LibreOffice-Suite-Draw/C3/Basics-of-Layers-Password-Encryption-PDF/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:28, 14 October 2015 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Basics of Layers and Password Encryption PDF वरील पाठात आपले स्वागत.
00:08 यामधे layers ची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.
00:12 तसेच password encryption च्या सहाय्याने
00:15 Draw फाईल प्रोटेक्ट करणे आणि
00:18 ती PDF मधे Export करणे हे जाणून घेऊ.


00:20 येथे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:30 'Route Map' फाईल उघडा.
00:33 Layers म्हणजे काय?
00:34 Layers हे एकावर एक ठेवलेल्या पारदर्शक कागदाप्रमाणे असतात.
00:40 प्रत्येक ड्रॉ फाईलमधे तीन लेयर्स असतात.
00:43 डिफॉल्ट रूपात लेआऊट लेयर दाखवला जातो.
00:46 बहुतांश ग्राफिक्स आपण येथे बनवतो.
00:50 बटणे आणि फॉर्म्ससारखी कंट्रोल एलिमेंटस संचित करण्यासाठी Control layer चा उपयोग केला जातो.
00:56 किचकट ड्रॉईंगमधे मोजमापाच्या रेषा दाखवण्यासाठी Dimensions layer वापरली जाते.
01:03 उदाहरणार्थ घराच्या नकाशात भिंतींचे अचूक मोजमाप तसेच विजेच्या वायरिंगच्या जागा इत्यादी दाखवण्यासाठी.
01:16 घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारे तीन नकाशे प्रिंट करू.
01:23 त्यांना Map 1, Map 2 आणि Map 3 अशी नावे देऊ.
01:28 Map 1 त्या भागातील सर्व मुख्य स्थळे दाखवेल.
01:32 Map 2 मधे दोन तलाव, स्टेडियम आणि व्यापारी संकुल या व्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
01:40 Map 3 मधे बागेव्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत.
01:45 हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन स्वतंत्र नकाशे बनवणे आवश्यक आहे का?
01:49 गरज नाही. ड्रॉने उपाय म्हणून यावर लेयर्स ही सुविधा प्रदान केली आहे.
01:54 त्यामुळे माहितीच्या अनेक लेयर्स असलेली केवळ एकच मॅप फाईल असेल.
01:59 एका ड्रॉ पेजच्या सहाय्याने लेयर्समधील माहिती एकत्रितपणे बघू शकतो किंवा प्रिंट करू शकतो.
02:06 RouteMap मधे काही लेयर्स समाविष्ट करू.
02:09 Layout layer वर क्लिक करा.
02:11 राईट क्लिक करून Insert layer वर क्लिक करा.


02:15 Insert layer चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:18 “Name” फिल्डमधे टाईप करा: “Layer four”.
02:21 तुमच्या ड्रॉईंगशी संबंधित असलेले कोणतेही टायटल आणि डिस्क्रीप्शन येथे देऊ शकता.
02:26 “Visible” आणि “Printable” हे चेकबॉक्स निवडा.
02:30 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:33 पुन्हा एकदा Layout layer वर क्लिक करा.


02:36 ड्रॉ पेजवरील नकाशा सिलेक्ट करून तो अनग्रुप करा.
02:40 आता Lakes सिलेक्ट करा.
02:43 Shift बटण दाबून Stadium आणि Commercial complex सिलेक्ट करा.
02:48 पुढे राईट क्लिक करून Cut वर क्लिक करा.


02:51 नंतर “Layer four” लेयरवर क्लिक करून ते येथे पेस्ट करा.


02:55 Layout layer वरील त्यांच्या जागांवरच ते या लेयरवरही पेस्ट होतील.
03:00 Layer Four वर पुन्हा क्लिक करा.


03:03 context menu साठी राईट क्लिक करून Modify Layer वर क्लिक करा.


03:08 Modify Layer चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:11 “Visible” चा बॉक्स अनचेक करून OK वर क्लिक करा.


03:14 Layer Four मधील ऑब्जेक्टस आता दिसणार नाहीत.
03:18 ही ऑब्जेक्टस प्रत्यक्षात उपस्थित आहेत. परंतु आपल्याला ती दिसू शकत नाहीत.
03:22 Layout Layer वर क्लिक करा. टॅब दिसत नसल्यास Layout layer चा टॅब दिसेपर्यंत लेफ्ट ऍरोचे बटण दाबून ठेवा.
03:31 आपला Map 2 तयार झाला आहे! अशाप्रकारे Map 3 देखील बनवू शकतो.
03:38 पाठ थांबवून ही असाईनमेंट करा.
03:41 घरापासून शाळेपर्यंत जाणारे दोन मार्ग बनवा.
03:45 RouteMap मधे प्रत्येक मार्ग वेगळ्या लेयरमधे बनवा. त्यामुळे एका मॅपमधे एक मार्ग अशाप्रकारे दोन वेगळे मॅप प्रिंट करता येतील.
03:56 आता ड्रॉ फाईल PDF फाईल म्हणून एक्सपोर्ट कशी करायची आणि ती पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची ते पाहू.
04:04 प्रथम “RouteMap” ही ड्रॉ फाईल 'PDF' फॉरमॅट मधे सेव्ह करू.
04:08 मुख्य मेनूतील File खालील “Export as PDF” वर क्लिक करा.


04:14 PDF डायलॉग बॉक्स उघडेल.
04:15 प्रथम “General” खालील पर्याय सेट करू.
04:18 “General” वर क्लिक करा.


04:20 ड्रॉ फाईलमधील सर्व पाने 'PDF' करण्यासाठी Range खालील All पर्याय निवडा.
04:28 Images खालील “JPEG compression” पर्याय निवडा.
04:32 काँप्रेशनसाठी सर्वसामान्यपणे हाच फॉरमॅट वापरला जातो.
04:36 पुढे Initial View टॅबवर क्लिक करा.
04:39 डायलॉग बॉक्समधे दाखवलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण तशाच ठेवणार आहोत.
04:44 आता Links टॅबवर क्लिक करा.
04:46 आपण ड्रॉ फाईलमधे लिंक्स समाविष्ट केलेल्या असू शकतात.
04:49 Links साठी सेट केलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याच ठेवणार आहोत.
04:53 'PDF' डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला पासवर्ड देऊ.
04:58 त्यासाठी “Security” टॅबवर क्लिक करा.
05:01 Set open password वर क्लिक करा.


05:04 Set open password डायलॉग बॉक्स उघडेल.
05:08 “Password” फिल्डमधे कुठलाही पासवर्ड टाईप करा ज्याने तुम्हाला फाईल प्रोटेक्ट करायची आहे.
05:14 मी “Protect101” पासवर्ड सेट करत आहे.
05:18 Confirm ह्या फिल्डमधे मी “Protect101” हा पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे. OK क्लिक करा.


05:25 पुढे डॉक्युमेंटमधे बदल करण्याची किंवा ते प्रिंट करण्याची परमिशन सेट करू.
05:31 Set permission password वर क्लिक करा.


05:35 Password फिल्डमधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. मी “ProtectAgain0” देत आहे.
05:43 Confirm फिल्डमधे “ProtectAgain0” हा पासवर्ड पुन्हा टाईप करून OK वर क्लिक करा.


05:51 Printing आणि Changes च्या परमिशनचे पर्याय आता ऍक्टिव्ह झाले आहेत.
05:58 आकडे आणि स्पेशल कॅरॅक्टर्स घेऊन तयार केलेला कमीत कमी सहा अक्षरी पासवर्ड सेट करणे कधीही चांगले.
06:08 Printing खालील Not Permitted हा पर्याय निवडा.
06:12 आता योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' ची प्रिंट घेता येऊ शकेल, अन्यथा नाही.
06:19 Changes खालील Not Permitted हा पर्याय निवडा.
06:23 योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' मधे बदल करता येऊ शकतील, अन्यथा नाही.
06:31 आता खालील Export वर क्लिक करा.


06:35 Export डायलॉग बॉक्स उघडेल.
06:37 डाव्या पॅनेलमधे Places खाली जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यावर क्लिक करा. मी Desktop निवडत आहे.
06:47 File type खाली PDF - Portable Document Format वर क्लिक करा.
06:51 Save वर क्लिक करा.


06:55 ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित होऊन ती डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे.
07:00 आता डेस्कटॉपवर जाऊ.
07:03 डेस्कटॉपवर जाऊन 'RouteMap PDF' फाईलवर डबल क्लिक करा.
07:08 Enter password हा डायलॉग बॉक्स उघडेल.
07:11 पासवर्ड फिल्डमधे "Protect111" असा चुकीचा पासवर्ड टाईप करू.
07:17 Unlock Document वर क्लिक करा.
07:20 पासवर्ड फिल्ड रिकामे झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करायला सांगितले जात आहे.
07:29 पासवर्ड फिल्डमधे "Protect101" हा योग्य पासवर्ड द्या.
07:35 Unlock Document वर क्लिक केल्यावर PDF फाईल उघडेल.
07:40 ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करून ती यशस्वीरित्या पासवर्ड प्रोटेक्टेड बनवली आहे.


07:47 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:50 आपण शिकलो- लेयर्सची प्राथमिक माहिती.
07:53 * ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करणे
07:56 * पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे.
08:01 असाईनमेंट.
08:04 RouteMap फाईलची आणखी एक PDF बनवा.
08:06 PDF डायलॉग बॉक्समधे “Initial View” टॅब खालील पर्याय बदला.
08:10 झालेले बदल लक्षात घ्या.
08:12 “User Interface” खालील सर्व पर्याय वापरून बघा.
08:16 permission passwords सेट करा.
08:18 PDF प्रिंट करा.
08:20 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:23 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:26 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:31 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:32 * Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08:36 * परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:39 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:50 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
09:06 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana