PERL/C3/File-Handling/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | File Handling in PERL वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत कसे -
रीड मोडमध्ये फाईल उघडणे फाईलमध्ये लिहीणे अपेंड मोडमध्ये फाईल उघडणे फाईल हॅंडल बंद करणे. |
00:17 | या पाठासाठी मी वापरणार आहे,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर |
00:28 | तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:32 | तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:37 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | पर्ल मध्ये फाइल्ससाठी मूलभूत ऑपरेशन्स करू शकतो जसे:
फाईल उघडणे फाईल मधून वाचणे फाईलमध्ये लिहीणे आणि फाईल बंद करणे. |
00:54 | डिफॉल्ट फाईल हॅंडल्स जसे
|
01:02 | open फंक्शनसाठी हा सिंटॅक्स आहे. |
01:05 | सिंटॅक्स मध्ये, FILEHANDLE हे फाइल हॅंडल कडून परतलेले open फंक्शन आहे. |
01:11 | MODE हे फाइल उघडण्याचे मोड प्रतिनिधित्व करतो. उदा: वाचणे, लिहीणे, इत्यादी. |
01:18 | EXPR हे एक भौतिक फाईलचे नाव आहे जे वाचण्यास आणि लिहिण्यास वापरले जाते. ह्या केस मध्ये, “First.txt” हे फाईलचे नाव आहे. |
01:27 | येथे दर्शवल्या प्रमाणे open फंक्शन लिहिण्यास आणखी एक मार्ग आहे. |
01:32 | अस्तित्वतिल फाईल कसे उघडण्यास आणि त्यातून डेटा कसे वचणे हे समजून घेऊ. |
01:38 | प्रथम आपण टेक्स्ट फाईल तयार करून त्यामध्ये काही डेटा संचित करू. टर्मिनल वर जाऊन टाईप करा
gedit first.txt आणि एंटर दाबा. |
01:51 | first dot txt फाईल मध्ये, खालील टेक्स्ट टाईप करा: |
01:55 | फाईल सेव्ह करून gedit बंद करा. |
01:59 | आता आपण पर्ल प्रोग्रॅम कडे पाहू जे first.txt फाईल उघडून त्यातले कॉंटेंट वचेल. |
02:07 | मी एक सॅंपल प्रोग्रॅम openfile.pl उघडते जे मी आधीच सेव्ह केले होते. |
02:13 | टाईप करा gedit openfile dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
02:19 | openfile dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
|
02:25 | आता आपण कोड समजून घेऊ. |
02:28 | open फंक्शन वाचण्यासाठी फाईल उघडते.
|
02:33 | पहिला पॅरमीटर DATA हे एक फाईल हॅंडल आहे जे भविष्यात पर्ल फाईलला संदर्भित करण्यास अनुमती देतो.
|
02:40 | दुसरा पॅरमीटर “<” लेस द्यान चिन्ह READ मोड दर्शवतो.
|
02:44 | जर मोडला निर्दिष्ट करण्यात अयशस्वी झालात, तर डिफॉल्ट रूपात फाईल “READ” मोडमध्ये उघडते. |
02:50 | तिसरा पॅरमीटर first.txt हे फाईलचे नाव आहे जेथून डेटा वाचला जातो. |
02:57 | first.txt फाईल अस्तित्वात नसेल, तर काय होईल? |
03:02 | dollar exclamation ($!) व्हेरिएबल मधील संग्रहित असलेल्या योग्य एरर मेसेज सह स्क्रिप्ट die(डाइ)/ होईल. |
03:08 | While लूप कोडचे ओळी दर ओळी वाचतो आणि फाईलचा DATA शेवटच्या सर्व ओळी वाचे पर्यंत लूप करतो. |
03:17 | Print dollar underscore ($_) व्हेरिएबल सध्याच्या ओळीचे कॉंटेंट्स प्रिंट करेल. |
03:22 | शेवटचे, FILEHANDLE नवासह फाईल बंद करा, जी आम्ही open स्टेट्मेंट मध्ये दिली होती.
|
03:29 | फाईल बंद करणे म्हणजे उपघती फाईल आणि कॉंटेंटचा ओवररायटिंग प्रतिबंधित करतो. |
03:36 | आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
03:40 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:42 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl openfile dot pl आणि एंटर दाबा. |
03:51 | दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे. |
03:54 | हा तोच कॉंटेंट आहे जे आपण पुर्वी first dot txt फाईलमध्ये पाहिले होते. |
03:59 | पुढे आपण पाहू फाईलमध्ये डेटा कसे लिहीणे. |
04:03 | open स्टेट्मेंट ग्रेटर दॅन (>) चिन्हा सह WRITE मोडला परीभाषित करतो. |
04:08 | Filename फाईलचे नाव प्रतिनिधित्व करतो जेथे डेटा लिहायचा आहे. |
04:13 | मी एक सॅंपल प्रोग्रॅम writefile.pl उघडते, जे मी आधीच सेव्ह केले होते. |
04:19 | टर्मिनल वर जा. |
04:21 | आता, टाईप करा gedit writefile dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
04:29 | writefile dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
04:34 | आता मी कोड स्पष्ट करते. |
04:37 | open फंक्शन, second.txt फाईलला write मोड मध्ये उघडते. |
04:44 | “>” ग्रेटर दॅन चिन्ह फाईलच्या नवा आधी write मोड दाखवतो. |
04:49 | पहिला पॅरमीटर FILE1 हे FILEHANDLE आहे. |
04:53 | print फंक्शन, FILEHANDLE ला दिलेला टेक्स्ट जे की FILE1 ला प्रिंट करतो. |
04:59 | आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
05:03 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
05:05 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा. |
05:12 | आता second.txt फाईलमध्ये टेक्स्ट लिहिले गेले आहे का हे तपासू. |
05:18 | टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा. |
05:23 | आपण Working with files makes data storage and retrieval a simple task! टेक्स्ट आपल्या second.txt फाईलमध्ये पाहू शकतो.
|
05:32 | second.txt फाईल बंद करू. |
05:35 | आपण तीच फाइल write मोड मध्ये पुन्हा उघडतो, तर काय होईल? आपण ते पाहू या. |
05:41 | writefile.pl मध्ये, आधीच्या print स्टेट्मेंटला कॉमेंट करा. |
05:46 | खालील print कमांड जोडा. |
05:48 | आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
05:54 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा. |
06:00 | आता पुन्हा एकदा second.txt फाईल तपासू. |
06:04 | टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा. |
06:09 | आपण आउटपुट पाहू शकतो की Greater than symbol (>) फाईलच्या कॉंटेंटला पुनर्लिखित करतो. |
06:14 | आधीचा second.txt फाईलचा कॉंटेंट पुनर्लिखित केलेला आहे. |
06:19 | कारण हे आहे की आपण फाईलला write मोड मध्ये पुन्हा उघडले होते. |
06:24 | आपण second.txt फाईल बंद करू. |
06:27 | पुढे, आपण पाहू की अस्तित्वतिल फाईलमधील डेटा कसे जोडणे. |
06:32 | open स्टेट्मेंट दोन greater than (>> ) चिन्हा सह APPEND मोड दाखवतो.
|
06:38 | आता मी gedit मध्ये पुन्हा writefile dot pl उघडेल. |
06:44 | open स्टेट्मेंट मध्ये, दोन greater (>>) than चिन्ह टाईप करा. हे दर्शवते की ही फाईल append मोड मध्ये आहे. |
06:52 | आधीच्या प्रिंट स्टेट्मेंटला कॉमेंट करा जे कार्यान्वित केले होते. |
06:57 | ही ओळ जोडा print FILE1 डबल कोट्स मध्ये Two greater than symbols >> opens the file in append mode अस्तित्वातील डेटाला जोडणे.
|
07:07 | फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
07:11 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
07:14 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा. |
07:20 | आता टेक्स्ट second.txt फाईलमध्ये जोडले गेले आहे का ते तपासू. |
07:26 | टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा. |
07:31 | आपण पाहू शकतो टेक्स्ट आपल्या second.txt फाईलमध्ये जोडले गेले आहे. |
07:36 | second.txt फाईल बंद करू. |
07:39 | तसेच, इतर मोड्स देखील आहेत. |
07:42 | तुम्ही स्वतः हे पर्याय वापरुन पहा आणि काय होते ते जाणून घ्या. |
07:49 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
07:53 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: कसे
रीड मोडमध्ये फाईल उघडणे फाईलमध्ये लिहीणे अपेंड मोडमध्ये फाईल उघडणे फाईल हॅंडल बंद करणे. |
08:03 | येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे.
writefile.pl प्रोग्रॅम मध्ये फाईल आट्रिब्यूटला +> (plus greater than) मध्ये बदला. |
08:11 | सेव्ह करून प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
08:14 | आउटपुट पाहण्यास second.txt फाईल उघडा. |
08:17 | फाईल आट्रिब्यूट +> चिन्हाच्या वापराला विश्लेषण करा. |
08:22 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
08:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
|
08:37 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
08:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
08:48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:53 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |