Inkscape/C2/Layers-and-Boolean-operations/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:47, 20 November 2015 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Inkscape मधील “Layers and Boolean operations” वरील पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत: * लेयर्स
00:11 * फिल्टर्स
00:12 * बुलियन ऑपरेशन्स.
00:15 या पाठासाठी वापरणार आहोत:
00:18 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:21 * इंकस्केप वर्जन 0.48.4
00:25 इंकस्केप उघडण्यासाठी Dash home वर जाऊन "Inkscape" टाईप करा.
00:30 Inkscape च्या लोगोवर क्लिक करा.
00:32 आपण बनवलेली 'Assignment_2.svg' ही फाईल उघडा.
00:38 मी ती Documents फोल्डरमधे सेव्ह केलेली होती.
00:41 प्रथम लेयर्सबद्दल जाणून घेऊ.
00:45 Layer मेनूखालील Layers पर्यायावर क्लिक करा.
00:50 interface च्या उजवीकडे Layer palette उघडेल.
00:55 डिफॉल्ट रुपात तिथे लेयर आहे जिचे Layer 1 हे नाव आहे.
01:01 नव्या layer साठी Layer palette वरील अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
01:07 Add layer नावाचा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:10 layer या टेक्स्ट बॉक्समधे लेयरला नाव देता येते.
01:15 लेयरला eye हे नाव देऊ.
01:18 आता Position या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून लेयरची जागा ठरवू शकतो.
01:25 येथे तीन पर्याय आहेत.
01:27 Above current हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या वरती ठेवेल.
01:32 Below current हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या खाली ठेवेल.
01:36 As sublayer of current पर्याय हा चालू लेयरचा भाग असल्याचे दाखवेल.
01:41 Above current पर्याय निवडू. Add वर क्लिक करा.
01:47 eye नावाची नवी layer आता Layer palette मधे दिसत आहे.
01:52 अशाप्रकारे bow नावाची आणखी एक लेयर बनवा.
02:00 आता लेयर पॅलेटमधे तीन लेयर्स आहेत.
02:04 आता लेयर चे नाव कसे बदलायचे ते पाहू.
02:08 प्रथम Layer 1 वर डबल क्लिक करा. आणि त्याला circle नाव देऊन एंटर दाबा.
02:16 कॅनव्हासवर परत जा. येथे दोन डोळे आणि एक बो आहे.
02:20 हे आकार आपण बनवलेल्या दोन वेगळ्या लेयर्समधे ठेवू.
02:25 माऊसच्या सहाय्याने दोन्ही डोळे सिलेक्ट करा.
02:28 Ctrl + X दाबा. आता डोळे दिसेनासे झाले आहेत.
02:34 आता लेयर पॅलेटमधील eye लेयरवर क्लिक करा.
02:38 कॅनव्हासवर जाऊन Ctrl + Alt + V दाबा.
02:44 हेच बो (bow) ह्या आकारासाठी करा.
02:52 कॅनव्हास वरील सर्व ऑब्जेक्टस डिसिलेक्ट करण्यासाठी रिकाम्या जागेवर क्लिक करा.
03:00 eye आणि lock आयकॉन्स वापरून लेयर्स लपवता आणि लॉक करता येतात.
03:04 लेयर लपवल्यास त्याच्या खालोखालच्या लेयर्सवरील ऑब्जेक्टस स्पष्टपणे दिसतात.
03:11 लेयर लॉक केल्यास विशिष्ट लेयरमधे अपघाताने होणारे बदल टाळता येतात.
03:18 विशेषतः मोठे आणि गुंतागुंतीचे ग्राफिक काम करताना हे उपयोगी ठरते.
03:25 प्रत्येक लेयरच्या डावीकडे eye आणि lock नावाचे दोन आयकॉन आहेत.
03:32 हे कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
03:35 लेयर्स लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी lock वर क्लिक करा. मी bow लेयर लॉक केला आहे.
03:42 layer लॉक केल्यास त्यात कोणताही बदल करू शकत नाही.
03:47 आता कॅनव्हासवरील bow सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ते करता येत नसल्याचे आपल्या लक्षात येईल.
03:58 आता bow लेयर अनलॉक करा.
04:01 आता bow ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज बदलता येतात.
04:07 कॅनव्हासवर लेयर दृश्य किंवा अदृश्य करण्यासाठी डावीकडील eye आयकॉनवर क्लिक करा.
04:15 bow लेयरसाठी eye आयकॉनवर क्लिक करू.
04:18 कॅनव्हासवर काय होते याकडे लक्ष द्या.
04:23 आता bow लेयरची दुसरी प्रत बनवू.
04:26 Layer मेनूखालील Duplicate Current Layer वर क्लिक करा.
04:32 bow copy नावाची नवी लेयर Layer Palette window मधे तयार झालेली दिसेल.
04:41 परंतु कॅनव्हासवर नवीन bow दिसणार नाही. कारण हे ऑब्जेक्ट आधीच्या लेयरवर ओव्हरलॅप झाले आहे.
04:50 वरच्या लेयरवरील bow सिलेक्ट करून तो बाजूला सरकवा म्हणजे दोन्ही बो दिसतील.
04:56 circle लेयर सिलेक्ट करा.
04:58 डोळे आणि बो यांच्याभोवती कॅनव्हासवर एक लंबगोल काढा. त्याला केशरी रंग द्या.
05:05 बॅकग्राऊंडमधे लंबगोल आणि इतर ऑब्जेक्टस त्याच्या वरच्या बाजूला दिसत आहेत.
05:10 Layers Palette मधील अधिक चिन्हापुढे चार आयकॉन्स आहेत जे निवडलेल्या लेयरची जागा ठरवतात.
05:17 पहिला आयकॉन सिलेक्ट केलेल्या लेयरला वर उचलून सगळ्यात वरचा लेयर बनवेल.
05:23 सध्या circle लेयर निवडलेली आहे.
05:25 हा पर्याय निवडल्यावर circle लेयर सगळ्यात वरची लेयर बनलेली दिसेल.
05:33 शेवटचा आयकॉन निवडलेली लेयर खाली नेऊन सगळ्यात खालची लेयर बनवेल.
05:38 हा आयकॉन क्लिक करा. आता circle लेयर सर्वात खालची लेयर बनली आहे.
05:44 दुसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर वर आणेल.
05:48 या आयकॉनवर क्लिक करा. circle लेयर ही eye लेयरच्या वर आलेली दिसेल. त्यामुळे आता डोळे दिसणार नाहीत.
05:57 तिसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर खाली नेईल.
06:01 या आयकॉनवर क्लिक करा. आता circle लेयर eye लेयरच्या खाली गेलेली दिसेल.
06:07 अशाप्रकारे ह्या चार आयकॉन्सचा उपयोग करता येऊ शकतो.
06:13 सगळ्यात शेवटचे वजाचे चिन्ह निवडलेली लेयर डिलीट करेल. bow copy लेयर निवडून यावर क्लिक करा.
06:21 bow copy आता दिसेनाशी झाली आहे.
06:27 Blend mode हा संपूर्ण लेयरवर Blend filter वापरायचा शॉटर्कट आहे.
06:31 म्हणजेच जर निवडलेल्या लेयर्सवरील ऑब्जेक्टस ओव्हरलॅप होत असल्यास, इंकस्केप या दोन ऑब्जेक्टसचे pixel-by-pixel मिश्रण करेल.
06:41 filters दिसण्यासाठी circle सर्वात वर ठेवा.
06:46 Blend mode च्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा. येथे पाच पर्याय आहेत.
06:52 Normal हा पहिला पर्याय लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट करत नाही.
06:57 हा पर्याय निवडा. लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट झालेला नाही.
07:03 पुढे Multiply वर क्लिक करा.
07:06 तुम्हाला दिसेल की सर्वात वरच्या लेयरमधील ऑब्जेक्टसमधून प्रकाश खालच्या लेयर्सवर झिरपून तेथील ऑब्जेक्टस दिसतील
07:14 त्याचबरोबर यामुळे रंगांचे मिश्रण होऊन ओव्हरलॅप क्षेत्रात गडद रंग तयार होतील.
07:21 Screen हा पुढचा पर्याय आहे.
07:25 वरच्या ऑब्जेक्टसकडे पहा. त्यांच्यामुळे खालची ऑब्जेक्टस फिकट दिसतील.
07:30 म्हणजेच त्यामुळे रंगांचे मिश्रण असे तयार होते की ओव्हरलॅप क्षेत्रात फिकट रंग तयार होतात.
07:36 Darken निवडा. वरच्या लेयर्स वरची ऑब्जेक्टस, खालच्या लेयर्सवरील ऑब्जेक्टसना गडद (dark) करतात.
07:44 आता शेवटचा पर्याय Lighten निवडा. येथे वरची ऑब्जेक्टस खालच्या ऑब्जेक्टसना फिकट करतात.
07:53 आपण केव्हाही Normal या Blend mode वर गेल्यास वापरलेली ब्लेंड फिल्टर्स दिसेनाशी होतील.
08:00 Filters मेनूखाली फिल्टर्सचे अनेक पर्याय आहेत.
08:04 विशिष्ट फिल्टर वापरण्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट निवडून नंतर योग्य फिल्टरवर क्लिक करा.
08:12 circle लेयर पुन्हा सगळ्यात मागे सरकवू.
08:16 डोळ्याचा आकार निवडा. Filters मेनूखालील Blur पर्यायातील Fancy blur वर क्लिक करा.
08:26 डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
08:29 आता दुसरा डोळा निवडा. Filters मेनूखालील Bevel पर्यायातील Smart jelly वर क्लिक करा.
08:39 पुन्हा एकदा डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
08:44 आता 'bow' सिलेक्ट करा. Filters मेनूखालील Scatter मधील Air spray निवडा.
08:51 बो एअर स्प्रे केल्याप्रमाणे दिसेल.
08:55 Blend mode च्या खालोखाल असलेला Opacity हा पर्याय निवडलेल्या लेयरची अपारदर्शकता कमी करतो.
09:01 circle लेयर निवडा.
09:03 Opacity लेव्हल बदलून लंबगोलात झालेला बदल पहा.
09:10 आता Boolean operations जाणून घेऊ.
09:13 Path मेनूखाली Boolean operations चे हे पर्याय उपलब्ध आहेत.
09:21 उपलब्ध असलेले हे आकार बाजूला ठेवू.
09:26 हिरव्या रंगाचा चौरस आणि लाल रंगाचे वर्तुळ काढा. चौरसाच्या वर थोडे कडेला हे वर्तुळ ठेवा.
09:36 दोन्ही सिलेक्ट करा. Path मेनू खालील Union वर क्लिक करा. आता दोन्ही आकार जोडले गेले आहेत.
09:46 Ctrl + Z दाबून undo करा.
09:51 पुन्हा दोन्ही सिलेक्ट करून Path मेनूवर जा.
09:55 Difference वर क्लिक करून काय होते ते बघा.
09:59 Ctrl + Z दाबून undo करा.
10:03 पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनू खालील Intersection वर क्लिक करून आकारात होणारे बदल पहा.
10:11 Ctrl + Z दाबून undo करा.
10:16 पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनूखालील Exclusion वर क्लिक करा.
10:22 आकारात झालेले बदल पहा.
10:24 Ctrl + Z दाबा.
10:27 पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस सिलेक्ट करून Path मेनू खालील Division वर क्लिक करा.
10:34 विभागलेल्या वर्तुळावर क्लिक करून तो भाग बाजूला सरकवा.
10:39 Ctrl + Z दाबून दोन वेळा undo करा.
10:44 पुन्हा दोन्ही ऑब्जेक्टस निवडा. Path मेनू खालील Cut Path क्लिक करा.
10:50 आकारात झालेला बदल पहा.
10:53 Cut Path पर्याय केवळ स्ट्रोक असलेल्या ऑब्जेक्टवरच वापरता येतो. प्रथम आकार अनसिलेक्ट करा.
10:59 आता कुठलाही एक स्ट्रोक निवडून तो बाजूला सरकवा म्हणजे cut path नीट दिसू शकेल.
11:05 आपण शिकलो ते थोडक्यात,
11:09 * लेयर्स
11:10 * फिल्टर्स आणि बुलियन ऑपरेशन्स.
11:14 या चार असाईनमेंट करा.
11:16 गुलाबी रंगाचा आयत आणि हिरव्या रंगाचा त्रिकोण काढा.
11:21 आयताच्या वरच्या बाजूला त्रिकोण ठेवा.
11:24 दोन्ही सिलेक्ट करा. Union पर्याय वापरा. हे घराच्या आकारासारखे दिसले पाहिजे.
11:30 या लेयरला home नाव द्या.
11:32 दोन वर्तुळे काढा.
11:34 दोन्ही एकमेकांवर ठेवा.
11:36 दोन्ही सिलेक्ट करून Difference पर्याय वापरा.
11:39 हे चंद्रकोरीप्रमाणे दिसले पाहिजे.
11:42 एक लंबगोल काढा.
11:44 10 कोन असलेली चांदणी काढा.
11:46 ती लंबगोलाच्या मध्यभागी ठेवा.
11:49 दोन्ही सिलेक्ट करून Exclusion पर्याय वापरा.
11:52 अनुक्रमे crescent आणि star नावाचे दोन लेयर्स बनवा.
11:57 चंद्रकोरीचा आकार कट करून crescent लेयरमधे पेस्ट करा.
12:00 असेच चांदणीच्या आकारासाठी करा.
12:03 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
12:07 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:23 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:34 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:39 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:42 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana