Inkscape/C3/Create-an-A4-Poster/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00.01 | Inkscape वापरून “Create an A4 Poster” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत. |
00.07 | आपण शिकणार आहोत- |
00.10 | * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे |
00.12 | * A4 आकाराच्या पोस्टरची रचना करणे |
00.14 | * पोस्टर 'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे. |
00.17 | या पाठासाठी वापरणार आहोत- |
00.19 | * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00.22 | * इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00.26 | इंकस्केप उघडू. |
00.28 | File मेनू खालील New वर क्लिक करा. |
00.32 | हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत. |
00.37 | डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास A4 आकारात आहे. |
00.41 | तो मी तसाच ठेवत आहे. |
00.44 | जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास A4 आकार निवडा. |
00.49 | आता काही सेटींग्ज बदलू. |
00.51 | File मेनूखालील Document properties वर क्लिक करा. |
00.54 | अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
00.59 | त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ. |
1.03 | Page या पहिल्या टॅबमधील Default units या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा. |
1.08 | एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल. |
1.13 | pixels हे युनिट ठेवू. |
1.16 | Background पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते. |
1.21 | त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल. |
1.24 | RGB स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा. |
1.29 | कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी alpha slider उजवीकडे सरकवा. |
1.35 | यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB' व्हॅल्यूजना बदलेल. |
1.40 | Document properties विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील. |
1.47 | Alpha स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा. |
1.52 | Page size खाली अनेक पर्याय आहेत. |
1.55 | हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो. |
2.00 | येथे क्लिक केल्यावर कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या. |
2.04 | पानाचा आकार A4 ठेवू. |
2.08 | Orientation मधे Portrait किंवा Landscape हे पर्याय निवडू शकता. |
2.12 | कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा. |
2.17 | Width आणि Height हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो. |
2.23 | Units च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो. |
2.31 | आता युनिटस बदलून ते pixels करू. |
2.34 | Resize page to content वर क्लिक करा. |
2.37 | उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील. |
2.41 | येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो. |
2.45 | मार्जिन सेट केल्यावर Resize page to drawing or selection वर क्लिक करणे गरजेचे आहे. |
2.51 | पुढे Border हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील. |
2.57 | हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे ellipse काढू. |
3.03 | पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो. |
3.08 | हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील. |
3.13 | पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील. |
3.18 | दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल. |
3.25 | पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा. |
3.31 | तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल. |
3.36 | येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे. |
3.42 | तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल. |
3.47 | हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो. |
3.52 | Border color हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो. |
3.57 | आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत. |
4.01 | पुढे Guides टॅबवर क्लिक करा. |
4.03 | Guides टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात. |
4.08 | आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो. |
4.12 | उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा. |
4.15 | Show Guides हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका. |
4.19 | कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल. |
4.25 | Guide color हा guideline चा रंग आहे. |
4.28 | Highlight color हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे. |
4.33 | guide आणि highlight चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत. |
4.37 | तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता. |
4.41 | मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे. |
4.44 | ड्रॅगिंग करताना Snap guides while dragging पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना snap करतात. |
4.52 | पुढे Grids टॅबवर क्लिक करा. |
4.54 | हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे grid सेट करू शकतो. |
5.00 | ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत. |
5.07 | ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा. |
5.09 | Rectangular grid आणि Axonometric grid हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. |
5.16 | Rectangular grid निवडून New वर क्लिक करा. |
5.20 | लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल. |
5.25 | उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात. |
5.31 | खालच्या बाजूचे Remove बटण क्लिक करून grid काढून टाकू शकतो. |
5.36 | याचप्रकारे Axonometric grid चे पर्याय वापरून बघू शकता. |
5.41 | पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ. |
5.47 | आता पोस्टर बनवायला सुरूवात करू. |
5.50 | प्रथम ellipse आणि guideline काढून टाकू. |
5.53 | आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ. |
5.58 | Rectangle टुलवर क्लिक करा. |
6.00 | संपूर्ण canvas चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा. |
6.06 | त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या. |
6.08 | Bezier tool च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात header area |
6.16 | आणि खालच्या भागात footer area काढा. |
6.23 | त्याला निळा रंग देऊ. |
6.25 | आता Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करू. |
6.28 | हा लोगो Code Files च्या लिंकवर दिलेला आहे. |
6.32 | प्रथम हा पाठ थांबवा. Code Files वर क्लिक करून zip file डाऊनलोड करा. |
6.39 | फोल्डर unzip करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा. |
6.45 | आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा. |
6.47 | File मेनूखालील Import वर क्लिक करा. |
6.51 | लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा. |
6.54 | Spoken Tutorial चा लोगो सिलेक्ट करून Open क्लिक करा. |
6.59 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. OK क्लिक करा. |
7.03 | आता हा लोगो canvas वर इंपोर्ट केला जाईल. |
7.06 | त्याचा आकार बदलून 100×100 पिक्सेल्स करा. |
7.09 | header area च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा. |
7.14 | आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा. |
7.18 | ते बोल्ड करा. |
7.20 | टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा. |
7.24 | हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा. |
7.27 | त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा. |
7.35 | या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा. |
7.39 | पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा. |
7.42 | हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे. |
7.47 | हे टेक्स्ट Code Files मधे दिलेले आहे. |
7.51 | तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा. |
7.54 | आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा. |
8.00 | फाँटचा आकार 28 करा. |
8.04 | लाईन स्पेसिंग सेट करा. |
8.06 | प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे bullets द्या. |
8.10 | त्याखाली 2 इमेजेस समाविष्ट करणार आहोत. |
8.13 | पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू. |
8.17 | मी त्या images या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत. |
8.20 | या इमेजेस Code Files मधे दिलेल्या आहेत. |
8.24 | त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा. |
8.27 | इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला. |
8.30 | आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा. |
8.33 | footer area मधे संपर्काचा तपशील लिहू. |
8.37 | पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा. |
8.42 | फाँटचा आकार 18 करा. |
8.45 | आपले पोस्टर तयार झाले आहे. |
8.47 | पुढे हे pdf फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू. |
8.51 | File खालील Save As वर क्लिक करा. |
8.55 | डायलॉग बॉक्स उघडेल. |
8.58 | फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा. |
9.00 | मी डेस्कटॉप निवडत आहे. |
9.02 | डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून pdf हा फॉरमॅट निवडा. |
9.09 | येथे Name या फिल्डमधे Spoken-Tutorial-Poster.pdf असे टाईप करा. |
9.16 | Save वर क्लिक करा. |
9.18 | आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे. |
9.21 | डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू. |
9.25 | आपले पोस्टर pdf फॉरमॅटमधे आहे. |
9.28 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
9.32 | * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे |
9.34 | * A4 पोस्टरची रचना करणे |
9.36 | * पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे. |
9.38 | असाईनमेंट. |
9.40 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी A4 पोस्टर बनवा. |
9.44 | असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे. |
9.48 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल |
9.54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.01 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10.04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.10 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.14 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10.16 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |