BOSS-Linux/C2/Synaptic-Package-Manager/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:01, 7 April 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script:Synaptic Package Manager

Author: Shahid Farooqui

Keywords: Synaptic, Repository, Administrative

Time Narration
00:01 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर कसे वापरावे या स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमधे आपण, बॉस लिनक्स 3.4.2 मध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून अप्लिकेशन्स इनस्टॉल करण्यास शिकणार आहोत.
00:18 मी येथे वापरात आहे.
00:20 बॉस लिनक्स 3.4.2 सह GNOME पर्यावरणाचा डेस्कटॉप .
00:26 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्यासाठी तुम्हाला प्रशासनिक अधिकार असायला हवा.
00:32 तसेच यासाठी इंटरनेटची जोडणी असणे आवश्यक आहे.
00:36 प्रथम आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडूया.
00:41 विंडो मिनीमाइज़ करू. आपण येथे 'बॉस' डेस्कटॉप पाहू शकतो.
00:48 आता Application, System Tools नंतर Administration वर जा.
00:56 आणि नंतर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर क्लिक करा.
01:00 आता, एडमीन पासवर्ड विचारण्यासाठी 'Authentication' डायलॉग बॉक्स दिसेल.
01:06 एडमीन पासवर्ड टाईप करून एंटर दाबूया.
01:11 आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर प्रथमच वापरत असाल तर त्याचा परिचय करून देणारी डायलॉग बॉक्स दिसेल.
01:19 ह्या डायलॉग बॉक्समध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा उपयोग कसा करावा याची माहिती आहे.
01:25 जर आपण प्रॉक्सी नेटवर्कमध्ये काम करत आहात, तर अप्लिकेशन्स किंवा पॅकेज प्रतिष्ठापन करण्यासाठी 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' मध्ये प्रॉक्सी कन्फिगर करा.
01:36 नाहीतर आपण हे प्रॉक्सी कॉन्फिगरेशन सेटिंग टाळू शकतो.
01:41 यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे जाऊया.
01:47 आता सेटींगमधे जाऊन प्रेफरन्सेस वर क्लिक करा.
01:54 प्रेफरन्स विंडोवर अनेक टॅब्ज आहेत.
01:58 प्रॉक्झी सेट्टिंग्स कॉंन्फिगर करण्यासाठी Network टॅब वर क्लिक करा.
02:03 प्रॉक्झी सर्व्हर अंतर्गत दोन पर्याय असतात जसे की - Direct Connection to the internet
02:09 आणि Manual Proxy Configuration
02:12 आपण पाहू शकता मी इथे ‘मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन’ वापरत आहे.
02:17 आपण आपल्या आवडीनुसार पर्याय निवडून Authentication बटणावर क्लिक करा.
02:23 स्क्रीनवर 'HTTP' ऑथेंटिकेशन विंडो दिसेल.
02:28 आवश्यकता भासल्यास 'Username' आणि 'Password' टाईप करून OK बटण वर क्लिक करा.
02:33 आता बदल लागू होण्यासाठी Apply वर क्लिक करा.
02:37 नंतर, विंडो बंद करण्यासाठी OK बटण वर क्लिक करा.
02:42 हे टूल कसे वापरावे हे शिकण्यास उदाहरण म्हणून मी व्ही.एल.सी.प्लेअर इनस्टॉल करत आहे.
02:49 जर आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल, तर आपल्याला पॅकेजेस रीलोड करावी लागतील.
02:57 हे करण्यासाठी टूलबार वरील Reload चे बटण दाबा.
03:02 यासाठी काही सेकंद लागतील.
03:06 येथे इंटरनेटवरून पॅकेजेस स्थलांतरीत आणि अपडेट होताना दिसतात.
03:14 रीलोडींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, टूलबारवर असणाऱ्या 'quick search' बॉक्समध्ये जाऊन vlc (व्ही.एल.सी) असे टाईप करा.
03:23 इथे आपल्याला सर्व पॅकेजेसची यादी मिळेल.
03:28 व्ही.एल.सी. पॅकेजेसच्या पुढील चेक बॉक्स वर क्लिक करा.
03:33 आता मेनूबारमधून Mark for installation हा पर्याय निवडा.
03:39 रीपॉझिटरी पॅकेजेसची यादी दाखवणारा एक डायलॉग बॉक्स दिसेल.
03:45 सर्व संबंधीत आवश्यक पॅकेजेस आपोआप निवडली जाण्यासाठी Mark बटण वर क्लिक करा.
03:51 टूलबारवर जाऊन Apply बटण वर क्लिक करा.
03:56 Install करायच्या सर्व पॅकेजेसचा तपशील दाखवणारी विंडो दिसेल.
04:02 इन्स्टलेशन सुरू करण्यासाठी Apply या बटणावर क्लिक करा.
04:07 पॅकेजेसची संख्या व आकार यानुसार इन्स्टलेशन प्रक्रियेस काही मिनिटांचा अवधी लागेल.
04:16 इन्स्टलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ’डाऊनलोडिंग पॅकेज फाईल’ ची विंडो बंद होईल.
04:25 व्ही.एल.सी. स्थापित झालेले आपल्याला दिसेल.
04:29 ‘सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर’ विंडो बंद करा.
04:33 आता व्ही.एल.सी प्लेअर आपल्या मशीनवर यशस्वीपणे स्थापित झाला आहे का ते पाहू.
04:40 स्क्रीन मिनिमाइज़ करू, यासाठी Applications मधून Sound & Video मध्ये जाऊया.
04:49 इथल्या यादीत आपल्याला 'व्ही.एल.सी. मिडिया प्लेअर' दिसेल.
04:54 अर्थात, 'व्ही.एल.सी' यशस्वीपणे स्थापित झालेला आहे.
04:59 यापद्धतीने 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरून आपण इतर अप्लिकेशन इनस्टॉल करू शकतो.
05:06 थोडक्यात
05:08 आपण या पठात शिकलो-
05:10 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' मध्ये प्रॉक्सी कन्फिगर करणे.
05:14 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरुन अप्लिकेशन किंवा पॅकेज इनस्टॉल करणे.
05:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:24 तो डाउनलोड करून पहा.
05:28 स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि online परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
05:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
05:44 या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट , स्पोकन ट्युटोरियल टीमने योगदान केले आहे.
05:50 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana