GChemPaint/C3/Features-of-GChem3D/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Features-of-GChem3D
Author: Manali Ranade
Keywords: Menubar, File types, Model types, Change Background color, Video tutorial
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. Features of GChem3D वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:10 | * मेनू बार |
00:11 | * फाईल टाईप फॉरमॅटस |
00:13 | * विविध मॉडेलचे प्रकार आणि |
00:15 | बॅकग्राऊंडचे रंग बदलणे. |
00:18 | आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04, |
00:24 | GChemPaint वर्जन 0.12.10 आणि |
00:29 | GChem3D वर्जन 0.12.10 वापरू. |
00:34 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला GchemPaint ची माहिती असावी. |
00:38 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:44 | GChemPaint ची नवी विंडो उघडली आहे. |
00:47 | Templates च्या ड्रॉपडाऊनच्या सहाय्याने, |
00:49 | डिस्प्ले एरियावर Adenosine ची रचना उघडू. |
00:53 | फाईल save करण्यासाठी टूलबारवरील Save च्या आयकॉनवर क्लिक करा. |
00:58 | Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:02 | फाईल GChem3D मधे बघण्यासाठी .mol, .mdl आणि .pdb ह्यासारख्या फाईल फॉरमॅटमधे save करावी लागते. |
01:11 | Adenosine.pdb असे फाईलनेम टाईप करा. |
01:15 | फाईल डेस्कटॉपवर save करण्यासाठी Desktop वर क्लिक करा. |
01:18 | Save वर क्लिक करा. |
01:21 | GChemPaint विंडो बंद करू. |
01:25 | आता GChem3D अॅप्लिकेशनबद्दल जाणून घेऊ. |
01:29 | GChem3D हे GChemPaint चे युटिलिटी सॉफ्टवेअर, |
01:34 | Synaptic Package Manager द्वारे इन्स्टॉल करता येते. |
01:38 | Synaptic Package Manager वर जा. |
01:40 | Quick filter box मधे gchempaint टाईप करा. |
01:44 | GChemPaint युटिलिटीजच्या पूर्ण इन्स्टॉलेशनसाठी gcu-plugin, libgcu-dbg आणि gcu-bin इन्स्टॉल करा. |
01:55 | आपण ह्या फाईल्स आधीच इन्स्टॉल केलेल्या आहेत. |
01:59 | GChem3d ही रेणूची त्रिमितीय रचना दाखवणारी युटिलिटी आहे. |
02:04 | हे GchemPaint चे युटिलिटी फीचर आहे. |
02:07 | GChemPaint मधे काढलेल्या रचना GChem3D मधे बघता येऊ शकतात. |
02:12 | GChem3D उघडण्यासाठी Dash Home वर क्लिक करा. |
02:15 | सर्चबारमधे gchem3d टाईप करा. |
02:20 | Molecules viewer च्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:24 | GChem3d Viewer विंडोमधे मेनूबार आणि डिस्प्ले एरिया यांचा समावेश असतो. |
02:30 | मेनूबारमधे GChem3D सोबत काम करण्यासाठी लागणा-या सर्व कमांडसचा समावेश असतो. |
02:36 | डिस्प्ले एरिया उघडलेल्या फाईलचे घटक दाखवते. |
02:40 | फाईल उघडण्यासाठी File मेनूमधील Open वर क्लिक करा. |
02:46 | Open चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:49 | जी फाईल उघडायची आहे ती सिलेक्ट करा. |
02:52 | डेस्कटॉपवरील Adenosine.pdb ही फाईल सिलेक्ट करा. |
02:57 | आता Open वर क्लिक करा. |
02:59 | डिस्प्ले एरियावर फाईल दाखवली जाईल. |
03:02 | व्ह्यू इमेज म्हणून save कसे करायचे ते पाहू. |
03:05 | File वर क्लिक करा. Save As Image वर जा. |
03:10 | Save as image डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:12 | खाली Width आणि Height ही पॅरॅमीटर्स दिसतील. |
03:17 | डिफॉल्ट रूपात इमेजच्या आकारात Width' 300 pixels आणि Height 300 pixels आहे. |
03:24 | तुम्ही स्क्रोलरच्या सहाय्याने ह्या व्हॅल्यूज वाढवू किंवा कमी करू शकता. |
03:29 | आता फाईल टाईपचे पर्याय पाहू. |
03:31 | GChem3D विविध फाईल फॉरमॅट्सना सपोर्ट करते. |
03:35 | VRML, PDF, PNG इत्यादी फाईल टाईप्स ड्रॉपडाऊनच्या सूचीत उपलब्ध आहेत. |
03:45 | फाईल टाईप नमूद केलेला नसल्यास, GChem3d फाईलनेमवरून फाईल टाईप शोधण्याचा प्रयत्न करते. |
03:52 | अयशस्वी झाल्यास, डिफॉल्ट रूपात VRML हा फाईल टाईप वापरला जातो. |
03:58 | रचना VRML ह्या फाईल फॉरमॅटमधे save करू. |
04:03 | VRML document हा पर्याय निवडा. |
04:07 | फाईलला Adenosine असे नाव द्या. |
04:11 | फाईल डेस्कटॉपवर save करण्यासाठी Desktop वर क्लिक करा. |
04:14 | Save वर क्लिक करा. |
04:17 | आता VRML फाईल टाईपबद्दल सविस्तर जाणून घेऊ. |
04:22 | VRML हा टेक्स्ट फाईल फॉरमॅट आहे. ज्याचे एक्सटेन्शन .wrl आहे. |
04:28 | 'vertices', 'edges', 'surface color' यासारख्या 3D बहुभुजाकृतीच्या प्रॉपर्टीज देता येतात. |
04:35 | VRML फाईल्स gzip ने कॉम्प्रेस केलेल्या प्लेन टेक्स्ट फाईल असतात. |
04:40 | 3D मॉडेलिंग प्रोग्रॅम्स यात ऑब्जेक्टस आणि दृश्ये save करतात. |
04:45 | save केलेली फाईल उघडू. |
04:48 | Adenosine.wrl ह्या फाईलवर राईट क्लिक करा. Open with Text Editor हा पर्याय निवडा. |
04:55 | टेक्स्ट एडिटर, रचनेसंबंधीची तपशीलवार माहिती दाखवतो. |
05:01 | आता Page Setup बद्दल जाणून घेऊ. |
05:04 | GChem3d प्रिंट करताना 300 dpi रेझोल्युशन वापरते. |
05:09 | ह्याच्या Page Setup प्रॉपर्टीज GchemPaint प्रमाणेच आहेत. |
05:14 | आपण हे GChemPaint वरील पाठात आधीच जाणून घेतले आहे. |
05:19 | ही विंडो बंद करू. |
05:21 | आता View मेनूवर जाऊ. |
05:25 | View मेनू सिलेक्ट करा. |
05:27 | GChem3D चार मॉडेल टाईपचे प्रकार वापरून रेणू दाखवते: |
05:32 | * Balls and sticks * Space filling |
05:35 | * Cylinders आणि * Wireframe. |
05:39 | Balls and sticks हे डिफॉल्ट मॉडेल आहे. |
05:42 | Multiple bond आणि बंधाची योग्य जागा या मॉडेलद्वारे दिसू शकते. |
05:48 | Space Filling वर क्लिक केल्यावर तुम्हाला फरक दिसेल. |
05:53 | Space Filling रेणूचे संक्षिप्त रूप दाखवते. |
05:58 | Cylinders मॉडेल cylindrical pipes च्या रूपात रचना दाखवते. |
06:03 | Wireframe मॉडेल skeletal म्हणजेच सांगाडारूपी रचना दाखवते. |
06:08 | आता Balls and sticks वर जाऊ. |
06:11 | आता बॅकग्राऊंडच्या रंगाबद्दल जाणून घेऊ. |
06:14 | डिफॉल्ट रूपात बॅकग्राऊंडचा रंग काळा असतो. |
06:17 | View मेनूतील, Background color निवडा. |
06:21 | सबमेनू उघडेल. |
06:23 | सबमेनूच्या शेवटी असलेले Custom color सिलेक्ट करा. |
06:26 | Background color विंडो उघडेल. |
06:30 | ह्या विंडोमधे पसंतीचा रंग निवडण्यासाठी विविध फिल्डस आहेत. |
06:35 | Hueद्वारे बॅकग्राऊंडचा रंग बदलू शकतो. |
06:39 | स्क्रोलवर क्लिक करा. व्हॅल्यूजमधील बदल आणि रंगाच्या वर्तुळात होणा-या हालचाली पहा. |
06:45 | Saturation द्वारे आपण रंगाची तीव्रता बदलू शकतो. |
06:51 | Value द्वारे RGB combination बदलून एकाच रंगाच्या विविध छटा मिळवू शकतो. |
06:59 | येथे Preview box आहे आणि त्याच्यापुढे eyedropper चा आयकॉन आहे. |
07:04 | eyedropper आयकॉनवर क्लिक करा. |
07:07 | तुमच्या पसंतीचा रंग निवडण्यासाठी रंगाच्या वर्तुळावर कुठेही क्लिक करा. |
07:11 | Ok वर क्लिक करा. स्क्रीनवर बॅकग्राऊंडचा रंग बदललेला दिसेल. |
07:18 | थोडक्यात, |
07:20 | या पाठात शिकलो, |
07:23 | विविध मेनू |
07:24 | फाईल टाईप फॉरमॅटस |
07:26 | मॉडेलचे प्रकार आणि बॅकग्राऊंडचा रंग बदलणे. |
07:30 | असाईनमेंट. |
07:33 | 1. GChemPaint मधून Saccharide लोड करा आणि फाईल .mdl फॉरमॅटमधे save करा. |
07:39 | 2. Molecules viewer मधे रचना उघडा. |
07:42 | 3. इमेज PNG आणि PDF ह्या फाईल टाईप्समधे Save करा. |
07:46 | 4. विविध बॅकग्राऊंड रंग वापरून बघा. |
07:49 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:53 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:06 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:17 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:22 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:29 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |