BOSS-Linux/C3/More-on-sed-command/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:22, 19 February 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: More-on-sed-command

Author: Manali Ranade

Keywords: Linux

Time Narration
00:01 More on sed या पाठात आपले स्वागत.
00:06 यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही sed कमांडस जाणून घेऊ.
00:13 ह्या पाठासाठी,
00:15 लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि.
00:20 GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.
00:23 पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या "4" किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:30 तसेच तुम्हाला,
00:33 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:36 "sed" टूलची माहिती असावी.
00:39 संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:45 sed चा मुख्य उपयोग बदल करण्यासाठी होतो.
00:49 इनपुटमधील काही पॅटर्न्स बदलून तेथे दुसरे लिहिणे.
00:54 प्रथम seddemo.txt ही मूळ फाईल पाहू.
01:00 Kumar हा शब्द चौथ्या ओळीत दोनदा आणि सहाव्या ओळीत एकदा आला आहे.
01:10 समजा ‘Kumar’ हा शब्द जितके वेळा आला आहे तो ‘Roy’ ने रिप्लेस करायचा आहे.
01:15 टर्मिनलवर टाईप करा,
01:17 sed space सिंगल कोटसमधे 's front slash / चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
01:39 एंटर दाबा.
01:42 चौथी ओळ बघा.
01:45 Kumar या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून Roy केला गेला. परंतु दुसरा तसाच राहिला.
01:51 सहाव्या ओळीत एकदा आलेला Kumar हा शब्द आता बदलला गेला.
01:57 आपल्याला दिसले की ओळीतील फक्त पहिला उल्लेख बदलला जात आहे.
02:02 कारण की डिफॉल्ट स्वरूपात, पहिला जुळणारा उल्लेख बदलला जातो.
02:10 जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी flag 'g' पर्याय वापरावा लागेल.
02:17 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
02:20 टाईप करा:
sed space सिंगल कोटसमधे 's  front slash चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash g' सिंगल कोट नंतर space seddemo.txt एंटर दाबा 
02:43 आता चौथ्या ओळीवरील दोन्ही एंट्रीज रिप्लेस झाल्या आहेत.
02:47 आपण एकाच वेळी अनेक बदल देखील करू शकतो.
02:52 समजा seddemo.txt फाईलमधे electronics हा शब्द electrical ने
02:57 आणि civil हा metallurgy ने रिप्लेस करायचा आहे.
03:04 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
03:06 टाईप करा:
sed space  hyphen e space सिंगल कोटसमधे 's front slash electronics slash electrical slash g' सिंगल कोट नंतर space hyphen e space  सिंगल कोटसमधे 's  front slash civil slash metallurgy slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt 
03:35 एंटर दाबा.
03:38 शब्द रिप्लेस झालेले दिसतील.
03:41 आता Anirban ची computers ही स्ट्रीम बदलून ती mathematics करायची आहे.
03:49 त्यासाठी टाईप करा:
03:52 sed space सिंगल कोटसमधे 'front slash Anirban slash s slash computers slash mathematics slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:11 एंटर दाबा.
04:13 stream बदललेली दिसेल.
04:17 हे समजून घेऊ.
04:20 त्यासाठी प्रथम sed नंतर सिंगल कोटसमधे जो पॅटर्न मॅच करायचा आहे तो लिहू.
04:27 हा Anirban आहे.
04:29 आता स्लॅश नंतर ऑपरेशन येईल.
04:33 येथे 's' म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे.
04:40 नंतर रिप्लेस करायचा पॅटर्न नमूद केला आहे म्हणजेच computers.
04:46 नंतर ज्याने तो बदलायचा आहे, म्हणजेच येथे mathematics नमूद केले आहे.
04:52 sed कमांडद्वारे फाईलमधे ओळी समाविष्ट करू किंवा पुसून टाकू शकतो.
04:59 समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम electronics नाही.
05:05 त्यासाठी आपल्याकडे d flag आहे.
05:09 टाईप करा:
sed space सिंगल कोटसमधे 'front slash electronics slash d' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt 
05:30 एंटर दाबा.
05:32 फाईलचे घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space nonelectronics.txt
05:41 समजा फाईलच्या सुरूवातीला Student Information ही ओळ समाविष्ट करायची आहे.
05:49 त्यासाठी आपल्याकडे 'i' ही कृती आहे.
05:53 टाईप करा: sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information' कोट नंतर seddemo.txt
06:09 एंटर दाबा.
06:12 आऊटपुट असे दिसेल.
06:14 अशाप्रकारे अनेक ओळी समाविष्ट करू शकतो.
06:19 समजा, आपल्याला दोन ओळी वाढवायच्या असतील तर याच पध्दतीने करू शकतो.
06:25 Student Information च्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक वर्ष वाढवायचे असल्यास,
06:33 त्यासाठी लिहू,
sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information slash n 2013' कोटस नंतर seddemo.txt 
06:54 एंटर दाबा.
06:56 'Information’ आणि ‘2013’ ह्या स्ट्रिंग्जमधे slash n असल्याचे दिसेल.
07:04 slash n मुळे 2013 हे ‘Student Information’ च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल.
07:10 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:14 थोडक्यात,
07:16 या पाठात शिकलो,
07:18 सबस्टिट्युशन
07:19 रिप्लेसमेंट
07:20 आणि समाविष्ट करणे
07:23 असाईनमेंट म्हणून, seddemo.txt हीच फाईल वापरून,
07:29 Ankit हे नाव Ashish नावाने रिप्लेस किंवा सबस्टिट्युट करण्याचा प्रयत्न करा.
07:35 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:53 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:57 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:16 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:28 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana