Inkscape/C2/Create-and-edit-shapes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Inkscape वापरून Create and edit shapes वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्युटोरियलमध्ये, आपण Inkscape बद्दल जाणून घेऊया. |
00:10 | आपण Inkscape इंटरफेस बद्दल आणि मूलभूत आकृति कसे तयार करणे, |
00:16 | * हॅंडल्स वापरून कलर फिल करणे आणि आकृती बदलणे ह्या बद्दल शिकणार आहोत. |
00:20 | ह्या ट्यूटोरियलसाठी मी वापरत आहे, उबंटू लिनॅक्स 12.04 OS |
00:25 | * Inkscape वर्जन 0.48.4 |
00:29 | Dash home वर जा आणि "Inkscape" टाईप करा. |
00:34 | आपण लोगो वर डबल क्लिक करून Inkscape उघडू शकतो. |
00:38 | इंटरफेस वर सर्वात वरती, आपल्याला menu bar आणि Tool controls bar सापडतील. |
00:44 | हे सर्वात वर आणि बाजूला rulers च्या नंतर आहे. |
00:48 | इंटरफेसच्या उजव्या बाजुला वर, आपल्याला Command bar आणि Snap controls bar सापडतील. |
00:54 | Tool box इंटरफेसच्या डाव्या बाजूला आहे. |
00:58 | मध्यभागी, canvas आहे. जेथे आपण आपला ग्रॅफिक्स ड्रॉ करूया. |
01:03 | इंटरफेस च्या तळाशी, आपण color palette आणि status bar पाहू शकतो. |
01:09 | आता, Inkscape मध्ये काही मूलभूत आकृत्यांना तयार आणि एडिट करणे जाणून घेऊ. |
01:14 | सर्व प्रथम, आपण Select आणि Transform टूल बद्दल शिकणार आहोत. ह्याला सामान्यतः Selector टूल म्हटले जाते. |
01:22 | हे एक अतिशय महत्वाचे टूल आहे. आपल्याला हे Tool box च्या डाव्या बाजूला सापडेल. |
01:28 | ह्या टूल सोबत, आपण ऑब्जेक्ट्स निवडू शकतो, canvas वर त्यांना ट्रॅन्सफॉर्म आणि मूव करू शकतो. |
01:34 | एक नवीन Inkscape डॉक्युमेंट उघडण्यास, File वर क्लिक करा आणि नंतर New निवडा आणि
Default वर क्लिक करा. |
01:41 | अस्तित्वातील Inkscape' डॉक्युमेंट उघडण्यास, File वर क्लिक करा आणि नंतर Open निवडा. |
01:47 | 'drawing_1.svg' फाईल उघडू, जी आपण पुर्वी बनवली होती. |
01:53 | मी ती Documents फोल्डर मध्ये सेव्ह केली आहे. उजव्या बाजूला खाली Open बटणावर क्लिक करा. |
02:01 | आपण पूर्वी एक आयत बनवले होते. |
02:04 | आता, आयत वर क्लिक करा. |
02:06 | डिफॉल्ट रूपात, आयताचा रंग हिरवा आहे. |
02:09 | रंग लालमध्ये बदलण्यास, आपण खालील color palette वापरू. |
02:14 | त्यामुळे, मी कर्सर तळाशी घेऊन जाईल आणि लाल रंग वर क्लिक करेल. |
02:18 | आयत मध्ये रंगाच्या बदलाकडे लक्ष द्या. |
02:22 | आता आयत हलवू. |
02:23 | असे करण्यासाठी, आपल्याला आयत वर कुठेही क्लिक केले पाहिजे. |
02:27 | माऊस बटण न सोडता, canvas वर आपण जेथे हवे तेथे तो ड्रॅग करा. |
02:33 | नंतर माऊस बटण सोडा. |
02:37 | चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी जूम-इन करा. असे करण्यासाठी Ctrl की दाबा आणि माऊस वरील स्क्रोल बटणाचा वापर करा. |
02:46 | आयतच्या आजू-बाजूच्या एरोज वर लक्ष द्या. ह्यांना हॅंडल्स म्हटले जाते, ज्याचा उपयोग आपण स्केल आणि रोटेट करण्यासाठी करू. |
02:57 | जेव्हा कर्सर कोणत्याही हॅंडल्स वर जातो, तेव्हा हॅंडल्सच्या रंगात बदल होतो. |
03:02 | हे सूचित करते की, हॅंडल्स निवडलेले आहे आणि आकार बदलण्याकरिता तयार आहे. |
03:08 | आयातचे स्केल किंवा आकृती बदलण्यास, कुठल्याही एका हॅंडल्सच्या कोपर्यावर क्लिक करून ड्रॅग करा. |
03:17 | जर तुम्हाला आकृतीचा अनुपात समान ठेवायचा असेल, तर आकृती बदलण्याकरिता Ctrl कि दाबून ठेवा. |
03:24 | आयतची लांबी किंवा रुंदी बदलण्यासाठी, आयतच्या कोपर्यावर कोणत्याही एका हॅंडलचा वापर करा. |
03:32 | एकतर डाव्या किंवा उजव्या बाजूला, हॅंडल वर क्लिक आणि ड्रॅग करा. |
03:39 | आयतच्या रुंदीमध्ये बदलाकडे पाहा. |
03:43 | आता, आयतची उंची बदलू. |
03:46 | अशा प्रकारे आपण एकतर हॅंडलच्या वरती किंवा खाली क्लिक आणि ड्रग करूया. |
03:51 | आयतच्या उंचीमध्ये बदलाकडे पाहा. |
03:54 | आम्ही स्वतः Tool controls बारवर Width आणि Height पॅरमीटर्सला बदलून आयतची रुंदी आणि उंची बदलू शकतो. |
04:03 | मी Width 400 आणि Height 200 नि बदलेल. |
04:07 | आयतच्या आकरामध्ये बदलाकडे लक्ष द्या. |
04:10 | त्याचप्रकारे, तुम्ही X आणि Y अक्ष पोज़िशन बदलून ऑब्जेक्टला मूव करू शकता. |
04:19 | आता जाणून घेऊ की आयत कसे रोटेट करणे. |
04:24 | असे करण्यासाठी, पुन्हा एकदा आयतवर क्लिक करा. |
04:27 | लक्ष द्या की आता, कोपऱ्यातल्या 'हँडल' चा आकार बदलला आहे, हे दाखवते की हे रोटेशनसाठी तयार आहे. |
04:34 | मी हँडलच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर क्लिक करेल आणि आयत रोटेट करेल. |
04:44 | आपण कोणत्याही बाजूच्या हॅंडल्सवर क्लिक आणि ड्रॅग करून आयतला तिरपा करू शकतो. |
04:50 | मी डावीकडे मध्यम हँडल वर क्लिक करते आणि आयतला तीरपे करण्यास हे वर किंवा खाली ड्रग करते. |
04:56 | माझ्या द्वारे केलेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
04:59 | आपण अन्य ट्यूटोरियलमध्ये ह्या हॅंडल्स वापरून काही अधिक तपशील जाणून घेऊ. |
05:04 | आता ह्या आकृतीची निवड रद्द करा. |
05:06 | असे करण्यास, कॅनव्हास क्षेत्रात किंवा कॅनव्हास सीमाच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
05:11 | माउसला परत Tool box वर घेऊन जा आणि त्याच rectangle टूलवर फिरवा. |
05:17 | टूल टीप म्हणतो की, आपण ह्या टूलचा वापर करून आयत आणि चौकोन काढू शकतो. |
05:22 | तर पहिले मी ह्या टूलवर क्लिक करेल. |
05:25 | एक चौकोन काढण्यास, फक्त Ctrl की दाबून ठेवा आणि Canvas वर ड्रग करा. |
05:30 | मी त्याचा रंग गुलाबी मध्ये बदलते. |
05:32 | तुमच्यासाठी एक असाईनमेंट. |
05:34 | Tool box मधून Create circles and ellipses टूल निवडा. |
05:38 | Ctrl की वापरा, कॅनव्हास वर एक वर्तुळ काढा. |
05:42 | ह्याला निळा रंग द्या. |
05:44 | हा माझा वर्तुळ आहे. |
05:46 | आता या वर्तुळामध्ये बदल कसे करायचे ते शिकू. |
05:49 | तुम्ही वर्तुळाची आकृती एक कंस किंवा रेषाखंड मध्ये बदलण्यास Start आणि End पॅरमीटर्स बदलू शकता. |
05:56 | येथे Tool controls bar मध्ये 3 पर्याय आहेत, जे आकृतीमध्ये मध्यभागी जाण्यास मदत करते. |
06:03 | मी Start पॅरमीटरला 100 आणि End पॅरमीटरला -50 शी बदलते. |
06:09 | आपण पाहुया की वर्तुळाची आकृती आता रेषाखंडाच्या आकृतीमध्ये बदलली आहे. |
06:14 | आता मी Arc आइकानवर क्लिक करेल आणि आपण आकृतीमध्ये बदल पाहू. |
06:19 | आपण circle आइकनवर क्लिक करून, वर्तुळाच्या आकृतीला पुन्हा बदलू शकता. |
06:25 | आता, आपल्या canvas वर वर्तुळाची आकृती जवळून पाहू. |
06:30 | आकृती मध्ये 2 चौकोन हॅंडल्स आणि 2 वर्तुळ हॅंडल्स वर लक्ष द्या, ज्याला कंस हॅंडल्स म्हणतात. |
06:37 | 2 चौकोन हॅंडल्सचा वापर वर्तुळाच्या आकृतीला लंबगोल आकृतीमध्ये बदलण्यास केले जाऊ शकते. |
06:44 | ह्या हॅंडल्सना वरती-खाली किंवा डाव्या-उजव्या दिशामध्ये ड्रग करा. |
06:53 | आकृती मध्ये बदल पहा. |
06:56 | 2 कंस हॅंडल्स एक मेकांना ओवरलॅप करतात. कंस हॅंडल वर क्लिक करा आणि ह्याला anti-clockwise मध्ये मूव करा. |
07:04 | आता आपण दोन्ही कंस हॅंडल्स पाहू शकतो. |
07:08 | आपण हे कंस हॅंडल्स वापरुन वर्तुळाची आकृती कंस किंवा रेषाखंडाच्या आकृतीमध्ये बदलू शकतो. |
07:14 | त्यांना clockwise किंवा anti-clockwise दिशांमध्ये मूव करून (हलवून) तसेच आकृती मध्ये बदल पाहू शकता. |
07:24 | आता आपण Tool box मधील आयत टूलवर क्लिक करून नंतर चौकोनवर क्लिक करू. |
07:30 | आकृतीच्या वर उजव्या कोपऱ्यात 2 रीसाइज हॅंडल्स आणि 2 कंस हॅंडल्स पहा. |
07:40 | पूर्वीप्रमाणे, 2 कंस हॅंडल्स एक मेकांवर ओवरलॅप होतात. |
07:43 | कोणत्याही एका कंस हॅंडल वर क्लिक करून clockwise (क्लॉकवाइज़) मूव करा. |
07:48 | आता, आपण दोन्ही कंस हॅंडल्स पाहू शकतो. |
07:51 | आपण हे हॅंडल्स वापरुन चौकोनच्या कडांवर गोल करू शकतो. |
07:56 | त्यांना clockwise किंवा anti-clockwise दिशांमध्ये मूव करून आकृती मध्ये बदल पहा. |
08:02 | आता Tool box मध्ये Stars आणि polygons टूलवर क्लिक करून एक बहुभुजाकृती तयार करू. |
08:08 | हे circle टूलच्या खाली उजव्या बाजूला आहे. तर त्यावर क्लिक करा. |
08:13 | आपण ह्या सारखेच एक बहुभुजाकृती काढू आणि हिरवा रंग देऊ. |
08:20 | डिफॉल्ट रूपात, एक 5 बाजू असलेला बहुभुजाकृती म्हणजे पंचकोन काढला आहे. |
08:24 | Tool controls बारवर पहा. येथे, हे दाखवते की बहुभूजाच्या कोपऱ्यावर संख्या 5 आहे. |
08:32 | तुम्ही संख्या 4 करून चौकोन आणि ह्याला 3 करून त्रिकोण तयार करू शकता. |
08:39 | हे वाढवून, आपण पंचकोन, षटकोन आणि इतर तयार करू शकतो. |
08:44 | बहुभुजाकृती वर रीसाइज हॅंडल पहा. |
08:47 | आपण ह्याचा वापर बहुभुजाकृतीची आकृती बदलणे किंवा रोटेट करण्यास करू शकतो. |
08:52 | Tool controls बार मध्ये, polygon आइकानच्या पुढे star आइकनवर क्लिक करून ह्याला स्टारची आकृती मध्ये बदलू. |
09:00 | एक टिप आणि एक संयुक्त स्टारची आकृती वर 2 हॅंडल्स पहा. |
09:06 | स्टारची आकृती बदलणे किंवा रोटेट करण्यास टिप वर हॅंडल क्लिक आणि ड्रग करा. |
09:12 | आपण इतर हॅंडलचा वापर करून स्टारच्या आकृतीला तिरपा करून बदलू शकतो. |
09:17 | त्यावर क्लिक करा, आणि क्लॉकवाइज़ किंवा एन्टी-क्लॉकवाइज़ दिशांमध्ये मूव करा तसेच आकृती आणि आकारावर लक्ष द्या. |
09:25 | आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात. |
09:30 | आपण Inkscape इंटरफेस बद्दल शिकलो. |
09:34 | आपण मूलभूत आकृती जसे आयत, चौकोन, वर्तुळ, लंबगोल, बहुभुजाकृती आणि स्टार तयार करणे देखील शिकलो. |
09:42 | * हॅंडल्स चा वापर करून आकृत्यांमध्ये बदल करणे आणि रंग भरणे देखील शिकलो. |
09:46 | तुमच्यासाठी असाइनमेंट. |
09:49 | निळ्या रंगासह एक आयतची आकृती तयार करा, |
09:52 | लाल रंगासह एक वर्तुळाची आकृती तयार करा, |
09:54 | हिरव्या रंगात 7 बाजू असलेला स्टार तयार करा. |
09:58 | आपली पूर्ण असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
10:03 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:09 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:13 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:22 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:28 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:32 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:38 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
10:47 | आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:50 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |