Node! Fantastic content.”
07:39 Save वर क्लिक करा.
07:42 superuser म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही.
07:50 आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, Content आणि नंतर Comments वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील.
07:59 उदाहरणार्थ - comments प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा.
08:05 ड्रुपलमधे Content, Comments आणि Files ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते.
08:12 आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि Revisions कसे कार्य करते ते पाहू.
08:20 Home page वर येण्यासाठी Home लिंक वर क्लिक करा.
08:24 DrupalCamp Cincinnati मधे Quick edit वर क्लिक करा.
08:29 नोडच्या body मधे थोडे अधिक content लिहू “There is another great camp in Columbus every October.”
08:39 Save वर क्लिक करा.
08:41 आणि आता DrupalCamp Cincinnati वर क्लिक करा. आपल्याला Revisions नावाचा नवीन टॅब दिसेल.
08:49 Revisions वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की admin ने या नोडला 2:37 वाजता अपडेट केले आहे आणि हे Current revision आहे.
09:00 आधीचे वर्जनही उपलब्ध आहे.
09:03 यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे.
09:09 परत जाण्यासाठी Revisions वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला Revert किंवा Delete करू शकतो.
09:18 येथे अन्य Modules आहेत जी ही क्रिया सोपी बनवतात.
09:22 परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण version control आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा revert करू शकतो.
09:36 ड्रुपलमधील स्वतःचे version control खूपच उपयोगी आहे.
09:41 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
09:47 आपण या पाठात जाणून घेतलेः
  • contents बनवणे
  • contents मॅनेज करणे आणि
  • Revisions तयार करणे
10:06 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:16 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:23 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:45 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana