BASH/C3/Here-document-and-Here-string/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Arrays-and-functions
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, here document, here strings
Visual Cue | Narration |
00.01 | नमस्कार. HERE document and strings वरील पाठात आपले स्वागत.
|
00.08 | या पाठात शिकणार आहोत, |
00.11 | * विशिष्ट उद्दिष्ट असलेल्या रीडायरेक्शनला Here डॉक्युमेंटस आणि Here स्ट्रिंग्ज म्हणतात. |
00.17 | * हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
|
00.20 | ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00.26 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.(http://www.spoken-tutorial.org) |
00.32 | ह्या पाठासाठी आपण वापरू,
|
00.34 | * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00.39 | * GNU BASH वर्जन 4.2 |
00.42 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00.49 | Here डॉक्युमेंट बद्दल जाणून घेऊ. |
00.52 | * हा विशिष्ट उद्देश असलेला टेक्स्ट किंवा कोडचा ब्लॉक आहे. |
00.56 | * हा एक I/O redirect चा फॉर्म आहे. |
01.00 | * हा इंटरऍक्टिव्ह प्रोग्रॅम किंवा कमांड लाईनला कमांडसची यादी देतो. |
01.06 | * ही स्वतंत्र फाईल म्हणून हाताळली जाऊ शकते. |
01.10 | * हे shell स्क्रिप्टकडे रीडायरेक्ट केलेले अनेक ओळींचे इनपुट म्हणूनही हाताळले जाऊ शकते. |
01.17 | त्याचा सिंटॅक्स, |
01.18 | command space less than less than space HERE. |
01.24 | नंतर पुढील ओळीवर, टेक्स्ट इनपुटस देऊ शकतो. |
01.29 | टेक्स्ट इनपुटस कितीही ओळींचे असू शकते. |
01.33 | येथे text1, text2, textN टेक्स्ट इनपुटस आहेत. |
01.40 | टेक्स्ट इनपुटस नंतर पुढील ओळीवर पुन्हा HERE हा कीवर्ड टाईप केला. |
01.46 | हे HERE डॉक्युमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते. |
01.50 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
|
01.53 | मी here dot sh फाईल उघडत आहे. |
01.59 | कोडमधील पहिली ओळ shebang line आहे. |
02.04 | ह्या ओळीनंतर कोडचा ब्लॉक लिहू. |
02.09 | wc शब्द संख्या दाखवते. |
02.12 | wc हायफन w HERE डॉक्युमेंट मधील शब्द संख्या मोजेल. |
02.20 | दुस-यांदा HERE येईपर्यंत असलेला कोडचा ब्लॉक किंवा टेक्स्ट ही फाईल समजली जाते. |
02.28 | HERE डॉक्युमेंट मधील घटक हे wc हायफन w कमांडसाठी इनपुट आहे. |
02.36 | अनेक ओळींचे इनपुट वाचताना HERE हे wc हायफन w या कमांडसाठी डिलिमीटरचे काम करेल. |
02.47 | हीच कमांड टर्मिनलवर कार्यान्वित करून पाहिल्यास '4' हे आऊटपुट मिळेल. |
02.55 | कारण 'wc हायफन w' कमांड मधे चार शब्द पास केले होते. |
03.03 | फाईल सेव्ह करण्यासाठीSave वर क्लिक करा. |
03.06 | CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
03.15 | टाईप करा: chmod space plus x space here dot sh |
03.22 | एंटर दाबा. |
03.24 | टाईप करा dot slash here dot sh |
03.27 | एंटर दाबा. |
03.30 | आपण 4 हे आऊटपुट बघू शकतो. |
03.33 | म्हणजे Here डॉक्युमेंटमधे शब्दसंख्या 4 आहे. |
03.38 | प्रोग्रॅमवर जा. |
03.41 | येथे टेक्स्टच्या सुरूवातीला आणखी दोन शब्द समाविष्ट करा. |
03.47 | Hello and welcome to Bash learning |
03.52 | Save वर क्लिक करा. |
03.54 | पुन्हा प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
03.57 | टर्मिनलवर टाईप करा dot slash here dot sh |
04.04 | एंटर दाबा. |
04.06 | आता 6 हे आऊटपुट मिळेल कारण टेक्स्टमधे आणखी दोन शब्द समाविष्ट केले होते. |
04.13 | Here डॉक्युमेंटमधे अर्ग्युमेंटही पास करू शकतो.
|
04.18 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
|
04.22 | hereoutput dot sh नावाची फाईल उघडू. |
04.28 | cat कमांड फाईल्स कंकॅटीनेट करेल आणि स्टँडर्ड आऊटपुट प्रिंट करेल. |
04.35 | लक्षात घ्या HEREऐवजी thisस्ट्रिंगचा वापर केला आहे. |
04.41 | नेहमी HERE हे डिलिमीटर वापरणे गरजेचे नसते. |
04.47 | तुम्ही इतरही डिलिमीटर वापरू शकता. |
04.51 | ही ओळ 0th (शून्य क्रमांकाचे) अर्ग्युमेंट दाखवेल. |
04.55 | डिफॉल्ट रूपात 0th (शून्य क्रमांकाचे) अर्ग्युमेंट हे फाईलनेम असते. |
05.00 | ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवेल. |
05.05 | आणि ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवेल. |
05.09 | येथे डॉक्युमेंट thisहेच डिलिमीटर वापरून डॉक्युमेंट पूर्ण केले आहे. |
05.17 | फाईल सेव्ह करा. |
05.18 | प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
05.21 | टर्मिनलवर टाईप करा: chmod space plus x space hereoutput dot sh |
05.29 | एंटर दाबा. |
05.32 | टाईप करा dot slash hereoutput dot sh space Sunday space Monday |
05.40 | असे आऊटपुट मिळेल: |
05.43 | 0'th argument is: dot slash hereoutput dot sh जे फाईलनेम आहे. |
05.49 | 1st argument is: Sunday |
05.51 | 2nd argument is: Monday |
05.55 | आता Here string बद्दल जाणून घेऊ. |
05.59 | * टेक्स्ट किंवा व्हेरिएबलच्या इनपुट रीडायरेक्शनसाठी Here string वापरली जाते. |
06.06 | * इनपुट त्याच ओळीवर सिंगल कोटसमधे नमूद केलेले असते. |
06.12 | सिंटॅक्स असा आहे. command space three less than symbols space सिंगल कोटसमधे लिहा string |
06.22 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
06.25 | here dot sh ही फाईल उघडू. |
06.30 | येथे शेवटी टाईप करा: wc space हायफन w three less than symbols space सिंगल कोटसमधे Welcome to Bash learning |
06.44 | हे कोटसमधील स्ट्रिंग कमांड wc हायफन w कडे रीडायरेक्ट करेल. |
06.52 | केलेले बदल सेव्ह करण्यासाठी Save क्लिक करा. |
06.55 | टर्मिनलवर जा. |
06.58 | टाईप करा: dot slash here dot sh |
07.03 | 6 आणि 4 असे आऊटपुट बघू शकतो. |
07.08 | here डॉक्युमेंटमधे 6 आणि here स्ट्रिंगमधे 4 अशी शब्दसंख्या आहे. |
07.15 | याप्रमाणे तुम्ही स्वतःचे Here स्ट्रिंग लिहू शकता. |
07.20 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07.23 | थोडक्यात,
|
07.25 | पाठात शिकलो, |
07.27 | * HERE डॉक्युमेंट |
07.29 | * HERE स्ट्रिंग |
07.31 | असाईनमेंट म्हणून, स्ट्रिंग अप्पर केसमधे रूपांतरित करा. |
07.36 | * Here डॉक्युमेंट |
07.37 | * Here स्ट्रिंगचा वापर करा |
07.39 | मदत: tr space a हायफन z space capital A हायफन capital Z. |
07.47 | ही कमांड लोअर केसमधील अक्षरे अप्पर केसमधे रूपांतरित करेल. |
07.54 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07.57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.01 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08.06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
08.12 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.17 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
|
08.25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
08.29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08.38 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
08.44 | हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
|
08.50 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. |
08.54 | सहभागासाठी धन्यवाद. |