PERL/C3/Including-files-or-modules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | PERL प्रोग्रॅम मधील Including files or modules वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकणार आहोत:
|
00:16 | ह्या ट्यूटोरियल साठी मी वापरत आहे:
|
00:28 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:32 | हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:37 | नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा. |
00:44 | do() मेथड: हे वर्तमान स्क्रिप्ट फाइलमध्ये इतर फाइल्समधून सोर्स कोडला समाविष्ट करणे सोपे मार्ग आहेत. |
00:53 | आपण समजून घेऊ की do() मेथड कसे वापरावे. |
00:57 | तुमच्या टेक्स्ट एडिटरमध्ये नवीन फाईल उघडून त्याला datetime dot pl म्हणून नाव द्या. |
01:03 | datetime dot pl फाईलमध्ये, स्क्रीन वर दाखवल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
01:09 | आता यापुढे टर्मिनलवर प्रत्येक कमांड नंतर एंटर की दाबणे लक्षात ठेवा. |
01:15 | आता कोड समजून घेऊ. |
01:18 | वर्तमान डेट आणि टाइम dollar datestring व्हेरिएबल मध्ये संचित केले जाते. |
01:23 | येथे, माझ्याकडे "msgThanks" नावाचा एक फंक्शन आहे जो एक “Thank you” मेसेज रिटर्न करतो. |
01:31 | आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
01:35 | पुढे, आपण आणखी एक पर्ल प्रोग्रॅम पाहू जे datetime dot pl ह्या फाईलचा उपयोग करेल. |
01:43 | तुमच्या टेक्स्टएडिटर मध्ये एक नवीन फाईल उघडून त्याला main dot pl नाव द्या. |
01:49 | main dot pl फाईल मध्ये, स्क्रीन वर दाखवल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
01:55 | आता मी कोड समजावते. |
01:58 | येथे पहिली ओळ वेलकम मेसेज प्रिंट करते. |
02:03 | do() मेथड त्या फाईलच्या नवासह कॉल होते जेथून आपल्याला कोडचा वापर करायचा आहे. |
02:09 | वर्तमान डेट आणि टाइम datetime dot pl फाईलच्या $datestring व्हेरिएबल मध्ये संचित केले जाते. |
02:16 | आणि शेवटी, आपण msgThanks() फंक्शनला त्याच फाईल मधून कॉल करतो. |
02:21 | आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
02:25 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:27 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा: perl main dot pl आणि एंटर दाबा. |
02:34 | टर्मिनलवर आऊटपुट बघा. |
02:37 | पुढे, आपण शिकुया की Perl प्रोग्रॅममध्ये require() मेथड आणि use() मेथड कसे वापरणे. |
02:44 | हे मेथड्स तेव्हा वापरले जातात जेव्हा आमच्याकडे सबरुटीन्सचा संग्रह असतो जे अनेक पेर्ल प्रोग्रॅम्स्मध्ये वापरले जाऊ शकते. |
02:52 | use() मेथड फक्त मॉड्यूल्ससाठी वापरले जाते. |
02:56 | ते कंपाइलेशनच्या वेळी सत्यापित होतात. |
02:59 | फाईल एक्सटेंशन देण्याची काही गरज नाही. |
03:03 | require() मेथड पेर्ल प्रोग्रॅम्स् आणि मॉड्यूल्स दोन्ही साठी वापरले जाते. |
03:08 | ते रन टाइमच्या वेळी सत्यापित होतात. |
03:10 | फाईल एक्सटेंशन देण्याची गरज आहे. |
03:14 | use() मेथडचा सिंटॅक्स आहे: use module name सेमिकॉलन |
03:20 | Perl modules त्या फाइल्स आहेत ज्या '.pm' एक्सटेंशनने समाप्त होतात. |
03:25 | कोड पुन: वापरण्याकरिता मॉड्यूल्सशी कार्यान्वित केले जाते. |
03:30 | इतर भाषांमध्ये हे libraries च्या समान आहेत. |
03:35 | आता, मी पर्ल कोडमध्ये एक मॉड्युल समाविष्ट करण्यासाठी use मेथड सह एक साधा प्रोग्रॅम दाखवेल. |
03:43 | तुमच्या टेक्स्ट एडिटर मध्ये एक नवीन फाईल उघडून त्याला sum dot pm नाव द्या. |
03:49 | sum dot pm फाईलमध्ये, स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
03:55 | येथे, माझ्याकडे एक साधा फंक्शन आहे जो दिलेल्या संख्याच्या संचाची बेरीज करेल. |
04:01 | आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
04:05 | आपण आणखी एक पर्ल स्क्रिप्ट लिहूया जेथे आपण ही sum dot pm फाईल वापरूया. |
04:11 | मी एक सॅंपल प्रोग्रॅम app dot pl फाईल उघडते जे मी आधीच सेव्ह केले आहे. |
04:17 | app dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
04:22 | आता मी कोड स्पष्ट करते. |
04:25 | पहिली ओळ मॉड्यूल नेम सह use मेथड दाखवते. |
04:29 | आमच्या बाबतीत, मॉड्युलचे नाव 'sum' आहे. |
04:33 | आम्ही sum dot pm फाईलमध्ये total() फंक्शन वर इनपुट पॅरमीटर्स 1, 7, 5, 4,9 पास करत आहोत. |
04:44 | पुन्हा एकदा, पुढील ओळीत, आपण त्याच फंक्शनवर 1 ते 10 पर्यंत इनपुट पॅरमीटर्स पास करत आहोत. |
04:52, | आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
04:56 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04:59 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा: perl app dot pl आणि एंटर दाबा. |
05:06 | टर्मिनल वर दर्शविलेले आऊटपुट बघा. |
05:10 | आपण use method मध्ये काही आणखी पर्याय पाहू. टेक्स्ट एडिटर मधील sum dot pm वर परत जा. |
05:18 | सोर्स कोडच्या सुरवातीला, ओळींना जोडा "use strict" सेमिकॉलन, "use warnings" सेमिकॉलन. |
05:27 | "use strict" आणि "use warnings" कंपाइलर फ्लॅग्स आहेत जे पर्लला अश्या सक्त प्रकारे वर्तन करण्यास सूचना देते. |
05:35 | हे सामन्य प्रोग्रँमिंगच्या चुका टाळण्यासाठी वापरले जातात. |
05:39 | use strict प्रोग्रॅममध्ये वापरलेले सर्व व्हरीएबल्सना घोषित करण्यासाठी यूज़रला फोर्स करतो. |
05:45 | जर एरर्स असेल तर use strict कार्यान्वित करणे इथेच बंद होईल. |
05:50 | use warnings फक्त वॉर्निंग देईल पण कार्यान्वित करणे सुरू राहील. |
05:56 | गृहीत धरुया की my म्हणून व्हेरिएबल $sum घोषित करणे विसरलात. |
06:02 | आता पाहू की समान प्रोग्रॅम कार्यान्वित कसे करतात. |
06:06 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
06:09 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा: perl app dot pl. |
06:15 | आपण पाहू शकतो की परिणाम कार्यान्वित न करता प्रोग्रॅम बंद झाले आहे. |
06:21 | टर्मिनल वर प्रदर्शित ओळींचा पहिला संच “use strict” द्वारा निर्माण झालेले error messages आहेत. |
06:29 | शेवटचे दोन abort मेसेजेस आहेत. |
06:32 | तर, ह्या प्रकारे use method पर्याय कार्य करतो. |
06:36 | पुढे, आता आपण एक पर्ल प्रोग्रॅम पाहू जेथे आपण require मेथड वापरु. |
06:41 | आता मी एक सॅंपल प्रोग्रॅम commonfunctions dot pl उघडते जी मी अगोदरच सेव्ह केली आहे. |
06:48 | तुमच्या commonfunctions dot pl फाईल मध्ये स्क्रीन वर प्रदर्शित म्हणून निम्न कोड टाईप करा. आता कोड समजून घेऊ. |
06:57 | येथे, आपण सामान्यतः वापरलेल्या फंक्शनस्चे संग्रह पाहू शकता. |
07:01 | पहिला फंक्शन square(), संख्येचा वर्ग(स्क्वेर) रिटर्न करतो. |
07:06 | दुसरा फंक्शन square underscore root(), दिलेल्या संख्येचा वर्गमूळ(स्क्वेर रूट) रिटर्न करतो. |
07:12 | पुढील फंक्शन random underscore number() एक यादृच्छिक संख्या निर्माण करते. |
07:18 | संख्यांची लोवर रेंज आणि वरील रेंजच्या दरम्यान एक यादृच्छिक संख्या निर्माण करते. |
07:26 | लक्षात ठेवा की आपल्याला फाईलच्या शेवटी 1 सेमिकॉलनची गरज आहे. |
07:31 | हे अश्यासाठी आहे कारण पर्लला ट्रू वॅल्यू रिटर्न करण्यास फाईल मध्ये शेवटच्या एक्सप्रेशनची गरज आहे. |
07:37 | आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
07:41 | पुढे, आपण एक पर्ल प्रोग्रॅम लिहू ज्याच्यात आपण require मेथड वापरुन ह्या सबरुटीन्स कॉल करूया. |
07:48 | आता मी तो सॅंपल प्रोग्रॅम call program dot pl उघडते जो मी आधीच सेव्ह केला आहे. |
07:54 | आपल्या फाईल मध्ये स्क्रीनवर प्रदर्शित निम्न कोड टाईप करा. आता मी कोड समजावते. |
08:02 | require पर्ल कोड असलेला commonfunctions dot pl फाईल वाचतो आणि ह्याला कंपाइल करतो. |
08:09 | हा प्रोग्रॅम वापरकर्त्याला 4 पर्याय देते. वापरकर्त्याला एका वेळी एक पर्याय निवडायचा आहे. |
08:17 | 1: संख्याचा वर्ग शोधण्यसाठी आहे. |
08:20 | 2: संख्याचा वर्गमूळसाठी आहे. |
08:23 | 3: दिलेल्या रेंज मध्ये रॅंडम(यादृच्छिक)संख्यासाठी आहे. 4: प्रोग्रॅम सोडण्यासाठी आहे. |
08:29 | जर पर्याय 1 टाईप केलेला असेल तर तो वापरकर्त्याशी एक नंबर प्रविष्ट करण्यासाठी विचारेल. |
08:34 | वॅल्यू $number मध्ये संचयित होते. वॅल्यू commonfunctions dot pl फाईल मध्ये square() फंक्शन वर पास केली जाते. |
08:44 | फंक्शन संख्याचा वर्ग रिटर्न करतो. |
08:47 | प्रिंट स्टेट्मेंट आउटपुट म्हणून संख्याचा वर्ग प्रिंट करतो. |
08:52 | जर पर्याय 2 टाईप केला असेल तर आउटपुट मध्ये संख्याचा वर्गमूळ प्रदर्शित होतो. |
08:58 | आधीचे फंक्शन square() मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे खालील कार्यान्वित करणे. |
09:03 | जर पर्याय 3 टाईप केला असेल तर दिलेल्या रेंज मध्ये आउटपुट म्हणून एक यादृच्छिक संख्या दाखवतो. |
09:09 | अन्यथा, जर पर्याय 4 असेल तर प्रोग्रॅम एक्जिट् होतो. जर दिलेल्या पर्यायच्या एवजी कोणत्याही इतर पर्याय निर्दिष्ट होतो तर प्रिंट स्टेट्मेंट दाखवतो “Incorrect option”. |
09:20 | लक्ष्य द्या ह्या प्रोग्रॅम मध्ये आम्ही, commonfunctions dot pl मधून चार मधून फक्त तीन फंक्शन्स कॉल केले आहेत. |
09:28 | आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
09:31 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
09:34 | टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा: perl callprogram dot pl. |
09:41 | आउटपुट बघा. |
09:44 | मी पुन्हा एकदा वेगळ्या पर्याय सह प्रोग्रॅम कार्यान्वित करेल. |
09:49 | टाईप करा: perl callprogram dot pl. |
09:53 | आता, पर्याय मध्ये प्रविष्ट करा 3. |
09:56 | लोअर रेंज मध्ये प्रविष्ट करा 50. |
09:59 | अपर रेंज मध्ये प्रविष्ट करा 99. |
10:02 | आपण पाहू शकतो की संख्याच्या दिलेल्या रेंज मध्ये रॅंडम (यादृच्छिक) संख्या लिहिले जाते. |
10:08 | स्वत: हून इतर पर्यायांना वापरुन पहा. |
10:11 | आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात |
10:16 | या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकलो:
|
10:24 | नोट: "require" मॉड्यूलच्या जागी "use" मॉड्यूलची सल्ला दिली जाते, कारण की हे संकलनाच्या वेळी मॉड्यूलची उपलब्धता निर्धरित करते. |
10:33 | येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. एक पर्ल प्रोग्रॅम reminder.pl लिहा, जेथे तुम्ही सहभागांना एक लेटर लिहाल. |
10:41 | वापरकर्त्याला To आणि From नेम प्रविष्ट करण्यासाठी सांगा. |
10:45 | ‘use’ मेथड वापरुन Letter dot pm मधून सबरुटीन्स कॉल करा. |
10:50 | Letter dot pm फाईल मध्ये खालील फंक्शन्स लिहा. |
10:54 | LetterDate() फंक्शन वर्तमान डेट आणि टाइम रिटर्न करतो. |
10:58 | To() फंक्शन सहभागांचे नाव रिटर्न करतो. |
11:02 | From() फंक्शन पाठवणार्याचे नाव रिटर्न करतो. |
11:05 | Lettermsg() फंक्शन पत्राची सामुग्री रिटर्न करतो. |
11:09 | Thanksmsg() फंक्शन "thanks" आणि "regards" रिटर्न करतो. |
11:13 | येथे दाखवल्याप्रमाणे आउटपुट दिसले पाहिजे. |
11:20 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
11:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
|
11:36 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
11:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:51 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |