Git/C2/Inspection-and-Comparison-of-Git/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Inspection and comparison of Git वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत:
|
00:17 | या पाठासाठी वापरणार आहोत -
|
00:29 | तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता. |
00:33 | या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:40 | नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:46 | git diff कमांडपासून सुरूवात करू. |
00:50 | ही कमांड फाईलच्या सध्याच्या स्टेटसमधील बदल दाखवेल. |
00:55 | हे कसे कार्य करते हे पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा. |
01:03 | आपण बनवलेल्या mywebpage या Git रिपॉझिटरीमधे जाऊ. |
01:09 | टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा. |
01:15 | मी येथे html फाईल्सचाच उपयोग करणार आहे. |
01:20 | तुम्ही तुमच्या पसंतीचा फाईल प्रकार निवडू शकता. |
01:24 | हे समजून घेण्यासाठी history.html ही फाईल बनवून कमिट करून घेऊ. |
01:32 | टाईप करा:gedit space history.html space ampersand आणि एंटर दाबा. |
01:41 | आधीच सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंट मधून काही कोड कॉपी करून या फाईलमधे पेस्ट करू. |
01:48 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
01:51 | लक्षात ठेवा फाईल समाविष्ट करताना किंवा काढून टाकताना आपले काम कमिट करणे गरजेचे असते. |
01:58 | फाईल staging area मधे समाविष्ट करण्यासाठी टाईप करा: git space add space history.html आणि एंटर दाबा. |
02:08 | आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added history.html” आणि एंटर दाबा. |
02:21 | Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log आणि एंटर दाबा. |
02:28 | सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे दोन कमिट्स आहेत. |
02:33 | mypage.html आणि history.html या फाईल्स उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space history.html space ampersand |
02:47 | येथील mypage.html ही फाईल आपण मागील पाठात बनवली होती. आता एंटर दाबा. |
02:56 | या फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा. |
03:01 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
03:05 | काही वेळेला आपण फाईल्समधे काय बदल केले होते हे आपल्याला आठवत नाही. |
03:11 | Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा. |
03:19 | हे केवळ बदललेल्या फाईलची नावे दाखवते. परंतु इतर कुठलाही तपशील मिळत नाही. |
03:26 | या फाईल्समधे प्रत्यक्षात कोणते बदल केले आहेत हे जाणून घ्यायचे आहे. कसे ते पाहू. |
03:35 | टाईप करा:git space diff आणि एंटर दाबा. |
03:40 | ही कमांड फाईलची सध्याची स्थिती त्याच्या सर्वात नव्या कमिट सोबत तुलना करेल. |
03:46 | येथे history.html या फाईलची दोन वर्जन्स दिसतील. |
03:51 | a slash history.html हे मागील कमिट केलेले वर्जन आहे. आणि हे वजाच्या चिन्हाने दाखवले आहे. |
04:00 | b slash history.html हे चालू वर्जन आहे. आणि हे अधिकच्या चिन्हाने दाखवले आहे.
|
04:09 | म्हणजे वजाचे चिन्ह असलेली लाल रंगाची ओळ हे जुने वर्जन आहे. |
04:15 | आणि अधिकचे चिन्ह असलेली हिरव्या रंगाची ओळ हे नवे वर्जन आहे. |
04:20 | पुढील भाग बघण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा. |
04:23 | या नव्या वर्जनमधे समाविष्ट केलेल्या काही ओळी आहेत. |
04:28 | तसेच तुम्ही mypage.html फाईलमधील बदल बघू शकता. डाऊन ऍरोचे बटण दाबा. |
04:35 | बाहेर पडण्यासाठी q बटण दाबा. |
04:38 | येथे आऊटपुट रंगीत स्वरूपात दाखवले आहे. |
04:42 | जर रंगीत ओळी दिसत नसतील तर टाईप करा: git space config space hyphen hyphen global space color dot ui space true आणि एंटर दाबा. |
04:57 | जर रंगीत ओळी नको असतील तर या कमांडमधे true च्या जागी false वापरा. |
05:03 | टाईप करा git space diff आणि एंटर दाबा. आता रंग नसलेले आऊटपुट दाखवेल. |
05:13 | पुढे आपण विशिष्ट फाईलमधे केलेले बदल कसे बघायचे ते पाहू. |
05:18 | टाईप करा:git space diff space history.html आणि एंटर दाबा. |
05:25 | येथे केवळ history.html या फाईलमधे केलेले बदल बघू शकतो. |
05:31 | आता फाईल्स staging area मधे समाविष्ट करू. टाईप करा:git space add space history.html space mypage.html आणि एंटर दाबा. |
05:44 | पुन्हा Git diff तपासण्यासाठी git space diff टाईप करून एंटर दाबा. |
05:52 | यावेळी कुठलेही आऊटपुट मिळालेले नाही कारण फाईल्स staging area मधे समाविष्ट आहेत. |
05:59 | अशावेळी टाईप करा:git space diff space hyphen hyphen staged आणि एंटर दाबा. |
06:08 | आता तेच आऊटपुट मिळाले आहे जे git diff ही कमांड वापरून मिळाले होते. |
06:15 | हाच रिझल्ट मिळवण्यासाठी hyphen hyphen staged ऐवजी hyphen hyphen cached देखील वापरू शकतो. |
06:23 | फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना आधीच्या कुठल्याही कमिट सोबत कशी करता येईल? |
06:28 | प्रथम Git log पाहू. टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
06:38 | समजा फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना Initial commit सोबत करायची आहे. |
06:43 | त्यासाठी टाईप करा:git space diff space नंतर Initial commit चा commit hash कॉपी आणि पेस्ट करून एंटर दाबा. |
06:52 | येथे फरक बघू शकतो. |
06:55 | अशाप्रकारे रिपॉझिटरीमधील मागील कुठल्याही कमिट सोबत फाईलच्या सध्याच्या स्थितीशी तुलना करता येते. |
07:02 | अशा प्रकारे git diff कमांड वापरून बदल केलेल्या फाईल्समधील सर्व बदल पाहू शकतो. |
07:09 | कमिट करण्यापूर्वी आपण नेमके काय बदल केले आहेत ते यामुळे कळू शकते. |
07:15 | या ठिकाणी आपला कोड freeze करू. |
07:19 | कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added colors” आणि एंटर दाबा. |
07:30 | दोन कमिटस मधला फरक कसा बघायचा हे जाणून घेऊ. |
07:35 | Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
07:44 | टाईप करा:git space diff space नंतर “Initial commit” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. आता space देऊन “Added colors” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
07:58 | दिलेल्या दोन कमिटस मधील फरक दिसेल. |
08:03 | पुढे आपण शेवटची रिविजन आणि शेवटून दुसरी रिविजन यांची तुलना करणार आहोत. |
08:08 | टाईप करा:git space diff space HEAD space HEAD tilde आणि एंटर दाबा. |
08:16 | HEAD हे शेवटची रिविजन दाखवते ज्याचा “Added colors” हा कमिट मेसेज आहे. |
08:22 | HEAD tilde हे शेवटून दुसरी रिविजन दाखवते ज्याचा “Added history.html” हा कमिट मेसेज आहे. |
08:30 | शेवटची रिविजन नेहेमीच HEAD असते. सर्वात शेवटची रिविजन वजा 1 नेहमीच HEAD tilde असते. |
08:39 | अशाच प्रकारे सर्वात शेवटची रिविजन वजा 2 म्हणजे HEAD tilde 2 सर्वात शेवटची रिविजन वजा 3 म्हणजे HEAD tilde 3 इत्यादी. |
08:50 | टर्मिनलवर परत जाऊ. |
08:53 | आता git show कमांड बद्दल जाणून घेऊ जे कमिटचा संपूर्ण तपशील दाखवेल. |
09:00 | टाईप करा:git space show आणि एंटर दाबा. |
09:04 | हे रिपॉझिटरी मधील सर्वात शेवटच्या कमिटचा तपशील दाखवेल. |
09:10 | यात फाईल्समधे केलेले बदल कमिटच्या तपशीलासहित आपल्याला दिसतील. |
09:16 | हे फीचर एकत्र काम करताना आपल्याला उपयोगी होते. |
09:20 | आता Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
09:30 | Initial commit चा तपशील बघण्यासाठी टाईप करा:git space show space. नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
09:42 | येथे Initial commit चा तपशील बघू शकतो. |
09:46 | अशाप्रकारे आपल्या रिपॉझिटरीमधील कुठल्याही कमिटचा तपशील बघू शकतो. |
09:51 | पुढे फाईलची संपूर्ण हिस्ट्री कशी बघायची हे जाणून घेऊ. |
09:56 | mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघण्यासाठी टाईप करा:git space blame space mypage.html आणि एंटर दाबा. |
10:07 | येथे mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघता येते. म्हणजेच फाईल तयार करण्यापासून त्याच्या सध्याच्या स्थितीपर्यंत. |
10:17 | अशाप्रकारे रिपॉझिटरी मधील कुठल्याही फाईलचा संपूर्ण तपशील बघू शकतो. |
10:22 | शेवटी Git मधून मदत कशी मिळवायची ते पाहू. |
10:27 | मदत मिळवायचा सिंटॅक्स असा आहे-
git help <verb> किंवा git <verb> hyphen hyphen help किंवा man git <verb> |
10:40 | उदाहरणार्थ: git help show. |
10:44 | हे वापरून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space help space show आणि एंटर दाबा. |
10:55 | येथे show कमांडचे मॅन्युअल पाहू शकतो. |
10:59 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:03 | थोडक्यात, |
11:04 | आपण या पाठात शिकलो:
|
11:15 | असाईनमेंट म्हणून या कमांडस वापरून पहा:
|
11:29 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:48 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:55 | या मिशन संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:00 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |