Inkscape/C2/Text-tool-features/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Inkscape च्या “Text tool features” वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत: |
00:09 | * मॅन्युअल कर्निंग |
00:10 | * स्पेल चेकिंग |
00:12 | * सुपर स्क्रिप्ट |
00:13 | * सब स्क्रिप्ट. |
00:15 | या पाठासाठी वापरणार आहोत- |
00:17 | * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:20 | * इंकस्केप वर्जन 0.48.4. |
00:24 | मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे. यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील. |
00:33 | इंकस्केप उघडू. |
00:35 | मागील भागात Text tool द्वारे टेक्स्ट लिहून फॉरमॅट करायला शिकलो. |
00:40 | आता टेक्स्ट टूलची महत्वाची फीचर्स जाणून घेण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
00:45 | Manual kerning पासून सुरूवात करू. |
00:48 | Horizontal kerning, Vertical shift आणि Character rotation याला मॅन्युअल कर्नस म्हणतात. |
00:54 | “Spoken” शब्द टाईप करा. |
00:58 | “S” अक्षरापुढे कर्सर ठेवा. |
01:01 | Horizontal kerning निवडलेल्या अक्षरापुढे स्पेस ठेवते. |
01:05 | “S” आणि “p” या अक्षरांमधील जागा कमी जास्त करण्यासाठी अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा. |
01:13 | केवळ “S” आणि “p” मधील अंतर कमी जास्त होत असल्याचे लक्षात येईल. |
01:19 | Horizontal kerning साठी 3 हे पॅरामीटर सेट करा. |
01:24 | पुढील आयकॉन Vertical shift चा आहे. जो सिलेक्ट केलेल्या अक्षराच्या पुढील अक्षरे वर खाली करतो. |
01:30 | अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा. |
01:34 | कर्सरच्या पुढील अक्षरे वर खाली होताना दिसतील. |
01:39 | त्याचा पॅरामीटर 15 सेट करा. |
01:42 | पुढे Character rotation च्या सहाय्याने अक्षरे फिरवू. |
01:47 | हा आयकॉन केवळ कर्सरच्या उजवीकडील केवळ पहिले अक्षर फिरवेल. |
01:51 | आता कर्सर “e” या अक्षराच्या आधी ठेवा. |
01:55 | Character rotation च्या अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करा. “e” हे अक्षर फिरताना दिसेल. |
02:02 | एकापेक्षा अधिक अक्षरांवर kerns वापरण्यासाठी प्रथम अक्षरे सिलेक्ट करून नंतर व्हॅल्यूज द्या. |
02:09 | “p” आणि “o” ही अक्षरे निवडून Horizontal kerning चा पॅरामीटर 5 वर सेट करा. |
02:17 | Vertical shift चा पॅरामीटर 10 वर आणि |
02:21 | Character rotation चा पॅरामीटर 20 वर सेट करा. |
02:24 | होणा-या बदलांकडे लक्ष द्या. |
02:26 | kerns काढण्यासाठी Text मेनूवर जा. |
02:29 | Remove Manual Kerns वर क्लिक करा. |
02:32 | मॅन्युअल कर्नस केवळ Regular text वर वापरता येतात. |
02:35 | Flowed text साठी हे पर्याय डिसेबल्ड असतात. |
02:39 | हे बघण्यासाठी text box काढा. |
02:43 | मॅन्युअल कर्नसचे पर्याय आता डिसेबल असल्याचे दिसेल. |
02:47 | हे undo करण्यासाठी Ctrl + Z दाबा. |
02:51 | पुढे Spell check फीचरबद्दल जाणून घेऊ. |
02:54 | Spell check फीचर बघण्यासाठी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह केलेले हे टेक्स्ट कॉपी करू. |
03:01 | Ctrl + A च्या सहाय्याने संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून Ctrl + C ने ते कॉपी करा. |
03:08 | आता इंकस्केपवर जा. |
03:10 | canvas वर क्लिक करून Ctrl + V द्वारे टेक्स्ट पेस्ट करा. |
03:15 | Text menu खालील Check Spelling वर क्लिक करा. |
03:19 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:22 | सिलेक्ट केलेले असो किंवा नसो संपूर्ण टेक्स्ट तपासले जाते. |
03:27 | संदिग्ध शब्द लाल रंगाच्या बॉक्सने हायलाईट केला जातो. कर्सर त्या टेक्स्टच्या आधी ठेवला जातो. |
03:33 | “http” या शब्दासाठी सुचवलेल्या शब्दांची यादी उघडेल. |
03:37 | हे स्पेलिंग बरोबर असल्यामुळे हा शब्द शब्दकोशात समाविष्ट करू. |
03:41 | त्यासाठी Add to Dictionary वर क्लिक करा. |
03:45 | यामुळे 'spell checker' तो शब्द योग्य स्पेलिंगचा म्हणून कायमचा स्वीकारेल. |
03:50 | पुढे “tutorial” हा शब्द हायलाईट केलेला आहे. |
03:53 | हे स्पेलिंग चुकीचे असल्यामुळे सुचवलेल्या सूचीतून “tutorial” हा योग्य शब्द निवडा. |
03:59 | Accept बटणावर क्लिक करा. |
04:02 | Ignore क्लिक केल्यास डॉक्युमेंटमधील हेच स्पेलिंग असलेल्या इतर शब्दांकडे दुर्लक्ष केले जाते. |
04:08 | Ignore once क्लिक केल्यास केवळ एकदाच म्हणजे प्रथम आलेल्या शब्दाकडे दुर्लक्ष केले जाते. |
04:14 | स्पेल चेकिंगची प्रक्रिया बंद करण्यासाठी Stop क्लिक करा. |
04:18 | Start क्लिक करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करता येते. |
04:22 | स्पेल चेकिंग वरून उजव्या बाजूच्या टेक्स्टपासून कॅनव्हासच्या खालच्या दिशेनी होते. |
04:27 | डायलॉग बॉक्स बंद करून हे टेक्स्ट एका बाजूला सरकवा. |
04:32 | पुढे सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट बद्दल जाणून घेऊ. |
04:36 | (a+b)2 = a2+b2+2ab.(a + b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab हे गणितीय समीकरण टाईप करा). |
04:44 | तीन ठिकाणी 2 या अंकाचा square म्हणून उपयोग करायचा आहे. |
04:48 | पहिला 2 हा अंक निवडा. Tool controls bar वर जाऊन Toggle Superscript आयकॉनवर क्लिक करा. |
04:56 | उर्वरित दोन्ही ठिकाणी 2 हा अंक याच प्रकारे बदला. |
04:59 | आता सबस्क्रिप्टद्वारे रासायनिक समीकरण लिहू. |
05:04 | टाईप करा “H2SO4”. |
05:07 | येथे 2 आणि 4 हे सबस्क्रिप्टमधे लिहिलेले असले पाहिजेत. |
05:11 | 2 सिलेक्ट करून Tool controls bar वर जा. Toggle Subscript वर क्लिक करा. |
05:17 | हेच 4 साठीही करा. |
05:19 | थोडक्यात, |
05:21 | पाठात शिकलो: |
05:24 | * मॅन्युअल कर्निंग |
05:25 | * स्पेल चेकींग |
05:26 | * सुपरस्क्रिप्ट आणि |
05:27 | * सबस्क्रिप्ट. |
05:29 | या दोन असाईनमेंट करून बघा. |
05:31 | “How are you” असे टेक्स्ट टाईप करून फाँटचा आकार 75 करा. |
05:36 | “w” अक्षरापुढे कर्सर ठेवा. हॉरिझाँटल कर्निंगचा पॅरामीटर 20 करा. |
05:42 | “are” शब्द सिलेक्ट करून व्हर्टिकल शिफ्टचा पॅरामीटर 40 ठेवा. |
05:47 | “you” शब्द सिलेक्ट करून कॅरॅक्टर रोटेशनचा पॅरामीटर 30 करा. |
05:52 | सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे पर्याय वापरून खालील समीकरणे लिहा. |
05:57 | सिल्वर सल्फेट Ag₂SO₄ |
06:00 | a2−b2=(a−b)(a+b) |
06:06 | असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसायला हवी. |
06:09 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल |
06:15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:22 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:34 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:36 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|