BOSS-Linux/C3/More-on-grep-command/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: More-on-grep-command
Author: Manali Ranade
Keywords: Linux
Time | Narration
|
---|---|
00:01 | more on grep वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | ह्यामधे शिकणार आहोत, |
00:07 | grepच्या आणखी कमांडस, |
00:10 | आणि उदाहरणे. |
00:13 | या पाठासाठी वापरणार आहोत, |
00:16 | लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि |
00:20 | GNU BASH वर्जन 4.2.24. |
00:23 | ह्या पाठाच्या सरावासाठी GNU bash च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. |
00:29 | तसेच तुम्हाला, |
00:31 | लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान, |
00:35 | grepसंबंधीचे ज्ञान असावे. |
00:37 | संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | आपण एकापेक्षा अधिक पॅटर्न्स देखील जुळवून बघू शकतो . |
00:47 | त्यासाठी hyphen e पर्याय वापरावा लागेल. |
00:52 | मी grepdemo.txt हीच फाईल वापरणार आहे. |
00:57 | समजा civil किंवा electronicsमधे कोण आहे ह्यासंबंधीची माहिती हवी आहे. |
01:04 | टर्मिनलवर टाईप कराः |
01:07 | grep space hyphen e space डबल कोटसमधे electronics कोटस नंतर space hyphen e space डबल कोटसमधे civil कोटस नंतर space grepdemo.txt |
01:22 | एंटर दाबा. |
01:24 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
01:27 | समजा choudhury नावाच्या व्यक्ती शोधायच्या आहेत. |
01:32 | वेगवेगळ्या व्यक्ती नावांचे स्पेलिंग वेगवेगळ्या पध्दतीने करतात. |
01:38 | यावर उपाय काय? |
01:41 | अशा वेळी hyphen e पर्याय hyphen i बरोबर वापरू शकतो. |
01:47 | टाईप करा:
grep space hyphen ie space डबल कोटसमधे chaudhury कोटस नंतर space hyphen ie space डबल कोटसमधे chowdhari कोटस नंतर space grepdemo.txt |
02:11 | एंटर दाबा. |
02:14 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
02:16 | परंतु नावे इतर अनेक पध्दतीने लिहीता येतात. |
02:22 | आपण hyphen e पर्याय किती वेळा वापरू शकतो? |
02:26 | आपल्याला ह्यापेक्षा अधिक चांगली पध्दत हवी आहे आणि ती आहे रेग्युलर एक्सप्रेशन्स. |
02:33 | रेग्युलर एक्सप्रेशन टेक्स्ट स्ट्रिंग्ज जुळवून बघण्याच्या सुटसुटीत आणि लवचिक पध्दती प्रदान करते |
02:41 | विशिष्ट अक्षरे, शब्द किंवा अक्षरांचे पॅटर्न्स. |
02:47 | अक्षरांचे रेग्युलर एक्सप्रेशन्स अनेक आहेत. |
02:51 | आपण एकेक करून बघू. |
02:54 | कॅरॅक्टर क्लास. |
02:56 | हे चौकटी कंसामधे अक्षरांचा संच प्रदान करण्याची परवानगी देते . |
03:03 | या अक्षरांच्या संचामधील एकेक अक्षराशी जुळवून बघितले जाते. |
03:07 | उदाहरणार्थ [abc] चा अर्थ हे रेग्युलर एक्सप्रेशन a किंवा b किंवा c अक्षराशी जुळवून बघितले जाईल. |
03:17 | chaudhury नाव जुळवण्यासाठी प्रॉम्प्टवर टाईप कराः |
03:22 | grep space hyphen i space डबल कोटसमधे ch चौकटी कंस सुरू ao चौकटी कंस पूर्ण चौकटी कंस सुरू uw चौकटी कंस पूर्ण dh चौकटी कंस सुरू ua चौकटी कंस पूर्ण r चौकटी कंस सुरू yi चौकटी कंस पूर्ण डबल कोटस नंतर space grepdemo.txt |
03:53 | एंटर दाबा. |
03:55 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
03:59 | तरी अजून दोनदा e असलेले choudhuree नाव जुळले नाही. |
04:02 | मोठी रेंज नमूद करायची असल्यास आपल्याला लिहावे लागेल: |
04:07 | रेंजमधील पहिले अक्षर dash शेवटचे अक्षर |
04:13 | समजा एखादा अंक जुळवून बघायचा असेल तर [0-9] लिहावे लागेल. |
04:20 | या अक्षरांच्या संचातील एकेक जुळवून बघितले जाते. |
04:24 | Asterisk: asterisk त्याच्या आधीच्या अक्षराची शू्न्य किंवा अधिक वेळा उपस्थिती सुचवतो. |
04:33 | उदाहरणार्थ ab asterisk हे a,ab,abb,abbb इत्यादी बरोबर जुळवून बघेल. |
04:43 | Mira नावाच्या विद्यार्थीनींच्या नावाशी जुळवून बघण्यासाठी |
04:47 | प्रॉम्प्टवर टाईप करा: |
04:50 | grep space hyphen i space डबल कोटसमधे m चौकटी कंस सुरू ei चौकटी कंस पूर्ण asterisk r a a asterisk कोटस नंतर space grepdemo.txt |
05:11 | एंटर दाबा. |
05:13 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
05:16 | dot रेग्युलर एक्सप्रेशन कुठलेही एक अक्षर जुळवून पाहतो. |
05:21 | समजा एखादा Mने सुरू होणारा 4 अक्षरी शब्द शोधायचा आहे. |
05:27 | त्यासाठी टाईप करा, |
05:30 | grep space डबल कोटसमधे M... space कोटस नंतर space grepdemo.txt |
05:43 | एंटर दाबा. |
05:45 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
05:47 | येथे कोटसमधीलspace महत्त्वाची आहे कारण त्यामुळे 5 किंवा अधिक अक्षरांचा शब्द जुळवून पाहिला जाणार आहे. |
05:56 | आपला पॅटर्न शोधण्यासाठी ओळीमधील विशिष्ट भाग देखील नमूद करू शकतो. |
06:01 | तो ओळीच्या सुरूवातीला असू शकतो. |
06:04 | त्यासाठी caret हे चिन्ह आहे. |
06:07 | समजा अशा एंट्रीज हव्या आहेत ज्यांचा roll नंबर A ने सुरू होतो. |
06:13 | फाईलमधे rollहे पहिले फिल्ड आहे. |
06:18 | प्रॉम्प्टवर टाईप करा: grep spaceडबल कोटसमधे caret sign A कोटस नंतर grepdemo.txt |
06:29 | एंटर दाबा. |
06:31 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
06:34 | आपण फाईलच्या शेवटी पॅटर्न जुळवून बघू शकतो. त्यासाठी dollar चे चिन्ह आहे. |
06:40 | 7000 ते 8999 मधील स्टायपेंडस शोधण्यासाठी आपल्याला लिहावे लागेल: |
06:49 | grep space डबल कोटसमधे चौकटी कंस सुरू 78 चौकटी कंस पूर्ण ...dollar sign कोटस नंतर space grepdemo.txt |
07:05 | एंटर दाबा. |
07:07 | अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
07:10 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:13 | थोडक्यात, |
07:15 | या पाठात शिकलो, |
07:17 | एकापेक्षा अधिक पॅटर्न जुळवून बघणे. |
07:20 | वेगवेगळी स्पेलिंग्ज असलेला शब्द तपासणे. |
07:23 | कॅरॅक्टर क्लास. |
07:24 | asterisk चा वापर. |
07:27 | कुठलेही एक कॅरॅक्टर जुळवण्यासाठी dot वापरणे. |
07:31 | फाईलच्या सुरवातीला असलेला पॅटर्न जुळवणे. |
07:35 | फाईलचा शेवटी असलेला पॅटर्न जुळवणे. |
07:39 | असाईनमेंट म्हणून, Y ने सुरू होणा-या आणि 5 अक्षरे असलेल्या एंट्रीजची सूची दाखवा. |
07:46 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:04 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:08 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:26 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |