Inkscape/C3/Design-a-CD-label/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | Inkscape वापरून CD label ची रचना करण्याच्या पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत- |
00:09 | * CD label टेंप्लेट बनवणे. |
00:11 | * CD label ची रचना करणे. |
00:13 | * फाईल PNG फॉरमॅटमधे सेव्ह करणे. |
00:16 | या पाठासाठी वापरणार आहोत- |
00:18 | * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:21 | * इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:25 | इंकस्केप उघडू. |
00:27 | File खालील Document properties वर क्लिक करा. |
00:32 | Width आणि Height पॅरॅमिटर्स बदलून ते 425 पिक्सेल करा. |
00:37 | डायलॉग बॉक्स बंद करा. |
00:40 | Rectangle टूलच्या सहाय्याने चौरस काढून त्याला लाल रंग द्या. |
00:45 | selector tool वर क्लिक करा. |
00:47 | Tool controls bar वर Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून ते 425 करा. |
00:54 | नंतर Ellipse tool च्या सहाय्याने वर्तुळ काढा. |
00:58 | पुन्हा selector tool वर क्लिक करा. |
01:01 | Tool controls bar वरील Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून ते 425 करा. |
01:07 | वर्तुळ आणि चौरस दोन्ही सिलेक्ट करा. |
01:11 | Object मेनूवर जा. |
01:13 | Align and Distribute वर क्लिक करा. |
01:16 | Relative to साठी Page पर्याय निवडा. |
01:19 | दोन्ही ऑब्जेक्टस मध्यात अलाईन करा. |
01:22 | Path मेनू वर जाऊन Difference पर्याय निवडा. |
01:26 | आणखी एक वर्तुळ काढा. |
01:28 | पुन्हा selector tool वर क्लिक करा. |
01:31 | height आणि width पॅरॅमिटर्स बदलून 85 करा. |
01:35 | Align and Distribute च्या सहाय्याने हे पानाच्या मध्यभागी अलाईन करा. |
01:41 | दोन्ही आकार सिलेक्ट करा. |
01:44 | ही template असल्यामुळे त्याचा रंग बदलून तो पांढरा करू. |
01:49 | त्यामुळे आता हे कदाचित दिसणार नाही. |
01:51 | Layer मेनू खालील Layers वर क्लिक करा. |
01:55 | सध्याच्या लेयरचे नाव बदलून ते CD template असे करा. |
02:00 | अनावधानाने लेयरमधील घटक हलवले जाऊ नयेत म्हणून लेयर Lock करू. |
02:05 | आता आणखी एक लेयर बनवून त्याला CD design असे नाव द्या. |
02:10 | ती CD template लेयरच्या खाली ठेवा. |
02:13 | आपली CD template तयार झाली आहे. |
02:16 | हिचा उपयोग आपण भविष्यात विविध सिडीज बनवण्यासाठी करू शकतो. |
02:20 | फाईल SVG फॉरमॅटमधे सेव्ह करा. |
02:23 | फाईल मेनूखालील Save As वर क्लिक करा. |
02:26 | Desktop वर सेव्ह करू. |
02:29 | फाईलनेम मधे CD template टाईप करून Save वर क्लिक करा. |
02:35 | आता CD design लेयरवर काम करू. |
02:39 | बॅकग्राऊंडची रचना करू. |
02:41 | Rectangle tool च्या सहाय्याने एक चौरस काढा. |
02:46 | रंग पांढरा असल्यामुळे तो दिसणार नाही. |
02:49 | त्याचा रंग फिकट निळा करू. |
02:52 | selector tool वर क्लिक करा. |
02:56 | Width आणि Height चे पॅरॅमिटर्स बदलून 425 करा. |
03:01 | ते मध्यात अलाईन करा. |
03:03 | आपण सीमारेषांमधे background color बघू शकतो. |
03:08 | आता graphic illustration ची रचना करू. |
03:11 | हळूहळू बदलता हिरवा रंग घेऊ. |
03:14 | Bezier टूल घेऊन वक्राकार रेषा काढू. |
03:19 | नंतर Spoken tutorial लोगो इंपोर्ट करू. |
03:23 | लोगो Code files च्या लिंकमधे प्रदान केला आहे. |
03:27 | फाईल मेनूखालील Import वर क्लिक करा. |
03:32 | लोगोचा आकार बदलून तो चित्राच्या वरच्या बाजूला ठेवा. |
03:37 | लोगोच्या उजव्या बाजूला Spoken Tutorial असे टाईप करा. |
03:41 | फाँटचा आकार बदलून 20 करा. |
03:44 | पुढच्या ओळीवर “Partner with us...help bridge the digital divide” हे टाईप करा. |
03:51 | फाँटचा आकार बदलून 8 करा. |
03:54 | CD label च्या खालच्या भागात संपर्काचा तपशील टाईप करू. |
03:59 | मी लिबर ऑफिस रायटरमधे आधीच सेव्ह करून ठेवलेला तपशील कॉपी करणार आहे. |
04:05 | तो येथे खालच्या भागात पेस्ट करा. |
04:08 | "Contact us" हे टेक्स्ट बोल्ड करून ते मध्यात अलाईन करा. |
04:13 | टेक्स्टचा रंग बदलून तो निळा करा. |
04:16 | CD label च्या उजवीकडे काही इमेज समाविष्ट करू. |
04:21 | मी image collage तयार करून Documents फोल्डरमधे सेव्ह केलेला आहे. |
04:26 | तीच इमेज तुमच्या Code Files लिंकवर देखील दिलेली आहे. |
04:30 | इमेज सेव्ह केलेला फोल्डर तपासून पहा. |
04:34 | आता File खालील Import वर क्लिक करून Image1 सिलेक्ट करा. |
04:40 | येथे इमेज इंपोर्ट होईल. तिचा आकार बदला. |
04:48 | ती CD label च्या उजव्या बाजूला ठेवू. |
04:51 | ही फाईल 'SVG' फॉरमॅटमधे सेव्ह करण्यासाठी File खालील Save As वर क्लिक करा. |
04:57 | ST CD label हे फाईलनेम टाईप करून सेव्हवर क्लिक करा. |
05:03 | आपले CD label तयार आहे. |
05:06 | आता फाईल 'PNG' फॉरमॅटमधे export कशी करायची ते पाहू. |
05:10 | File खालील Export Bitmap वर क्लिक करा. |
05:14 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:16 | Export area खालील Page टॅबवर क्लिक करा. |
05:21 | Bitmap size खालील dpi ची व्हॅल्यू बदलून ती 300 करा. |
05:26 | Browse बटणावर क्लिक करा. |
05:29 | फाईल सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप हे लोकेशन निवडू. |
05:33 | फाईलला ST-CD-label असे नाव देऊन Save वर क्लिक करा. |
05:42 | शेवटी Export बटणावर क्लिक करा. |
05:46 | आता डेस्कटॉपवर जाऊन आपली फाईल तपासू. |
05:50 | आपले CD label असे दिसेल. |
05:53 | थोडक्यात, |
05:55 | या पाठात शिकलो: * CD label टेंप्लेट बनवणे. |
06:00 | * CD label ची रचना करणे. |
06:02 | * फाईल 'PNG' फॉरमॅटमधे सेव्ह करणे. |
06:05 | असाईनमेंट- |
06:07 | Inkscape साठी CD label बनवा. |
06:10 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
06:13 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:19 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:27 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा |
06:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:39 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |