Inkscape/C3/Create-patterns-in-Inkscape/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:06, 3 December 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Create patterns in Inkscape या पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
  • क्लोनिंग
  • Pattern along path
  • Spray टुल आणि
  • Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत-
  • उबंटु लिनक्स 12.04 OS
  • इंकस्केप वर्जन 0.48.4
00:27 इंकस्केप उघडू.
00:29 Star टुलवर क्लिक करून कॅनव्हासवर चांदणी काढा.
00:33 Selector tool वर क्लिक करा.
00:36 टूल कंट्रोल्स बारवरील Width आणि Height चे पॅरामीटर्स बदलून 40 करा.
00:42 Zoom in करून चांदणीवर एकदा क्लिक करा.
00:46 आता pivot point म्हणजेच चांदणीच्या मध्यभागातील अधिकचे चिन्ह दिसत आहे.
00:53 येथे दाखवल्याप्रमाणे pivot point वर क्लिक करून तो चांदणीपासून लांब नेऊन ठेवा.
00:59 आता Edit मेनूखालील Clone पर्यायातील Create Tiled clones पर्याय निवडा.
01:06 नवा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामधे अनेक टॅब्ज आणि प्रत्येक टॅबखाली अनेक पर्याय दिसतील.
01:15 Symmetry टॅबखाली विविध मेथड्स असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी simple translation पर्याय निवडू.
01:25 rows आणि कॉलम्सचे पॅरामीटर्स बदलून अनुक्रमे 1 आणि 40 करा.
01:32 Shift टॅबवर जा. Per column खालील Shift Xची टक्केवारी बदलून -100 करा.
01:41 Rotation टॅबवर जा. Per column खालील Angle बदलून 10 करा.
01:48 Create बटणावर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल.
01:55 अशाचप्रकारे Create Tiled clones खालील इतर पर्याय वापरून सुंदर पॅटर्न्स बनवू शकता.
02:01 हे चांदण्यांचे वर्तुळ बाजूला सरकवू.
02:04 आता पाथच्या कडेने नक्षीकाम कसे करायचे ते पाहू.
02:09 Rectangle टूल सिलेक्ट करा. राऊंडेड आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर Selector टूलवर क्लिक करा.
02:20 टूल कंट्रोल्स बारवर Width बदलून 540 आणि Height 250 करा.
02:28 Star टूल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा.
02:32 Selector टूलवर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बारवर Width आणि Height बदलून 50 करा.
02:40 हे आयताच्या डावीकडे वरच्या बाजूला बॉर्डरवर ठेवा.
02:45 दोन्ही आकार सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा.
02:48 Generate from path वर क्लिक करून Pattern along Path वर क्लिक करा.
02:55 Copies of the patterns साठी Repeated आणि Deformation type साठी Ribbon पर्याय निवडा.
03:03 Apply आणि Close बटणावर क्लिक करा. आयताच्या बॉर्डरभोवती सुंदर पॅटर्न तयार झालेला दिसेल.
03:11 Path effects द्वारे आणखी एक पॅटर्न बनवू.
03:16 Bezier टूल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा.
03:20 Path मेनू खालील Path Effects Editor वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडेल.
03:27 Apply new effect च्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. विविध इफेक्टसची सूची दिसेल.
03:33 Gears पर्याय निवडून Add वर क्लिक करा. आकारात होणारा बदल पहा.
03:41 पुढे Sketch पर्याय निवडून Add वर क्लिक करा. होणारा बदल पहा.
03:48 Path Effect Editor मधे निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील.
03:54 त्यातील Strokes चे पॅरामीटर बदलून ते 10 करा आणि एंटर दाबा. ऑब्जेक्टमधे होणारा बदल पहा.
04:03 Path Effect Editor चा डायलॉग बॉक्स बंद करा.
04:08 सर्व आकार सिलेक्ट करून ते एका बाजूला सरकवा.
04:12 पुढे Spray टूलद्वारे झाडासारखा पॅटर्न काढायला शिकू.
04:18 Bezier टूल सिलेक्ट करा. दाखवल्याप्रमाणे झाडाचे खोड काढून त्याला तपकिरी रंग द्या. पान काढून त्याला हिरवा रंग द्या.
04:38 Spray टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा.
04:43 झाडाचा आकार तयार करण्यासाठी माऊसचे बटण न सोडता ते खोडाभोवती ड्रॅग करा.
04:51 झाडाचा आकार तयार झाला आहे.
04:55 थोडक्यात,
04:58 पाठात शिकलो:
  • क्लोनिंग
  • Pattern along path
  • Spray टुल आणि
  • Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे.
05:08 असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा.
05:12 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
05:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
05:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:41 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana