LibreOffice-Calc-on-BOSS-Linux/C3/Formulas-and-Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Resources for recording Formulas and Functions
VISUAL CUE | NARRATION |
00:00 | लिबर ऑफीस कॅल्क मधील Formulas and Functions वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण,
कंडिशनल ऑपरेटर, इफ ऑर स्टेटमेंट, बेसिक स्टैटिस्टिक फंक्शन्स, संख्याचे पूर्णन शिकणार आहोत. |
00:19 | इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:30 | आपण बेसिक अरिथ्मेटिक ऑपरेटर्स लागू करणे, जसे बेरीज, वजा करणे आणि डेटा वरील सरासरी बद्दल शिकलो आहोत. |
00:39 | आता काही उपयुक्त ऑपरेटर्स बद्दल शिकुया. |
00:43 | सर्व सामान्य पणे वापरले जाणारे ऑपरेटर्स म्हणजे Conditional Operator. |
00:51 | Conditional Operators, उपयोगकर्ता द्वारे डेटा वर लागू केलेले कंडीशन तपासते. |
00:56 | आणि नंतर बूलीयन मध्ये निकाल प्रदर्शित करते- चुक किंवा बरोबर. |
1:01 | चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडूया. |
1:05 | येथे “Cost” शीर्षका खाली मी काही वस्तूंच्या किंमती सूचीबद्ध केल्या आहेत. |
1:11 | चला त्यावर कंडीशनल ऑपरेटर्स लागू करून निकालचे विश्लेषण करूया. |
1:17 | “B10” उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि त्या आत “Condition Result” टाइप करा. |
1:24 | आता “C10” उल्लेखित सेल वर क्लिक करा. |
1:28 | कंडीशन चा निकाल लागू होऊन या सेल मध्ये दिसत आहे. |
1:33 | लक्ष द्या “House Rent” ची किंमत 6,000 आहे. |
1:38 | “Electricity Bill” ची किंमत 800 आहे. |
1:43 | “House Rent” ची किंमत “Electricity Bill” पेक्षा जास्त आहे. |
1:48 | आपण त्यावर विविध कंडीशन लागू करून निकाल तपासू शकतो. |
1:54 | “C10” उल्लेखित सेल वर क्लिक करा. |
1:57 | या सेल मध्ये, पहिली कंडीशन “is equal to C3 greater than C4 ” टाइप करा आणि Enter की दाबा. |
2:09 | जोपर्यंत सेल C3 मधील वॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त आहे आपल्याला निकाल “TRUE” मिळेल. |
2:18 | आता या कंडीशनल स्टेट्मेंट ला “is equal to C3 less than C4” मध्ये बदलू. |
2:26 | “Enter” दाबा. |
2:28 | आपल्याला निकाल “FALSE” मिळेल. |
2:32 | या प्रमाणे तुम्ही इतर कंडीशनल स्टेट्मेंट लागू करू शकता आणि निकाल चा अभ्यास करू शकता. |
2:38 | मोठ्या प्रमाणात डेटा चे कार्य करताना या स्टेट्मेंट लाभदायक ठरतात. |
2:44 | कंडीशन नुसार जो निकाल TRUE आहे तो प्रिंट करण्यास. |
2:49 | तुम्ही डेटा वर If आणि Or कंडीशन वापरु शकता. |
2:55 | “C10” उल्लेखित सेल वर क्लिक करूया आणि, |
2:59 | “ is equal to IF”आणि कंसात “C3 greater than C4” कॉमा, दुहेरी अवतरण चिन्हात “Positive” कॉमा आणि पुन्हा दुहेरी अवतरण चिन्हात “Negative”. |
3:16 | याचा अर्थ, जर सेल C3 ची वॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त असेल तर “Positive” प्रदर्शित होईल. |
3:25 | किंवा याशिवाय “Negative” प्रदर्शित होईल. |
3:28 | आता “Enter” दाबा. |
3:31 | लक्ष द्या, निकाल “Positive” आहे कारण 6000 रुपये 800 पेक्षा अधिक आहेत. |
3:39 | आता कंडीशन स्टेट्मेंट मध्ये, चला “greater than” ला “less than” मध्ये बदला आणि “Enter” दाबा. |
3:47 | लक्ष द्या, सेल C3 ची वॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त असूनही निकाल आता “Negative” आहे. |
3:57 | जर आपण C3आणि C4 चा डेटा बदलू, तुम्ही हा बदल निकाला मध्ये ही पाहु शकता. |
4:04 | निकाल आता“Negative” प्रदर्शित आहे. |
4:09 | आता सेल C4 ची वॅल्यू वाढवून ती“7000” करून “Enter” दाबा. |
4:17 | निकाल आपोआप “Positive” मध्ये बदलेल. |
4:22 | पुन्हा सेल C4 ची वॅल्यू कमी करून ती 800 करूया. |
4:26 | आणि “Enter” की दाबा. |
4:29 | निकाल पुन्हा आपोआप “Negative” मध्ये बदलेल. |
4:34 | आता केलेले बदल डिलीट करूया. |
4:38 | नंतर काही अरिथ्मेटिक आणि स्टॅटिस्टिक फंक्शन्स शिकुया. |
4:43 | बेसिक अरिथ्मेटिक फंक्शन्स संविष्ट करते,
|
4:57 | आता Sum, Product आणि Quotient फंक्शन्स कार्य तपासण्यास काही क्रिया करू. |
5:05 | प्रथम “Sheet 3” निवडा. |
5:08 | “B1”, “B2” आणि “B3” उल्लेखित सेल च्या आत अनुक्रमे “50”,”100” आणि ”150” नंबर्स प्रविष्ट करा. |
5:19 | “A4” सेल वर क्लिक करा आणि “SUM” टाइप करा. |
5:23 | “B4” सेल वर क्लिक करा. |
5:26 | आपण या सेल मध्ये निकालाची गणना करूया. |
5:30 | “is equal to “SUM” आणि कंसात B1 कॉमा B2 कॉमा B3 टाइप करा. |
5:37 | Enter दाबा. |
5:39 | लक्ष द्या निकाल “300” दाखवत आहे. |
5:43 | या प्रमाणे तुम्ही सेल ची रांग ही प्रविष्ट करू शकता. |
5:47 | “B4” वर पुन्हा क्लिक करा. |
5:49 | आता कंसात B1 कॉमा, B2 कॉमा B3 कॉमा च्या शिवाय B1 कोलन B3 टाइप करा. |
5:58 | Enter दाबा. |
6:00 | पुन्हा एकदा निकाल “300” दाखवत आहे. |
6:03 | आता “A5” सेल वर क्लिक करा आणि “PRODUCT” टाइप करा. |
6:08 | “B5” सेल वर क्लिक करा. |
6:10 | येथे “is equal to “PRODUCT”, आणि कंसात B1 कोलनB3 टाइप करा. |
6:18 | Enter दाबा. |
6:20 | लक्ष द्या निकाल “7,50,000” दाखवत आहे. |
6:26 | आता पाहुया Quotient कशा प्रकारे कार्य करते. |
6:29 | “A6” उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि “QUOTIENT” टाइप करा. |
6:34 | आता “B6” सेल वर क्लिक करा. |
6:37 | आपण निकालाच्या गणनेसाठी हा सेल वापरु. |
6:40 | “is equal to QUOTIENT”, आणि कंसात, B2 कॉमा B1टाइप करा. |
6:47 | Enter दाबा. |
6:49 | तुम्हाला उत्तर 2 मिळेल. कारण “100” भगीले “50” म्हणजे 2. |
6:59 | याप्रमाणे तुम्ही कॅल्क मध्ये अनेक अरित्मॅटिक कार्य करू शकता. |
7:05 | आता स्टॅटिस्टिक फंक्शन्स कार्यान्वित करणे शिकुया. |
7:09 | स्टॅटिस्टिक फंक्शन्स,
|
7:27 | प्रथम शीट 1 वर क्लिक करूया. |
7:30 | पाहुया की कशाप्रकारे स्टॅटिस्टिकल फंक्शन्स चा वापर करून कमीत कमी, जास्तीत जास्त आणि मध्यक किंमत शोधतात. |
7:37 | “C10” उल्लेखित सेल वर क्लिक करा. जेथे आपण उत्तर प्रदर्शित करणार आहोत. |
7:44 | “Cost”,शीर्षका खाली आपल्याकडे फार कमी नोंदी आहेत. |
7:48 | कमीत कमी किंमत 300 रुपये आहे. |
7:51 | जास्तीत जास्त किंमत 6000 आहे. |
7:55 | हे उत्तर प्रदर्शित झाले पाहिजे जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा वापर करतो. |
8:00 | “C10” सेल मध्ये “is equal to MAX” आणि कंसात “C3” colon “C7” टाइप करा. |
8:10 | आता “Enter” की दाबा. |
8:13 | लक्ष द्या, कॉलम मधील जास्तीत जास्त उत्तर “6000” आहे. |
8:20 | आता स्टेट्मेंट्स मधील “MAX” हा शब्द “MIN” मध्ये बदलू. |
8:25 | आणि “Enter” की दाबा. |
8:28 | लक्ष द्या, Cost कॉलम मधील कमीत कमी उत्तर रक्कम 300 आहे. |
8:34 | मध्यक किंमत शोधण्यासाठी, “MIN” शब्दाला “MEDIAN” मध्ये बदला. |
8:40 | आणि “Enter” की दाबा. |
8:43 | उत्तर “800”, दर्शवत आहे जे cost कॉलम मधील मध्यकाची किंमत आहे. |
8:50 | या प्रमाणे तुम्ही, डेटा वर इतर स्टॅटिस्टिकल फंक्शन्स चा वापर करू शकता आणि त्यांचे अनुक्रमे विश्लेषण करू शकता. |
8:58 | या सेल मधील.बदलास डिलीट करूया. |
9:02 | आता संख्यांचे पुर्णंन करणे शिकुया. |
9:05 | “Cost” शीर्षका खाली काही बदल करूया. |
9:09 | आपण
“6000” ला “6000.34” “600” ला “600.4” ”300” ला “300.3” मध्ये बदलुया. |
9:23 | आता “B11” उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि “ROUNDING OFF” शीर्षक टाइप करा. |
9:31 | “C11”उल्लेखित सेल वर क्लिक करा जेथे आपण “Cost शीर्षका खालील वस्तूंची एकूण बेरीज शोधणार आहोत. |
9:39 | C11 सेल मध्ये “is equal to SUM” आणि कंसात “C3” colon “C7” टाइप करा. |
9:49 | आता “Enter” की दाबा. |
9:53 | लक्ष द्या एकूण बेरीज “9701.04” आहे. |
9:59 | आता समजा आपल्याला निकाला मध्ये काही दशांश च्या जागा नको आहेत. |
10:04 | एक उत्तम उपाय म्हणजे उत्तराच्या संखेचा जवळपास ची संख्या घेणे |
10:09 | एकूण बेरीज “9701.04” असलेल्या सेल वर क्लिक करा. |
10:15 | “is equal to ROUND”, टाइप करा “SUM” कंस उघडा आणि पुन्हा कंसात “C3” colon “C7” |
10:25 | कंस पूर्ण करा Enter दाबा. |
10:29 | तुम्ही पहात आहात की, उत्तर आता “9701”, आहे जे “9701.04” संख्याच्या जवळपास आहे. |
10:44 | राउंडिंग ऑफ खालील पूर्ण संख्या किंवा उचत्तर संख्या वर करू शकतो. |
10:52 | उत्तरासह सेल वर क्लिक करा आणि त्यास संपादित करून शब्द “ROUND” ला “ROUNDUP” मध्ये बदला. |
10:59 | आता Enter की दाबा. |
11:02 | तुम्ही पाहत आहात की उत्तर आता “9702”आहे जी वरील उचत्तर पूर्ण संख्या आहे. |
11:10 | खालील पूर्ण संख्या राउंड ऑफ करण्यासाठी “ROUNDUP” शब्दाला “ROUNDDOWN” मध्ये बदला. |
11:17 | आणि “Enter” की दाबा. |
11:19 | उत्तर आता “9701”आहे जी खालील पूर्ण संख्या आहे. |
11:28 | आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” ला तिच्या मूळ स्वरुपात आणण्यासाठी या बदलास अंडू करूया. |
11:37 | हा पाठ येथे संपत आहे. |
11:43 | संक्षिप्त रूपात आपण,
कंडिशनल ऑपरेटर, इफ ऑर स्टेटमेंट, बेसिक स्टॅटिस्टिक फंक्शन्स, संख्याचे पूर्णन शिकलो. |
11:55 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:58 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
12:01 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
12:06 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
12:08 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:11 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
12:15 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
12:21 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
12:26 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
12:34 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
12:37 | spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
12:45 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |