Digital-Divide/D0/How-to-buy-the-train-ticket/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | ऑनलाईन रेल्वे बुकिंग' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत “आयआरसीटीसीवर तिकीट कसे निवडावे.” |
00:13 | प्रवासासाठी क्षेत्र निवडणे. |
00:16 | ट्रेन(रेल्वे) आणि प्रवासाचा वर्ग निवडणे. |
00:19 | वापरकर्त्याची माहिती दाखल करणे आणि ई-तिकीट की आय-तिकीट ते ठरवणे. |
00:24 | पहिल्यांदाच डेबिट कार्ड कसे वापरावे आणि ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यासाठी ह्याचा कसा वापर करावा हे देखील मी दाखवेन. |
00:32 | तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक; |
00:36 | एटिएम कार्डासहित असलेले बँकेतील खाते |
00:39 | ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते, |
00:43 | क्रेडिट कार्ड |
00:44 | आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक |
00:48 | मी खालील पद्धत निवडत आहे; |
00:50 | माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे. |
00:53 | हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे. |
00:56 | मग आता तिकीट विकत घेऊ. |
00:59 | मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल. |
01:12 | समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. SURAशब्द टाईप करून वाट पाहेन. |
01:26 | प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे. |
01:28 | स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी |
01:35 | भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले. |
01:47 | मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general |
01:55 | ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन; |
01:59 | मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत. |
02:02 | मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा. |
02:08 | मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन. |
02:11 | जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो, |
02:15 | समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे. |
02:19 | आता मी बघते की दुसर्या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two s' |
02:24 | मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे. |
02:29 | ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे. |
02:34 | तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.” |
02:44 | तर समजा मला बांद्रा टर्मिनस निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते . |
02:57 - | ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती – विंडो सीट निवडतो. |
03:12 | आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले . |
03:22 | आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. |
03:31 | ५८ वर्षावरील स्त्रिया आणि ६० वर्षावरील पुरुषांना ज्येष्ट नागरिक मानले जाईल. |
03:39 | ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे सवलती आहेत. |
03:41 | तर मी परत male, window seatवर जाते . |
03;45 | ह्याबद्दल मला कोणतीही काळजी नाही, मला फक्त ही प्रतिमा 'E37745A' एंटर करायची आहे. |
03:58 | आता मी go दाबते. |
04.03 | ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९ |
04:11 | आता मला पेमेंट करायचे आहे, चला मी ह्यावर क्लिक करते. |
04:20 | माझ्याकडे पुढीलपैकी काहीही असू शकते. |
04:22 | माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते. |
04:29 | बर्याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे. |
04:38 | मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही. |
04:46 | पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड असल्यास इथे क्लिक करा. |
04:55 | म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते. |
05:09 | त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे. तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो. |
05:16 | मी हे 'Visa Master निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार 'Visa आहे. |
05:23 | मी माझ्याकडील एटीएम कार्डावरील नंबर दाखवणार नाही. |
05:27 | तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. |
05:39 | जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील. |
05:44 | पुढे आपली 'स्वाक्षरी', ही माहिती दाखल केल्यानंतर मला Buy बटण दाबावे लागेल. |
05:52 | मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला. |
05:57 | मला 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक' प्रविष्ट करणे आवश्यक आहे. |
06:04 | ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी. |
06:09 | मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता. |
06:14 | मी हे सर्व प्रविष्ट करेन पण मला आपल्याला हे दाखवायचे आहे, |
06:21 | ज्या क्षणी मी हे केले त्याचवेळी मला पुढील संदेश आला. |
06:26 | मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे. |
06:36 | मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल. |
06:45 | आपण फक्त एकदाच हा पासवर्ड तयार करणार आहोत हे लक्षात ठेवा. |
06:48 | आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते. |
07:00 | मला संदेश आला अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”. |
07:06 | लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते. |
07:13 | प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे. |
07:21 | आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे. |
07:29 | आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ. |
07:36 | मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे? |
07:39 | आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता. |
07:42 | प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल. |
07:47 | प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे. |
07:51 | आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही. |
07:53 | तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत. |
07:58 | मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे. |
08:03 | विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात. |
08:07 | ही पद्धत 'क्रेडिट कार्ड, 'ऑनलाइन बँक व्यवहार यांसाठी समान आहे. |
08:14 | पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे. |
08:20 | खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी |
08:23 | पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो. |
08:31 | पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट खरेदी कसे करावे. |
08:36 | प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता. |
08:41 | एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही. |
08:48 | आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता. |
08:51 | आपल्याला प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा' आवश्यक आहे, मात्र, |
08:55 | आय- तिकीटाबाबतीत तो कुरिअर ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत. |
09:03 | पोस्टाने वितरणासाठी आपल्याकडे २-३ दिवस हवेत. |
09:07 | वितरण सर्व शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध नाही. |
09:11 | तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते. |
09:15 | आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही. |
09:21 | ओळख पुरावा काय असतो? |
09:22 | कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते; |
09:26 | पॅन कार्ड |
09:27 | निवडणूक कार्ड |
09:28 | वाहन चालक परवाना |
09:29 | किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते. |
09:33 | मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे. |
09:41 | आता आपण स्लाइड्सवर परत जाऊया, |
09:43 | इथे सवलतीचे दर उपलब्ध आहेत. |
09:46 | आतमध्ये यादी दिली आहे. चला आता आपण या साईटला भेट देऊया. |
09:55 | मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते. |
10:01 | वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे. |
10:09 | प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे . |
10:15 | जर आपण ई-तिकिट बुक केले असेल तर प्रवासादरम्यान काय बाळगावे लागेल? तुमच्या स्मार्ट फोनमधील "ई-कॉपी" किंवा "प्रिंट आऊट", "ओळख पुरवा" ह्यापैकी काहीही एक तिकीटाचा पुरावा म्हणून चालेल. |
10:29 | किंवा आय-तिकीट घ्या. |
10:32 | आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही. |
10:37 | माझ्याकडे तुमच्यासाठी खालीलपैकी उपयोगी टीपा आहेत. |
10:40 | कृपया आगाऊ बुकींग करा. |
10:42 | प्रवासाची शक्यता कमी असेल तरी सुदधा बुक करा. |
10:46 | आपण ते कधीही रद्द करू शकता. आपण ते रद्द केले तर काही पैसे गमावू तथापि |
10:51 | तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे. |
10:55 | आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही. |
10:57 | ज्यावेळेस आयआरसीटीसी वेबसाईट जलद गतीने काम करत आहे त्यावेळेस आरक्षण करा. |
11.01 | सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते. |
11:06 | आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा. |
11:10 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया. |
11:18 | मागील बुकींग कशी पहावी. |
11:20 | पीएनआर स्थिती कशी पहावी. |
11:23 | आणि तिकिट कसे रद्द करावे. |
11:25 | मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन. |
11:28 | http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा. |
11:35 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:38 | जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:43 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम |
11:45 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:54 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.58 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:03 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:12 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. |
12:15 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद. |