LibreOffice-Suite-Impress/C2/Printing-a-Presentation-Document/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Printing a Presentation
Author: Manali Ranade
Keywords: Impress
|
|
---|---|
00.00 | इम्प्रेसच्या 'Printing a Presentation' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.06 | यात कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे पर्याय जाणून घेऊ. |
00.11 | 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'. |
00.16 | येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00.25 | अनेकदा प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर लागते. |
00.29 | उदाहरणार्थ प्रेझेंटेशनची कॉपी श्रोत्यांना पुढील संदर्भास द्यायची असते. |
00.35 | प्रथम 'Sample Impress' प्रेझेंटेशन फाईल वर डबल क्लिक करून उघडू. |
00.41 | स्लाईडची प्रिंट घेण्यासाठी 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा. किंवा Ctrl आणि P कीबोर्डवरील बटणे एकत्र दाबा. |
00.50 | 'General' आणि 'Options' टॅबखालील सेटींग्जबद्दल जाणून घेण्यास, |
00.55 | लिबर ऑफिस रायटरमधील 'Viewing and printing documents' ट्युटोरियची मदत घ्या. |
01:02 | 'General' टॅब मधल्या 'Print' खालील 'Document' फिल्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ठ पर्याय उपलब्ध असतात. |
01:09 | यामुळे सोयीच्या फॉरमॅटमध्ये स्लाईडची प्रिंट घेता येते. |
01:15 | 'Slides', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' पैकी आपण 'Slides' पर्याय निवडू. |
01:22 | 'लिबर ऑफिस इम्प्रेस' टॅबवर क्लिक करा. |
01:26 | येथे आपण स्लाईडचा रंग आणि आकार व जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो. |
01.34 | कंटेट्स खाली 'Slide Name', 'Date and Time' आणि 'Hidden Pages' हे निवडूया . |
01:41 | पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव, तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकता. |
01:49 | नंतर कलर खालील 'Greyscale' पर्याय निवडा. |
01:53 | नावाप्रमाणेच स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते. |
02:00 | आणि Size खाली 'Fit to printable page' पर्याय निवडा. लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील इतर पर्याय कशाप्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता. |
02:10 | तुम्हाला ज्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार 'pane layout' टॅबमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. |
02:18 | समजा एकाच पानावर अनेक स्लाईडस् छापायच्या आहेत. |
02:23 | त्यासाठी 'pages per sheet' पर्याय निवडा. Default रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते. |
02:29 | येथे पानाचा छोटा preview दिसत आहे. |
02:33 | ड्रॉप डाऊन ऍरोवर क्लिक करून पानावरील स्लाईडस्ची संख्या निवडा. |
02:39 | दोन संख्या निवडल्यास preview मध्ये आपल्याला दोन स्लाईडस् दिसतील. सहा निवडल्यास सहा दिसतील. |
02:48 | 'Draw a border around each page' पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल. |
02:56 | त्यामुळे पान आकर्षक दिसेल. |
02:59 | 'Brochure' पर्यायामुळे स्लाईड, पुस्तक रूपात प्रिंट करता येतात. त्यामुळे बाईंडिंग करणे सोपे जाते. |
03:06 | सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही. ह्या पर्याया चे कार्य तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या. |
03:14 | 'Option' टॅबमधील कुठलाही चेक बॉक्स निवडलेला नाही ही खात्री करा. |
03:19 | हे चेक बॉक्स विशिष्ट कारणांसाठी दिले आहेत. याची चर्चा पुढे कधीतरी. |
03:25 | आता 'Print' बटणावर क्लिक करा. |
03:28 | तुमचे प्रिंटर योग्य पध्दतीने configure केला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल. |
03:36 | पुढे 'Handouts' पर्यायाबद्दल जाणून घेऊ या. 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा. |
03:41 | आणि 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट फिल्डमधून 'Handouts' पर्याय निवडा. |
03:47 | 'Default' रूपात एका पानावर चार स्लाईड असतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो. या प्रेझेंटेशनसाठी यात बदल करू नये. |
03:58 | लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील 'Size' हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रीय आहे. |
04:05 | ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा स्लाईडस् ची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो. |
04:12 | आता 'Print' बटणावर क्लिक करा. |
04:15 | प्रिंटर 'configure' केला असल्यास छापण्यास सुरूवात होईल. |
04:20 | आता पहिल्या स्लाईडवर जाऊन 'Note' टॅबवर क्लिक करा. |
04:25 | येथे आपण 'This is a sample note' ही तळटीप टाईप करू या. |
04:30 | स्लाईडसच्या तळटीपा प्रिंट करण्यास फाईलवर जाऊन 'Print' निवडा. |
04:35 | 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट फिल्डवर जाऊन 'Notes' पर्याय निवडा. |
04:42 | 'preview' पेज पहा. खालील भागात तुमची तळटीप दिसत आहे. |
04:48 | आता 'Libre Office Impress' टॅब वर क्लिक करा. |
04:52 | लक्षात घ्या 'Notes' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो. |
04:57 | आता 'Print' या बटणावर क्लिक करा. प्रिंटर 'configure' केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल. |
05:05 | प्रेझेंटेशन करताना संदर्भ म्हणून स्लाईडसची रूपरेखा छापण्यासाठी File वर क्लिक करून Print निवडा. |
05:13 | 'General' टॅबमधील 'Print' खालील 'Document' फिल्डवर जाऊन 'Outline पर्याय निवडा. |
05:19 | डावीकडील 'Preview' पेज पहा |
05:28 | आता'Libre Office Impress' टॅबवर क्लिक करा. |
05:32 | लक्षात घ्या 'Outline ' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो. |
05:38 | आता 'Print' बटणावर क्लिक करा. प्रिंटर 'configure' केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल. |
05:47 | या पाठात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले. |
05:52 | 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' |
05:57 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT. नवीन प्रेझेंटेशन तयार करा. |
06:02 | फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा. 'Handout' रूपात पहिल्या चार स्लाईडस् प्रिंट करा. |
06:10 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:16 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:21 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:31 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:38 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:42 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
06:50 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
07:01 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|