Inkscape/C2/Create-and-Format-Text/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Inkscape च्या Create and format text वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत:
|
00:15 | शेवटी simple flyer बनवण्याची कृती जाणून घेऊ. |
00:19 | या पाठासाठी वापरणार आहोत:
|
00:29 | मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे. यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील. |
00:38 | इंकस्केप उघडू. |
00:40 | टूल बॉक्स मधील Text tool द्वारे टेक्स्ट समाविष्ट करता येते. |
00:45 | टेक्स्ट दोन पध्दतीने लिहिता येते
|
00:50 | आधी Regular Text बद्दल जाणून घेऊ. Text tool क्लिक करून नंतर canvas वर क्लिक करा. |
00:57 | "Spoken" शब्द टाईप करा. टेक्स्ट सामावून घेण्यासाठी टेक्स्ट बॉक्स मोठा होत जातो. |
01:03 | Line breaks स्वतः घालावे लागतात. नव्या ओळीवर जाण्यासाठी Enter दाबून “Tutorial” असे टाईप करा. |
01:11 | हा शब्द मागील ओळीवर नेण्यासाठी कर्सर 'T' अक्षराआधी ठेवा. backspace दाबा आणि दोन शब्दांमधे स्पेस द्या. |
01:22 | याचप्रकारे "Spoken Tutorial" च्या खाली नव्या ओळीवर http://spoken-tutorial.org/ हे टाईप करा. |
01:33 | Flowed text वापरून टेक्स्ट समाविष्ट कसे करायचे ते पाहू. |
01:38 | आता मी लिबर ऑफिस रायटरच्या फाईलमधे सेव्ह केलेले टेक्स्ट कॉपी करणार आहे. |
01:45 | Ctrl + A दाबून संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि Ctrl + C द्वारे कॉपी करा. |
01:52 | आता इंकस्केपवर जाऊन Text tool सिलेक्ट केले असल्याची खात्री करा. |
01:58 | canvas वर क्लिक करून आयत किंवा चौरसाकृती टेक्स्ट एरिया काढण्यासाठी माऊस ड्रॅग करा. |
02:03 | माऊसचे बटण सोडल्यावर कॅनव्हासवर निळ्या रंगाचा आयताकृती बॉक्स तयार होईल. |
02:10 | आता टेक्स्ट बॉक्सच्या आत डाव्या वरील कोप-यात text prompt ब्लिंक होताना दिसेल. |
02:17 | कॉपी केलेले टेक्स्ट Ctrl + V दाबून पेस्ट करा. |
02:22 | टेक्स्ट बॉक्सचा रंग लाल झालेला दिसेल. |
02:25 | कारण समाविष्ट केलेले टेक्स्ट बॉक्सच्या मर्यादेपेक्षा अधिक झाले आहे. |
02:31 | हे टेक्स्ट बॉक्सच्या उजव्या कोप-यातील छोट्या diamond handle द्वारे नीट करू. |
02:38 | क्लिक करून टेक्स्ट बॉक्सचा रंग निळा होईपर्यंत ड्रॅग करा. |
02:44 | शेवटचे वाक्य हे त्याच्या मागील वाक्याबरोबर जोडले गेले आहे. |
02:48 | शेवटचे वाक्य वेगळे करण्यासाठी त्या वाक्याच्या सुरूवातीला दोन वेळा एंटर दाबा. |
02:53 | टेक्स्टसाठी असलेले विविध फॉरमॅटिंगचे पर्याय समजून घेऊ. “Spoken Tutorial” शब्दावर क्लिक करा. |
03:01 | मुख्य मेनूवर जा. Text वर क्लिक करून Text and Font क्लिक करा. |
03:09 | Font आणि Text हे पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. Font टॅबखाली अनेक पर्याय आहेत. |
03:17 | Font family मधे उपलब्ध असलेल्या सर्व फाँटसची यादी दिसेल. तुमच्या पसंतीचा फाँट निवडू शकता. |
03:25 | सिलेक्ट केलेला फाँट कसा दिसेल हे preview box मधे बघता येतो. मी Bitstream Charter हा फाँट निवडला आहे. |
03:33 | Style खाली- Normal, Italic, Bold आणि Bold Italic हे चार पर्याय आहेत. तुम्ही गरजेप्रमाणे स्टाईल निवडा. मी Bold निवडत आहे. |
03:46 | फाँटचा आकार बदलण्यासाठी ड्रॉप डाऊन वापरून आकार निवडा. हे छोटे दिसत असल्यामुळे मी 64 हा मोठा फाँट निवडत आहे. |
03:57 | पुढे Layout हा पर्याय आहे. |
03:59 | ह्या पर्यायासाठी प्रिव्ह्यू दिसत नसल्यामुळे याबद्दल नंतर जाणून घेऊ. |
04:04 | Font टॅबच्या पुढील Text टॅबवर क्लिक करा. येथील preview window मधे टेक्स्ट दिसेल. |
04:12 | येथे तुम्ही टेक्स्टमधे कुठलेही बदल करू शकता. |
04:16 | Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. टेक्स्ट फॉरमॅट झालेले दिसेल. |
04:23 | खालच्या भागातील color palette द्वारे टेक्स्टचा रंग बदलता येतो. maroon रंगावर क्लिक करा. |
04:30 | http://spoken-tutorial.org या URL मधील टेक्स्ट सिलेक्ट करा. |
04:40 | टेक्स्ट फॉरमॅटिंगचे पर्याय Tool controls bar वर देखील उपलब्ध आहेत. |
04:44 | मी Bitstream charter हा फाँट, त्याचा आकार 28 आणि रंग निळा निवडणार आहे. |
04:54 | परिच्छेदातील टेक्स्ट निवडू. |
04:56 | Text tool आधीच सिलेक्ट केलेले असल्यास टेक्स्ट बॉक्समधे जाण्यासाठी text वर क्लिक करा. |
05:04 | फाँटचा आकार बदलून 25 करा. |
05:08 | कॅनव्हासच्या आतील टेक्स्ट हलवण्यासाठी diamond handle क्लिक करून ड्रॅग करा. |
05:15 | आता टेक्स्ट अलाईन करू. |
05:19 | Tool controls bar वर Italic icon च्या पुढे चार आयकॉन आहेत जे टेक्स्ट डावीकडे, मध्यात किंवा उजवीकडे अलाईन करेल. |
05:30 | चौथा पर्याय टेक्स्ट बॉक्सच्या बाऊंडरीजमधे टेक्स्ट जस्टीफाय करेल. पुढे जाण्यापूर्वी मी left align वर क्लिक करत आहे. |
05:39 | Align and distribute पर्याय वापरून देखील टेक्स्ट अलाईन करता येते. |
05:43 | मुख्य मेनूतील Object मेनूवर क्लिक करून Align and Distribute पर्याय निवडा. |
05:51 | आता Spoken Tutorial हा शब्द मध्यात आणण्यासाठी यावर क्लिक करू. |
05:57 | प्रथम Relative to पर्यायासाठी Page हे पॅरामीटर सेट केले आहे का ते तपासा. |
06:01 | Centre on vertical axis वर क्लिक करा. आता टेक्स्ट मध्यात अलाईन झाल्याचे दिसेल. |
06:10 | येथे खालच्या रिकाम्या भागात आणखी काही टेक्स्ट लिहू. |
06:13 | "FOSS Categories" असे टाईप करा. हे टेक्स्ट पानाच्या मध्यात अलाईन करण्यासाठी Centre on vertical axis वर क्लिक करा. |
06:25 | कॅनव्हासवर Linux, LaTeX, Scilab, Python अशी काही FOSS ची नावे स्वतंत्रपणे आणि कुठेही टाईप करा. |
06:39 | आता हे टेक्स्ट एकाच रो मध्ये समान अंतरावर अलाईन करा. |
06:44 | चारही टेक्स्ट शिफ्ट बटणाच्या सहाय्याने सिलेक्ट करा. Align baseline of text आणि Distribute baseline of text horizontally वर क्लिक करा. |
06:58 | या शब्दांमधील अंतर समान नसल्याचे लक्षात येईल. |
07:02 | पहिल्या शब्दातील पहिले आणि दुस-या शब्दातील पहिले अक्षर यांच्यातील अंतर समान आहे. परंतु प्रत्यक्ष शब्दांतील अंतर समान नाही. |
07:10 | हे उभ्या टेक्स्टसाठी देखील असेच कार्य करते. |
07:15 | हे पर्याय काही ठराविक ठिकाणी उपयोगी पडू शकतात. |
07:20 | आता शब्दांमधील अंतर समान करणार आहोत. |
07:23 | त्यासाठी Distribute खालील पहिल्या ओळीतील चौथ्या आयकॉनवर क्लिक करा. आता शब्दांतील अंतर सारखे झाले आहे. |
07:32 | पुढे परिच्छेदातील ओळींमधील अंतर कमी जास्त कसे करायचे हे शिकू. |
07:38 | टेक्स्ट बॉक्समधील परिच्छेदावर डबल क्लिक करा. |
07:44 | टूल कंट्रोल्स बारवरील Spacing between lines आयकॉन ओळींमधील अंतर कमी जास्त करतो. |
07:50 | अंतर वाढल्यावर काय काय होते ते बघा. |
07:55 | मी लाईन स्पेसिंग 1.50 ठेवत आहे. |
07:59 | पुढील आयकॉन अक्षरातील अंतर कमी जास्त करेल. पुन्हा अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करून होणा-या बदलांकडे लक्ष द्या. |
08:07 | येथे space पॅरामीटर 0 ठेवू. |
08:12 | कॅनव्हासच्या दोन्ही उभ्या कोप-यात रिकामी जागा दिसत आहे. त्यात काही टेक्स्ट टाईप करू. |
08:19 | कॅनव्हासच्या बाहेर "Learn Open Source Software for free" असे वाक्य टाईप करा. |
08:24 | फाँट बदलून तो Ubuntu करा. फाँटचा आकार 22 करा आणि टेक्स्ट बोल्ड करा. |
08:34 | Tool controls bar वरील Vertical text या शेवटच्या आयकॉनवर क्लिक करा. |
08:39 | टेक्स्ट उभ्या पध्दतीने अलाईन झालेले दिसेल. |
08:43 | Selector tool वापरून टेक्स्टवर क्लिक करून कॅनव्हासच्या डाव्या कोप-यात ते सरकवा. |
08:49 | टेक्स्टची दुसरी प्रत मिळवण्यासाठी Ctrl + D दाबा. दुसरी प्रत Ctrl key च्या सहाय्याने दुस-या कोप-यात हलवा. |
08:59 | आता परिच्छेदात असलेल्या टेक्स्टला bullet points देऊ. |
09:03 | इंकस्केप टेक्स्टसाठी बुलेट किंवा अंकांची सूची देत नाहीत. बुलेट पॉईंटस स्वतः बनवावे लागतात. |
09:11 | ellipse टूलवर क्लिक करून लाल रंगाचे छोटे वर्तुळ काढा. |
09:17 | ही बुलेट परिच्छेदातील पहिल्या ओळीवर नेऊन ठेवा. त्याची दुसरी प्रत करून पुढील वाक्यावर नेऊन ठेवा. |
09:27 | हे सर्व वाक्यांसाठी करा. |
09:32 | आपल्या गरजेनुसार टेक्स्ट तयार झाले आहे. |
09:36 | शेवटी हे flyer सारखे दिसण्यासाठी थोडे नक्षीकाम करू. |
09:41 | हा पूर्ण झालेला flyer आहे. |
09:45 | आपण वर आणि खाली बॉर्डर्स टाकल्या आहेत. टेक्स्टभोवती गोलाकार आयत आणि लंबवर्तुळे काढली आहेत. |
09:51 | फ्लायरसाठी तुम्ही कलात्मकता वापरून विविध लेआऊट आणि डिझाईन्स बनवा. |
09:57 | थोडक्यात, |
09:59 | आपण टेक्स्ट समाविष्ट करणे, फॉरमॅट आणि अलाईन करणे, स्पेसिंग आणि बुलेट लिस्ट बनवायला शिकलो. |
10:06 | तसेच सिंपल flyer बनवायला शिकलो. |
10:09 | असाईनमेंट. |
10:11 | फ्लायर असा बनवा.
|
10:19 | star टूल वापरून 10 कोपरे असलेली चांदणी काढा.
|
10:31 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:39 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:47 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:01 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:03 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|