PERL/C3/Referencing-and-Dereferencing/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:21, 5 February 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Referencing and De-referencing in Perl वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
  • स्केलर रेफरेन्सेस
  • अरे रेफरेन्सेस
  • हॅश रेफरेन्सेस
  • डि-रेफरेन्सेस आणि
  • अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
00:22 या पाठासाठी मी वापरणार आहे,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 gedit हा टेक्स्ट एडिटर

00:33 तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:37 तुम्हाला,
  • पर्ल प्रोग्रँमिंग
  • अरे फंकशन्स आणि
  • हॅश फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:43 नसल्यास संबंधित पर्ल पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:49 References म्हणजे काय?
00:51 एक व्हेरिएबल, अरे, हॅश किंवा सबरुटीनसाठी रेफरेन्स पॉइंटर किंवा अड्रेस आहे.
00:58 ते थेट डेटा समाविष्ट करत नाहीत.
01:01 रेफरेन्स हा सोपा, संक्षिप्त स्केलर वॅल्यू आहे.
01:05 जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा स्ट्रक्चर्स पास किंवा रीटर्न करणार तेव्हा रेफरेन्स पर्लच्या कमगिरीमध्ये सुधारणा करेल.
01:12 हे मेमरी सेव्ह करते कारण की वॅल्यूच्या एवजी सबरुटीनला रेफरेन्स पास केले जाते.
01:18 क्लिष्ट पर्ल डेटा स्ट्रक्चर्स व्यवस्थापित करण्यासाठी सोपे आहे.
01:22 आपण रेफरेन्स कसे तयार करणे हे शिकू.
01:25 आपण त्याच्या समोर एक backslash (\) ठेवल्याने कोणताही व्हेरिएबल, सबरुटीन किंवा वॅल्यू साठी एक रेफरेन्स तयार करू शकतो.
01:33 येथे दर्शवल्या प्रमाणे स्केलर व्हेरिएबल हे backslash आणि dollar sign($) द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:39 अरे व्हेरिएबल हे backslash आणि at the rate(@) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:45 येथे उदाहरणात दाखवल्या प्रमाणे हॅश व्हेरिएबल हे backslash आणि percentage(%) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:53 dereference म्हणजे काय?
01:55 जेव्हा reference dereferenced केले जाते, तेव्हा प्रत्यक्ष वॅल्यू रिटर्न होते.
02:00 एक रेफरेन्स व्हेरिएबलला महिरपी कंसात ठेवल्यास तो Dereference बनतो.
02:06 डाव्या महिरपी कॅंसाच्या आधी कॅरक्टर सह जो reference चा प्रकार आहे तो दर्शवितो.
02:12 आपण व्हेरिएबल्सना dereference कसे करू.
02:16 स्केलर व्हेरिएबल हे dollar sign ($) आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:21 अरे व्हेरिएबल हे at the rate (@) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:27 हॅश व्हेरिएबल हे percentage(%) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:33 आपण Scalar reference आणि dereference साठी एक साधा प्रोग्राम पाहू.
02:38 मी gedit टेक्स्ट एडिटर मध्ये एक सॅंपल प्रोग्राम उघडते.
02:43 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit scalarRef dot pl ampersand आणि एंटर दाबा.
02:50 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
02:55 मी कोड स्पष्ट करते.
02:57 पहिली ओळ scalar variable $a घोषित करते आणि त्याला 10 ही वॅल्यू इनिशियलाइज़्ड केले.
03:03 आधी सांगितल्याप्रमाणे, scalar variable हे backslash आणि dollar sign ($) द्वारे रेफरेन्स केले जाते.
03:10 ही ओळ व्हेरिएबलची मेमरी अड्रेस प्रिंट करते जी रेफरेन्स म्हणून तयार केली आहे.
03:16 प्रत्यक्ष वॅल्यू प्रिंट करण्यास, व्हेरिएबल हे $ च्या अगोदर महिरपी कॅंसा द्वारे dereference केले जाते.
03:23 येथे ref() फंकशन हे रेफरेन्स टाईप रिटर्न करेल जसे की स्केलर किंवा अरे किंवा हॅश.
03:30 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
03:34 प्रोग्राम कार्यान्वित करू.
03:36 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl scalarRef dot pl आणि एंटर दाबा.
03:43 दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
03:46 पहिली ओळ मेमरी अड्रेस दाखवते जेथे 10 ही वॅल्यू संग्रहीत आहे.
03:51 दुसरी ओळ प्रत्यक्ष वॅल्यू 10 रिटर्न करेल.
03:55 Ref() फंकशन Scalar हे आउटपुट रिटर्न करेल.
03:59 पुढे, आपण एक सॅंपल प्रोग्राम वपरून reference आणि dereference अरे कसे तयार करणे हे जाणून घेऊ.
04:07 माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
04:13 टर्मिनल मध्ये, टाईप करा gedit arrayRef dot pl ampersand आणि एंटर दाबा.
04:20 arrayRef dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
04:26 आता मी कोड स्पष्ट करते.
04:28 येथे पहिल्या ओळीत, मी एक अरे @color घोषित केले आणि त्याला तीन वॅल्यूज सह इनिशीयलाइज़ केले.
04:35 हे backslash @color सह reference केले आहे जे array name आहे आणि $colorRef ला असाइन केले आहे.
04:42 प्रिंट स्टेट्मेंट हे reference आणि dereferenced वॅल्यू प्रिंट करेल.
04:47 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:51 प्रोग्राम कार्यान्वित करा.
04:53 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि एंटर दाबा.
05:00 येथे दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
05:04 पहिली ओळ रेफरेन्स म्हणून तयार केलेली व्हेरिएबलची मेमरी अड्रेसच्या आउटपुटला दाखवते.
05:10 दुसरी ओळ dereferenced केलेल्या प्रत्यक्ष वॅल्यूला दाखवते.
05:16 पुढे, आपण अरे साठी direct reference घोषित कसे करणे हे पाहू.
05:21 आपल्या प्रोग्रामवर परत येऊ.
05:24 मी अरे साठी direct reference दाखवण्यास अस्तित्वातील प्रोग्राम बदलला आहे.
05:29 तुम्ही दाखवल्याप्रमाणे चौकटी कंस [] वापरुन अरे साठी direct reference तयार करू शकता.
05:35 dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा.
05:39 प्रिंट स्टेट्मेंट आउटपुट म्हणून Green प्रिंट करेल.
05:43 येथे आपल्या प्रोग्राममध्ये प्रिंट स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [1]. जे Green ते घेतो.
05:50 फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
05:54 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
06:03 मी त्याच कोड फाईल मध्ये डाइरेक्ट हॅश रेफरेन्स कसे वापरावे, एक उदाहरण दाखवेल.

आपण gedit वर जाऊ.

06:11 येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही महिरपी कंस {} वापरुन हॅश साठी direct reference तयार करू शकता.
06:18 ह्याला dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा. “Name” हे हॅश की आहे.
06:24 ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित केल्यास, दोन्ही प्रिंट स्टेट्मेंट्स आउटपुट म्हणून Sunil प्रिंट करेल.
06:31 पुढे, आपण पाहू सॅंपल प्रोग्राम सह array reference च्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
06:39 माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
06:45 टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit arrayRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा.
06:54 gedit मध्ये arrayRefadd.pl फाईल उघडली आहे. येथे तुमच्या फाईल मध्ये दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
07:02 पहिली ओळ अरेला इनिशीयलाइज़ करते.
07:06 आपण backslash @numarray सह array reference केले आणि $ref ला असाइन केले.
07:13 आता, आपण पाहू array reference मधून एक विशिष्ट एलिमेंट एक्सेस कसे करणे.
07:19 एक विशिष्ट वॅल्यू एक्सेस करण्यास चौकटी कंसात “[ ]” अरे इंडेक्स वापरणे आवश्यक आहे. आणि dereference करण्यास एक एरो ऑपरेटर (->) वापरा.
07:28 print स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [0] प्रिंट करेल.
07:32 Push फंक्शन हे एक array reference च्या शेवटच्या स्थानावर घटक जोडते.

आपल्या बाबतीत 5,6,7 अस्तित्वतिल असलेल्या अरे 1,2,3,4 च्या शेवटटी जोडले जाते.

07:47 हे print स्टेट्मेंट array reference ला जोडल्या नंतर आउटपुट दाखवते.
07:53 Pop function array reference शेवटच्या स्थिती मधून एलिमेंटला काढून टाकते.
07:58 आपल्य उदाहरणात, अस्तित्वतिल असलेल्या array reference मधून 7 ला काढून टाकते.
08:03 print स्टेट्मेंट array reference मधून काढून टकल्या नंतर आउटपुट दाखवते.
08:08 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
08:11 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08:14 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRefadd dot pl आणि एंटर दाबा.
08:22 दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
08:26 आता आपण आणखी एक सॅंपल प्रोग्राम जिथे hash reference च्या एलिमेंट्स ला जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे पाहू.
08:34 टर्मिनल वर टाईप करा gedit hashRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा.
08:42 हे gedit मध्ये hashRefadd.pl फाईल उघडेल.
08:47 मी सॅंपल प्रोग्राम स्पष्ट करते.
08:50 मी एक direct hash reference घोषित केले आहे जे स्केलर व्हेरिएबल $weektemp मध्ये संचित केले जाऊ शकते.
08:57 हॅश रेफरेन्सला प्रतिनिधित्व करण्यास महिरपी कंस आणि dereference ला प्रतिनिधित्व करण्यास एरो ऑपरेटर वापरले आहे.
09:04 हा कोड सोमवार ते शुक्रवार पर्यन्त तपमानाचे मूल्ये संचित करतो.
09:09 मी हॅशच्या किजला लूप करण्यास “keys” built-in function वापरत आहे.
09:15 हॅशच्या प्रत्येक एलिमेंट ला print स्टेट्मेंट प्रिंट करतो.
09:19 येथे दाखवल्या प्रमाणे एलिमेंटचे विशिष्ट मूल्य एक्सेस करू शकतो.
09:25 print स्टेट्मेंट सोमवारच्या तापमनाला प्रिंट करतो.
09:29 आता, फाईल सेव्ह करा.
09:32 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl hashRefadd dot pl आणि आउटपुट पाहण्यासाठी एंटर दाबा.
09:41 हॅश किज आणि हॅश वॅल्यूज यादृच्छिक क्रमाने संचित केले जातात.
09:46 प्रदर्शित आउटपुट जे आधी जोडलेले होते त्या प्रमाणे नाहीत.
09:52 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:57 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
  • स्केलर रेफरेन्सेस
  • अरे रेफरेन्सेस
  • हॅश रेफरेन्सेस
  • डि-रेफरेन्सेस आणि
  • अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
10:14 येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. आपल्या hashRefadd dot pl file मध्ये नवीन किज हॅश weektemp च्या आत Saturday आणि Sunday जोडा.
10:24 शेवटी Saturday की काढून टाका.
10:27 हॅश weektemp प्रिंट करा.
10:30 प्रोग्रामला सेव्ह आणि कार्यान्वित करा. आणि परिणाम तपासा.
10:35 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

कृपया डाउनलोड करून पहा.

10:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.

10:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:02 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana